Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Monday 7th April 2025 | 5th week of the Lent |

उपवासकाळातील पांचवा सप्ताह 

सोमवार  दि. ७ एप्रिल  २०२५

 ✝️  

"तुम्हांमध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा." 

"Let him who is without sin among you be the first to throw a stone at her."
✝️  
संत जॉन बॅप्टिस्ट डे लासाले

- वर्तनसाक्षी (१६५१-१७१९)
 चिंतन : “विचाराबरोबरं समर्पित वृत्ती, परोपकाराबरोबर विवेकशीलता आणि कनवाळूपणाबरोबर खंबीर मनोवृत्ती ह्यांचा मिलाफ घडून आला तर जीवन फुलून जाते.” - संत जॉन डे ला साले



आजच्या शुभवर्तमानात व्यभिचारी स्त्रिला यहुदी नियमाप्रमाणे चव्हाट्यावर आणून दगडाने मारुन ठार करण्याची देहांत शिक्षा करण्याच्या तयारीत असताना येशू तिथे हजर होतो. अनेक वयस्कर आणि अनुभवी व्यक्ता त्या ठिकाणी हजर असतात. सर्वांनी हातात दगड उचलले असताना येशू म्हणतो, 'तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिला दगड मारावा.' प्रभू येशूचे हे शब्द ऐकताच हजर असलेल्या प्रत्येकाच्या हातातील दगड खाली पडले. प्रत्येक व्यक्ती पापत पडते. परंतु नम्रतेने त्या पापाचा स्वीकार करण्यास धजत नाही. स्वत:पेक्षा इतरांची पापे आपणास जास्त वाटत असतात. आपण स्वतः पापी असताना इतरांचे दोष काढीत असतो. आज प्रभू येशू ख्रिस्ताने व्यभिचारी स्त्रिला समाजकंटकांच्या पंजातून सोडवून मुक्तीचे वरदान प्राप्त करुन दिले.

पहिले वाचन :  दानिएल १३:१-९,१५-१७,१९-३०,३३-६२
वाचक दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन

