उपवासकाळातील चौथा सप्ताह
मंगळवार दि. १ एप्रिल २०२५
✝️
“जा; तुमचा मुलगा वाचला आहे."
"Go; your son will live."
संत ह्यू
•महागुरू, वर्तनसाक्षी (१०५०-११३२)
संत ब्रुनो ह्यांनी त्यांचे आध्यात्मिक मार्गदर्शक या नात्याने संत ह्यू ना खास सल्ला देऊन त्यांच्या उपासतापासावर नियंत्रण आणले. परंतु भयंकर आत्मक्लेशाची सवय असलेल्या संत यू ह्यांनी अनवाणी चालण्याचे सोडून दिले नाही.
गरिबांविषयी त्यांच्या मनात इतकी जबरदस्त कळकळ भरलेली होती की त्यांच्या कल्याणासाठी संत यू ह्यांनी आपला सोनेरी प्याला (द्राक्षरसासाठी वापरला जाणारा) आणि महागुरूपदाची सोनेरी अंगठी विकून त्याचे पैसे दीनदलितांना वाटून टाकले. भांडणतंटा सोडविण्यात आणि दोन्ही पक्षांना समाधानपूर्वक न्याय देण्यात त्यांचा हातखंडा होता. दोन्ही पक्ष शांतीने आपापल्या घरी परत जात असत.
४० वर्षांच्या शारीरिक व मानसिक यातनांमध्ये होरपळत असलेला देऊळमातेचा हा राजपुत्र १ एप्रिल १९३२ रोजी आपल्या स्वर्गधामी निघून गेला. अवघ्या दोनच वर्षांनी त्यांना संतपदामध्ये समाविष्ट करण्यात आले.
“प्रार्थनेमुळे मला सतत ताजे टवटवीत व शक्तिशाली वाटते. निरर्थकता • आणि चुकीच्या मोहपाशांना बळी पडणारा आत्मा सहज सैतानाच्या जबड्यात अडकतो." - ग्रेनोबलचे संत ह्यू
पवित्र स्थानातून निघणारा हा झरा सर्वांना आरोग्य देणारा आहे.
असाध्य आजाराने त्रस्त झालेली माणसे जीवनाला कंटाळलेली असतात, अडतीस वर्षे बाजेवर पडलेल्या आजारी माणसाचा विश्वास आणि चिकाटी वाखाणण्यासारखी आहे. आरोग्यदायी जीवनाच्या बेथसेदा तळ्याजवळ तो सतत प्रयत्नशील होता, म्हणूनच योग्य वेळी त्याच्या जीवनात चमत्कार घडला. आपले आजार, वेदना संकटे व अडचणी दूर करण्यासाठी आपण त्या कृपेच्या झऱ्याजवळ जायला हवे. ख्रिस्तावरील आपला विश्वास दृढबनवून त्याला शरण जाणे महत्वाचे आहेच,
पहिले वाचन : यहेज्केल ४७:१-९.१२
वाचक : यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन
देवदुताने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले, तो पाहा, मंदिराच्या उंबरठ्याखालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत आहे; मंदिराची पुढली बाजू पूर्वेस होती; तो झरा मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता. त्याने मला उत्तर द्वाराच्या वाटेने बाहेर नेले व बाहेरच्या रस्त्याने सभोवार फिरवून बाहेरल्या द्वाराकडे म्हणजे पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराकडे नेले, ते पाहा, द्वाराच्या उजव्या बाजूस पाणी वाहत आहे.
मग तो पुरुष पूर्व दिशेस चालला व त्याच्या हाती मापनसूत्र होते; त्याने एक हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालायला सांगितले, तो तेथे पाणी घोट्यापर्यंत होते. त्याने आणखी हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालायला सांगितले, तो तेथे पाणी गुडघ्यापर्यंत होते. त्याने आणखी हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालायला सांगितले, तो तेथे पाणी कमरेपर्यंत होते. त्याने आणखी हजार हात अंतर मापले तो त्या नदीतून माझ्याने चालवेना, कारण पाणी फार झाले; मला त्यातून पोहून जाता आले असते; उतरुन जाता आले नसते, एवढी ती नदी झाली. तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू हे पाहिले ना ?"मग त्याने मला नदीच्या तीराने माघारी नेले. परत येत असता नदीच्या दोन्ही तीरांवर पुष्कळ झाडे असलेली मी पाहिली. तो मला म्हणाला, "हे पाणी पूर्वप्रदेशांकडे वाहत जाते आणि तेथून अरबांत उतरून समुद्राकडे जाते; ही नदी समुद्राला मिळून त्याचे पाणी निर्दोष होते. ही महानदी जाईल तेथे तेथे तिच्यामध्ये जे जीवजंतू भरलेले असतील ते जगतील व तिच्यामध्ये मासे विपुल होतील; कारण जेथे जेथे हे पाणी जाईल तेथे तेथे सर्व काही निरोगी होईल; जेथे जेथे ही नदी जाईल तेथे तेथे सर्व प्राणी जिवंत राहातील. नदीच्या उभय तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी हरतऱ्हेची झाडे वाढतील. त्यांची पाने वाळणार नाहीत; त्याच्या फळांचा बहर खुंटणार नाही; प्रतिमासी ती पक्व फळे देतील, कारण त्या नदीचे पाणी पवित्रस्थानातून निघाले आहे. त्या वृक्षाची फळे खाण्याजोगी व त्यांची पाने औषधी होतील."
