उपवासकाळातील पहिला सप्ताह
मंगळवार दि. ११ मार्च २०२५
✝️
“तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका,
At that time: Jesus said to his disciples, "When you pray, do not heap up empty phrases as the Gentiles do,
✝️
प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात प्रार्थनेचे महत्त्व आणि अर्थ स्पष्ट करुन आपल्याला प्रार्थना कशी करावी ते शिकवित आहे. आपल्याला जीवन जगण्यासाठी काय हवे आणि कशाची गरज आहे हे स्वर्गीय पिता जाणून आहे. प्रभूच्या प्रार्थनेतील 'तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.' ह्या वचनांवर आपण चिंतन करीत आहोत. आपली इच्छा असते की, आपल्या जीवनात सर्वकाही सुरळीत असावे व चांगले ते घडावे. मात्र आपल्या जीवनातील देवाची इच्छा जाणण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. त्यासाठी परमेश्वराच्या वचनावर भिस्त ठेवून जगायला शिकले पाहिजे. परमेश्वराचे वचन कधीच विफल होत नाही, परंतु त्यासाठी प्रार्थनेद्वारे परमेश्वराबरोबर संवाद साधून त्याची इच्छा जाणण्यासाठी आपले सर्वस्व त्याला समर्पित करायला हवे.
'हे आमच्या स्वर्गातील पित्या' ही प्रार्थना आज आपण दिवसभर मनातल्या मनात बोलू या.
✝️
पहिले वाचन यशया ५५:१०-११
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"माझा शब्द माझ्या इच्छा पूर्ण करील."
प्रभू म्हणतो, “पाहा, पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून, पेरणाऱ्याला बीज, खाणाऱ्याला भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत. त्याचप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठवले ते केल्यावाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही."
प्रभूचा शब्द
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Isaiah 55:10-11
Thus says the Lord: "As the rain and the snow come down from heaven and do not return there but water the earth, making it bring forth and sprout, giving seed to the sower and read to the eater, so shall my word be that goes out from my mouth; it shall not return to me empty, but it shall accomplish that which I purpose, and shall succeed in the thing for which I sent it.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ३४:४-७,,१६-१९
प्रतिसाद : सात्त्विकांचा धावा प्रभू ऐकतो.
१) माझ्याबरोबर प्रभूची थोरवी गा.
त्याच्या नामाचा महिमा आपण एकमुखाने गाऊ या.
मी प्रभूला शरण गेलो.
त्याने माझे ऐकले.
त्याने माझी सगळी भीती घालविली.
२) त्याच्याकडे पाहणाऱ्यांची मुद्रा तेजस्वी होते.
त्यांचा चेहरा निराशेने पडणार नाही.
मी पामराने धावा केला, प्रभूने तो ऐकला
आणि माझी संकटे हरण केली.
३) वाईट करणारांची आठवणदेखील
पृथ्वीवरून बुजवून टाकावी म्हणून
प्रभू त्यांना विमुख होतो.
प्रभूची दृष्टी सात्त्विकांकडे लागलेली असते.
त्यांची हाक ऐकायला त्याचे कान उघडे असतात.
४) सात्त्विक धावा करतात, प्रभू ऐकतो.
तो सर्व संकटांतून त्यांना सोडवतो.
ज्यांची कंबर खचली आहे अशांच्या जवळ प्रभू असतो.
ज्यांचे अवसान गळाले आहे अशांचा तो उद्धार करतो.
Psalm 34:4-5, 6-7, 16-17, 18-19 R The Lord rescues them in all their distress.
Glorify the Lord with me;
together let us praise his name.
I sought the Lord, and he answered me;
from all my terrors he set me free. R
Look toward him and be radiant;
let your faces not be abashed.
This lowly one called; the Lord heard,
and rescued him from all his distress.
The Lord turns his eyes to the just,
and his ears are open to their cry.
The Lord turns his face against the wicked
to destroy their remembrance from the earth. R
When the just cry out, the Lord hears,
and rescues them in all their distress.
The Lord is close to the broken hearted;
those whose spirit is crushed he will save. R
जयघोष
प्रभू म्हणतो, "आता तरी मनःपूर्वक माझ्याकडे वळा कारण मी कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे."
Acclamation:
Man shall not live by bread alone,
but by every word that comes from the mouth of God.
शुभवर्तमान मत्तय ६:७-१५
वाचक :मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“ह्यास्तव तुम्ही ह्याप्रकारे प्रार्थना करा."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका, आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे.
ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा :
हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हांला दे. आणि जसे आम्ही आमच्या देणेकऱ्यांना देणे सोडले आहे तसे तू आमची देणी आम्हांला सोड. आमची तू परीक्षा पाहू नको आणि आम्हांला वाईटापासून सोडव.
कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Matthew 6:7-15
At that time: Jesus said to his disciples, "When you pray, do not heap up empty phrases as the Gentiles do, for they think that they will be heard for their many words. Do not be like them, for your Father knows what you need before you ask him. Pray then like this:
"Our Father in heaven, hallowed be your name.
Your kingdom come,
your will be done, on earth as it is in heaven.
Give us this day our daily bread,
and forgive us our debts,
as we also have forgiven our debtors.
And lead us not into temptation,
but deliver us from evil.
For if you forgive others their trespasses, your heavenly Father will also forgive you, but if you do not forgive others their trespasses, neither will your Father forgive your trespasses.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: परमेश्वराच्या मुखातून निघालेले वचन हे फलप्राप्तीसाठी आहे आणि ते वचन विफल होऊन परमेश्वराकडे परत जाणार नाही. वचन परमेश्वराचे आहे आणि मी त्या वचनाचे फळ दिले पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम मी परमेश्वराचे वचन आत्मसात केले पाहिजे आणि पाळले पाहिजे. मी एकटा फळ देऊ शकत नाही; तर त्यासाठी मला परमेश्वराची साथ लागते. द्राक्षवेलीमध्ये राहूनच मी फळ देण्यासाठी प्रभू येशू 'आमच्या बापा' ह्या प्रार्थनेमधील मध्यबिंदूवर बोट ठेवतो; “जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुम्हांला तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही." क्षमा केल्यानेच क्षमा होते. जर आपण परमेश्वराकडून आपल्या पापांची क्षमा मागत असू तर देवाचे वचन आपणांस आठवण करून देते की आपण आपल्या अपराध्यांस प्रथम क्षमा केली पाहिजे, कारण आपण सर्व भाऊबंध आणि एकाच देवाची लेकरे आहोत. क्षमा करण्यामध्येच अंतःकरणाचा विशेष आनंद आहे. क्षमा करणे कठीण आहे आणि माझ्या मानवी स्वभावामध्ये ते मला शक्य होत नाही, म्हणून मला इतरांना क्षमा करण्यासाठी पवित्र आत्म्याच्या कृपासामर्थ्याची गरज आहे. ह्या उपवास-काळामध्ये इतरांना क्षमा करण्याचे दान परमेश्वराने आपणांस बहाल करावे, म्हणून आपण परमेश्वराठायी विशेष आशीर्वाद मागू या.
प्रार्थना : हे प्रभू येशू, स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे अनुकरण करण्यास मला प्रेरणा व सद्बुद्धी दे, आमेन.