उपवासकाळ राखेच्या बुधवार नंतर चा
शनिवार दि.८ मार्च २०२५
✝️
“निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते.
"Those who are well have no need of a physician, but those who are sick.
देवभक्त संत जॉन
वर्तनसाक्षी (१४९५-१५५०)
जॉनचा जन्म मध्य पोर्तुगालमध्ये इ. स. १४९५ साली झाला. मात्र त्याचे बालपण स्पेनमधील ओरोपेझा या ठिकाणी एका गुराख्याच्या घरी गेले. इथंच तो लहानाचा मोठा झाला आणि एक उत्तम मेंढपाळ म्हणून नावारुपाला आला. त्याच्या साधेपणाला विश्वासूपणा आणि पावित्र्य ह्यांची जोड होती.
पुढे तो सैनिक म्हणून फ्रान्स येथे गेला. व्हिएनाच्या वेढ्याच्या वेळी तो सेव्हईल येथे धनगर म्हणून काम पाहू लागला. मूर्स येथील गुलामांच्या सुटकेसाठी खंडणी म्हणून तो स्वत:च्या जीवाची किंमत मोजायला तयार होता.
काही काळ तो जिब्राल्टार येथे धार्मिक पुस्तके आणि चित्रे विकण्याचा धंदा करीत होता. वयाच्या ४५ व्या वर्षी एका दृष्टांतामध्ये बाळ येशू त्याच्या दृष्टीस पडला. त्याने त्यास म्हटले, 'हे देवभक्ता जॉन ग्रानाडा हा तुझा क्रूस होईल.'
ग्रानाडा ह्या शहरात जॉन जेव्हा गेला तेव्हा तेथे धन्यवादित जॉन अविलाकर' ह्यांच्या एका प्रवचनाचा त्याला स्पर्श झाला. त्या उपदेशाने तो खूप बेचैन झाला. त्याने आपली सर्व धनदौलत गोरगरिबांना वाटून टाकली. समाजातील दुःख निवारण्यासाठी तो विलक्षण धडपड करू लागला. त्याच्यातील तात्काळ परिवर्तनामुळे त्याचे डोके फिरले आहे, अशी लोकांची भावना झाली. त्यांनी त्याला वेड्यात काढले. नेमका ह्याचवेळी धन्यवादित जॉन अविलाकर ह्याने त्याच्याशी गप्पागोष्टी केल्या. त्याचे मन समजून घेतले. त्याच्या लहानसहान पापांची त्याला क्षमा केली. ह्या प्रसंगामुळे जॉनने आपले संपूर्ण जीवन गरीब आणि आजारी लोकांसाठी अर्पण करण्याचे ठरविले.
ग्रानाडा येथे त्याने छोटेसे घर भाड्याने घेतले. जे रोगी, आजारी त्याच्याकडे येत असत, त्यांना तो मोफत औषधोपचार करीत असे. जे रोगी स्वतः तिथे येऊ शकत नसत त्यांना तो आपल्या खांद्यावर प्रसंगी पाठीवर वाहून आणीत असे. रोगी आपल्या घरात आल्यानंतर तो त्यांचे पाय धुवून काढी. एक क्रूस त्यांच्यासमोर ठेवून रोगी त्या क्रुसाचे चुंबन घेत. त्यानंतर जॉन त्यांना अंथरूणावर झोपवी. त्यांचे पापनिवेदन ऐकण्यासाठी एखाद्या धर्मगुरूंना बोलावणे पाठवी. त्याच्या ह्या छोट्या घराचा संपूर्ण कारभार तो एकटाच सांभाळीत असे. घराची स्वच्छता, स्वत:चा स्वयंपाक, कपडे धुणे, औषधांची व रुग्णांची देखभाल, त्यांचा दैनंदिन आहार इ. गोष्टींवर तो जातीने लक्ष देत असे. उरलेला वेळ रात्री जागरण करून प्रार्थना, मनन-चिंतन यामध्ये तो घालवित असे. कधी कधी त्याला आपल्या उदरनिर्वाहासाठी पैसे आणि अन्न मागत दारोदार फिरावे लागे. देवाने आपल्यावर इतके प्रेम केलेले आहे. मग आपण देवावरील प्रेमाखातर थोडा तरी त्याग करायला नको का? असे तो सर्वांना सांगत सुटे.
