Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | 6th March 2025| Thursday After Ash Wednesday | The of Fast & Obstinance

उपवासकाळ राखेच्या बुधवार नंतर चा 

  गुरुवार  दि.६ मार्च २०२५

✝️ 
जर कोणा एका मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वत:ला गमावले किंवा स्वतःचा नाश करुन घेतला तर त्याला काय लाभ ?"
For what does it profit a man if he gains the whole world and loses or forfeits himself?"


संत कॉलेट

(-   कुमारिका )
अनेक नवी कॉन्व्हेंट्स आणि मठ उदयास आले. फ्रान्सिस्कन जीवनपद्धतीलाही त्याची चांगली झळ पोहोचली. त्यामुळेच कॉलटेच्या नावावर १७ नवी कॉन्व्हेंटस आणि १४ नवे मठ उभारण्यात आल्याची नोंद झालेली आढळते.

संत कॉलेटने स्थापन केलेल्या धर्मभगिनी पूर्णपणे अलिप्त जीवन जगत असतात. उपवास, प्रार्थना, त्याग आणि गरिबीचे व्रत अशी त्यांच्या जीवनाची प्रमुख अंगे होत. आपल्या जीवन कारकिर्दीत संत कॉलेट हिने (संत) जोन ऑफ आर्क (सण २३ ऑक्टो.) आणि (संत) विन्सेंट फेरेर (सण ५ एप्रिल) अशा पवित्र स्त्री-पुरुषांचा सल्ला घेतला. (संत) विन्सेंट ह्यांनी तर तिच्या प्रतिष्ठेला शोभेल असा खास क्रूस तिला बहाल केलेला होता. मिरवणुकीच्या वेळी हा क्रूस सन्मानाने लोकांसमोर उभा केला जाई. हा क्रूस (संत) विन्सेंट फेरेर ह्यांनी आपल्या जाहीर कार्यक्रमात वापरलेला होता.

चिंतन : सार्वकालिक जीवनाकडे जाणारा मार्ग वेदना, दुःखसहन आणि सोशिकतेने स्वीकारलेल्या यातनामय क्रूसाला छेदून जातो. संत कॉलेट


✝️



आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वराची आज्ञा, विधी व नियम पाळण्यासाठी व त्याच्या मार्गात चालणाऱ्यासाठी आपल्याला आवाहन करण्यात आले आहे. आपले जीवन सर्वस्वी देवावर अवलंबून असावे म्हणून आज आपण चिंतन करु या.
ह्या उपवास काळात आपण लहान-सहान गोष्टीत त्याग करुन प्रभूची आज्ञा पाळण्यासाठी प्रेरणा मागू या. प्रभूला अनुसरण्यासाठी व त्याचे सच्चे अनुयायी बनण्यासाठी वधस्तंभाचा संदेश आचरणात आणू या. 
✝️

पहिले वाचन अनुवाद ३०:१५-२०
वाचक : अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन

"पाहा, आजचा दिवस मी आशीर्वाद आणि शाप म्हणून ठरवतो." मोशेने सर्व लोकांना बोलावले व त्यांना म्हटले, पाहा, जीवन व मरण, हानी व लाभ ही आज मी तुझ्यापुढे ठेवली आहेत. मी तुला आज्ञा करीत आहे की, तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कर. त्याच्या मार्गाने चाल आणि त्याच्या आज्ञा, विधी व नियम ही पाळ, म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील आणि ज्या देशाचे वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुझे कल्याण करील. पण तुझे मन बदलून तू ऐकले नाहीस आणि बहकून अन्य देवाचे भजनपूजन केलेस तर मी तुला आज बजावून सांगतो की, तुझा खात्रीने नाश होईल. यार्देन उतरून जो देश तू वतन करुन घेण्यास जात आहेस तेथे तू चिरकाल राहणार नाहीस. आकाश आणि पृथ्वी ह्यांना तुझ्याविरुद्ध साक्षीला ठेवून आज मी सांगतो की, जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि शाप ही तुझ्यापुढे ठेवली आहेत. तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझा वंश जिवंत राहील. आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कर. त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा. कारण त्यातच तुझे जीवन आहे. त्यातच तुझी आयुर्वृद्धी आहे असे केल्याने जो देश देण्याविषयी परमेश्वराने तुझे पूर्वज आब्राहाम, इसहाक व याकोब यांना शपथपूर्वक वचन दिले आहे आणि त्यात तुझी वस्ती होईल.
 
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Deuteronomy 30:15-20

Moses spoke to the people, saying, "See, I have set before you today life and good, death and evil. If you obey the commandments of the Lord your God that I command you today, by loving the Lord your God, by walking in his ways, and by keeping his commandments and his statutes and his rules, then you shall live and multiply, and the Lord your God will bless you in the land that you are entering to take possession of it. But if your heart turns away, and you will not hear, but are drawn away to worship other gods and serve them, I declare to you today, that you shall surely perish. You shall not live long in the land that you are going over the Jordan to enter and possess. I call heaven and earth to witness against you today, that I have set before you life and death, blessing and curse. Therefore choose life, that you and your offspring may live, loving the Lord your God, obeying his voice and holding fast to him, for he is your life and length of days, that you may dwell in the land that the Lord swore to your fathers, to Abraham, to Isaac, and to Jacob, to give them."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र   :१-४,६
प्रतिसाद : प्रभूवर विश्वास ठेवणारा आनंद पावतो.

