Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | 7th March 2025| Friday After Ash Wednesday |

उपवासकाळ राखेच्या बुधवार नंतर चा 

  शुक्रवार  दि.७ मार्च २०२५

✝️ 
वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल. तेव्हा ते उपवास करतील.”
The days will come when the bridegroom is taken away from them, and then they will fast."

संत परपेच्युआ व फेलसीटी 
रक्तसाक्षी (२०३)
  
     श्रद्धेमध्ये बळकट रहा. एकमेकांवर प्रेम करा. आमच्या छळामुळे तुम्ही भिऊन जाऊ नका. आमचे दुःखसहन तुम्हाला अडखळणाऱ्याचा धोंडा बनू नये.- संत पर्पेतुआ
  
✝️
उपासाला उपवास असेही म्हटले जाते.  उपवास म्हणजेच स्वतःच्या आचरणावर नियंत्रण ठेवून देवाच्या सहवासात जाणे.  उपवासात म्हणजेच तन-मन-धनानेदेवाच्या सहवासाची ओढलागायला हवी.  शिष्य उपास करीत नव्हते कारण ते सतत प्रभू येशूच्या सहवासात होते. म्हणूनच प्रभू म्हणतो, 'वऱ्हाड्याबरोबर वर आहे तोपर्यंत उपास करणे शक्य नाही.' आपण आपल्या जीवनावर चिंतन करु या. आपण खरोखरच चांगला उपास / उपवास करतो का ? श्रद्धेला किंवा उपासाला कृतीची जोड असायला हवी. प्रार्थना उपास  आणि दानधर्मा बरोबरच आपल्या उपासाला सेवेची जोड द्यायला हवी. यशया  संदेष्ट्याने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे आपण आपल्यातील दुष्टपणा तपासून पाहावा  आणि दुष्टतेच्या बेड्या तोडून टाकायला हव्यात.ह्या उपवास काळात आपल्याला कृतीशील उपवास करता यावा आणि क्षमा,  समेट, परोपकार व प्रेम ह्यांचा अविष्कार आपल्या जीवनात दिसून यावा म्हणून  प्रयत्नशील बनू या.

पहिले वाचन यशया ५८:१-९
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय ?"

प्रभू म्हणतो, कंठरव कर, कसर करु नको, आपला स्वर कर्ण्याप्रमाणे मोठा कर. माझ्या लोकांना त्याचे अपराध, याकोबच्या घराण्याला त्याची पातके विदित कर. ते तर रोजरोज माझ्याकडे येतात. माझे मार्ग ते जाणू इच्छितात. धर्माचरण करणाऱ्या व आपल्या देवाचे नियमशास्त्र सोडणाऱ्या राष्ट्राप्रमाणे ते माझ्याजवळ रास्त निर्णय मागतात. देवाची समीपता ते इच्छितात. आम्ही उपवास करतो ते तू का पाहात नाहीस? आम्ही आपल्या जिवाला पीडा देतो, ती तू का लक्षात आणत नाहीस? पाहा, आपल्या उपवासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाडकष्ट करवता, पाहा तुमच्या उपवासाचा परिणाम तर असा होतो की, तुम्ही त्यावेळी कटकटी करता व दुष्टपणाने मारामारी करता. तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा याकरता तुमचे हल्लीचे उपवास आहेत असे नाही. मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय? मनुष्याच्या जिवाला पीडा व्हावी असा हा तुमचा उपवासाचा दिवस आहे काय ? लव्हाळ्यासारखे आपले डोके लववणे आणि आपल्या अंगाखाली गोणपाट व राख पसरणे याला उपवास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपवास नव्हे काय? तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे, तू लाचारांना व निरश्रितांना आपल्या घरी न्यावे; उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला विन्मुख होऊ नये हाच तो उपवास नव्हे का? असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल. तुझी जखम लवकर भरेल. तुझी धार्मिकता तुझ्यापुढे चालेल व परमेश्वर ऐकेल. तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल, मी येथे आहे.
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Isaiah 58:1-9a

24 Thus says the Lord God: "Cry aloud; do not hold back; lift up your voice B FRI

like a trumpet, declare to my people their transgression, to the house of Jacob their sins. Yet they seek me daily and delight to know my ways, as if they were a nation that did righteousness and did not forsake the judgment of their God; they ask of me righteous judgments; they delight to draw near to God. Why have we fasted, and you see it not? Why have we humbled ourselves, and you take knowledge of itt Behold, in the day of your fast you seek your own pleasure, and oppress all your workers. Behold, you fast only to quarrel and to fight and to hit with a wicked fist. Fasting like yours this day will not make your voice to be heard on high. Is such the fast that I choose, a day for a person to humble himself? Is it to bow down his head like a reed, and to spread sackcloth and ashes under him? Will you call this a fast, and a day acceptable to the Lord? "Is not this the fast that I choose: to loose the bonds of wickedness, to undo the straps of the yoke, to let the oppressed go free, and to break every yoke? Is it not to share your bread with the hungry and bring the homeless poor into your house; when you see the naked, to cover him, and not to hide yourself from your own flesh? Then shall your light break forth like the dawn, and your healing shall spring up speedily; your righteousness shall go before you; the glory of the Lord shall be your rear guard. Then you shall call, and the Lord will answer, you shall cry, and he will say, 'Here I am.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र   ५१:३-४,६,१८-१९
प्रतिसाद : हे परमेश्वरा, नम्र व पश्चात्तापी अंतःकरण तू झिडकणार नाहीस.