First Reading :
Ezekiel 47:1-9, 12
In those days: [The angelj brought me back to the door of the temple, and behold, water was issuing from below the threshold of the temple toward the east (for the temple faced east). The water was flowing down from below the south end of the threshold of the temple, south of the altar. Then he brought me out by way of the north gate and led me around on the outside to the outer gate that faces toward the east; and behold, the water was trickling out on the south side. Going on eastward with a measuring line in his hand, the man measured a thousand cubits, and then led me through the water, and it was ankle-deep. Again he measured a thousand, and led me through the water, and it was knee-deep. Again he measured a thousand, and led me through the water, and it was waist-deep. Again he measured a thousand, and it was a river that I could not pass through, for the water had risen. It was deep enough to swim in, a river that could not be passed through. And he said to me, "Son of man, have you seen this?" Then he led me back to the bank of the river. As I went back, I saw on the bank of the river very many trees on the one side and on the other. And he said to me, "This water flows toward the eastern region and goes down into the Arabah, and enters the sea; when the water flows into the sea, the water will become fresh. And wherever the river goes, every living creature that swarms will live, and there will be very many fish. For this water goes there, that the waters of the sea may become fresh; so everything will live where the river goes. And on the banks, on both sides of the river, there will grow all kinds of trees for food. Their leaves will not wither, nor their fruit fail, but they will bear fresh fruit every month, because the water for them flows from the sanctuary. Their fruit will be for food, and their leaves for healing."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ४६:२-३,५-६,८-९
प्रतिसाद :सेनाधीश प्रभू आमच्याबरोबर आहे.
१) देव आमचा आश्रयदाता व सामर्थ्यदाता आहे.
तो संकटकाळी साह्य करण्यास सदा सिद्ध असतो;
पृथ्वी गडगडली, पर्वत कोसळून समुद्रात खोलवर बुडाले
तरी आम्ही भिणार नाही.
२) जिचे पाट देवाच्या नगरीला, प
रात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदित करतात
अशी एक नदी आहे. त्या नगरीस देव आहे,
ती हादरणार नाही; तांबडे फुटते न फुटते
तोच देव तिला मदत करील.
३) सेनाधीश प्रभू आमच्याबरोबर आहे;
याकोबचा देवा आमचा उंच बुरूज आहे.
प्रभूने काय केले आहे, ते येऊन पाहा;
त्याने पृथ्वीची कशी धूळधाण केली आहे.
Psalm 46:2-3, 5-6, 8-9 (8)
The Lord of hosts is with us;
the God of Jacob is our stronghold.
God is for us a refuge and strength,
an ever-present help in time of distress:
so we shall not fear though the earth should rock,
though the mountains quake to the heart of the sea. R
The waters of a river give joy to God's city,
the holy place, the dwelling of the Most High.
God is within, it cannot be shaken;
God will help it at the dawning of the day.
The Lord of hosts is with us:
the God of Jacob is our stronghold.
Come and behold the works of the Lord,
the awesome deeds he has done on the earth.
जयघोष
तुम्ही वाचावे म्हणून बऱ्याच्या मागे लागा; वाइटाच्या मागे लागू नका, म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमेश्वर, सेनाधीश देव, तुम्हांबरोबर असेल.
Acclamation:
Create a pure heart for me, O God; restore in me the joy of your salvation.
शुभवर्तमान योहान५:१-३,५-१६
वाचक :योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
यहुद्यांचा सण होता, तेव्हा येशू वर यरुशलेमला गेला. यरुशलेममध्ये मेंढरेद्वार नावाच्या स्थळाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात; त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे ह्यांचा मोठा समुदाय पडलेला असे. तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला कोणीएक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, "तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?" त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले, "महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही; मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो." येशू त्याला म्हणाला, "ऊठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग." लागलीच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला.
