उपवासकाळातील तिसरा सप्ताह
बुधवार दि. २६ मार्च २०२५
✝️
आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही.
until heaven and earth pass away, not an iota, not a dot, will pass from the Law until all is accomplished.
✝️
पहिले वाचन अनुवाद ४:१,५-९
वाचक : अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन
मोशे लोकांना म्हणाला, "आता, अहो इस्राएल लोकहो, जे विधी व नियम मी तुम्हांला शिकवीत आहे ते पाळावे म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हांला जो देश देत आहे, त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्याल.
पाहा, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही जात आहा, त्यात पाळण्यासाठी आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हांला विधी व नियम शिकवले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही चालावे तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावेत. कारण त्यामुळे देशोदेशी लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल. त्या सर्व विधीसंबंधी ऐकून ते म्हणतील की, हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकाचे आहे. कारण आमचा देव परमेश्वर ह्याचा आम्ही धावा करतो, तेव्हा तो आमच्याजवळ असतो. ह्याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे ? हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हांला देत आहे. त्यातल्यासारखे यथार्थ विधी व नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे ? मात्र स्वत:विषयी सावधगिरी बाळग आणि स्वत:ला फार जप. नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील. तू आपल्या पुत्रपौत्रांना त्याची माहिती द्यावी.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Deuteronomy 4:1.5.9
Moses said to the people saying, O irael, listen to the statutes and the rules that I am teaching you, and do them, that you may live, and go in and take possession of the land that the LORD, the God of your fathers, is giving you. See, I have taught you statutes and rules, as the LORD my God commanded me that you should do them in the land that you are entering to take possession of it. Keep them and do them, for that will be your wisdom and your understanding in the sight of the peoples, who, when they hear all these statutes, will say, Surely this great nation is a wise and understanding people. For what great nation is there that has a god so near to it as the LORD our God is to us, whenever we call upon him! And what great nation is there, that has statutes and rules so righteous as all this law that I set before you today? "Only take care, and keep your soul diligently, lest you forget the things that your eyes have seen, and lest they depart from your heart all the days of your life. Make them known to your children and your children's children."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १४८:१२-१३,१५-१६,१९-२०
प्रतिसाद :येरुशलेम, प्रभूचे गुणगान कर !
१) येरुशलेम, प्रभूचे गुणगान कर !
सियोन, तुझ्या देवाचे स्तवन कर !
तुझ्या वेशींचे अडसर त्याने मजबूत राखले आहेत.
तुझ्यामधील नागरिकांना आशीर्वाद दिला आहे.
२) तो पृथ्वीवर हुकूम सोडतो.
त्याचा शब्द वेगाने धावत येतो.
तो लोकरीसारखी दाट हिमवृष्टी करतो,
राखेसारखे दव पसरतो.
३)आपला संदेश त्याने याकोबला आणि
आपले नियम व संकेत इस्राएलला जाहीर केले.
कुठल्याही राष्ट्रासाठी त्याने असे केले नाही.
त्याचे संकेत त्यांना माहीत नाहीत.
: Psalm 147:12-13, 15-16, 19-20 ( 12a)
O Jerusalem, glorify the Lord!
O Jerusalem, glorify the Lord!
O Sion, praise your God!
He has strengthened the bars of your gates:
he has blessed your children within you.
He sends out his word to the earth,
and swiftly runs his command.
He showers down snow like wool,
the scatters hoarfrost like ashes. R
He reveals his word to Jacob,
to Israel, his decrees and judgements
He has not dealt thus with other nations
he has not taught them his judgements.
जयघोष
पहा, आताच समय अनुकूल आहे. आजच तारणाचा दिवस आहे.
Acclamation:
Your words, Lord, are Spirit and life; you have the words of eternal life
शुभवर्तमान मत्तय ५:१७-१९
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करायला नव्हे तर पूर्ण करायला आलो आहे. कारण मी तुम्हांला खचित सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. ह्यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञातील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Mathew 5:17-19
At that time: Jesus said to his disciples, "Do not think that I have come to abolish the Law or the Prophets; I have not come to abolish them but to fulfill them. For truly, I say to you, until heaven and earth pass away, not an iota, not a dot, will pass from the Law until all is accomplished. Therefore whoever relaxes one of the least of these commandments and teaches others to do the same will be called least in the kingdom of heaven, but whoever does them and teaches them will be called great in the kingdom of heaven
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: परमेश्वराच्या योजना ह्या बऱ्याच वेळेला आपल्या योजनांपेक्षा वेगळ्या असतात आणि परमेश्वर आपल्या योजना योग्यवेळी पूर्ण करीत असतो. प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी ह्या जगात आला आणि जे काही परमेश्वराच्या योजनेमध्ये होते ते प्रभू येशूने पूर्ण केले. पण काही लोकांना वाटत होते की प्रभू येशू देवाचे नियमशास्त्र पाळत नाही, म्हणून आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू स्पष्टपणे सांगतो की, "नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असे समजू नका; मी रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास आलो आहे." प्रभू येशू शाश्वती देऊन सांगतो, "आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही." प्रभू येशू ख्रिस्त यहुदी नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांच्या ग्रंथांचे पूर्णत्व आहे. जे प्रभू येशूने पूर्ण केले आहे ते आपण आज साजरे करतो. आपल्या भक्ती-आराधनेचा केंद्रबिंदू स्वतः प्रभू येशू आहे. प्रभू येशूला अनुसरणे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणे ह्यामध्येच नियमशास्त्राची पुर्तता आहे
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला अपेक्षित नियम व आज्ञा पाळून तुझ्या राज्याचे वारसदार बनण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
✝️