१) तुझ्या दयेला अनुसरून माझ्या 
अपराधाचे कलंक पुसून टाक. 
मला धुवून माझा दोष पूर्णपणे दूर कर.

२) माझे अपराध मी जाणून आहे. 
माझे पाप मला सतत टोचत आहे. 
तुझी केवळ अवज्ञा करून मी पाप केले आहे. 
तुझ्या दृष्टीने वाईट ते केले आहे.

३) यज्ञ केल्याने तू प्रसन्न होत नाहीस. 
होमार्पणाचीदेखील तुला आवड नाही. देवा, 
तुला शरण आलेला आत्मा हाच माझा यज्ञ. 
नम्र व पश्चात्तापी अंतःकरण तू झिडकारणार नाहीस.


Psalm Psalm 51:3-4, 5-6ab, 18-19

A broken and humbled heart, O God, you will not spurn. 

Have mercy on me, O God, 
according to your merciful love, 
according to your great compassion, 
blot out my transgressions. 
Wash me completely from my iniquity, 
and cleanse me from my sin.

My transgressions, truly I know therm; 
my sin is always before me

Against you, you alone, have I sinned; 
what is evil in your sight I have done. R

For in sacrifice you take no delight; 
burnt offering from me would not please you. 
My sacrifice to God, a broken spirit: 
a broken and humbled heart,
O God, you will not spurn. R

जयघोष  
हे प्रभू परमेश्वरा, तुझ्याशी तादात्म्य पावण्यास, तुझ्याशी संवाद साधण्यास व तुझ्याबरोबर एकरूप होण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, तसेच दया कृत्ये करण्यास प्रेरणा दे, आमेन

Acclamation: 

 Seek good, and not evil, that you may live; and the Lord, the God of hosts, will be with you.

शुभवर्तमान मत्तय ९:१४-१५
वाचक :  मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

  "वर त्याच्यापासून काढून घेतला जाईल. तेव्हा ते उपवास करतील. "

योहानचे शिष्य येशूकडे येऊन त्याला म्हणाले, “आम्ही व परुशी पुष्कळ उपवास करतो पण आपले शिष्य उपवास करत नाहीत. ह्याचे कारण काय ?" येशू त्यांना म्हणाला, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांनी शोक करणे शक्य आहे का? तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल. तेव्हा ते उपवास करतील.”
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Matthew 9:14-15

At that time: The disciples of John came to Jesus, saying, "Why do we and the Pharisees fast, but your disciples do not fast?" And Jesus said to them, "Can the wedding guests mourn as long as the bridegroom is with them? The days will come when the bridegroom is taken away from them, and then they will fast."
  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनआजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणतो, "असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल तेव्हा ते उपवास करतील." म्हणजे प्रभू येशूच्या मृत्यू - मरण- पुनरुत्थान-स्वर्गरोहणानंतर शिष्य उपवास करतील. आपण उपवास करावा ही परमेश्वराची इच्छा आहे. परंतु उपवास म्हणजे काय? आपण सेवन करीत असलेल्या अन्नाचा त्याग करणे म्हणजे उपवास. पण हा उपवास कशासाठी? आजचे पहिले वाचन उपवासाला एक अनोखा अर्थ प्राप्त करून देते. उपवास हा परमेश्वराच्या गौरवाप्रीत्यर्थ आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी केला जातो. आपण उपवास करून जर कोणावर अन्याय करीत असू तर त्या उपवासाने परमेश्वराला संतोष होणार नाही. खरा आणि पवित्र उपवास म्हणजे, आपण दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्यांस मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, भुकेल्यांस अन्न वाढावे, लाचारांस व निराश्रितांस आसरा द्यावा, उघड्यांस वस्त्र पांघरावे, हाच परमेश्वराला संतोषविणारा खरा उपवास आहे. असे केल्याने प्रभू म्हणतो तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी धार्मिकता तुझ्यापुढे चालेल व परमेश्वराचे गौरव तुझे पाठिराखे होईल. तू हाक मारशील ती परमेश्वर ऐकेल; तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल, 'हा मी आहे.' उपवासकाळात खरे आणि निःस्वार्थी उपवासमय आचरण करण्यास आपणांस आमंत्रित करण्यात आले आहे. माझा उपवास परमेश्वराला संतोषविणारा असेल का?

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुजवर प्रीति करण्यास व तुझ्या आज्ञा पाळण्यास मला प्रेरणा व कृपा दे, आमेन.