Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | 4th Sunday of the Lent | 30th March 2025 |

(उपवासकाळ ४था  रविवार)

 दि. ३० मार्च  २०२५

✝️ 


तो दूर आहे तोच त्याच्या वडिलांनी त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला.

And when he was yet a great way off, his father saw him, and was moved with compassion, 

✝️ 

 "बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे."

✝️


देवाचे प्रेम, देवाची दया आणि देवाची कृपा किती महान आहे, हे दर्शविण्यासाठी आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूने दिलेल्या दृष्टांतावर आपण चिंतन करु या. देव दयाळू आणि क्षमाशील आहे परंतु  माणसाने पश्चात्ताप करणे  गरजेचे आहे. पश्चात्तापी माणसाबद्दल स्वर्गात आनंद होतो असे आपल्याला सांगितले आहे.  आज अनेक माणसे आपल्या स्वकीयांपासून विभक्त होऊन जीवनात खूप काही हरवल्याचा अनुभव घेत आहेत. असहाय्य परिस्थितीत असताना  मुलाला बापाची  आठवण आली आणि तो शुद्धीवर आला. त्याने पश्चात्ताप करुन मागे फिरण्याचा व आपल्या बापाकडे येण्याचा निर्णय घेतला. त्या क्षणालाच त्याचे परिवर्तन| झाले. बाप तर हरवलेल्या मुलाची परतण्याची वाट पाहातच होता. बापाने  आनंदाने त्याचे स्वागत केले बापाने तर त्याबद्दल आनंद जल्लोष करीत मेजवानी दिली. पश्चात्ताप, परिवर्तन व समेट ह्याचे सुंदर उदाहरण असलेला हा दाखला सर्वांनाच प्रेरणादायी ठरावा. जीवनात मार्ग चुकलेली, देवापासून बहकलेली व आज्ञा गमावून बसलेल्या सर्वांना आज प्रभू येशू पश्चात्ताप करण्यासाठी आवाहन करीत आहे. ह्या प्रायश्चित्तकाळात आपण देवाकडे परतवळू या. देवाबरोबर व आपल्या बंधु-भगिनींबरोबर समेट करुन देवाला अपेक्षित आनंदी जीवन जगण्यासाठी देवाकडे प्रेरणा मागू या.

✝️   
पहिले वाचन  यहोशवा   ५:९-१२
वाचक  : यहोशवा या पुस्तकातून घेतलेले वाचन
“वतनभूमीत प्रवेश केल्यानंतर इस्राएली लोक वल्हांडणाचा सण पाळतात."
परमेश्वरा यहोशवाला म्हणाला, “इजिप्तचे लोक तुमचा उपहास करीत असत तो आज मी तुम्हांपासून दूर केला आहे." इस्राएल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरिहोजवळच्या मैदानात चतुर्दशीस संध्याकाळी वल्हांडण सण केला. वल्हांडण सणाच्या दुसऱ्या दिवशी त्या देशात उत्पन्न झालेल्या धान्याची बेखमीर भाकर आणि हुरडा त्यांनी खाल्ला. ज्या दिवशी त्यांनी त्या देशातील धान्य खाल्ले त्याच दिवशी मान्त्रा बंद झाला; तो पुन्हा इस्राएल लोकांना मिळाला नाही. त्या वर्षी त्यांनी कनान देशातले उत्पन्न खाल्ले.
प्रभूचा शब्द  
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :  
: Joshua 5: 9a, 10-12
The Lord said to Josue: This day have I taken away from you the reproach of Egypt.And the children of Israel abode in Galgal, and they kept the phase on the fourteenth day of the month, at evening, in the plains of Jericho: And they ate on the next day unleavened bread of the corn of the land, and frumenty of the same year. And the manna ceased after they ate of the corn of the land, neither did the children of Israel use that food any more, but they ate of the corn of the present year of the land of Chanaan.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र स्तोत्र ३४:२-७
प्रतिसाद :   प्रभू किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पाहा.

१) मी सर्वदा परमेश्वराचा धन्यवाद करीन 
माझ्या मुखात त्याचे स्तवन सदैव असेल. 
माझा आत्मा परमेश्वराच्या ठायी अभिमान बाळगील. 
दीन हे ऐकून हर्ष करतील.

२) तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा. 
आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णू या.
 मी परमेश्वराला शरण गेलो आणि तो मला पावला.
त्याने माझ्या सर्व भयापासून मला मुक्त केले.

३) ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाशित झाले. 
त्यांचे चेहरे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत. 
या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला.
 त्याने त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले.