जोकीम नावाचा एक मनुष्य बाबिलोनमध्ये राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव सुसन्ना होते. ती हिलकियाची मुलगी होती. ती अत्यंत सुंदर व प्रभूभक्त होती. तिचे आईवडील सज्जन होते. त्यांनी मोशेच्या आज्ञांप्रमाणे तिला शिक्षण दिले होते. जोकीम फार श्रीमंत होता. त्याच्या घराला लागूनच त्याचा भव्य असा बगीचा होता. यहुदी लोक त्याच्याकडे भेटीला येत असत. तो त्याच्यातला अधिक प्रतिष्ठित असा होता. त्या वर्षी लोकांमधून दोन वडीलजन न्यायाधीश म्हणून नेमले होते. त्यांच्याविषयी प्रभूने असे म्हटले होती, "बाबिलोनमध्ये या नेत्यांपासून अधर्म सुरू झाला. ते न्यायाधीश होते परंतु जनतेचे राज्य सांभाळण्याचे ढोंग करीत होते." ही माणसे पुष्कळ वेळा जोकीमच्या घरी असत व ज्यांच्या फिर्यादी होत्या. ते तेथे त्याच्याकडे येत. जेव्हा लोक दुपारी निघून जात तेव्हा सुस्ना आपल्या पतीच्या बागेत फिरायला जात असे. ते दोघे वडीलजन तिला रोज बागेत इकडे तिकडे फिरताना पाहात असत. त्यांना तिच्या सहवासाची इच्छा होऊ झाली. त्याचे मन इतके विकृत झाले की, त्यांनी स्वर्गाकडील आपली दृष्टी फिरवून नैतिकतेचे सर्व नियम झुगारून दिले.
ते योग्य संधीची वाटच पाहत होते; तोच असे झाले की, सुसन्ना दोन नोकराणींबरोबर आपल्या सवयीप्रमाणे बागेत गेली त्या दिवशी फार गरम होत होते. म्हणून तिला आंघोळ घ्यावीशी वाटली. त्या दोन वडीलजनांशिवाय तिकडे कोणीही नव्हते. ते लपून तिच्याकडे पाहात होते. तिने आपल्या नोकराणींना सांगितले, “माझ्यासाठी तेल आणि सुगंधी द्रव्ये आणा आणि बागेचे फाटक बंद करा म्हणजे मला आंघोळ करता येईल.'
नोकराणी बाहेर जाताच ते दोघे वडीलजन उठून सुसन्नाच्या जवळ धावत गेले आणि तिला म्हणाले, "पहा, फाटकाचा दरवाजा बंद आहे; कोणीही आपल्याला पाहत नाही; आम्ही तुझ्यावर आसक्त झालो आहोत; आमच्याबरोबर प्रणय कर. नाहीतर तुझ्या विरुद्ध आम्ही अशी साक्ष देऊ की, कोणी युवक तुझ्याबरोबर होता आणि म्हणून तू आपल्या नोकराणींना बाहेर पाठवलेस."
सुसन्नाने उसासा टाकून म्हटले, "मला कोणताच मार्ग दिसत नाही. जर मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे केले तर मी प्राणदंडास योग्य ठरेन; जर मी नकार दिला तर तुमच्या तावडीतून सुटणार नाही. तरी देखील परमेश्वरासमोर पाप करण्यापेक्षा तुमच्या तावडीत निर्दोषी सापडणे मी पसंत करीन." 
त्यानंतर सुसन्ना मोठ्या आवाजात ओरडू लागली, परंतु ते दोघे वडीलजन तिच्या विरुद्ध ओरडू लागले. त्यांच्यापैकी एकाने धावत जावून बागेचे फाटक उघडले. त्यावेळी घरातल्या नोकरवर्गाने बागेत ओरडण्याचा आवाज ऐकला, आणि सुसन्नाला काय झाले हे पाहण्यासाठी ते धावत आले व बाजूच्या दरवाजाने बागेत गेले. जेव्हा वडीलजनांनी आपली हकिकत सांगितली, तेव्हा नोकरांना मोठा धक्का बसला; कारण सुसन्नावर अशा प्रकारचा आरोप कधीच कुणी केला नव्हता. दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्व लोक तिचा पती जोकीम याचेकडे एकत्र जमले तेव्हा ज्या दोन दुष्ट वडीलजनांनी सुसत्राला प्राणदंड देण्याचे कुभांड रचले होते, ते तेथे आले आणि त्यांनी लोकांसमोर सांगितले, "हिलकियाची मुलगी, जोकीमची पत्नी सुसन्नाला बोलावून आणा.” लोकांनी तिला बोलावून आणले. ती आपले आई-वडील, आपली मुले तसेच आपले सर्व आप्तजन यांच्या समवेत तेथे आली. तिचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार व जेवढयांनी तिला पाहिले होते ते सर्वच्या सर्व रडत होते. त्या दोन वडीलजनांनी सभेमध्ये उभे राहून तिच्या डोक्यावर आपले हात ठेवले. ती रडत स्वर्गाकडे पाहत राहिली. तिने परमेश्वरावर विश्वास ठेवला होता. वडीलजनांनी सांगितले, "जेव्हा आम्ही एकटेच बागेत फिरत होतो, तेव्हा ही दोन नोकराणींबरोबर बागेत आली; हिने बागेचे फाटक बंद केले आणि नोकराणींना बाहेर पाठवले. तेव्हा लपून राहिलेला एक तरुण जवळ येऊन तिच्याबरोबर झोपला. आम्ही बागेच्या एका कोपऱ्यातून हे पाप पाहून धावत त्याच्याजवळ गेलो आणि आम्ही दोघांना प्रणय करताना पाहिले. आम्ही त्या तरुणाला पकडू शकलो नाही, कारण तो आमच्याहून बलवान होता; बागेचे फाटक उघडून तो पळून गेला. आम्ही हिला पकडले व विचारले की, तो युवक कोण आहे ? परंतु तिने त्याचे नाव सांगायचे नाकारले. आम्ही या गोष्टींना साक्षी आहोत." सभेने त्यांच्यावर विश्वास ठेवला, कारण ते लोकांचे नेते आणि न्यायाधीश होते. 
(लोकांनी सुसन्नाला प्राणदंडाची शिक्षा फर्मावली. यावर सुसन्नाने मोठ्या आवाजात ओरडून म्हटले, "हे शाश्वत परमेश्वरा, तू सर्व रहस्ये आणि भविष्यात होणाऱ्या गोष्टी जाणून असतोस; तू जाणतोस की, यांनी माझ्याविरुद्ध खोटी साक्ष दिली आहे. यांनी ज्या वाईट गोष्टींचा माझ्यावर आरोप केला आहे. त्यातली एकदेखील खरी नाही! तरीही मला मरणे भाग आहे.'

