Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | First Sunday of the Lent | 09th March 2025 |

उपवासकाळ १ ला रविवार 

 दि.९ मार्च  २०२५

✝️ 
“अरण्यात येशूची परीक्षा " 
Thou shalt not tempt the Lord thy God. 

“परमेश्वर तुझा देव याला नमन कर व त्याचीच सेवा कर, असे शास्त्रात लिहिले आहे."

✝️

 प्रभू येशू खरा देव आणि खरा मनुष्य होता म्हणूनच सैतानाने  पसरलेल्या मोहजाळात न अडकता त्याने आत्मविश्वासाने त्या परीक्षेला तोंड  दिले. आपण ह्या जगात आव्हानात्मक जीवन जगत असताना येणाऱ्या  अडचणी, मोह व दुष्ट शक्तींबरोबर सामना कसा करावा ह्याचे उत्तम उदाहरण  प्रभू येशू स्वतः आहे. 
उपवास काळातील आजच्या पहिल्या रविवारी आपण  ह्या अनुषंगाने चिंतन करु या.
 आपले स्वतःबद्दलचे स्वतःशी, देवाशी आणि आपल्या बंधु भगीनीशी असलेले नाते घट्ट असायला हवे. आपल्या सशक्तपणाची व अशक्तपणाची जाणीव आपल्याला असायला हवी, म्हणजेच आत्मपरिक्षण करून मी स्वतःला ओळखावे. आपले देवाबरोबरचे नाते कोणत्या प्रकारचे आहे ते तपासावे  आपल्या संपूर्ण जीवनाचा ताबा परमेश्वराकडे आहे का? आजच्या  शुभवर्तमानात म्हटले आहे, 'परमेश्वर तुझा देव त्याला नमन कर त्याचीच सेवा  कर.' त्याचबरोबर आपल्या बंधु भगिनीबरोबरचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत का? ते पहावे. ह्या सर्व प्रकारच्या आचरणाद्वारे परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे  असेलतर प्रभूच्या वचनानुसार जीवन जगणे गरजेचे आहे. प्रभू म्हणतो, 'मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने  जगेल. जगातीलमोहाला व प्रलोभनांना बळी न पडता प्रभू येशू ख्रिस्ताशी  एकनिष्ठ राहून त्याची शिकवण अमलात आणू या. प्रार्थना, उपवास आणि दान धर्म करुन आपले संबंध घट्ट बनवू या. 

✝️   

पहिले वाचनअनुवाद २६:४-१०
वाचक अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"निवडलेल्या लोकांची श्रद्धा'

मोशेने लोकांना म्हटले, "मग याजकाने तुझ्या हातून प्रथम उत्पन्नाची पाटी घेऊन तुझा देव परमेश्वर याच्या वेदीसमोर ठेवावी. तेव्हा तू आपला देव परमेश्वर याच्यासमक्ष असे म्हण: माझा मूळपुरूष एक अरामी मनुष्य होता. तो नष्ट होण्याच्या बेतास आला तेव्हा तो आपला लहानसा परिवार घेऊन इजिप्त देशात गेला व तेथे परदेशी म्हणून राहिला. त्याच्यापासून तेथे एक महान, सामर्थ्यवान व संख्येने मोठे असे राष्ट्र उत्पन्न झाले. तेथे इजिप्तच्या लोकांनी आम्हांला वाईट प्रकारे गांजले व आम्हांवर बिकट दास्य लादले. पण आम्ही आमच्या पूर्वजांचा देव पमेश्वर याचा धावा केला तेव्हा त्याने आमची आरोळी ऐकली आणि आमचे दुःख, कष्ट व छळवणूकही पाहिली, तेव्हा परमेश्वराने समर्थ बाहूने व हात उगारून, भयंकर उत्पात व चमत्कार दाखवून आम्हांला इजिप्त देशातून बाहेर आणले आणि आम्हांला या स्थळी आणून पोहोचवले व दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत असा हा देश आम्हांला दिला. यास्तव, हे परमेश्वरा, पाहा, जमिनीचा जो प्रथम उपज मला तू दिला आहेस, तो मी तुला आणला आहे. मग तू आपला देव परमेश्वर याच्यासमोर ती पाटी ठेवून त्याला दंडवत घाल.'
प्रभूचा शब्द  
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :  : Deuteronomy 26: 4-10
 And the priest taking the basket at thy hand, shall set it before the altar of the Lord thy God: And thou shalt speak thus in the sight of the Lord thy God: The Syrian pursued my father, who went down into Egypt, and sojourned there in a very small number, and grew into a nation great and strong and of an infinite multitude.And the Egyptians afflicted us, and persecuted us, laying on us most grievous burdens:And we cried to the Lord God of our fathers: who heard us, and looked down upon our affliction, and labour, and distress:
 And brought us out of Egypt with a strong hand, and a stretched out arm, with great terror, with signs and wonders: And brought us into this place, and gave us this land flowing with milk and honey.
And therefore now I offer the firstfruits of the land which the Lord hath given me. And thou shalt leave them in the sight of the Lord thy God, adoring the Lord thy God.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र स्तोत्र ९१:१-२,१०-१५
प्रतिसाद : प्रभो, संकटप्रसंगी तू माझ्याजवळ राहा.

