Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading |Wednesday 12th March 2025| First week of the Lent |

उपवासकाळातील पहिला  सप्ताह 

बुधवार दि. १२ मार्च २०२५

✝️ 
 त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे."
for they repented at the preaching of Jonah, and behold, something greater than Jonah is here. 

कारण जसा योना निनवेकरांना चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्र ह्या पिढीला होईल. 

 देवाच्या आज्ञेनुसार योनाने निनवेकरांना पश्चात्तापाचा संदेश दिला. लहानातल्या सर्वापासून निनवेच्या राजापर्यंत सर्वांनी  दुराचरण सोडले आणि पश्चात्ताप केला. देवाने त्यांच्यावर कोणतेच संकट आणू दिले नाही  अशाप्रकारे निनवेकरांसाठी योना देवाचे चिन्ह बनला.

 ह्या प्रायश्चित काळात सर्वांनी आपल्या कुमार्गापासून  वळावे व पश्चात्ताप करावा, कारण योनापेक्षा थोर म्हणजे खुद्द प्रभू येशू आपल्याला चिन्ह देऊन बोलावीत आहे. आपण आपल्या जीवनावर चिंतन करून आपले परिक्षण  करु या. आपण देवापासून बहकून  दूर गेलो आहोत  आपल्यामध्ये अहंकार, स्वार्थ आणि दुष्टता वाढली आहे.  पश्चाताप आणि प्रार्थनेचा अभाव आहे. ख्रिस्तसभेने दिलेल्या संधीचा आपण येग्य तो उपयोग करुन घेऊ. प्रायश्चित्त संस्कार घेऊन आपल्या आध्यात्मिक जीवनाचे नुतनीकरण करण्याची हीच चांगली वेळ आहे.सकारत्मकतेने देवाच्या वाणीकडे लक्ष देऊ या आणि आपले जीवन परमेश्वराच्या दयेने, प्रेमाने व कृपेने बहरावे म्हणून सन्मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा मागू या.
                                                    
                                                    ✝️

पहिले वाचन योना ३ :१-१०
वाचक : योना या पुस्तकातून घेतलेले वाचन
“निनवेच्या लोकांनी आपले दुराचरण सोडले"

योनाला दुसऱ्यांदा प्रभूचा आदेश आला. तो म्हणाला, "ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि मी देतो तो संदेश तू तेथे जाहीर कर." योना उठला आणि प्रभूच्या आज्ञेनुसार निनवेला गेला. निनवे तर फार मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास तीन दिवस लागत. योनाने शहरातून जाण्यास सुरुवात केली आणि एक दिवसाच्या वाटचालीनंतर दवंडी पिटवून तो म्हणाला, “फक्त चाळीस दिवस, मग निनवे जमीनदोस्त होईल!” तेव्हा निनवेच्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला. त्यांनी सार्वजनिक उपवास जाहीर केला आणि श्रेष्ठांपासून तर कनिष्ठांपर्यंत सर्वजण  पश्चात्तापदर्शक गोणपाट नेसले. निनवेच्या राजाला ही खबर पोहचली तेव्हा तो आपल्या सिंहासनावरून उठला आणि त्याने आपल्या अंगावरील राजवस्त्र काढून टाकले व पश्चात्ताप दाखविण्यासाठी गोणपाट नेसून तो राखेत बसला. मग त्याने फर्मान काढून निनवेभर जाहीर केले ते असे, “हा राजाचा व त्याच्या श्रेष्ठींचा हुकूम आहे. कोणीही मनुष्याने, पशूने, गुराढोराने तसे शेरडामेंढराने काहीही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये. माणसे व पशू ह्यांनी गोणपाटे पांघरावी आणि कळकळीने देवाला आळवावे.. प्रत्येकाने आपले दुराचरण सोडावे व हिंसाचारापासून आपले हात आवरावे. कोण जाणे कदाचित देव अनुताप पावेल व आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. " त्यांनी आपले दुराचरण सोडले. ही त्यांची कृती देवाने पाहिली. तेव्हा त्याने अरिष्ट त्यांच्यावर आणीन असे सांगितले होते त्यापासून तो अनुताप पावला आणि ते त्याने त्यांच्यावर आणले नाही.
प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Jonah 3:1-10
Then the word of the LORD came to Jonah the second time, saying, "Arise, go to Nineveh, that great city, and call out against it the message that I tell you. So Jonah arose and went to Nineveh, according to the word of the LORD Now Nineveh was an exceedingly great city, three day's journey in breadth, korab began to go into the city, going a day's journey. And he called out, "Vet forty days, and Ninevel shall be overthrown! And the people of Nineveh believed God. They called for a fast and put on sackcloth, from the greatest of them to the least of them. The word reached the king of Nineveh, and he arose from his throne, removed his robe, covered himself with sackcloth, and sat in ashes. And he issued a proclamation and published through Nineveh, "By the decree of the king and his nobles: Let neither man nor beast, herd nor flock, taste anything, Let them not feed or drink water, but let man and beast be covered with sackcloth, and let them call out mightily to God. Let everyone turn from his evil way and from the violence that is in his hands. Who knows? God may turn and relent and turn from his fierce anger, so that we may not perish. When God saw what they did, how they tumed from their evil way, God relented of the disaster that he had said he would do to them, and he did not do it.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र   ५१:१-२,१०-११,१६-१७
प्रतिसाद :  हे देवा, नम्र व पश्चात्तापी अंतःकरण तू झिडकारणार नाहीस.