परमेश्वराने तिचा आक्रोश ऐकला. जेव्हा लोक तिला प्राणदंडासाठी नेत होते, तेव्हा परमेश्वराने दानिएल नावाच्या तरुणात एक दिव्य प्रेरणा उत्पन्न केली. तो ओरडून सांगू लागला, मी हिच्या रक्ताबद्दल दोषी नाही."

यावर सर्व लोक त्याच्याकडे पाहू लागले आणि म्हणाले, "तुझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे ?" त्याने त्यांच्याकडे उभे राहून म्हटले "हे इस्राएली लोकांनो, तुमची बुद्धी कोठे आहे ? तुम्ही चौकशी न करता आणि संपूर्ण माहिती न मिळवता इस्राएलच्या मुलीचा वध का करत आहात ? तुम्ही सर्व न्यायालयात परत जा. कारण ह्यांनी हिच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली आहे."

यावर लोक लगेच माघारी फिरले आणि वडीलजनांनी दानिएलला सांगितले, "या, आमच्यामध्ये बसा आणि आपली माहिती द्या, कारण परमेश्वराने आपल्याला अधिकार प्रदान केला आहे." दानिएलने त्यांना उत्तर दिले, "या दोघांना एकदुसऱ्यापासून अलग करा आणि मग मी यांची चौकशी करीन.” दोघांना वेगळे केले गेले, तेव्हा दानिएलने एकाला बोलावून म्हटले, "अधर्म करून तुझे केस पिकले, आता तुला 44 जुन्या पापांचा दंड मिळणार आहे. तू निर्दोषी लोकांना दंडपात्र ठरवून व दोषी लोकांना निर्दोष सोडून खोटा न्याय देत होतास; प्रभूने तर म्हटले आहे, तुम्ही निर्दोष आणि धार्मिकांना प्राणदंड देऊ नका. जर तू तिला पाहिले, तर मला सांग की, कोणत्या झाडाखाली दोघांना तू एकत्र प्रणय करताना पाहिलेस?" त्याने उत्तर दिले, "बाभुळाच्या झाडाखाली." दानिएल म्हणाला, “ठीक आहे! एवढे मोठे खोटे सांगून तू आपले प्राण गमावून बसला आहेस, कारण परमेश्वराच्या दुताला परमेश्वराकडून असा आदेश मिळाला आहे की, त्याने त्वरित तुझे दोन तुकडे करावेत."
नंतर दानिएलने त्याला घेऊन जाण्याची आज्ञा केली व दुसऱ्याला बोलवायला सांगितले आणि त्याला म्हटले, "तू यहुदाचा नव्हे तर कनानची संतती आहेस. सौंदर्याने तुला पतभ्रष्ट केले आणि वासनेने तुझे हृदय दूषित झाले आहे. तुम्ही लोक इस्राएलच्या मुलींबरोबर अशा प्रकारचे व्यवहार करीत होते आणि त्या भीतीने तुमची इच्छा मान्य करीत होत्या; परंतु ही यहुदाची मुलगी आहे, तिने अधर्माच्या समोर आपली मान वाकवली नाही. तर मला सांग तू कुठल्या वृक्षाखाली दोघांना एकत्र प्रणय करताना पाहिलेस?" त्याने उत्तर दिले, "ओकच्या झाडाखाली" यावर दानिएल म्हणाला, "ठीक आहे ! तू पण एवढे मोठे खोटे बोलून आपला जीव गमावला आहेस, परमेश्वराचा दूत हातात तरवार घेऊन तुझी वाट पहात आहे; तो तुझे दोन तुकडे करील आणि तुम्हा दोघांचा सर्वनाश करील."
तेव्हा सर्व लोक मोठ्या आवाजात जयजयकार करून परमेश्वराला धन्यवाद देऊ लागले की, जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याचे तो संरक्षण करतो. दानिएलने त्याच्या मुखातून निघालेल्या शब्दांतूनच त्या दोन वडीलजनांची साक्ष खोटी ठरवून दाखवली. लोक त्यांच्यावर तुटून पडले आणि त्यांनी मोशेच्या आज्ञेप्रमाणे त्या दोन दुष्टांना दंड केला, तो दंड ते आपल्या शेजाऱ्याला देऊ इच्छित होते .लोकांनी दोघांना मृत्युदंड दिला. अशाप्रकारे त्या दिवशी निर्दोषी सुसन्नाचा बचाव झाला.
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Daniel: 13:41c-62

