(उपवासकाळ ५वा रविवार)
दि. ६ एप्रिल २०२५
✝️
येशू तिला म्हणाला, “मीही तुला दंड ठरवत नाही; जा, ह्यापुढे पाप करू नको.”
And Jesus said: Neither will I condemn thee. Go, and now sin no more.
✝️
‘तुम्हामध्ये निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड मारावा.’
✝️
परमेश्वर हाच मुक्तिदाता आहे त्याच सामर्थ्यशाली परमेश्वराने इस्त्राएलला सर्व संकटातून बाहेर काढले ह्याची जाणीव आजच्या वाचनात करुन देत आली आहे.
व्यभिचारी स्त्री ची घटना : प्रभू येशू दयेचा, करुणेचा आणि क्षमेचा महासागर आहे, हे आजच्या शुभवर्तमानात स्पष्ट झाले आहे. शास्त्री परुशांनी येशूसमोर व्यभिचारी स्त्रीला उभे करून मोठे आव्हान दिले. कारण नियमशास्त्राप्रमाणे व्यभिचारी माणसाला दगडमार करून ठार करण्याची शिक्षा देण्यात येत असे. मात्र प्रभू येशूने म्हटले, ‘तुम्हामध्ये निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड मारावा.’ प्रभू येशूने । शास्त्री परुशांना व जमावाला जाणीव करुन दिली की सर्वजण पापी आहेत. कुणाचाही न्याय करण्यास आपण अपात्र आहोत. इतरांना दोष देण्याऐवजी आपण आपल्या अंतर्मनात डोकावून पहावे.
पुन्हा पुन्हा प्रभू आपल्याला पश्चाताप करण्याची संधी देत असतो. आपण आपल्या जीवनाचे परीक्षण करुन ह्या पश्चाताप काळात चांगले कुमसार करु या. प्रभूला अपेक्षित चांगले जीवन जगण्यास कृपा मागू या.
✝️
✝️
पहिले वाचन यशया ४३:१६-२१
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“पाहा, मी नवीन गोष्ट करणार आहे; मी माझ्या निवडलेल्या लोकांना पिण्यासाठी पाणी देणार आहे."
जो समुद्रात मार्ग करतो, प्रचंड प्रावाहात वाट करतो, ज्याने रथ व घोडे, सैन्य व वीर यांना बाहेर काढल्यामुळे ते एकत्र पडले आहेत, त्यांच्याने उठवले नाही, ते विझले आहेत, वातीप्रमाणे मालवले आहेत, असा जो परमेश्वर तो म्हणतो, पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे; आताच ती उद्भवत आहे व तुम्ही ती पाहणार आहात. मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन. नवपशू, कोल्हे व शहामृग माझे स्तवर करतील; कारण मी आपल्या लोकांना, आपल्या निवडलेल्यांना, पिण्यासाठी अरण्यात जले, मरुभूमीत नद्या देईन, मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील.
प्रभूचा शब्द
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
: Isaiah 43: 16-21
Thus saith the Lord, who made a way in the sea, and a path in the mighty waters. Who brought forth the chariot and the horse, the army and the strong: they lay down to sleep together, and they shall not rise again: they are broken as flax, and are extinct. Remember not former things, and look not on things of old. Behold I do new things, and now they shall spring forth, verily you shall know them: I will make a way in the wilderness, and rivers in the desert. The beast of the field shall glorify me, the dragons and the ostriches: because I have given waters in the wilderness, rivers in the desert, to give drink to my people, to my chosen. This people have I formed for myself, they shall shew forth my praise.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १२६:१-६
प्रतिसाद : परमेश्वराने आम्हासाठी महाकृत्ये केली !
१ सियोनातून धरून नेलेल्या लोकांना परमेश्वराने
परत आणले तेव्हा आम्ही स्वप्नात आहो असे आम्हांला वाटले.
तेव्हा आमचा चेहरा हास्याने व आमची जिव्हा गायनाने भरली.
२)त्या समयी अन्य राष्ट्रातील लोक म्हणू लागले की,
परमेश्वराने याच्यासाठी महत्कृत्ये केली !
परमेश्वराने आम्हासाठी महत्कृत्ये केली आहेत!
त्यामुळे आम्हाला अत्यानंद झाला आहे.
३) हे परमेश्वरा, कोरड्या भूमीतल्या ओढ्याप्रमाणे,
जे अश्रूपूर्ण नेत्रांनी प्रेरणा करतात
ते हर्षाने कापणी करतात..
४) जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो
तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल.
Psalm:
Psalms 126: 1-2ab, 2cd-3, 4-5, 6
R. (3) The Lord has done great things for us; we are filled with joy.
1 When the lord brought back the captivity of Sion,
we became like men comforted.
2ab Then was our mouth filled with gladness;
and our tongue with joy.
R. The Lord has done great things for us; we are filled with joy.
2cd Then shall they say among the Gentiles:
The Lord hath done great things for them.
3 The Lord hath done great things for us:
we are become joyful.
R. The Lord has done great things for us; we are filled with joy.
4 Turn again our captivity, O Lord,
as a stream in the south.
5 They that sow in tears shall reap in joy.
R. The Lord has done great things for us; we are filled with joy.
6 Going they went and wept, casting their seeds.
But coming they shall come with joyfulness,
carrying their sheaves.
R. The Lord has done great things for us; we are filled with joy.
दुसरे वाचन फिलिपे ३:८-१४
वाचक: पौलचे फिलिप्पीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्तासाठी मी सर्व गोष्टींना मुकलो आहे."
ख्रिस्त माझा येशू प्रभू याच्याविषयी ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केरकचरा असा लेखतो; मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा आणि मी त्याच्याठायी आढळावे आणि माझे नीतिमत्त्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्त्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे, म्हणजे देवापासून विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे असावे. तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची ओळख, मी त्याच्या मरणाला अनुरूप होऊन, करून घ्यावी; म्हणजे कसेही करून मी मृत लोकांमधून पुनरुत्थान मिळवावे. एवढ्यातच मी मिळवले किंवा एवढ्यात मी पूर्ण झालो आहे असे नाही; तर ज्याच्याठायी ख्रिस्त येशूने मला आपल्या ताब्यात घेतले ते मी आपल्या ताब्यात घ्यावे; म्हणून मी त्याच्या मागे लागत आहे. बंधूनो, मी अद्यापि ते आपल्या ताब्यात आणले असे मानीत नाही; तर मागील गोष्टींकडे लक्ष लावून, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी अंतिम ध्येयाच्या दिशेने मी धावतो, हेच एक माझे काम आहे.
प्रभूचा शब्द
सर्व : देवाला धन्यवाद.
Second Reading:
Philippians 3: 8-14
Furthermore I count all things to be but loss for the excellent knowledge of Jesus Christ my Lord; for whom I have suffered the loss of all things, and count them but as dung, that I may gain Christ:
And may be found in him, not having my justice, which is of the law, but that which is of the faith of Christ Jesus, which is of God, justice in faith: That I may know him, and the power of his resurrection, and the fellowship of his sufferings, being made conformable to his death, If by any means I may attain to the resurrection which is from the dead. Not as though I has already attained, or were already perfect; but I follow after, if I may by any means apprehend, wherein I am also apprehended by Christ Jesus.
Brethren, I do not count myself to have apprehended. But one thing I do: forgetting the things that are behind, and stretching forth myself to those that are before, I press towards the mark, to the prize of the supernal vocation of God in Christ Jesus.
This is the word of God
Thanks be to God
जयघोष
तुम्ही माझ्याविरुद्ध आचरलेले आपले सर्व दुराचार टाकून द्या आपल्या ठायी नवे हृदय व नवा आत्मा स्थापित करा.
Acclamation:
Even now, says the Lord, return to me with your whole heart; for I am gracious and merciful.
शुभवर्तमान योहान ८:१-११
वाचक :योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्हांमध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिला दगड मारावा.