त्या दिवशी शब्बाथ होता. ह्यावरून यहुदी त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले, "आज शब्बाथ आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही." त्याने त्यांना उत्तर दिले, “ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की, आपली बाज उचलून चालू लाग," त्यांनी त्याला सांगितले, "आपली बाज उचलून चाल असे ज्याने तुला सांगितले, तो कोण माणूस आहे?" तो कोण आहे हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते; कारण त्या ठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस; आतापासून पाप करू नको; करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल." त्या माणसाने जाऊन यहुद्यांना सांगितले, ज्याने मला बरे केले तो येशू आहे. ह्यामुळे यहुदी येशूच्या पाठीस लागले, कारण तो शब्बाथ दिवशी अशी कामे करीत असे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
John 5:1-16
There was a feast of the Jews, and Jesus went up to Jerusalem. Now there is in Jerusalem by the Sheep Gate a pool, in Aramaic called Bethesda, which has five roofed colonnades. In these lay a multitude of invalids-blind, lame, and paralyzed. One man was there who had been an invalid for thirty-eight years. When Jesus saw him lying there and knew that he had already been there a long time, he said to him, "Do you want to be healed?" The sick man answered him, "Sir, I have no one to put me into the pool when the water is stirred up, and while I am going another steps down before me." Jesus said to him, "Get up, take up your bed, and walk." And at once the man was healed, and he took up his bed and walked. Now that day was the Sabbath. So the Jews said to the man who had been healed, "It is the Sabbath, and it is not lawful for you to take up your bed." But he answered them, "The man who healed me, that man said to me, 'Take up your bed, and walk." They asked him, "Who is the man who said to you, Take up your bed and walk?" Now the man who had been healed did not know who it was, for Jesus had withdrawn, as there was a crowd in the place. Afterward Jesus found him in the temple and said to him, "See, you are well! Sin no more, that nothing worse may happen to you." The man went away and told the Jews that it was Jesus who had healed him. And this was why the Jews were persecuting Jesus, because he was doing these things on the Sabbath.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: परमेश्वर आपणांस नेहमीच बरे करू इच्छितो आणि चांगले आरोग्य देऊ इच्छितो, कारण परमेश्वर आरोग्यदाता परमेश्वर आहे आणि आपण परमेश्वराच्या आरोग्यदायी देणगीचा मनापासून स्वीकार केला पाहिजे. आजच्या पहिल्या वाचनात आपणांस परमेश्वराच्या मंदिरातून वाहणाऱ्या आरोग्यदायी पाण्याचा दृष्टांत दिला आहे. मंदिराच्या वेदीमधून निघालेल्या पाण्याची वाढ होऊन त्याची महानदी होते. म्हणजे परमेश्वराच्या आशीर्वादांना आणि कृपेला कोणतीही सीमा नाही. ही कृपा परमेश्वराने आपणांस विपुल प्रमाणात बहाल केली आहे. आजचे शुभवर्तमान प्रकट करते की स्वतः प्रभू येशू जिवंत पाणी आहे, कारण बेथेस्दा तळ्याजवळ असलेल्या आजारी माणसाची पीडा केवळ प्रभू येशूच ओळखू शकला. प्रभू येशूने त्याला तळ्याच्या पाण्यात सोडले नाही; तर आपल्या जीवनरूपी शब्दांच्या पाण्याने त्याला बरे केले आणि नंतर त्याला ताकीद दिली की पाप करू नकोस, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा वाईट होईल. ह्याचा अर्थ ह्या माणसाची दैन्यावस्था त्याच्या पापांमुळे झाली होती. आपणांसाठी संदेश स्पष्ट आहे की त्या माणसाचे शारीरिक व्यंग आपल्या जीवनातील पापांची प्रतिमा आहे. जेव्हा आपण पाप करतो तेव्हा आपण स्वतःला 'अर्धांगवायू' करतो. पापाचे आपल्या जीवनावर गंभीर परिणाम होतात. विशेषतः गंभीर पाप आपणांस प्रेम करण्यास आणि खऱ्या स्वातंत्र्यात जीवन जगण्यास असमर्थ बनवते. आपल्या जीवनात आपण पापांचे परिणाम पाहाणे महत्त्वाचे आहे. परमेश्वर आपणांस आत्म्याचे स्वास्थ्य देऊ इच्छितो, पण त्यासाठी आपण पापांचा त्याग केला पाहिजे.
प्रार्थना:हे प्रभू येशू, आम्ही सन्मार्गावर चालावे व शुद्धतेचे जीवन जगून तुझी सुवार्ता इतरापर्यंत पोहोचविण्यास आम्हाला सामर्थ्य दे, आमेन.