१) जो परात्पराच्या आश्रयी वसतो, 
तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील. 
तो परमेश्वराला म्हणतो, 
"तू माझा आश्रय तू माझा दुर्ग, 
तू माझा देव, तुझ्यावर मी भाव ठेवतो."

२) कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही. 
कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. 
कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची 
तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल.

३) तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये.
म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील.
तू सिंह व नाग यावर पाय देऊन चालशील
तरुण सिंह व अजगर ह्यांना तुडवीत चालशील. 

४) त्याचे प्रेम माझ्यावर आहे, म्हणून 
मी तुला मुक्त करीन. 
त्याला माझ्या नामाची जाणीव आहे 
म्हणून मी त्याला निर्भय ठेवीन. 
तो माझा धावा करील आणि मी त्याचे ऐकेन.
 संकटसमयी मी त्याच्याजवळ असेन 
आणि मी त्याचा गौरव करीन,

 Psalm: Psalms 91: 1-2, 10-11, 12-13, 14-15
R. (15b) Be with me, Lord, when I am in trouble.

1 He that dwelleth in the aid of the most High, 
shall abide under the protection of the God of Jacob.
2 He shall say to the Lord: Thou art my protector, 
and my refuge: my God, in him will I trust.
R. Be with me, Lord, when I am in trouble.

10 There shall no evil come to thee: 
nor shall the scourge come near thy dwelling.
11 For he hath given his angels charge over thee; 
to keep thee in all thy ways.
R. Be with me, Lord, when I am in trouble.

12 In their hands they shall bear thee up: 
lest thou dash thy foot against a stone.
13 Thou shalt walk upon the asp and the basilisk: 
and thou shalt trample under foot the lion and the dragon.
R. Be with me, Lord, when I am in trouble.

14 Because he hoped in me I will deliver him: 
I will protect him because he hath known my name.
15 He shall cry to me, and I will hear him: 
I am with him in tribulation, I will deliver him, and I will glorify him.
R. Be with me, Lord, when I am in trouble.


दुसरे वाचन  पौलचे रोमकरांस १०:८-१३
वाचक: पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन १०:८-१३

"ख्रिस्ती माणसाची श्रद्धा."
नीतिमत्व काय म्हणते ?
ते वचन तुझ्याजवळ आहे. तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवीत आहो ते हेच होय, येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. कारण शास्त्र म्हणते, "त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फनीत होणार नाही." यहुदी व हेल्लेणी ह्यांच्यामध्ये भेद नाही. कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करतात त्या सर्वांना पुरवण्याइतका तो संपन्न आहे. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल."

 प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second Reading: 
 Romans 10: 8-13
But what saith the scripture? The word is nigh thee, even in thy mouth, and in thy heart. This is the word of faith, which we preach.
 For if thou confess with thy mouth the Lord Jesus, and believe in thy heart that God hath raised him up from the dead, thou shalt be saved. For, with the heart, we believe unto justice; but, with the mouth, confession is made unto salvation. For the scripture saith: Whosoever believeth in him, shall not be confounded. For there is no distinction of the Jew and the Greek: for the same is Lord over all, rich unto all that call upon him. For whosoever shall call upon the name of the Lord, shall be saved. 
This is the word of God 
Thanks be to God 


जयघोष 
मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगत असतो.

Acclamation: 
One does not live on bread alone, but on every word that comes forth from the mouth of God.

