उपवासकाळातील चौथा सप्ताह
सोमवार दि.३१ मार्च २०२५
✝️
“जा; तुमचा मुलगा वाचला आहे."
"Go; your son will live."
मुरानोचे संत डॅनियल
साधू (१४११)
✝️
संत डॅनियल हे एक जर्मन व्यापारी होते. व्यापारानिमित्ते ते अधूनमधून व्हेनिस शहराचा दौरा करीत असत. तिथेच ते मुरानो येथल्या भिक्षुकांच्या संपर्कात आले. त्या भिक्षुकांच्या जीवनपद्धतीमुळे आणि विचासरणीने ते इतके प्रभावित झाले की त्यांच्या सहवासात ते अधिक वेळ कसा घालविता येईल त्यासाठी धडपडू लागले आणि शेवटी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचीच वैराग्याची वस्त्रे धारण करून ते एका साधूप्रमाणे आपल्या घरात राहू लागले.
संत डॅनियल हे आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. बराच वेळ ते प्रार्थनेमध्ये गढून गेलेले दिसत. साधुवृत्तीचा अंगिकार केल्यानंतर त्याने आपली सर्व धनदौलत विकून टाकली आणि व्हेनिस शहरातील कंगाल-गरीब लोकांची दयनीय स्थिती सुधारण्यासाठी त्याने आ पली रक्कम दान करून टाकली; परंतु त्याची ही दानशूरता पाहून १४११ झाली काही दरोडेखोरानी त्यांच्या राहत्या घरावर हल्ला केला व त्यांची निर्घृण हत्या केली.
देवाने इस्त्रायल जनतेला नवीन जीवनदायी आशेचा संदेश दिला आहे. प्रभू येशूच्या येण्याने नवजीवनाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. कारण ज्या काना गावी येशूने पाण्याचा द्राक्षरस केला होता त्या गावी तो आला होता. तेथील एका मुलाचा बाप येशूकडे आला. त्या अंमलदाराला कदाचित येशूविषयी माहिती असावी कारण विश्वासाने तो येशूकडे आला होता, येशूची महानता आणि त्याचे सामर्थ्य अंमलदाराने ओळखले होते, म्हणूनच तो आपली प्रतिष्ठा व मानसन्माम बाजूला ठेवून जवळ जवळ २० मैलाचे अंतर चालून येशूकडे आला होता. त्याच्या विश्वासामुळे व नम्रतेमुळे देवाची कृपा त्याला प्राप्त झाली. येशूचे शब्द ऐकताच त्याने विश्वासाने, आपल्या घरचा रस्ता पकडला. विश्वास ठेवून निघून गेला. प्रभू येशूच्या दर्शनाने व त्याच्या शब्दाची अनुभूती घेतल्याने त्या माणसाचा मुलगा बरा झाला. विश्वासाने विश्वास वाढत असतो आणि नम्रता धारण केल्याने ! माणसाला मोठेपणा प्राप्त होत असतो.
✝️
पहिले वाचन :यशया ६५:१७-२१
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
प्रभू म्हणतो, "पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करतो. पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत. परंतु जे मी उत्पन्न करतो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्हास पावा; पाहा, मी येरुशलेम उल्हासमय, त्याचे लोक आनंदमय करतो. मी येरुशलेमविषयी उल्हास पावेन, माझ्या लोकांविषयी आनंद पावेन; त्यात शोकाचा व आकांताचा शब्द पुनः ऐकू येणार नाही. यापुढे थोडे दिवस वाचणारे अर्भके त्यात जन्माला येणार नाही, जो पुऱ्या आयुष्याचा होणार नाही असा म्हातारा त्यात असणार नाही; तेथील जो कोणी तरुणपणी मरेल तो शंभर वर्षाचा होऊन मरेल, देवाच्या शापाने मरणारा पापीही शंभर वर्षांचा होऊन मरेल. ते घरे बांधून त्यात राहतील; द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील."
