सामान्य काळातील ८वा सप्ताह
मंगळवार दिनांक ४ मार्च २०२५
✝️
“पाहा, आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत.” Behold, we have left all things, and have followed thee.
✝️
ऑस्ट्रेलियाच्या सद्गुणी एलिझाबेथ आणि पोलंडचा कर्तव्यतत्पर राजा कासिमीर चौथा ह्यांच्या पोटी कासिमीर हा दुसरा मुलगा जन्माला आला. पोलंडचा सुप्रसिद्ध इतिहासकार जॉन डग्लस ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे प्रारंभीचे शिक्षण झाले. त्यांच्याकडून त्यावेळी त्याला धार्मिक जीवनाचे बाळकडू मिळाले. पुढे हे इतिहासकार लेम्बर्ग धर्मप्रांताचे आर्चबिशप झाले.
वयाच्या ९ व्या वर्षातच कासिमीर ह्याने आपल्या तीक्ष्ण बुद्धीमतेची आणि पवित्र जीवनाची चमक दखविली होती. तो तासन् तास व बंद असलेल्या देवळासमोर गुडघे टेकून प्रार्थना करण्यात मग्न असे. कधी कधी संपूर्ण रात्रभर तो त्या अवस्थेत प्रार्थनेमध्ये गुंग होऊन जाई. पोलंडचे हवामान त्याच्या ह्या आध्यात्मिकतेला अजिबात अनुकूल नव्हते. तशात तो वरचेवर उपवास करायचा. जमिनीवर झोपायचा आणि केवळ एकच केसाळ शर्ट वापरायचा. गरिबांविषयी त्याच्या मनात अपार करूणा भरून राहिलेली होती. त्यामुळे लवकरच त्याला “गरीब व दीनदुबळे ह्यांचा संरक्षक व कैवारी" असा किताब मिळाला.
✝️
देवाच्या व तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमात पडलेल्या शिष्यांनी आपले सर्वस्व समर्पण करुन प्रभूला अनुसरण्याचा निर्णय घेतला होता. प्रभू येशूने आपल्या सर्व शिष्यांना आश्वासन देऊन म्हटले 'सुवार्ते करिता सर्वस्वाचा त्याग करणाऱ्यांस शंभरपटीने मिळेलच व त्याबरोबर सार्वकालिक जीवन मिळेल.' देवाला आपण काय समर्पण करणार आहोत ह्यावर आज चितंन करु या.
सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रत्येकाला देवाच्या राज्यात प्रवेश मिळावा म्हणून आपण प्रभू येशू बरोबरचे आपले ऐक्याचे संबंध तपासून पाहू या.
✝️
पहिले वाचन :बेन सिरा ३५:१-१२
वाचक : बेन सिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन
"आदेशांचे पालन करणे म्हणजे शांतिबली अर्पण करण्यासारखे आहे."
कायद्याचे पालन करणे म्हणजे पुष्कळ दानार्पण करण्यासारखे आहे; आदेशाचे पालन करणे म्हणजे शांतिबली अर्पण करण्यासारखे आहे. उपकाराची परतफेड करणे म्हणजे अन्नबली अर्पण करण्यासारखे आणि शिक्षादान देणे म्हणजे उपकारबली अर्पण करण्यासारखे होय.दुष्कर्मापासून दूर राहिल्याने परमेश्वर संतुष्ट होतो आणि दुराचरणाचा त्याग हे पापाचे प्रायश्चित्त होते. रिकाम्या हातांनी परमेश्वरापुढे जाऊ नका, कारण ह्या सर्व गोष्टी आदेशांना धरून आहेत. सदाचारी माणसाच्या दानार्पणाने वेदीचा अभिषेक होतो आणि त्याचा आल्हाददायक सुवास सर्वोच्च प्रभूपर्यंत पोहोचतो.
सदाचारी माणसाचे बलिदान प्रभूला स्वीकारणीय आहे आणि त्याचे विस्मरण कधी होत नाही. उदार मनाने प्रभूची पूजा करा आणि तुमची प्रथमफळे अर्पण करण्यास कुचराई करू नका.
प्रत्येक दान प्रसन्न चित्ताने अर्पण करा आणि उल्हासित मनाने दशांश द्या. ज्या प्रमाणात सर्वोच्च देवाकडून तुम्हाला मिळाले आहे त्या प्रमाणात यथाशक्ती सर्वोच्च परमेश्वराला दान द्या. कारण प्रभू सदैव परतफेड करणारा आहे, तो सात पटीने परत करील. त्याला लाच दाखवू नका, ती तो स्वीकारत नाही. परमेश्वर असा न्यायाधीश आहे. तो पक्षपाती न्याय करत नाही म्हणून अधार्मिक बलिदानावर विसंबून राहू नका.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
: Sirach 35: 1-12
He that keepeth the law, multiplieth offerings. It is a wholesome sacrifice to take heed to the commandments, and to depart from all iniquity. And to depart from injustice, is to offer a propitiatory sacrifice for injustices, and a begging of pardon for sins. He shall return thanks, that offereth fine flour: and he that doth mercy, offereth sacrifice. To depart from iniquity is that which pleaseth the Lord, and to depart from injustice, is an entreaty for sins. Thou shalt not appear empty in the sight of the Lord. For all these things are to be done because of the commandment of God. The oblation of the just maketh the altar fat, and is an odour of sweetness in the sight of the most High. The sacrifice of the just is acceptable, and the Lord will not forget the memorial thereof. Give glory to God with a good heart: and diminish not the firstfruits of thy hands. In every gift shew a cheerful countenance, and sanctify thy tithes with joy. Give to the most High according to what he hath given to thee, And with a good eye do according to the ability of thy hands: For the Lord maketh recompense, and will give thee seven times as much. Do not offer wicked gifts, for such he will not receive. And look not upon an unjust sacrifice, for the Lord is judge, and there is not with him respect of person.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ५०: ५-८,१४,२३
प्रतिसाद : जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन.
