सामान्य काळातील ६वा सप्ताह
शुक्रवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२५
कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जिवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ ?
For what shall it profit a man, if he gain the whole world, and suffer the loss of his soul?
येशूने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, “जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला क्रूस उचलून घ्यावा आणि मला अनुसरत राहावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता आणि सुवार्तेकरिता आपल्या जिवाला मुकेल तो त्याला वाचवील. कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जिवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ ? किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल ? ह्या व्यभिचारी आणि पापी पिढीमध्ये ज्या कोणाला माझी आणि माझ्या वचनांची लाज वाटेल, त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूतांसहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल तेव्हा त्यालाही वाटेल."आणखी तो त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचित सांगतो की, येथे उभे असणाऱ्यांपैकी काहीजण असे आहेत की, देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.