Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading |Monday 3rd March 2025 | 8th Week in Ordinary Time

सामान्य काळातील ८वा  सप्ताह  

सोमवार दिनांक ३ मार्च  २०२५

✝️ 
जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल, माझ्यामागे ये." go, sell whatsoever thou hast, and give to the poor, and thou shalt have treasure in heaven; and come, follow me. 



संत कैथरीन

✝️   
सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी देवाच्या वचनाप्रमाणे पवित्रतेचे, नीतिमत्तेचे व त्यागाचे जीवन जगणे आवश्यक आहे. धन-संपत्तीची आणि ऐष आरामाची आस लागलेली माणसे जागतिक सुखाच्या लालसेने अनेकदा भ्रष्टाचारी जीवन जगत असतात. स्वार्थ साधण्यासाठी अविचार व अनीतिच्या मार्गाचा अवलंब केला जातो. सार्वकालिक जीवन वतन मिळविण्यासाठी परमेश्वराच्या मार्गात अडथळा बनणाऱ्या सर्व गोष्टींचा त्याग करणे आवश्यक आहे. त्यासाठी देवाला सर्वस्वी शरण जावे लागते. ख्रिस्तावर पूर्ण श्रद्धा ठेवून  पवित्र आत्म्याठायी देवपित्याबरोबर ऐक्य साधणे गरजेचे आहे.
प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांना आज धनसंपतीचा लाभ किंवा सार्वकालिक जीवन यापैकी एका गोष्टीची निवड करायला सांगत आहे. आपण  अंतर्मुख बनून त्याची वाणी ऐकू या.

पहिले वाचन सिराख १७:२४-२९

जे पश्चात्ताप करतात त्यांना प्रभू परत वळवतो आणि ज्यांची सहनशक्ती कमी होते त्यांना तो धैर्य देतो.

प्रभूकडे वळा आणि तुमचे दुर्वर्तन सोडा, त्याच्या समोर प्रार्थना करा आणि तुमचे गुन्हे कमी करा.
सर्वोच्च देवाकडे वळा, दुष्टाई सोडा आणि अमंगलाचा तीव्रतेने निषेध करा.
जिवंत लोक जसे प्रभूचे प्रतिगान गातात तसे मृत्युलोकात सर्वोच्च देवाचे स्तुतिगान कोण गाईल ?
जे जिवंत आणि कुशल आहेत ते परमेश्वराचे स्तुतिगान गातात; परंतु जे मेलेले आहेत, म्हणजे जे अस्तित्वात नाहीत, ते प्रभूची उपकारस्तुती गाऊ शकत नाहीत.
परमेश्वराची दया किती अपार आहे! आणि जे त्याच्याकडे वळतात त्यांच्याप्रती देवाची दया आणि क्षमा किती अपार आहे!
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
: Sirach 17: 20-24
Turn to the Lord, and forsake thy sins: Make thy prayer before the face of the Lord, and offend less. Return to the Lord, and turn away from thy injustice, and greatly hate abomination. And know the justices and judgments of God, and stand firm in the lot set before thee, and in prayer to the most high God. Go to the side of the holy age, with them that live and give praise to God. Tarry not in the error of the ungodly, give glory before death. Praise perisheth from the dead as nothing. Give thanks whilst thou art living, whilst thou art alive and in health thou shalt give thanks, and shalt praise God, and shalt glory in his mercies. How great is the mercy of the Lord, and his forgiveness to them that turn to him!
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र : ३२:१-२,५-७
प्रतिसाद : सज्जनहो, प्रभूठायी हर्ष करा !

१ ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे,
ज्याच्या पापांवर पांघरूण घातले आहे,
तो धन्य !
ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनीतीचादोष लावत नाही
आणि ज्याच्या मनात कपट नाही,तो मनुष्य धन्य ! (प्र.)

    पण आता मी आपली पापे तुझ्याजवळ कबूल केली,
मी आपली अनीती लपवून ठेवली नाही. 
"मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन" 
असे मी म्हणालो, तेव्हा तू, हे प्रभो, 
मला माझ्या पापदोषाची क्षमा केली. (प्र.)

३ ह्यासाठी प्रत्येक भक्ताने वेळीच तुझा धावा करावा. 
जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. 
हे प्रभो, तू माझे आश्रयस्थान आहेस, 
तू संकटापासून माझे रक्षण करशील. 
मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढशील. (प्र.)


  Psalms  32: 1-2, 5, 6, 7
R. (11a) Let the just exult and rejoice in the Lord.

1 To David himself, understanding. 
Blessed are they whose iniquities are forgiven, 
and whose sins are covered.
2 Blessed is the man to whom the Lord hath not imputed sin,
and in whose spirit there is no guile.
R. Let the just exult and rejoice in the Lord.

5 I have acknowledged my sin to thee, 
and my injustice I have not concealed.
 I said I will confess against myself my injustice to the Lord: 
and thou hast forgiven the wickedness of my sin.
R. Let the just exult and rejoice in the Lord.