शुभवर्तमान लूक  ४:१-१३
वाचक :लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“आत्म्याने येशूला रानात नेले, तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. "

येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनपासून परतला आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले; तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसांत त्याने काही खाल्ले नाही. त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा सैतान त्याला म्हणाला, “तू देवाचा पुत्र असलास तर ह्या धोंड्याला भाकर हो असे सांग." येशूने त्याला उत्तर दिले, "मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही, असे लिहिले आहे." मग सैतानाने त्याला उंचावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली आणि त्याला म्हटले, "ह्यांवरचा सर्व अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन, माझ्यावर सोपवून दिले आहे व माझ्या मनाला येईल त्याला मी हे देतो. म्हणून तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल."

येशूने त्याला उत्तर दिले, “परमेश्वर तुझा देव याला नमन कर व त्याचीच सेवा कर, असे शास्त्रात लिहिले आहे." नंतर त्याने त्याला येरुशलेमेत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले व त्याला म्हटले, “तू देवाचा पुत्र असलास तर येथून उडी टाक. कारण तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील," असे शास्त्रात लिहिले आहे.

पुढे येशूने त्याला उत्तर दिले, “परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस, असे सांगितले आहे." मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला.
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
  Luke 4: 1-13
And Jesus being full of the Holy Ghost, returned from the Jordan, and was led by the Spirit into the desert, For the space of forty days; and was tempted by the devil. And he ate nothing in those days; and when they were ended, he was hungry. And the devil said to him: If thou be the Son of God, say to this stone that it be made bread. And Jesus answered him: It is written, that Man liveth not by bread alone, but by every word of God. And the devil led him into a high mountain, and shewed him all the kingdoms of the world in a moment of time; And he said to him: To thee will I give all this power, and the glory of them; for to me they are delivered, and to whom I will, I give them. If thou therefore wilt adore before me, all shall be thine. And Jesus answering said to him: It is written: Thou shalt adore the Lord thy God, and him only shalt thou serve. And he brought him to Jerusalem, and set him on a pinnacle of the temple, and he said to him: If thou be the Son of God, cast thyself from hence. For it is written, that He hath given his angels charge over thee, that they keep thee. And that in their hands they shall bear thee up, lest perhaps thou dash thy foot against a stone.
And Jesus answering, said to him: It is said: Thou shalt not tempt the Lord thy God. And all the temptation being ended, the devil departed from him for a time.
  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनआज उपवासकाळातील पहिला रविवार, जेथे आपण आपल्या प्रभू येशूबरोबर अरण्यामध्ये जातो आणि त्याच्या परीक्षेमध्ये सहभागी होतो. आजचे शुभवर्तमान आपणांस सांगते की प्रभू येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनपासून परतला आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले. होय, खरोखर पवित्र आत्म्यानेच प्रभू येशूला हा चाळीस दिवसांचा अनुभव घेण्यासाठी रानात नेले. प्रभू येशू - मसिहा, देवाचा पुत्र, विश्वाचा निर्माता, महान 'मी', परम पवित्र त्रैक्यातील दुसरी व्यक्ती, प्रभूचा प्रभू आणि राज्यांचा राजा अशा खडतर प्रसंगातून का जातो? प्रभू येशूला सैतानाच्या परीक्षेला का सामोरे जावे लागते ? प्रभू येशूने हे सर्व केले आपणांस मार्ग दाखवण्यासाठी. ह्या जगामध्ये प्रत्येकाच्या विश्वासाची परीक्षा होईल आणि आपण त्या विश्वासामध्ये टिकून राहिले पाहिजे. सैतान प्रत्येकाला मोहामध्ये पाडिल. वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या घेऊन तो आपल्याठायी येईल आणि आपणांस देवाविरुद्ध पाप करण्यास प्रवृत्त करील. सैतान आपणांस संपत्तीचा, पैशाचा, प्रतिष्ठेचा मोह देईल आणि आपणांस देवापासून दूर नेईल. प्रभू येशूने देवाच्या वचनाने सैतानाच्या मोहाचा पाडाव केला आणि त्याच्यावर विजय मिळवला. परमेश्वर आपणांस देखील तसेच करण्यासाठी मार्ग दाखवत आहे. मोहापाशांनी आणि पापांनी भरलेल्या ह्या जगात आपण सैतानाच्या मोहाला बळी पडू नये; तर परमेश्वराच्या दिव्य शब्दांनी त्याचा पाडाव करून त्याच्यावर विजय मिळवावा म्हणून ह्या उपवासकाळात ख्रिस्तसभा आपणांस साद घालत आहे.

प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, सैतानाच्या मोहाला बळी न पडता तुझ्या प्रकाशात चालण्यास मला कृपा दे, आमेन.

✝️