Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading |Saturday 22nd February 2025 | 6th Week in Ordinary Time

सामान्य काळातील ६वा    सप्ताह  

शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी  २०२५

✝️ 
  शिमोन पेत्रने उत्तर दिले, "आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा.”
Simon Peter replied, "You are the Christ, the Son of the living God."



संत पीटरचे आसन
- (चौथे शतक)

✝️
प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पृथ्वीतलावरील प्रेषितकार्यात बारा प्रेषितांना निवडून घेतले होते. त्यातल्या बारांपैकी पेत्र, याकोब आणि योहान ह्या तिघांना त्याने आपल्या अंतर्वर्तुळात स्थान दिले होते. महत्त्वाच्या प्रसंगी तो खास ह्या तिघांना आपणासोबत घेऊन जात असे. मग तो प्रसंग आनंदाचा असो (याईराची कन्या मृतांतून पुन्हा जिवंत करणे) दुःखाचा असो (गेथशेमनी बागेतील यातनामय प्रार्थना) वा गौरवाचा असो (पर्वतावरील येशूचे वैभवशाली रुपांतर). त्यातही पेत्रला त्याने इतरांपेक्षा अधिक महत्त्वाची जबाबदारी दिलेली होती.
प्रभू येशू ख्रिस्ताचे ईश्वरी रुप ओळखून “तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात” अशी कबुली देणाऱ्या पेत्रला येशू म्हणतो, “आणखी मी तुला सांगतो तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या किल्ल्या देईन. जे काही तू पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तू पृथ्वीवर मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल” (मत्तय १६ : १८-१९). अशा प्रकारे खुद्द येशूने पेत्रला इतर प्रेषितांवरच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीवरच्या ख्रिस्तसभेवर अधिकार दिला. जगभरची ख्रिस्तसभा पेत्रला प्रथम पोप म्हणून गौरविते.
परमगुरू म्हणून पेत्रचा हा स्मृतिसोहळा साजरा करून ख्रिस्तसभा सन्मानित करते. इ. स. ४९-५० साली येरूशलेम येथे जी प्रथम विश्वपरिषद भरली त्यात पेत्रने इतर शिष्यांना व (संत) पौलसारख्या सुवार्तिकांना अमोल मार्गदर्शन केले. (प्रे. कृ. १५). त्यावेळी त्याने जे आसन वापरले त्याचा विशेष सन्मान आजच्या सणाच्या दिवशी केला जातो. त्या आसनाला “कॅथेड्रा पेट्रीय” असे नाव आहे.व्हॅटिकनच्या प्राचीन महामंदिरात (संत पीटर बॅसिलिका) दोन आसने होती. एक मार्बल लादी वापरून तयार केलेले, ज्यावर पोपमहाशय बसून आपल्या सहकारी कार्डिनल्ससह चर्चा विनिमय करून "बिनचूक" विधाने करीत असतात. दुसरे आसन पहिल्या शतकाच्या मध्यकाळात म्हणजे इ. स. ५०-६० मध्ये विशेष लोकप्रिय आणि आदरणीय ठरलेले होते.
हे दुसरे आसन अजूनही जतन करून ठेवण्यात आले आहे. बर्निनी नावाच्या कलावंताने तयार केलेल्या ब्राँझच्या भव्य पेटीकेमध्ये ते ठेवण्यात आले आहे. हे आसन ओकच्या वृक्षापासून तयार केलेले आहे. किड्यांनी पोखरले गेल्यामुळे आता त्याच्यावर हस्तिदंती मुलामा चढविण्यात आलेला आहे. इ. स. १८६७ साली संत पीटरच्या अठराव्या हौतात्म्य शताब्दीनिमित्ताने ते रोम शहरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
संत पीटरच्या आसनाचा सन्मान हा ख्रिस्तसभेतील परमगुरूंच्या स्थानाचा सन्मान आहे. त्यांच्यासाठी दररोजच्या मिस्सामध्ये प्रार्थना करून विश्वव्यापी ख्रिस्तसभेचे ऐक्य व्यक्त केले जाते.
महागुरुस्वामी व धर्मगुरुंना मिळालेल्या अधिकाराचा वापर आपल्या सर्वांच्या भलेपणासाठीच असतो ह्याची आपण जाणीव ठेवू या.

आपण सर्वजण सामान्यजन आहोत तरी सुद्धा प्रभू येशूने आपल्या सर्वांना सुवार्ता प्रसारासाठी जबाबदारी दिलेली आहे. ख्रिस्तसभेच्या सर्व आज्ञांचे पालन करुन सर्व पवित्र संस्कारांचा आदर सन्मान करु या.

✝️   

पहिले वाचन १पेत्र  ५:१-४
वाचक :प्रेत्रचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"मी तुमच्याप्रमाणेच वडील आणि ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी आहे.' 
तुम्हातील वडिलांना, मी तुमच्याप्रमाणेच वडील, ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी आणि प्रकट होणाऱ्या गौरवाचा वाटेकरी तो मी असा बोध करतो. तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करा, करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा. सोपवलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर तुमच्या हाती कळपाला आदर्श व्हा. मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल.
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
1 Peter 5:1-4
Beloved: So I exhort the elders among you, as a fellow elder and a witness of the sufferings of Christ, as well as a partaker in the glory that is going to be revealed: shepherd the flock of God that is among you, exercising oversight, not under compulsion, but willingly, as God would have you; not for shameful gain, but eagerly; not domineering over those in your charge, but being examples to the flock. And when the chief Shepherd appears, you will receive the unfading crown of glory.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र   २३ : १-६
प्रतिसाद :  परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही.
१)परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, 
मला काही उणे पडणार नाही.
तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो.
तो मला संथ पाण्यावर नेतो, 
तो माझा जीवन ताजातवाना करतो.