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Isaiah 65:17-21
Thus says the Lord: "For behold, I create new heavens and a new earth, and the former things shall not be remembered or come into mind. But be glad and rejoice forever in that which I create; for behold, I create Jerusalem to be a joy, and her people to be a gladness. I will rejoice in Jerusalem and be glad in my people; no more shall be heard in it the sound of weeping and the cry of distress. No more shall there be in it an infant who lives but a few days, or an old man who does not fill out his days, for the young man shall die a hundred years old, and the sinner a hundred years old shall be accursed. They shall build houses and inhabit them; they shall plant vineyards and eat their fruit.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ३०:२,४-६,११-१३
प्रतिसाद :प्रभो, मी तुझा महिमा गातो
१) प्रभो, मी तुझा महिमा गातो,
कारण तू मला वर आणले आहेस;
अशा रीतीने माझ्या शत्रूंना तू आनंद होऊ दिला नाहीस.
हे प्रभो, तू अधोलोकातून मला वर आणलेस,
मी गर्तेत पडू नये म्हणून तू मला जिवंत ठेवलेस.
२) अहो प्रभूचे भक्त हो, त्याचे स्तवन करा,
त्याच्या पावित्र्याचे स्मरण करून धन्यवाद द्या.
त्याचा कोप केवळ क्षणभर; पण प्रसन्नता मात्र आयुष्यभर.
सायंकाळी दुःखाश्रू घर करतात, पण सकाळी आनंदाचा गजर होतो.
३) प्रभूने माझे ऐकले व माझ्यावर दया केली.
प्रभू माझा सहाय्यकर्ता झाला.
तू माझ्या शोकाचे रूपांतर करून मला आनंदाने नाचायला लावले आहेस.
हे प्रभो, माझ्या देवा, मी सदैव तुला धन्यवाद देईन.
Psalm 30:2 and 4, 5-6, 11-12a and 13b ( 2a)
R. I will extol you, Lord, for you have raised me up.
I will extol you, Lord, for you have raised me up,
and have not let my enemies rejoice over me.
O Lord, you have lifted up my soul from the grave,
restored me to life from those
who sink into the pit. R
Sing psalms to the Lord, you faithful ones;
give thanks to his holy name.
His anger lasts a moment;
his favour all through life.
At night come tears, but dawn brings joy.
Hear, O Lord, and have mercy on me;
be my helper, O Lord.
You have changed my mourning into dancing.
O Lord my God, I will thank you for ever. R
जयघोष
परमेश्वर म्हणतो, आता तरी मन:पूर्वक माझ्याकडे वळा, कारण मी कृपाळू व दयासागर आहे.
Acclamation:
Seek good, and not evil, that you may live; and the Lord the God of hosts, will be with you.
शुभवर्तमान योहान ४:४३-५४
वाचक :योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू शोमरोनहून गालिलात निघून गेला. कारण येशूने स्वत: साक्ष दिली की, संदेष्ट्याला स्वदेशात मान मिळत नाही. म्हणून तो गालिलात आल्यावर गालिलकरांनी त्याचा स्वीकार केला; कारण येरुशलेममध्ये सणात त्याने जे काही केले होते ते सर्व त्यांनी पाहिले होते, कारण तेही सणाला गेले होते.
नंतर तो गालिलातील काना येथे पुन्हा आला; तेथे त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता. त्या स्थळी कोणीएक अंमलदार होता, त्याचा मुलगा कर्फणहूम येथे आजारी होता. येशू यहुदियातून गालिलात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली की, आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करा; कारण तो मरणाच्या पंथाला लागला होता. त्यावर येशू त्याला म्हणाला, " तुम्ही चिन्हे व अद्भुते पहिल्या वाचून विश्वास ठेवणार नाही." तो अंमलदार त्याला म्हणाला, "प्रभुजी, माझे मूल मरण्यापूर्वी तुम्ही खाली येण्याची कृपा करा.” येशू त्याला म्हणाला, “जा; तुमचा मुलगा वाचला आहे." तो मनुष्य, येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून निघून गेला.