१) "ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे,
त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा."
आकाश त्याची न्यायपरायणता प्रकट करते,
देव स्वतः न्याय करणारा आहे.
२)“माझ्या लोकांनो, ऐका, मी बोलत आहे;
हे इस्राएल, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो:
मी देव, तुझा देव आहे.
तुझ्या यज्ञासंबंधाने मी तुला बोल लावत नाही.
तुझे होमबली माझ्यापुढे नित्य आहेतच.
३)“देवाला आभाररूपी यज्ञ कर,
परात्परापुढे आपले नवस फेड,
जो आभाररूपी यज्ञ करतो तो माझा गौरव करतो.
आणि जो सरळ मार्गाने चालतो
त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन.
Psalms 50: 5-6, 7-8, 14 and 23
R. (23b) To the upright I will show the saving power of God.
5 Gather ye together his saints to him:
who set his covenant before sacrifices.
6 And the heavens shall declare his justice:
for God is judge.
R. To the upright I will show the saving power of God.
7 Hear, O my people, and I will speak:
O Israel, and I will testify to thee:
I am God, thy God.
8 I will not reprove thee for thy sacrifices:
and thy burnt offerings are always in my sight.
R. To the upright I will show the saving power of God.
14 Offer to God the sacrifice of praise:
and pay thy vows to the most High.
23 The sacrifice of praise shall glorify me:
and there is the way by which I will shew
him the salvation of God.
R. To the upright I will show the saving power of God.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव; मला सरळ मार्गाने ने.
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
Blessed are you, Father, Lord of heaven and earth; you have revealed to little ones the mysteries of the Kingdom.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मार्क १०:२८-३१
वाचक : मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्हांला सांप्रतकाळी आणि येणाऱ्या युगात छळवणुकीबरोबर शंभरपटीने सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही."
पेत्र येशूला म्हणू लागला, “पाहा, आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत.” येशूने उत्तर दिले, "मी तुम्हांला नक्की सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता आणि सुवार्तेकरिता घरदार, बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे, किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळवणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आईवडील, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. तरी पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले, असे पुष्कळ जणांचे होईल."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Mark 10: 28-31
And Peter began to say unto him: Behold, we have left all things, and have followed thee. Jesus answering, said: Amen I say to you, there is no man who hath left house or brethren, or sisters, or father, or mother, or children, or lands, for my sake and for the gospel, Who shall not receive an hundred times as much, now in this time; houses, and brethren, and sisters, and mothers, and children, and lands, with persecutions: and in the world to come life everlasting. But many that are first, shall be last: and the last, first.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
संत पीटर प्रभू येशूला म्हणाला, "आम्ही सर्वकाही सोडून तुझ्यामागे आलो आहोत." आत्मत्याग करण्याच्या आमंत्रणावेळी आणि प्रभू येशूच्या मागे जाण्याच्या हाकेविषयीच्या शिकवणीदरम्यान संत पीटर प्रभू येशूला वरील गोष्टी सांगतो, म्हणजे आम्ही सर्व गोष्टींचा त्याग करून तुला अनुसरले आहोत तर मग आम्हांला काय मिळणार ? प्रभू येशू त्यांना शाश्वती देतो की त्यांनी केलेल्या त्यागामुळे सांप्रतकाळात त्यांना सर्वकाही लाभेल आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी त्याग आहे, काहीजणांच्या बाबतीत जीवनाचा त्याग आहे. आपल्या सर्वांना ख्रिस्ताचे अनुसरण करण्यासाठी 'सर्वकाही' सोडण्यास सांगण्यात आले आहे. सर्वकाही सोडून परमेश्वराच्या दैवी योजनेनुसार त्याची सेवा करण्यासाठी आपल्या जीवनातील आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्णपणे देवाठायी समर्पित करण्यासाठी आपणांस
आवाहन करण्यात आले आहे. 'सर्वकाही सोडणे' म्हणजे आपल्या जीवनातील स्वतःचे स्वार्थी आदर्श आणि आपल्या आवडीनिवडी ह्यांचा त्याग करून परमेश्वराच्या इच्छेला प्राधान्य देणे होय. आजचे पहिले वाचन आपणांस सांगते की आपण परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करावे, उपकारांची फेड करून दानधर्म करावा आणि उदारहस्ते आपली अर्पणे आणावीत म्हणजे परमेश्वर आपणांस त्याचा मोबदला देईल व शेवटी सार्वकालिक जीवन हे वतन देईल. विशेष आनंदाची बातमी म्हणजे परमेश्वराने आपल्यासाठी सज्ज केलेले सार्वकालिक जीवन आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात चांगले आहे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, माझे हे जीवन तुझेच दान आहे. मी सर्वस्वी तुला शरण येतो. माझ्या संपूर्ण जीवनाचा ताबा, तू घे आणि तुझ्या इच्छा प्रमाणे मला वरदान दे, आमेन.
✝️