Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading |Wednesday 26th February 2025 | 7th Week in Ordinary Time

सामान्य काळातील ७वा  सप्ताह  

बुधवार  दिनांक २६ फेब्रुवारी  २०२५

✝️ 
 कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे.
 For he that is not against you, is for you.

संत मेखतिल्ड
(कुमारिका १२४०-१२९८)
✝️
प्रभू येशूच्या अतिपवित्र हृदयाची भक्ती करणाऱ्या काही भक्तिमान व नीतिमान संत स्त्रियामध्ये संत गुर्टुडबरोबर संत मेखतिल्ड हिचा क्रमांक खूप वरचा लागतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने एकदा संत मेखतिल्ड हिला म्हटले, “सकाळी जेव्हा तू जागी होशील तेव्हा तुझ्या मुखाद्वारे तू प्रथम माझ्या अतिपवित्र हृदयाला वंदन कर आणि स्वतःला माझ्या हाती सोपव." "
चिंतन: प्रभू येशूने मेखतिल्ड हिला दिलेल्या दृष्टांतात एकदा म्हटले होते, 'जेव्हा लोक माझ्याकडून मोठमोठ्या गोष्टींची अपेक्षा करतात तेव्हा मला आनंद होतो. त्यांच्या अपेक्षेपेक्षा मी त्यांना अधिक देण्यास सदैव तयार असतो.'
✝️
नम्रतेचे जीवन जगणे सोपे नाही त्यासाठी आपल्याठायी धैर्य व आत्मबलिदान करण्याची तयारी असावी लागते. जीवन जगण्यासाठी चिकाटी आणि एकाग्रता असावी लागते. आज आपण लहान बाळकांचे निरीक्षण करुन त्यांचे चांगले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करु या.
✝️   

पहिले वाचन बेन सिरा ४:११-१९
वाचक : बेन सिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"ज्यांना ज्ञान प्रिय आहे त्यांच्यावर देव प्रेम करतो."

ज्ञान आपल्या पुत्रांचा उद्धार करते आणि जे ज्ञानाचा शोध करतात त्यांना ते मदत करते.
ज्ञानावर प्रेम करणे म्हणजे जीवनावर प्रेम करणे होय, जे त्याचा सुरवातीपासून शोध घेतात ते सर्वदा आनंदी होतात.
जो ज्ञानाला चिकटून राहतो त्याचा सन्मान होईल आणि ज्ञान जेथे शिरकाव करील ती जागा परमेश्वर आशीर्वादित करील.
जे ज्ञानाची सेवा करतात ते परमेश्वराची सेवा करतात; ज्यांना ज्ञान प्रिय आहे त्यांच्यावर देव प्रेम करतो.
जो कोणी ज्ञानाच्या आज्ञेत राहील तो लोकांचा न्याय करण्यास पात्र ठरेल आणि जो ज्ञानाच्या मार्गाने चालेल तो सुरक्षित राहील. ज्याचा ज्ञानावर विश्वास आहे त्याला ते प्राप्त होईल आणि त्याच्या वंशजांकडे ते राहील.
प्रथम ज्ञान त्याला अपरिचित असते. नंतर त्यांच्यात भीती निर्माण करते. ज्ञान आपल्या शिस्तीने आपली खात्री पटेपर्यंत त्याची परीक्षा घेते, आपल्या अनुशासनाने ते त्याची पारख करते.
त्यांनतर ते सरळ त्याच्याकडे येते आणि त्याला सुखी करून आपले रहस्य प्रकट करते. त्याने ज्ञानाला अव्हेरले तर ते त्याचा त्याग करते आणि त्याला नाश करणाऱ्यांच्या हाती सोपवते.
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
: Sirach 4: 11-19
Wisdom inspireth life into her children, and protecteth them that seek after her, and will go before them in the way of justice. And he that loveth her, loveth life: and they that watch for her, shall embrace her sweetness.They that hold her fast, shall inherit life: and whithersoever she entereth, God will give a blessing. They that serve her, shall be servants to the holy one: and God loveth them that love her. He that hearkeneth to her, shall judge nations: and he that looketh upon her, shall remain secure. If he trust to her, he shall inherit her, and his generation shall be in assurance. For she walketh with him in temptation, and at the first she chooseth him. She will bring upon him fear and dread and trial: and she will scourge him with the affliction of her discipline, till she try him by her laws, and trust his soul. Then she will strengthen him, and make a straight way to him, and give him joy,And will disclose her secrets to him, and will heap upon him treasures of knowledge and understanding of justice. But if he go astray, she will forsake him, and deliver him into the hands of his enemy.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र  ११८:१६५.१६८,१७१-१७२,१७४-१७५
प्रतिसाद : हे देवा, तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांठायी शांती असते.

१ तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांठायी शांती असते, 
त्यांना अडखळण्याचे कारण नाही. मी तुझे आदेश 
आणि तुझे निर्बंध पाळतो, कारण माझा सर्व वर्तनक्रम तुझ्यापुढे आहे.

२ तू मला आपले नियम शिकवतोस म्हणून 
माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो. 
माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो, 
कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत.

३ माझा जीव वाचव म्हणजे मी तुझी स्तुती करीन. 
तुझे निर्णय मला सहाय्य करोत. हे परमेश्वरा, 
तुझ्या सहाय्याची मी उत्कंठतेने वाट पाहात आहे, 
तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे.

 Psalms 119: 165, 168, 171, 172, 174, 175
R. (165a) O Lord, great peace have they who love your law.

165 Much peace have they that love thy law, 
and to them there is no stumbling block.
R. O Lord, great peace have they who love your law.

168 I have kept thy commandments and thy testimonies:
 because all my ways are in thy sight.
R. O Lord, great peace have they who love your law.

171 My lips shall utter a hymn, 
when thou shalt teach me thy justifications.
R. O Lord, great peace have they who love your law.

172 My tongue shall pronounce thy word: 
because all thy commandments are justice.
R. O Lord, great peace have they who love your law.

174 I have longed for thy salvation, O Lord; 
and thy law is my meditation.
R. O Lord, great peace have they who love your law.

175 My soul shall live and shall praise thee: 
and thy judgments shall help me.
R. O Lord, great peace have they who love your law.


जयघोष  
आलेलुया, आलेलुया ! 
हे प्रभो, माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या धर्मशास्त्रातील अलौकिक गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
 आलेलुया!
Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
 I am the way and the truth and the life, says the Lord; no one comes to the Father except through me.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  मार्क ९:३८-४०
वाचक :  मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे."
योहान येशूला म्हणाला, "गुरुजी आपला अनुयायी नसलेल्या कोणा एकाला आम्ही आपल्या नावाने भुते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मना केले, कारण तो आपला अनुयायी नव्हता," पण येशू म्हणाला, "त्याला मना करू नका, कारण जो माझ्या नावाने महत्कृत्ये करून लागलीच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही. कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Mark 9: 38-40
John answered him, saying: Master, we saw one casting out devils in thy name, who followeth not us, and we forbade him. But Jesus said: Do not forbid him. For there is no man that doth a miracle in my name, and can soon speak ill of me.
 For he that is not against you, is for you.
  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतन:प्रभू येशूच्या नावाने कार्य करणारा त्याला अनुकूलच आहे, म्हणून अशा व्यक्तीला सत्कार्य करण्यास मना करू नका. आजच्या शुभवर्तमानातील योहानची तक्रार दर्शवते की, येशूच्या नावाने कार्य करणाऱ्या व्यक्तीबद्दल योहान आणि इतर शिष्यांना त्यांचा हेवा वाटतो आणि ते त्याला तसे करण्यापासून थांबवू इच्छितात. योहान आणि शिष्य ह्यांची वागणूक आपल्यामध्ये आपणांस पाहावयास मिळते का? बऱ्याच वेळेला आपण देखील योहानसारखे वागतो. आपल्यापेक्षा कोणी जास्त चांगले कार्य करीत असेल किंवा आपल्यापेक्षा इतर कोणाची जास्त सन्मार्गावर प्रगती झाली तर आपणांस त्याचा हेवा का वाटावा? इतरांच्या सत्कार्यामध्ये आपण नम्रपणे त्यांना सहकार्य करतो की, आक्रमकपणे त्यांच्याशी स्पर्धा करतो? आजच्या पहिल्या वाचनानुसार देवाचे शहाणपण ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण शहाणपणच आपला उद्धार करते. जे ज्ञानाची सेवा करतात ते पवित्र देवाची सेवा करतात. आजच्या वाचनांतून आपण "ज्ञान आणि न्यायाचे आकलन" ह्या दोन्ही गोष्टींचा शोध घेऊ शकतो.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला शरण येण्यास व तुजवर प्रेम करुन तुझी सुवार्ता पसरविण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
✝️