6 For this shall every one that is holy 
pray to thee in a seasonable time. 
And yet in a flood of many waters, 
they shall not come nigh unto him.
R. Let the just exult and rejoice in the Lord.

7 Thou art my refuge from the trouble 
which hath encompassed me: 
my joy, deliver me from them that surround me.
R. Let the just exult and rejoice in the Lord.


जयघोष  
आलेलुया, आलेलुया ! 
हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव; मला सरळ मार्गाने ने.

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
Jesus Christ became poor although he was rich, so that by his poverty you might become rich.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  मार्क १०:१७-२७
वाचक :  मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 
येशू निघून वाटेस लागणार तोच एकाने धावत येऊन आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विचारले, "उत्तम गुरूजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे?" येशू त्याला म्हणाला, "मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव त्याच्यावाचून कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊकच आहेतः 'खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, ठकवू नको, आपला बाप आणि आपली आई ह्यांचा मान राख." त्याने त्याला उत्तर दिले, "गुरुजी, मी आपल्या तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा पाळत आलो आहे." येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि त्याच्यावर त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, "तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे; जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल, माझ्यामागे ये." परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले आणि कष्ट होऊन तो निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. तेव्हा येशू सभोवार पाहून आपल्या शिष्यांना म्हणाला, "देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण आहे बघा!" तेव्हा शिष्य त्याच्या बोलण्याने थक्क झाले. येशू त्यांना पुन्हा म्हणाला, "मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती तरी कठीण आहे! धनवानाला देवाच्या राज्यात जाणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे." तेव्हा ते अत्यंत विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, "तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?" येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, "मनुष्यांना हे अशक्य आहे, परंतु देवाला नाही; देवाला सर्व काही शक्य आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading:
 Mark 10: 17-27
 And when he was gone forth into the way, a certain man running up and kneeling before him, asked him, Good Master, what shall I do that I may receive life everlasting? And Jesus said to him, Why callest thou me good? None is good but one, that is God. Thou knowest the commandments: Do not commit adultery, do not kill, do not steal, bear not false witness, do no fraud, honour thy father and mother. But he answering, said to him: Master, all these things I have observed from my youth. And Jesus looking on him, loved him, and said to him: One thing is wanting unto thee: go, sell whatsoever thou hast, and give to the poor, and thou shalt have treasure in heaven; and come, follow me. Who being struck sad at that saying, went away sorrowful: for he had great possessions. And Jesus looking round about, saith to his disciples: How hardly shall they that have riches, enter into the kingdom of God! And the disciples were astonished at his words. But Jesus again answering, saith to them: Children, how hard is it for them that trust in riches, to enter into the kingdom of God? It is easier for a camel to pass through the eye of a needle, than for a rich man to enter into the kingdom of God. Who wondered the more, saying among themselves: Who then can be saved? And Jesus looking on them, saith: With men it is impossible; but not with God: for all things are possible with God.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 

चिंतन:
परमेश्वराची दया किती महान आहे, त्याच्याकडे पश्चात्तापी अंतःकरणाने येणाऱ्या • सर्वांना परमेश्वर उदारतेने क्षमा करतो. आजचे  पहिले वाचन आपणांस पाप सोडून, अमंगलाचा तिरस्कार करून, दुष्कृत्याचा त्याग करून  परात्पर परमेश्वराकडे परत फिरण्यासाठी आव्हान - करीत आहे. परमेश्वर आपणांवर विपुल प्रेम - करतो आणि म्हणून तो आपणांस आपल्या = पापांची क्षमा करतो. आजच्या शुभवर्तमानात आपण वाचतो की प्रभू येशूने त्याच्याकडे  आलेल्या तरुणाला त्याचे अनुसरण करण्याचे - आमंत्रण देण्याअगोदर त्याच्याकडे निरखून पाहिले आणि त्याच्यावर प्रीती केली. प्रभू येशूने - ह्या तरुणाला सर्व गोष्टींचा संपूर्ण त्याग करून त्याला अनुसरण्यासाठी आमंत्रित केले. त्या तरुणाकडे सध्या असलेल्या संपत्तीपेक्षा प्रभू येशूने त्याला स्वार्गीय संपत्ती देण्याचे आश्वासन दिले. त्या तरुणाकडे पर्याय होता स्वतःची संपत्ती किंवा स्वर्गीय संपत्ती, प्रभू येशूच्या मागेजाणे किंवा स्वतःच्या संपत्तीसह राहाणे. दुर्दैवाने ह्या तरुणांनी प्रभू येशूपेक्षा आपल्या संपत्तीवर जास्त प्रेम केले आणि प्रभू येशूला पूर्णपणे ओळखण्यास तो कमी पडला. प्रभू येशू आपणांस त्याचे अनुसरण करण्यासाठी बोलावत आहे. आपल्या जीवनात सर्व गोष्टींपेक्षा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला अधिक प्राधान्य दिले पाहिजे.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्याकडे सार्वकालिक जीवनाची वचने आहेत, ती! | आचरण्यास व तुझी आज्ञा पाळण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
✝️