<

 सामान्यकाळातील ३३ वा रविवार 

१९नोव्हेंबर २०२३

ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल; 

So take the talent from him and give it to him who has the ten talents.


तर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते. 

Then you ought to have invested my money with the bankers, and at my coming I should have received what was my own with interest.


 देवाने दिलेल्या देणग्यांचा, कलेचा आणि कौशल्याचा योग्य तो वापर करुन सद्गुणी स्त्री आपले कुटुंब सांभळते. आपल्या शेजोळातील माणसांबरोबर तिचे संबंध सलोख्याचे असतात. सद्गुणी स्त्रीचे व्यक्तिमत्व सर्वांसमोर आदर्शवत आहे. परमेश्वराने प्रत्येक माणसाला योग्य त्या देणग्या देऊन त्यानुसार जबाबदारीने कार्यक्षम बनण्यासाठी ह्या जगात पाठविले आहे. देवाचे हे दान व्यर्थ घालविण्यासाठी, स्वार्थासाठी किंवा| लपवून ठेवण्यासाठी नाही तर ते उघडपणे स्वतःबरोबरच इतरांचे जीवन फुल विण्यासाठी आणि देवाच्या गौरवासाठी आहे. आपण आपल्या जीवनावर चिंतन करु या.


✝️             

पहिले वाचन : नीतिसूत्रे ३१:१०- १३.१९-२०.३०-३१
वाचक :नीतिसूत्रे या पुस्तकातून घेतलेले वाचन
'सद्गुणी स्त्री आनंदाने आपल्या हातांनी काम करते." 

सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते ? तिचे मोल मोत्याहून अधिक आहे.
तिच्या पतीचे मन तिच्यावर विश्वास ठेवते, त्याला संपत्तीची वाण पडत नाही.ती आमरण त्याचे हित करते, अहित करत नाही. ती लोकर व ताग खटपटीने मिळवते आणि आनंदाने आपल्या हातांनी काम करते.ती आपल्या हाती चाती घेते, ती हातांनी चरखा धरते.ती गरिबांसाठी मूठ उघडते, गरजवंतास हात देते, सौंदर्य भुलवणारे आहे आणि लावण्य व्यर्थ आहे. परंतु परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. तिच्या हातचे श्रमफळ तिला लाभू द्या, तिच्या कृत्यांमुळे भर वेशीत तिची प्रशंसा होवो.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Proverbs 31:10-13, 19-20, 30-31

An excellent wife who can find? She is far more precious than jewels. The heart of her husband trusts in her, and he will have no lack of gain. She does him good, and not harm, all the days of her life. She seeks wool and flax, and works with willing hands. She puts her hands to the distaff, and her hands hold the spindle. She opens her hand to the poor and reaches out her hands to the needy. Charm is deceitful, and beauty is vain, but a woman who fears the Lord is to be praised. Give her of the fruit of her hands, and let her works praise her in the gates.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  १२८:१-५
प्रतिसाद :  जे परमेश्वराचे भय धरतात ते धन्य !

१ जे परमेश्वराचे भय धरतात, 
जे प्रभूच्या मार्गानी चालतात ते धन्य ! 
तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, 
तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल.

२ तुझ्या माजघरात तुझी पत्नी सफळ
 द्राक्षवेलीसारखी होईल, 
तुझ्या मेजासभोवती तुझी मुले जैतुनाच्या
रोपासारखी होतील.

३ पाहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या मनुष्याला
असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सियोनातून
 तुला आशीर्वाद देवो आणि 
तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस 
येरुशलेमचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो.


fruitful vine in the heart of your house; your children like shoots of the olive around your table. R

Indeed thus shall be blessed the man who fears the Lord. May the Lord bless you from Sion. May you see Jerusalem prosper all the days of your life!


दुसरे वाचन   थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र ५:१-६
वाचक : पौलचे थेस्सलनिकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"प्रभूच्या दिवसाने तुम्हांला चोरासारखे गाठू नये."