१) जो मनुष्य दुर्जनांच्या सल्ल्याप्रमाणे चालत नाही, 
पातक्याच्या वाऱ्याला उभा राहात नाही, 
किंवा देवनिंदकाच्या बैठकीत सामील होत नाही 
उलट जो प्रभूच्या धर्मशास्त्रात रमतो, 
त्याच्या धर्मशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य!

२) वाहत्या पाण्याजवळ एखादे झाड लावलेले असते 
यथाकाळी त्याला बहर येतो. त्याची पाने कोमेजत नाहीत 
अशा झाडाजवळ तो असतो. 
तो हाती घेतो ते सर्व सफल होते.

३)पण दुर्जनांचे तसे मुळीच नाही! 
वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे ते आहेत. 
सज्जनांच्या मार्गावर प्रभूचे लक्ष असते. 
परंतु दुर्जनांचा मार्ग विनाशाकडे जातो.


Psalm 1:1-4 &6
Blessed the man who has placed his trust in the Lord. 

Blessed indeed is the man 
who follows not the counsel of the wicked, 
nor stands in the path with sinners, 
nor abides in the company of scorners, 
but whose delight is the law of the Lord, 
and who ponders his law day and night. R 

He is like a tree that is planted 
beside the flowing waters, 
 that yields its fruit in season,
and whose leaves shall never fade;
 and all that he does shall prosper. R 

Not so are the wicked, not so! 
For they, like winnowed chaff, 
shall be driven away by the wind. 
For the Lord knows the way of the just, 
but the way of the wicked will perish. R 

जयघोष  
आज आपली हृदये कठीण करू नका.
तर परमेश्वराचा आवाज ऐका.

Acclamation: 

 Repent, says the Lord, for the kingdom of heaven is at hand 

शुभवर्तमान लूक ९:२२-२५
वाचक : लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 “जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल तो त्याला वाचवील.

 "येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडील मंडळी, मुख्य याजक व शास्त्री ह्याच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे."
त्याने सर्वांना म्हटले, "जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छितो तर त्याने आत्मत्याग करावा व रोज स्वतःचा क्रूस उचलून घेऊन मला अनुसरावे.
जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल तो त्याला वाचवील. जर कोणा एका मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वत:ला गमावले किंवा स्वतःचा नाश करुन घेतला तर त्याला काय लाभ ?"
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Luke 9:22-25
At that time: Jesus said to his disciples, "The Son of Man must suffer many things and be rejected by the elders and chief priests and scribes, and be killed, and on the third day be raised." And he said to all, "If anyone would come after me, let him deny himself and take up his cross daily and follow me. For whoever would save his life will lose it, but whoever loses his life for my sake will save it. For what does it profit a man if he gains the whole world and loses or forfeits himself?"
  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनमाणसाने सारे जग मिळवले पण स्वतःचा आत्मा गमावला, तर त्याला काय लाभ?"

आजच्या शुभवर्तमानातील ह्या वाक्याने संत फ्रान्सिस झेविअरच्या जीवनाचा कायापालट झाला. परमेश्वराचे वचन आत्मसात केल्यानंतर आपल्यादेखील जीवनाचा कायापालट होऊशकतो. श्रद्धेचे जीवन जगण्यासाठी आणि आपल्या आत्म्याच्या उद्धारासाठी आपण ह्या जगातील बऱ्याच गोष्टींचा त्याग केला पाहिजे. आजच्या पहिल्या वाचनातून परमेश्वर आपणांस सांगतो की मी तुझ्यापुढे जीवन आणि मरण ठेवले आहे, पण तू जीवन निवडून घे. आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा, कारण त्यातच आपले जीवन आहे. ह्या पवित्र जीवनाचा अर्थ समजण्यासाठी प्रभू येशू आपणांस आत्मत्याग करण्यासाठी बोलावत आहे: "जर कोणी माझ्यामागे येऊ पाहातो तर त्याने आत्मत्याग करावा आणि दररोज स्वतःचा क्रूस उचलून मला अनुसरावे." आत्मत्याग करून स्वतःचा क्रूस उचलून प्रभू येशूच्या मागे जाणे ह्यातच खरा जीवनाचा अर्थ आहे, त्यामध्येच आपले तारण आहे. आपल्या शाश्वत तारणासाठी आणि इतरांच्या तारणासाठी आपण 'त्याग' करण्यास तयार असले पाहिजे. शाश्वत दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून जीवन जगणे बऱ्याच जणांना कठीण जाते, कारण आपल्या जीवनात बऱ्याच वेळेला आपले प्राधान्यक्रम चुकीचे असतात. आपण ह्या जगात पुष्कळ संपत्ती कमावली, पण आपल्या जीवनात देवाची कृपा नसेल आणि विश्वासाचा अभाव असेल तर त्या संपत्तीचा काय लाभ? प्रभू येशूच्या मागे जाऊन जीवनाला कवटाळणे ह्यामध्येच खरा सुज्ञपणा आहे. प्रभू येशूला माझ्या जीवनामध्ये प्रथम प्राधान्य देऊन, त्याच्याठायीच आणि त्याच्यासाठीच मला जीवन जगायचे आहे असा ठाम निश्चय करू या.

प्रार्थना : हे प्रभू येशू, वधस्तंभाला स्वीकारण्यास व त्याग करुन तुला  अनुसरण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.