 Psalm: Psalms 34: 2-3, 4-5, 6-7
R. (9a) Taste and see the goodness of the Lord.

2 I will bless the Lord at all times, his praise shall be always in my mouth.
3 In the Lord shall my soul be praised: let the meek hear and rejoice.
R. Taste and see the goodness of the Lord.

4 O magnify the Lord with me; and let us extol his name together.
5 I sought the Lord, and he heard me; and he delivered me from all my troubles.
R. Taste and see the goodness of the Lord.

6 Come ye to him and be enlightened: and your faces shall not be confounded.
7 This poor man cried, and the Lord heard him: and saved him out of all his troubles.
R. Taste and see the goodness of the Lord.




दुसरे वाचन  २ करिंथ ५:१७-२१
वाचक:पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन 
 “परमेश्वराने विस्ताद्वारे आमचा स्वत:बरोबर समेट केला."
जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नयी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले. पाहा, ते नवे झाले आहे. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने ख्रिस्ताच्याद्वारे स्वतःबरोबर आपला समेट केला आणि समेटाची सेवा आम्हांला दिली. म्हणजे जगातील लोकांची पापे जमेस न धरता देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आम्हांकडे समेटाचे वचन सोपवून दिले. म्हणून देव आम्हांकडून विनवीत असल्यासारखे आम्ही खिस्ताच्या वतीने वकिली करतो. तुम्ही देवावरोवर समेट केले असे व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने आम्ही सर्वाकरिता पाप असे केले. यासाठी की, आम्ही त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे.
 प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second Reading: 
Second Corinthians 5: 17-21
 If then any be in Christ a new creature, the old things are passed away, behold all things are made new. But all things are of God, who hath reconciled us to himself by Christ; and hath given to us the ministry of reconciliation. For God indeed was in Christ, reconciling the world to himself, not imputing to them their sins; and he hath placed in us the word of reconciliation. For Christ therefore we are ambassadors, God as it were exhorting by us. For Christ, we beseech you, be reconciled to God. Him, who knew no sin, he hath made sin for us, that we might be made the justice of God in him.
This is the word of God 
Thanks be to God 


जयघोष 
मी उठून आपल्या पित्याकडे जाईन व त्याला म्हणेन,
 "बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे."


Acclamation: I will get up and go to my Father and shall say to him: Father, I have sinned against heaven and against you. 


शुभवर्तमान लूक  १५:१-३, ११-३२
वाचक :लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

  “हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे."