तो खाली जात असता त्याचे दास त्याला भेटून म्हणाले, "आपला मुलगा वाचला आहे." ह्यावरून त्याला कोणत्या ताशी उतार पडू लागला, हे त्याने त्यांना विचारले; त्यांनी त्याला म्हटले, "काल सातव्या ताशी त्याचा ताप गेला." ह्यावरून ज्या ताशी येशूने त्याला सांगितले होते की, "तुमचा मुलगा वाचला आहे, "त्याच ताशी हे झाले असे बापाने ओळखले आणि त्याने स्वत: व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला. येशूने यहुदियातून गालिलात आल्यावर केलेले हे दुसरे चिन्ह होय."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
John 4:43-54
At that time: Jesus departed [from Samaria) for Galilee. (For Jesus himself had testified that a prophet has no honor in his own hometown.) So when he came to Galilee, the Galileans welcomed him, having seen all that he had done in Jerusalem at the feast. For they too had gone to the feast. So he came again to Cana in Galilee, where he had made the water wine. And at Capernaum there was an official whose son was ill. When this man heard that Jesus had come from Judea to Galilee, he went to him and asked him to come down and heal his son, for he was at the point of death. So Jesus said to him, "Unless you see signs and wonders you will not believe." The official said to him, "Sir, come down before my child dies." Jesus said to him, "Go; your son will live." The man believed the word that Jesus spoke to him and went on his way. As he was going down, his servants met him and told him that his son was recovering. So he asked them the hour when he began to get better, and they said to him, "Yesterday at the seventh hour the fever left him." The father knew that was the hour when Jesus had said to him, "Your son will live." And he himself believed, and all his household. This was now the second sign that Jesus did when he had come from Judea to Galilee.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: उपवास काळामध्ये आपणांस आपल्या पापांसाठी पश्चात्ताप करून परमेश्वराकडे परत फिरण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. आपण जेव्हा आपल्या पापांबद्दल मनापासून पश्चात्ताप करतो आणि आपणांस आपल्या पापांची क्षमा होते तेव्हा त्यामध्ये जीवनाचा वेगळाच आनंद असतो. परमेश्वर हा आनंद आपणांस नित्य देऊ इच्छितो, म्हणून परमेश्वर सांगतो, "पाहा, मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी निर्माण करितो." जेथे फक्त आनंदच असेल आणि सर्व दुःखे, शोक आणि आकांत नाहीसे होतील. आपण परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण परमेश्वराने आपल्यासाठी चांगले योजिले आहे. आजच्या शुभवर्तमानात आपण पाहातो की एक अंमलदार प्रभू येशूच्या वचनावर विश्वास ठेवतो आणि पाहातो की मरावयास टेकलेला त्याचा मुलगा प्रभू येशूच्या "जा, तुझा मुलगा वाचला आहे." ह्या शब्दांमुळे पूर्णपणे बरा होतो. प्रभू येशू आपल्या शब्दांनी अमंलदार आणि त्याच्या कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित करतो. खरे पाहाता, हा आनंद त्यांना त्यांच्या विश्वासामुळे प्राप्त झाला. विश्वासामध्ये प्रचंड ताकद आहे आणि विश्वासामुळे आपण आपल्या जीवनात परमेश्वराच्या अद्भुत कृत्यांचा अनुभव घेऊ शकतो. फक्त परमेश्वरच माझ्या जीवनातील आनंद मला परत मिळवून देऊ शकतो. प्रभू परमेश्वरावर मनापासून विश्वास ठेवण्यास मी तयार आहे का?
प्रार्थना : हे प्रभू येशू , आमच्यातील अहंकार व अविश्वास काढून टाक आणि विश्वासाने तुझ्या सन्मार्गावर चालण्यास तुझी कृपा दे, आमेन.
✝️