रात्री आसरा शोधत असलेल्यांना तो आपल्या घरात ठेवून घेई, अनाथ, विधवा, गरीब विद्यार्थी, वाकडे पाऊल पडलेल्या वा उपेक्षित, स्त्रिया ह्यांना तो अतिशय प्रेमाने वागवी. बेकारांना तो नोकरी शोधून देई. दु:खितांचे अश्रू पुसत व आनंदोत्सव करणाऱ्यांना उत्तेजन देत तो इकडेतिकडे भटकत राही. आर्चबिशपांनी त्याच्या ह्या कार्याला पूर्ण पाठिंबा दिलेला होता. त्याच्या पावित्र्यपूर्ण जीवनाला चमत्काराचे भरपूर पीक आलेले होते.
मार्च १५५० रोजी वेदीसमोर गुडघे टेकून प्रार्थना करीत असताना त्याला अचानक मृत्यू आला इ. स. १६९० साली त्याला संतपद देण्यात आले. संत जॉन इस्पितळे, आजारी, पारिचारिका, छापखाने आणि पुस्तक विक्रेते ह्याचा तो आश्रयदाता संत आहे.
त्याने स्थापन केलेल्या हॉस्पीटलर्स ब्रदर्सना इटालीत बरीच लोकप्रियता मिळाली. आज जगातील विविध भागांमध्ये १०० हून अधिक इस्पितळे हे ब्रदर्स चालवित असतात.
चिंतन : हे प्रभो, तुझे काटे माझी गुलाबे आहेत आणि तुझे दुःखसहन माझा गौरव आहे म्हणूनच वेळ असेपर्यंत मी सर्व प्रकारची चांगली कामे अखंडितपणे करीत राहीन. मला तुझी शक्ती दे. - देवभक्त संत जॉन
✝️
पहिले वाचन यशया ५८:९-१४
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"स्वतःच्या मार्गाने न जाण्याने तू प्रभूचा आदर करशील."
प्रभू म्हणतो, “जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील, दुःखग्रस्त जिवाला तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल. परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल. तो अवर्षणसमयी तुझ्या जिवास तृप्त करील. तुझ्या हाडांना मजबूत करील. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील. पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुनः बांधतील. पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाये तू पुन: उभारशील. मोडतोडीचा जीर्णोद्वार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा, असे तुझे नाव पडेल. तू शब्बाथाची पायमल्ली करणार नाहीस. माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस. शब्बाथ आनंद दिन आहे. परमेश्वराचा पवित्र व सन्मान दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाहीस, आपला धंदा चालव नाहीस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहीस, तर तू परमेश्वराच्याठायी हर्ष पावशील. तू देशांच्या उच्च स्थलांचे जयोत्साहाने आक्रमण करशील, असे मी करीन आणि तुझा पिता याकोब याच्या वतनाचा तुला उपभोग घेऊ देईन. परमेश्वराच्या तोंडचे हे शब्द आहेत."
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : Isaiah 58:9c-14
Thus says the Lord: "If you take away the yoke from your midst, the
pointing of the finger, and speaking wickedness, if you pour yourself out for the hungry and satisfy sat the desire of the afflicted, then shall your light rise in the darkness and your gloom be as the noonday. And the Lord will guide you continually and satisfy your desire in scorched places and make your bones strong; and you shall be like a watered garden, like a spring of water, whose waters do not fail. And your ancient ruins shall be rebuilt; you shall raise up the foundations of many generations; you shall be called the repairer of the breach, the restorer of streets to dwell in. "If you turn back your foot from the Sabbath, from doing your pleasure on my holy day, and call the Sabbath a delight and the holy day of the Lord honourable; if you honour it, not going your own ways, or seeking your own pleasure, or talking idly; then you shall take delight in the Lord, and I will make you ride on the heights of the earth; I will feed you with the heritage of Jacob your father, for the mouth of the Lord has spoken."
This is the word of God
Thanks be to God
स्तोत्र ८६:१-६
प्रतिसाद : प्रभो, मला मार्गदर्शन कर.
१) माझ्याकडे लक्ष दे प्रभू, मला उत्तर दे.
मी गरीब व गरजवंत आहे.
माझ्या जिवाला जप कारण मी तुझा भक्त आहे.
तुझ्यावर भाव ठेवणाऱ्या आपल्या दासाचे रक्षण कर.
२) तू माझा देव आहेस. म्हणून माझ्यावर दया कर.
हे स्वामी, सारा दिवसभर मी तुझा धावा करतो.
या तुझ्या दासाच्या मनाला आनंद वाटू दे.
कारण हे स्वामी, माझा जीव तुझ्याकडे लागला आहे.
३) स्वामी, तू किती चांगला आहे.
तू क्षमाशील आहेस.
तुझा धावा करणाऱ्यांना तू दयासागर आहेस.
माझी प्रार्थना ऐक.