सर्व जकातदार व पापी येशूचे ऐकायला त्याच्याजवळ येत होते, तेव्हा परुशी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की, “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो." मग त्याने त्यांना हा दाखला सांगितला : तो म्हणाला, एका मनुष्याला दोन मुलगे होते; त्यापैकी धाकटा पित्याला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या संपत्तीची त्यांच्यात वाटणी केली. थोड्याच दिवसांत धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व मालमत्ता खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाश्याजवळ जाऊन त्याच्या आश्रयाने राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारायला लावले. तेव्हा डुकरे खात असत त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या वडिलांच्या किती तरी मोलकऱ्यांना भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या वडिलांकडे जाईन व त्यांना म्हणेन "बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी लायक नाही; आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा." मग तो उठून आपल्या वडिलांकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या वडिलांनी त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला. त्यांनी धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी लायक नाही. " पण वडिलांनी आपल्या दासांना सांगितले " लवकर उत्तम झगा आणून याच्या अंगात घाला. ह्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा; आपण भोजन करून आनंदोत्सव करू कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे." मग आनंदोत्सव करू लागले.
त्याचा थोरला मुलगा शेतात होता. तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायनवादन व नृत्य ह्याचा आवाज ऐकला. त्याने एका चाकराला बोलावून विचारले, हे काय चालले आहे ? त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी भोजन ठरवले आहे. तेव्हा तो रागावला व आत जाईना; म्हणून त्याचे वडील बाहेर आले व त्याची समजूत घालू लागले. परंतु त्याने त्यांना उत्तर दिले, पाहा, मी इतकी वर्षे तुमची सेवाचाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही; तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. पण ज्याने तुमची उपजीविका वेश्यांबरोबर खाऊन टाकली तो तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले. त्यांनी त्याला म्हटले, बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस आणि जे काही माझे आहे, ते सर्व तुझेच आहे. तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे; कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे: हरवला होता तो सापडला आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Luke 15: 1-3,11-32
Now the publicans and sinners drew near unto him to hear him. And the Pharisees and the scribes murmured, saying: This man receiveth sinners, and eateth with them. And he spoke to them this parable, saying: And he said: A certain man had two sons: And the younger of them said to his father: Father, give me the portion of substance that falleth to me. And he divided unto them his substance. And not many days after, the younger son, gathering all together, went abroad into a far country: and there wasted his substance, living riotously. And after he had spent all, there came a mighty famine in that country; and he began to be in want. And he went and cleaved to one of the citizens of that country. And he sent him into his farm to feed swine. And he would fain have filled his belly with the husks the swine did eat; and no man gave unto him. And returning to himself, he said: How many hired servants in my father’s house abound with bread, and I here perish with hunger? I will arise, and will go to my father, and say to him: Father, I have sinned against heaven, and before thee: I am not worthy to be called thy son: make me as one of thy hired servants. And rising up he came to his father. And when he was yet a great way off, his father saw him, and was moved with compassion, and running to him fell upon his neck, and kissed him. And the son said to him: Father, I have sinned against heaven, and before thee, I am not now worthy to be called thy son. And the father said to his servants: Bring forth quickly the first robe, and put it on him, and put a ring on his hand, and shoes on his feet:
 And bring hither the fatted calf, and kill it, and let us eat and make merry: Because this my son was dead, and is come to life again: was lost, and is found. And they began to be merry.Now his elder son was in the field, and when he came and drew nigh to the house, he heard music and dancing: And he called one of the servants, and asked what these things meant. And he said to him: Thy brother is come, and thy father hath killed the fatted calf, because he hath received him safe. And he was angry, and would not go in. His father therefore coming out began to entreat him. And he answering, said to his father: Behold, for so many years do I serve thee, and I have never transgressed thy commandment, and yet thou hast never given me a kid to make merry with my friends: But as soon as this thy son is come, who hath devoured his substance with harlots, thou hast killed for him the fatted calf. But he said to him: Son, thou art always with me, and all I have is thine. But it was fit that we should make merry and be glad, for this thy brother was dead and is come to life again; he was lost, and is found.
  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतन:आज आपण उपवास काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत, ज्याला 'लेतारे रविवार' (Laetare Sunday) म्हणून संबोधण्यात आले आहे. आजच्या दिवसाच्या पवित्र मिस्साबलिदान विधीच्या प्रवेश अँटीकनमध्ये यशयाच्या पुस्तकातील "यरुशलेम आनंद कर" (Rejoice-Laetare Jerusalem) हे शब्द वापरण्यात आले आहेत (यशया ६६:१०). अपेक्षित असलेल्या विजयी आनंदाबद्दल चर्च हा दिवस साजरा करते. परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राला आम्हांसाठी पाप असे करून क्रुसावर खिळवले व आमचा स्वतःबरोबर समेट घडवून आणला म्हणून आपण ख्रिस्तामध्ये परमेश्वराची नवीन निर्मिती आहोत. नवीन निर्मितीचे, परमेश्वराच्या प्रेमाचे आणि तारणाच्या आनंदाचे उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आजच्या शुभवर्तमानातून देत आहे. परमेश्वराचे आपल्यावरील विपुल प्रेम आणि त्याने आपणास मिळवून दिलेल्या तारणाचा आनंद स्पष्ट करण्यासाठी प्रभू येशू उधळ्या पुत्राचा दाखला देतो. आपला पुत्र चुकला आहे आणि पापांमध्ये भरकटत गेला आहे, हे बापाला ठाऊक आहे, तरी बाप आशेने आपल्या पुत्राच्या परतण्याची वाट पाहातो. एक दिवस पश्चात्तापी अंतःकरणाने जेव्हा पुत्र परत येतो तेव्हा बापाचा आनंद गगनात मावेनासा होतो. बाप घोषित करतो की, "माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे; हरवला होता तो सापडला आहे." बाप सर्वांसहित आपल्या मुलाच्या परतण्याचा आनंद साजरा करतो. उधळ्या पुत्राप्रमाणे आपण बहकले आहोत का? पापांमुळे आपणांस परमेश्वराच्या प्रेमाचा विसर पडला आहे का? परमेश्वर एक दयाळू पिता म्हणून आपल्या परतण्याची वाट पाहात आहे. जीवनाचा खरा आनंद हा परमेश्वरामध्येच आहे, हे आपण ओळखावे.

प्रार्थना :  हे परमेश्वरा, आम्ही तुझ्याविरूद्ध व आमच्या स्वकीयांविरूद्ध पाप  केले आहे, आम्हावर दया कर, आम्हास पश्चात्तापी अंत:करण दे, आमेन.


✝️