उपवासकाळातील पहिला सप्ताह
शनिवार दि. १५ मार्च २०२५
✝️
तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
Love your enemies and pray for those who persecute you,
परमेश्वराठायी भोदभाव नसून तो सर्वांवर सारखाच प्रेम करीत असतो, म्हणूनच प्रभू म्हणत आहे, 'जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा.' प्रभूमध्ये पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी प्रभूची प्रीतिची आज्ञा पाळावीच लागेल.
वैऱ्यांवर प्रीति करण्यासाठी मन खूप मोठ असाव लागते. त्याचप्रमाणे जे आपला छळ करतात व आपल्यावर अन्याय करतात त्यांच्यासाठी प्रार्थना हाच एकमेव चांगला मार्ग आहे. प्रभूने दिलेली ही शिकवण आपल्याला परिपूर्णतेकडे नेणारी आहे. देवाची लायक मुले बनण्यास व त्याच्या प्रीतिचे
साक्षीदार बनण्यास आपण प्रेरणादायी जीवन जगू या..
✝️
पहिले वाचन अनुवाद २६:१६-१९
वाचक : अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तू परमेश्वर आपला देव ह्याची पवित्र प्रजा होशील."
मोशेने लोकांना म्हटले, “हे विधी व नियम तू पाळावे अशी आज्ञा आज तुझा देव परमेश्वर तुला करीत आहे म्हणून ते तू जिवेभावे व काळजीपूर्वक पाळ. परमेश्वर हा आपला देव आहे असे मान्य करून तू आज वचन दिले आहे की, मी तुझ्या मार्गानी चालेन. तुझे विधी, आज्ञा व नियम पाळीन आणि तुझा शब्द मानीन आणि परमेश्वरानेही आज मान्य केले आहे. तुला संगितल्याप्रमाणे तू माझी खास प्रजा झाली आहेस. तू माझ्या सर्व आज्ञा पाळ, म्हणजे मी निर्माण केलेल्या सर्व राष्ट्रांपेक्षा प्रशंसा, नावलौकिक आणि सन्मान ह्या बाबतीत तुला श्रेष्ठ करीन आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तू परमेश्वर आपला देव ह्याची पवित्र प्रजा होशील.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Deuteronomy 26:16-19
Moses spoke to the people, saying: "This day the Lord your God commands you to do these statutes and rules. You shall therefore be careful to do them with all your heart and with all your soul. You have declared today that the Lord is your God, and that you will walk in his ways, and keep his statutes and his commandments and his rules, and will obey his voice. And the Lord has declared today that you are a people for his treasured possession, as he has promised you, and that you are to keep all his commandments, and that he will set you in praise and in fame and in honour high above all nations that he has made, and that you shall be a people holy to the Lord your God, as he promised.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ११९:१-२,४-५, ७-८
प्रतिसाद : जे प्रभूच्या धर्मशास्त्रानुसार वागतात, ते धन्य!
१) ज्याचे आचरण शुद्ध आहे,
जे प्रभूच्या धर्मशास्त्रानुसार वागतात, ते धन्य!
जे त्याची शिकवण आचरतात,
अगदी मनापासून त्याचा शोध करतात, ते धन्य होत.
२) प्रभू तुझे आदेश आम्ही निष्ठापूर्वक पाळावेत.
म्हणून तू ते आम्हांला देऊन ठेवले आहेत.
तुझ्या नियमांप्रमाणे आचरण राखण्याकडे
माझी प्रवृत्ती असली तर बरे.
३) तुझे न्याय्य संकेत मला समजू लागतील.
तसा मी सरळ मनाने तुला धन्यवाद देईन.
मी तुझे नियम पाळीन, मला कधीच अंतर देऊ नकोस.
Psalm 119:1-2, 4-5, 7-8
Blessed are those who walk in the law of the Lord
Blessed are those whose way is blameless,
who walk in the law of the Lord!
Blessed are those who keep his decrees!
With all their hearts they seek him. R
You have laid down your precepts
to be carefully kept.
May my ways be firm
in keeping your statutes.
I will thank you with an upright heart,
I learn your as just judgments.
I will keep your statutes;
do not ever forsake me. R
जयघोष
जे वचन ऐकून सालस व चांगल्या अंतःकरणात
धरून ठेवतात आणि धीराने फळ दे जातात, ते धन्य होत.
Acclamation:
Behold, now is the favourable time;
behold, now is the day of salvation
शुभवर्तमान मत्तय ५:४३-४८
वाचक :संत मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा"
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करा व आपल्या वैऱ्यांचा द्वेष करा, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाइटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो. जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय ? जकातदारही तसेच करतात ना? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करता? परराष्ट्रीयही तसे करतात ना? ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Matthew 5:43-48
At that time: Jesus said to his disciples, "You have heard that it was said, 'You shall love your neighbour and hate your enemy. But I say to you, Love your enemies and pray for those who persecute you, so that you may be sons of your Father who is in heaven. For he makes his sun rise on the evil and on the good, and sends rain on the just and on the unjust. For if you love those who love you, what reward do you have? Do not even the tax collectors do the same? And if you greet only your brothers, what more are you doing than others? Do not even the Gentiles do the same? You therefore must be perfect, as your heavenly Father is perfect.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:आज प्रभू येशू आपणांस सांगतो की, "जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा." परमेश्वराची परिपूर्णता कोणत्याही अशक्त माणसाला मिळणार नाही, परंतु परमेश्वराठायी परिपूर्ण होणे हे आपले पाचारण आहे. परिपूर्णता म्हणजे आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आपण परमेश्वराच्या कृपेने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज मला परिपूर्ण होण्यासाठी सांगण्यात आले आहे, म्हणजे कालचा काळ कायमचा निघून गेला आहे. मी त्या काळामध्ये घडलेल्या माझ्या पापांबद्दल फक्त पश्चात्ताप करू शकतो. माझ्याकडे आता वर्तमानकाळ आहे आणि उद्याचे मला ठाऊक नाही. म्हणून आज मी परिपूर्ण होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण आपली परमेश्वरावरील निष्ठा आणि विश्वास राखला पाहिजे. आपण परमेश्वराने दिलेल्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. परमेश्वरासारखे पूर्ण होण्यासाठी प्रभू येशू आपणांस मार्ग दाखवत आहे. "तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा." हे शक्य आहे का? अंतःकरणाचे परिपूर्णत्व गाठल्याशिवाय आणि पवित्र आत्म्याच्या कृपेने भरल्याशिवाय आपण आपल्या वैऱ्यांवर प्रीती करू शकत नाही किंवा आपला छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना करू शकत नाही. आपल्यासाठी जे अवघड आहे ते परमेश्वरासाठी शक्य आहे. परिवर्तन हे परमेश्वराच्या आशीर्वादानेच घडून येते.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या वचनानुसार व आज्ञेनुसार प्रेम व सर्वांगपूर्ण शील जोपासण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.