First Reading : First Samuel 26: 2, 7-9, 12-13, 22-23
Saul arose, and went down to the wilderness of Ziph, having with him three thousand chosen men of Israel, to seek David in the wilderness of Ziph. So David and Abisai came to the people by night, and found Saul lying and sleeping in the tent, and his spear fixed in the ground at his head: and Abner and the people sleeping round about him. And Abisai said to David: God hath shut up thy enemy this day into thy hands: now then I will run him through with my spear even to the earth at once, and there shall be no need of a second time. And David said to Abisai: Kill him not: for who shall put forth his hand against the Lord’s anointed, and shall be guiltless?
So David took the spear, and the cup of water which was at Saul’s head, and they went away: and no man saw it, or knew it, or awaked, but they were all asleep, for a deep sleep from the Lord was fallen upon them. And when David was gone over to the other side. and stood on the top of the hill afar off, and a good space was between them, And David answering, said: Behold the king’s spear: let one of the king’s servants come over and fetch it. And the Lord will reward every one according to his justice, and his faithfulness: for the Lord hath delivered thee this day into my hand, and I would not put forth my hand against the Lord’s anointed.
This is the word of God
प्रतिसाद स्तोत्र स्तोत्र १०३:१-४,८१०,१२-१३
प्रतिसाद : परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे.
१ ) हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे,
हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद दे.
हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे,
त्याचे सर्व उपकार विसरु नकोस.
२) तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो,
तो तुझे सर्व आजार बरे करतो,
तो तुझा जीव विनाशगर्तेतून वाचवतो,
तो तुला दया आणि करुणा ह्यांचा मुकूट घालतो.
३) परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे,
तो मंदक्रोध आणि दयामय आहे.
आमच्या पापांच्या मानाने त्याने
आम्हाला शासन केले नाही त्याने
आमच्या दुष्कृत्याच्या मानाने
आम्हाला प्रतिफळ दिले नाही.
४) पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे,
तितके त्याने आमचे अपराध
आमच्यापासून दूर केले आहेत.
जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो,
तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करतो.
Psalm:Psalms 103: 1-2, 3-4, 8, 10, 12-13
R. (8a) The Lord is kind and merciful.
1 Bless the Lord, O my soul: and let all that is within me bless his holy name.
2 Bless the Lord, O my soul, and never forget all he hath done for thee.
R. The Lord is kind and merciful.
3 Who forgiveth all thy iniquities: who healeth all thy diseases.
4 Who redeemeth thy life from destruction: who crowneth thee with mercy and compassion.
R. The Lord is kind and merciful.
8 The Lord is compassionate and merciful: longsuffering and plenteous in mercy.
10 He hath not dealt with us according to our sins: nor rewarded us according to our iniquities.
R. The Lord is kind and merciful.
12 As far as the east is from the west, so far hath he removed our iniquities from us.
13 As a father hath compassion on his children, so hath the Lord compassion on them that fear him:
R. The Lord is kind and merciful.
दुसरे वाचन १करिंथ १५:४५-४९
वाचक: पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
“जो मातीचा त्याचे प्रतिरूप आपण धारण केले आहे; तर जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप आपणधारण करू.
पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला. शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही; प्राणमय ते प्रथम, मग जे आध्यात्मिक ते. पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गातून आहे. तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहेत आणि तो स्वर्गातला जसा आहे तसेच जे स्वर्गातले तेही आहेत आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
Second Reading:
First Corinthians 15: 45-49
The first man Adam was made into a living soul; the last Adam into a quickening spirit. Yet that was not first which is spiritual, but that which is natural; afterwards that which is spiritual. The first man was of the earth, earthly: the second man, from heaven, heavenly. Such as is the earthly, such also are the earthly: and such as is the heavenly, such also are they that are heavenly. Therefore as we have borne the image of the earthly, let us bear also the image of the heavenly.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो ! स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव!
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
I give you a new commandment, says the Lord: love one another as I have loved you.
Alleluia, alleluia.
शुभवर्तमान लूक ६:२७-३८
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.'
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "तुम्हा ऐकणाऱ्यांना मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा, जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमची निर्भर्त्सना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जो तुझ्या एका गालावर मारतो, त्याच्यापुढे दुसराही गाल कर आणि जो तुझा अंगरखा हिरावून घेतो त्याला तुझी बंडीही घेऊन जाण्यास विरोध करू नको. जो कोणी तुझ्याजवळ मागतो त्याला दे आणि जो तुझे काही हिरावून घेतो त्याच्यापाशी ते परत मागू नको. लोकांनी तुम्हाशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा. जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकही आपणावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात. जे तुमचे बरे करतात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकार तो काय ? पापी लोकही तसेच करतात. ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यांस तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचा उपकार तो काय ? जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोकही पापी लोकांना उसने देतात. तुम्ही तर आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल; कारण तो कृतघ्न आणि दुर्जन ह्यांच्यावरही उपकार करणारा आहे. जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही; कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरवणार नाही; क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल; द्या म्हणजे तुम्हांला दिले जाईल; चांगले माप दाबून, हलवून आणि शीग भरून तुमच्या पदरी घालतील, कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.