२) तो आपल्या नामासाठी मला नीतिमार्गाने चालवतो. 
मृत्युछायेच्या दरीतूनही मी जात असलो 
तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. 
कारण तू माझ्याबरोबर आहेस, 
तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात.

३) तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस. 
तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस, 
माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे.

४.) खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस 
मला कल्याण आणि दया ही लाभतील. 
परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन


Psalm 23:1-3a, 3b-4, 5, 6 ( 1)
The Lord is my shepherd; there is nothing I shall want.

The Lord is my shepherd; 
there is nothing I shall want. 
Fresh and green are the pastures 
where he gives me repose. 
Near restful waters he leads me;
 he revives my soul. R 

He guides me along the right path, 
for the sake of his name. 
Though I should walk in the valley 
of the shadow of death,
no evil would I fear, for you are with me.R

 Your crook and your staff will give me comfort.
You have prepared a table before me in the sight of my foes.
My head you have anointed with oil; 
my cup is overflowing. R 

Surely goodness and mercy shall follow me
all the days of my life. 
In the Lord's own house shall I dwell 
for length of days unending. R

जयघोष  
तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी स्थापीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही.

Acclamation: 
You are Peter, and on this rock I will build my Church, and the gates of Hades shall not prevail against it.


शुभवर्तमान मत्तय  १६:१३-१९ 
वाचक :संत मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तू पेत्र आहेस आणि मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन."
फिलिप्पाच्या कैसरीयाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, "मनुष्याच्या पुत्राला लोक काय म्हणून म्हणतात?” ते म्हणाले, "कोणी स्नानसंस्कार करणारा योहान, कोणी एलीया, कोणी यिर्मया, किंवा संदेष्टयातील कोणी एक, असे म्हणतात." तो त्यांना म्हणाला, "पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?" शिमोन पेत्रने उत्तर दिले, "आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा.” येशूने त्याला म्हटले, "शिमोन बार्योना, धन्य तुझी! कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी स्थापीन आणि तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल."शावरून पश्चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Mathew 16:13-19
At that time: When when Jesus came into the district of Caesarea Philippi, he asked his disciples, "Who do people say that the Son of Man is?" And they said, "Some say John the Baptist, others say Elijah, and others Jeremiah or one of the prophets." He said to them, "But who do you say that I am?" Simon Peter replied, "You are the Christ, the Son of the living God." And Jesus answered him, "Blessed are you, Simon Bar-Jonah! For flesh and blood has not revealed this to you, but my Father who is in heaven. And I tell you, you are Peter, and on this rock I will build my church, and the gates of hell shall not prevail against it. I will give you the keys of the kingdom of heaven, and whatever you bind on earth shall be bound in heaven, and whatever you loose on earth shall be loosed in heaven."
  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतन:आज आपण "चेअर ऑफ सेंट पीटर" हा सण साजरा करीत आहोत. 'चेअर' ह्या शब्दासाठी 'कथिड्रा' हा लॅटिन शब्द वापरण्यात आला आहे, ज्यावरून 'कथिड्रल' हा शब्द अस्तित्वात आला. प्राचीन परंपरेनुसार रोमचे बिशप, म्हणजे पोप रोमच्या कथिड्रलमध्ये (लॅटरन कथिड्रल) कथिड्रावर बसतात आणि प्रेषित पेत्राच्या उत्तराधिकाराच्या अखंड साखळीने जोडले जातात. अशा प्रकारे पोप प्रतिकात्मकरित्या संत पीटरच्या खुर्चीत बसतात. पोप संत पीटरचे उत्तराधिकारी म्हणून ख्रिस्तामधील संपूर्ण चर्चच्या ऐक्याचे हमीदार बनतात. कॅथलिक परंपरेनुसार हे ऐक्य जपण्याची जबाबदारी प्रभू येशूने संत पीटरवर सोपवली होती. आजच्या शुभवर्तमानानुसार प्रभू येशू जाहीर करतो की, "तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी स्थापीन." विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सन्मानाकडे 'पॉवर प्ले' म्हणून कधीच पाहिले गेले नाही, तर त्याकडे सेवेच्या दृष्टिकोनातून पाहाण्यात आले आहे. स्वतःच्या उल्लेख करताना "मी सेवकांचा सेवक" म्हणून पोप महोदय अस्मादिकांचा उल्लेख करतात. म्हणूनच पेत्र आणि त्याच्या वारसदारांना मिळालेला सन्मान हा नेहमीच मेंढपाळाच्या प्रतिमेशी जोडला गेला आहे. मेंढपाळ कसा असावा? मेंढपाळ म्हणून उत्तम मेंढपाळ ख्रिस्त ह्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या हाती सोपवलेल्या लोकांवर धनीपणाने नव्हे, तर कळपाला आदर्श असा सेवामय मेंढपाळ होणे गरजेचे आहे. (वाचा संत योहानकृत शुभवर्तमान, अध्याय १०).
प्रार्थना :  हे प्रभू येशू, परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी व धर्मगुरुस्वामी ह्या सर्वांना चांगले आरोग्य बहाल कर, त्यांच्या पवित्र कार्यावर तुझा आशीर्वाद घाल, आमेन.
✝️