हे प्रभू, माझ्या याचनेच्या शब्दांकडे लक्ष दे.
Psalm 86: 1-6
Teach me, O Lord, your way, so that I may walk in your truth.
Turn your ear, O Lord, and answer me,
for I am poor and needy. Preserve my soul,
for I am faithful; save the servant
who trusts in you, my God. R
Have mercy on me, O Lord,
for I cry to you all the day long.
Gladden the soul of your servant,
for I lift up my soul to you, O Lord. R
O Lord, you are good and forgiving,
full of mercy to all who call to you.
Give ear, O Lord, to my prayer,
and attend to my voice in supplication.
जयघोष
जे अपराध तू माझ्याविरुद्ध केले आहेत, ते तुझ्यातून निघून जाऊ दे आणि तुझ्यामध्ये नवीन आत्मा आणि नवीन शक्ती येवो.
Acclamation:
I have no pleasure in the death of the wicked, says the Lord, but that he turn from his way and live.
शुभवर्तमान लूक ५:२७-३२
वाचक : लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“मी नीतिमानांना बोलावायला आलो नाही, तर पापी लोकांना पश्चात्तापासाठी बोलावायला आलोआहे."
येशूने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, "माझ्यामागे ये." तेव्हा तो सर्व काही तेथून सोडून देऊन उठला व त्याच्यामागे गेला.
मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली. त्यावेळी त्याच्याबरोबर जकातदार व दुसरे लोक यांचा मोठा समुदाय जेवायला बसला होता. तेव्हा परुशी व त्यांच्यातील शास्त्री हे त्याच्या शिष्यांच्या विरुद्ध कुरकुर करीत त्यांना म्हणाले "जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर तुम्ही का खाता पिता ?" येशूने त्यांना उत्तर दिले, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमानांना बोलावायला आलो नाही तर पापी लोकांना पश्चात्तापासाठी बोलावायला आलो आहे.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Luke 5:27-32
At that time: Jesus went out and saw a tax collector named Levi, sitting at the tax booth. And he said to him, "Follow me." And leaving everything, he rose and followed him. And Levi made him a great feast in his house, and there was a large company of tax collectors and others reclining at table with them. And the Pharisees and their scribes grumbled at his disciples, saying, "Why do you eat and drink with tax collectors and sinners? And Jesus answered them, "Those who are well have no need of a physician, but those who are sick. I have not come to call the righteous but sinners to repentance."
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: उपवासकाळामध्ये परमेश्वर आपणांस आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप करून चांगले वर्तन अंगीकारण्यासाठी बोलावत आहे. आपण इतरांवर अन्याय करू नये, कोणाला दोष लाऊ नये, वाईट गोष्टी बोलू नये, भुकेल्यांस अन्न द्यावे, दुःखीतांचे सांत्वन करावे, म्हणजे परमेश्वर आपला मार्गदर्शक होईल आणि आपणांस आशीर्वादित करील. बऱ्याच वेळेला परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्यास आपण कमी पडतो. आपण आपल्या दुर्बल आणि पापी अवस्थेत परमेश्वरापासून दूर जातो आणि पापांच्या अंधकारामध्ये गुरफटून बसतो. प्रभू येशू आपल्या जीवनाचा प्रकाश आहे आणि आपल्या पापांपासून आपणांस निरोगी करण्यासाठी तो ह्या जगात आला. प्रभू येशू आज आपणांस आश्वासन देतो की, "निरोग्यांस वैद्याची गरज नसते, तर रोग्यांस असते. मी नीतिमानांस बोलावण्यास आलो नाही तर पापी लोकांस पश्चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे." मी रोगी आहे की निरोगी? मी निरोगी असेल तर मला प्रभू येशूची गरज नाही; परंतु मी जर खरोखर रोगी, म्हणजे पापी असेल तर मला नितांत प्रभू येशूच्या प्रेमाची आणि क्षमेची गरज आहे. प्रभू येशूकडे वळा, पश्चातापी अंतःकरणाने वळा, म्हणजे परमेश्वर आपणांस जीवनाचा खरा मार्ग दाखवील. संत मत्तय आपल्यासारखाच पापी होता, पण जेव्हा प्रभू येशू त्याच्या जीवनात आला तेव्हा त्याच्या जीवनाचा कायापालट झाला. मत्तयप्रमाणे प्रभू येशू आज मला देखील सांगत आहे "माझ्या मागे ये!" मी प्रभू येशूला अनुसरण्यास तयार आहे का?
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, पश्चात्तापी अंत:करणाने आम्ही तुझ्याजवळ येतो. आमचे जीवन परिवर्तन कर, आमेन.