बंधूनो, काळ आणि समय ह्यांविषयी तुम्हांला काही लिहिण्याची गरज नाही. कारण तुम्हांला स्वतःला पक्के माहीत आहे की, जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो. “शांती आहे, निर्भय आहे" असे ते म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो आणि ते निभावणारच नाहीत. बंधुजनहो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हांला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा आणि दिवसाची प्रजा आहा, आपण रात्रीचे आणि अंधाराचे नाही. ह्यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे आणि सावध राहावे.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद

Second Reading 1 Thessalonians 5:1-6

Concerning the times and the seasons, brothers, you have no need to have anything written to you. For you yourselves are fully aware that the day of the Lord will come like a thief in the night. While people are saying, "There is peace and security", then sudden destruction will come upon them as labour pains come upon a pregnant woman, and they will not escape. But you are not in darkness, brothers, for that day to surprise you like a thief. For you are all children of light, children of the day. We are not of the night or of the darkness. So then let us not sleep, as others do, but let us keep awake and be sober.
This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
तुम्ही मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहाण्यास समर्थ
व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. 
  आलेलुया!

Acclamation: Abide in me, and I in you, says the Lord; whoever abides in me bears much fruit.


शुभवर्तमान मत्तय २५: १४-३०
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  
“तू लहानश्या गोष्टीत विश्वासू राहिलास तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो."

येशूने आपल्या शिष्यांना एक दाखला सांगितलाः “ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या नोकरांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे स्वर्गाचे राज्य आहे. त्याने एकाला पाच हजार शेकेल, एकाला दोन हजार आणि एकाला एक हजार असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लगेच जाऊन त्यांवर व्यापार केला आणि आणखी पाच हजार मिळवले. तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्याने आणखी दोन हजार मिळवले. परंतु ज्याला एक हजार मिळाले होते त्याने जमीन खणली आणि तिच्यात आपल्या धन्याचा पैसा लपवून ठेवला. मग बराच काळ लोटल्यावर त्या नोकरांचा धनी आला आणि त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला. तेव्हा ज्याला पाच हजार मिळाले होते तो आणखी पाच हजार आणून म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर पाच हजार शेकेल सोपवून दिले होते. पाहा, त्यांवर मी आणखी पाच हजार शेकेल मिळवले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, “शाब्बास, भल्या आणि विश्वासू नोकरा ! तू लहानश्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक 
करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो." मग ज्याला दोन हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर दोन हजार शेकेल सोपवून दिले होते. पाहा, त्यांवर मी आणखी दोन हजार शेकेल मिळवले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, "शाब्बास भल्या आणि विश्वासू नोकरा, तू लहानश्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.”
 नंतर ज्याला एक हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर माणूस आहा, जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता आणि जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता, म्हणून मी भ्यालो आणि तुमचे हजार शेकेल मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते, पाहा, ते तुमचे तुम्हांला मिळाले आहेत. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, “अरे दुष्ट आणि आळशी नोकरा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो आणि पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो हे तुला ठाऊक होते काय ? तर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते. तर ते हजार शेकेल त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार शेकेल आहेत त्याला दया. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल; परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल. ह्या निरुपयोगी नोकराला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे आणि दातखाणे चालेल."
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Matthew 25:14-30