१) हे देवा, तुझ्या प्रेमाखातर माझ्यावर दया कर. 
तुझ्या महान दयेला अनुसरून माझ्या 
अपराधाचे कलंक पुसून टाक. 
मला धुवून माझा दोष पूर्णपणे दूर कर. 
माझ्या पापांपासून मला शुद्ध कर.

२ )देवा, माझ्याठायी शुद्ध अंतःकरण 
निर्माण कर मला एक नवीन निष्ठावंत आत्मा दे.
 तुझ्या समोरून मला टाकून देऊ नकोस.
 माझ्यापासून तुझा पवित्र आत्मा काढून घेऊ नकोस.

३) यज्ञ केल्याने तू प्रसन्न होत नाहीस. 
'तू' नाहीतर तो मी केला असता.
होमार्पणांचीदेखील तुला आवड नाही.
देवा, तुला शरण आलेला हा आत्मा 
हाच माझा यज्ञ होय. नम्र व पश्चात्तापी अंतःकरण 
तू झिडकारणार नाहीस.


Psalm 51:3-4, 12-13, 18-19 ( 19b)

A broken and humbled heart, O God, you will not spurn. 

Have mercy on me, O God, 
according to your merciful love; 
according to your great compassion, 
blot nut my transgressions. 
Wash me completely from my iniquity,
 and cleanse me from my sin. R 

Create a pure heart for me, O God; 
renew a steadfast spirit within me.
Do not cast me away from your presence, 
take not your holy spirit from me. R

For in sacrifice you take no delight 
burnt offering from me
would not please you.
My sacrifice to God, a broken spirit:
a broken and humbled heart,
O God, you will not spurn. R

जयघोष  
तुम्ही वाचावे म्हणून चांगल्याच्या मागे लागा, 
वाइटाच्या मागे लागू नका; 
म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 
परमेश्वर, सेनाधीश देव, तुम्हांबरोबर असेल

Acclamation: 
Even now, declares the Lord, return to me with all your heart, 
for I am gracious and merciful.

शुभवर्तमान लूक ११:२९-३२
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“योनाच्या चिन्हाशिवाय ह्या पिढीला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही."

लोकसमुदाय येशूजवळ एकत्र जमत असता तो म्हणू लागला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे. ही चिन्ह मागते. परंतु योनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. कारण जसा योना निनवेकरांना चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्र ह्या पिढीला होईल. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांना दोषी ठरवील. कारण शलमोनचे ज्ञान ऐकावयास ती पृथ्वीच्या सीमेपासून आली आणि पाहा, शलमोनपेक्षा थोर असा एक येथे आहे. निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील; कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Luke 11:29-32

At that time: When the crowds were increasing, Jesus began to say, "This generation is an evil generation. It seeks for a sign, but no sign will be given to it except the sign of Jonah. For as Jonah became a sign to the people of Nineveh, so will the Son of Man be to this generation. The queen of the South will rise up at the judgment with the men of this generation and condemn them, for she came from the ends of the earth to hear the wisdom of Solomon, and behold, something greater than Solomon is here. The men of Nineveh will rise up at the judgment with this generation and condemn it, for they repented at the preaching of Jonah, and behold, something greater than Jonah is here.
  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनमाणूस जेव्हा पाप करतो तेव्हा परमेश्वर त्याच्याकडून पापांच्या पश्चात्तापाची अपेक्षा करतो. आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा योनाचे आणि निनवे लोकांच्या पश्चात्तापाचे उदाहरण आपल्या समोर मांडण्यात आले आहे. परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे योनाने निनवे शहरात लोकांना परमेश्वराचे वचन सांगितले : "फक्त चाळीस दिवस आणि निनवे धुळीस मिळेल.

लहानांपासून थोरापर्यंत सर्वांना हा संदेश आपल्या हृदयी घेतला व गोणताट नेसून आणि अंगाला राख फासून पश्चात्ताप केला. परमेश्वराने त्यांच्या पश्चात्तापामुळे त्यांना पापांची क्षमा केली.

प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात योना संदेष्ट्याचा संदर्भ देऊन आपणांस पश्चात्तापासाठीआवाहन करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी खरे चिन्ह आहे, म्हणून आपण प्रभू येशूचे ऐकले पाहिजे. प्रभू येशू शलमोन राजा आणि योना संदेष्टा ह्यांच्याहून अधिक थोर आहे. दक्षिणेकडची राणी शलमोनचे ज्ञान ऐकण्यासाठी पृथ्वीच्या सीमेपासून त्याच्याकडे आली आणि योना संदेष्ट्याच्या घोषणेमुळे निनवे शहरातील लोकांनी खरा पश्चात्ताप केला. मग आपण प्रभू येशूच्या वाणीकडे किती मोठ्या प्रमाणात लक्ष द्यायला पाहिजे? आपण जर प्रभू येशूचे वचन ऐकण्यास अपयशी ठरलो तर आपल्या पापांबद्दल खरा पश्चाताप करण्यास आपणांस अपयश येते. खऱ्या पश्चात्तापासाठी प्रभूच्या वचनाला प्राधान्य देऊन त्याचे शब्द आपल्या अतर्यामी उतरले पाहिजेत, तरच आपल्या पापांबद्दल आपणांस खरा पश्चात्ताप होईल.

प्रार्थना : हे प्रभू येशू, पश्चात्तापी अंतःकरणाने आम्ही तुज समोर येतो, : आम्हावार दया कर, तुझ्या सन्मार्गावरुन चालण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.