येशू जैतुनांच्या डोंगरावर गेला. नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला तेव्हा सर्व लाके त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. त्यावेळी शास्त्री व परुशी ह्यांनी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, "गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हांला अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावा. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता ?" त्याला दोष लावावयाला आपल्याला काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओणवून बोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्याला एकसारखे विचारीत असता ते उठून त्यांना म्हणाला, “तुम्हांमध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा." मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून ते थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले; नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला; “बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत ? तुला कोणी दंड ठरवला नाही का ?” ती म्हणाली “प्रभूजी कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मीही तुला दंड ठरवत नाही; जा, ह्यापुढे पाप करू नको.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
John 8: 1-11
And Jesus went unto mount Olivet.And early in the morning he came again into the temple, and all the people came to him, and sitting down he taught them. And the scribes and the Pharisees bring unto him a woman taken in adultery: and they set her in the midst, And said to him: Master, this woman was even now taken in adultery. Now Moses in the law commanded us to stone such a one. But what sayest thou? And this they said tempting him, that they might accuse him. But Jesus bowing himself down, wrote with his finger on the ground. When therefore they continued asking him, he lifted up himself, and said to them: He that is without sin among you, let him first cast a stone at her. And again stooping down, he wrote on the ground. But they hearing this, went out one by one, beginning at the eldest. And Jesus alone remained, and the woman standing in the midst. Then Jesus lifting up himself, said to her: Woman, where are they that accused thee? Hath no man condemned thee? Who said: No man, Lord. And Jesus said: Neither will I condemn thee. Go, and now sin no more.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:आज आपण उपवासकाळातील पाचवा रविवार साजरा करीत आहोत. आजची वाचने आपणांस सांगतात की परमेश्वराचा आत्मा आपल्यामध्ये कार्यरत आहे. आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर आपणांस सांगतो की मी तुमच्याठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्ही सजीव व्हाल. संत पौल आपणांस सांगतो की देवाचा आत्मा आपल्याठायी वसती करीत आहे. आत्मा जीवन आहे आणि पवित्र आत्माच जीवन बहाल करतो, हे आजच्या शुभवर्तमानातून स्पष्ट करण्यात आले आहे, जेथे प्रभू येशू मृत लाजरसला जिवंत करतो. प्रभू येशू मार्थासहित आपणांस सांगतो की तोच पुनरुत्थान आणि जीवन आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आपल्या शिष्यांचा विश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांना आपल्या स्वतःच्या नावाची ओळख करून देण्यासाठी प्रभू येशू लाझरसच्या कुटुंबापासून लांब राहातो, म्हणजे लाझरसला मरणातून उठवून प्रभू येशू त्याचे गौरव प्रकट करू शकेल. लाझरसला मरून चार दिवस झाले होते, तरी प्रभू येशूने देवाचे गौरव प्रकट करण्यासाठी लाझरसला जिवंत केले. हा चमत्कार पाहून बऱ्याच यहुद्यांनी येशूवर विश्वास ठेवला. परमेश्वर चमत्कार किंवाआज आपण उपवासकाळातील पाचवा रविवार साजरा करीत आहोत. आजची वाचने आपणांस सांगतात की परमेश्वराचा आत्मा आपल्यामध्ये कार्यरत आहे. आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर आपणांस सांगतो की मी तुमच्याठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्ही सजीव व्हाल. संत पौल आपणांस सांगतो की देवाचा आत्मा आपल्याठायी वसती करीत आहे. आत्मा जीवन आहे आणि पवित्र आत्माच जीवन बहाल करतो, हे आजच्या शुभवर्तमानातून स्पष्ट करण्यात आले आहे, जेथे प्रभू येशू मृत लाजरसला जिवंत करतो. प्रभू येशू मार्थासहित आपणांस सांगतो की तोच पुनरुत्थान आणि जीवन आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आपल्या शिष्यांचा विश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांना आपल्या स्वतःच्या नावाची ओळख करून देण्यासाठी प्रभू येशू लाझरसच्या कुटुंबापासून लांब राहातो, म्हणजे लाझरसला मरणातून उठवून प्रभू येशू त्याचे गौरव प्रकट करू शकेल. लाझरसला मरून चार दिवस झाले होते, तरी प्रभू येशूने देवाचे गौरव प्रकट करण्यासाठी लाझरसला जिवंत केले. हा चमत्कार पाहून बऱ्याच यहुद्यांनी येशूवर विश्वास ठेवला. परमेश्वर चमत्कार किंवाचिन्ह घडवून आणतो तेव्हा त्यामागे त्याचे प्रकटीकरण असते. ह्या प्रकटीकरणावर आपण विश्वास ठेवावा हीच परमेश्वराची इच्छा असते. लाझरसचे चिन्ह हे आपला विश्वास वाढवण्यासाठी प्रभू येशूने घडवून आणले. "होय, प्रभू, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहा असा मी विश्वास धरला आहे." मार्थाने प्रभू येशूवर व्यक्त केलेला हा विश्वास धरण्यास आपण तयार आहात काय ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, मज पाप्यावर दया कर, मला तुझ्या कृपेत वाढण्यास प्रेरणा व सामर्थ्य दे, आमेन.
✝️