At that time: Jesus told his disciples this parable: "It will be like a man going on a journey, who called his servants and entrusted to them his property. To one he gave five talents, to another two, to another one, to each according to his ability. Then he went away. He who had received the five talents went at once and traded with them, and he made five talents more. So also he who had the two talents made two talents more. But he who had received the one talent went and dug in the ground and hid his master's money. Now after a long time the master of those servants came and settled accounts with them. And he who had received the five talents came forward, bringing five talents more, saying 'Master, you delivered to me five talents; here, I have made five talents more. His master said to him, 'Well done, good and faithful servant. You have been faithful over a little; I will set you over much. Enter into the joy of your master. And he also who had the two  talents came forward, saying, 'Master, you delivered to me two talents; here, I have madetwo talents more. His master said to him, Well done, good and faithful servant, You have been faithful over a little; I will set you over much. Enter into the joy of your master. He also who had received the one talent came forward, saying, 'Master, I knew you to be a hard man, reaping where you did not sow, and gathering where you scattered no seed, so I was afraid, and I went and hid your talent in the ground. Here, you have what is yours. "But his master answered him, 'You wicked and slothful servant! You knew that I reap where I have not sown and gather where I scattered no seed? Then you ought to have invested my money with the bankers, and at my coming I should have received what was my own with interest. So take the talent from him and give it to him who has the ten talents. For to everyone who has will more be given, and he will have an abundance. But from the one who has not, even what he has will be taken away. And cast the worthless servant into the outer darkness. In that place there will be weeping and gnashing of teeth?
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन:  संत डॉन बॉस्को ह्यांच्या मते, "तुम्ही जर आळसाला आजचा दिवस दिला तर त्याने उद्याचा दिवस तुमच्याकडून चोरलाच म्हणून समजा." आळस हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे. हे जग लोकांच्या उद्योगशीलतेवर व कष्टाळूपणावर चाललेले आहे. बालपणी एक कविता होती : "गणपत वाणी बिती पिताना म्हणावयाचा, याद जागेवर बांधीन भी माही. गणपत वाणी पितानाव मरून गेला. अशी मानवी स्वप्ने हवेत विरून जात उद्योगी माणसाला नवनवी स्वप्ने पडतात. ती तो पूर्ण करतो आणि स्वप्नपूर्तीचा आनंद लुटीत आगी नवनवी शिखरे चढत जातो. आजच्या उपासनेतील वाचने त्या दृष्टीने तीन विचार मांडतात 
१. सद्गुणी त्रीचा आदर्श: नीतिसूत्रे पुस्तकात सद्गुणी सीची २२ गुणवैषिष्ट सांगण्यात आलेली आहेत. इंग्रजीत जशी २६ मुळाक्षरे तशी हिब्रू भाषेत २२ मुळाक्षरे आहेत. प्रत्येक मुळाक्षरागणिक एक सद्गुण देण्यात आलेला आहे. त्यात लोकर व ताग खटपटीने मिळविणे, आनंदाने काम करणे, लवकर उठून कामाला लागणे, रात्रंदिन काम करणे, अशाने तिला श्रमफळ लाभते व देशीत तिची प्रशंसा होते. 
२. प्रकाशाची प्रजा होण्यास आमंत्रण: "रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येणार आहे." असा इशारा देऊन संत पौल थेस्सलनीका येथील लोकांना प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा होण्यासाठी आमंत्रण देतो. रात्र, अंधार, झोप ही प्रतिके वापरून त्याने कंटाळा, आळस व ऐषाराम ह्यांचा निषेध केलेला आहे. 
३. चांगले व विश्वासू दास होण्यास पाचारण शुभवर्तमानातील दाखल्यात पहिल्या दोन दासांनी काबाडकष्ट करून आपल्या हातातील भांडवल दुप्पट केले. तर तिसऱ्या दासाने निमित्त सांगून निष्क्रिय राहणे पसंत केले. त्यामुळे पहिल्या दोन दासांना शाबासकी तर मिळालीच परंतु त्यांना आणखी काम करण्याची संधी मिळाली. "आळशी व दुष्ट" अशा शब्दांत तिसन्या दासावा न्याय करून त्याला कठोर शिक्षा करण्यात आली. आळशी माणूस परिस्थितीपुढे हात टेकतो तर उद्योगी माणसापुढे परिस्थिती देखील गुडघे टेकते. 
आत्मपरीक्षण उद्योगशीलता हा प्रभूच्या येण्याची तयारी करण्याचा उत्तम मार्ग आहे हे मला मनोमन पटलेले आहे का ? उद्योगशीलतेमुळे मी आत्तापर्यंत काय काय प्राप्त करू शकलेलो आहे ? आळसामुळेमाझी कोणकोणती कामे विनाकारण लांबणीवर पडलेली आहेत ?


प्रार्थना : हे प्रभू येशू तुझे विश्वासु, कर्तदक्ष व एकनिष्ठ अनुयायी बनण्यास व फलदायी जीवन जगण्यास आम्हाला कृपा दे, आमेन

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️