(longer form: Daniel 13:1-9, 15-17, 19-30, 33-62)
In those days: The assembly condemned Susanna to death. Then
Susanna cried out with a loud voice and said. "O eternal God, who does discern what is secret, who is aware of all things before they come to be, you know that these men have borne false witness against me. And now I am to die! Yet I have done none of the things that they have wickedly invented against me!" The Lord heard her cry. And as she was being led away to be put to death, God aroused the holy spirit of a young lad named Daniel; and he cried with a loud voice, "I am innocent of the blood of this woman." All the people turned to him and said, "What is this that you have said?" Taking his stand in the midst of them, he said, "Are you such fools, you sons of Israel? Have you condemned a daughter of Israel without examination and without learning the facts? Return to the place of judgment. For these men have borne false witness against her." Then all the people returned in haste. And the elders said to him, "Come, sit among us and inform us, for God has given you that right." And Daniel said to them, "Separate them far from each other, and I will examine them." When they were separated from each other, he summoned one of them and said to him, "You old relic of wicked days, your sins have now come home, which you have committed in the past, pronouncing unjust judgments, condemning the innocent, and letting the guilty go free, though the Lord said, 'Do not put to death an innocent and righteous person. Now then, if you really saw her, tell me this: Under what tree did you see them being intimate with each other?" He answered, "Under a mastic tree." And Daniel said, "Very well! You have lied against your own head, for the angel of God has received the sentence from God and will immediately cut you in two." Then he put him aside and commanded them to bring the other. And he said to him, "You offspring of Canaan and not of Judah, beauty has deceived you and lust has perverted your heart. This is how you both have been dealing with the daughters of Israel, and they were intimate with you through fear, but a daughter of Judah would not endure your wickedness. Now then, tell me: Under what tree did you catch them being intimate with each other?" He answered, "Under an evergreen oak." And Daniel said to him, "Very well! You also have lied against your own head, for the angel of God is waiting with his sword to saw you in two, that he may destroy you both." Then all the assembly shouted loudly and blessed God, who saves those who hope in him. And they rose against the two elders, for out of their own mouths Daniel had convicted them of bearing false witness; and they did to them as they had wickedly planned to do to their neighbour, acting in accordance with the law of Moses, they put them to death. Thus innocent blood was saved that day.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र २३:१-६ 
प्रभो, तू माझा सांगाती आहेस.

१) प्रभू माझा मेंढपाळ आहे; मला कशाची कमतरता नाही. तो मला हिरव्या कुरणात विसावू देतो.तो मला प्रशांत जलाशयाकडे नेतो. तो मला नवजीवन देतो.

२ आपल्या गौरवासाठी तो मला सन्मार्ग दाखवतो. मृत्यूछायेच्या दरीतून जरी मी जात असलो तरी कुठल्याही संकटाला मी भिणार नाही, कारण तू माझा सांगाती आहेस. तुझा सोटा व तुझी काठी मला धीर देतात.

३) माझ्या शत्रूंच्या देखत तु माझ्यासाठी मेजवानी करतोस.तू माझ्या डोक्याला तेल लावून आशीर्वादित केले आहेस. माझा पेला ओसंडत आहे. 

४) खरेच, आयुष्यभर मला सुखाचे व प्रेमाचे दिवस लाभतील आणि प्रभूच्या निवासस्थानी मी निरंतर राहीन.



Psalm 23:1-3a, 3b-4, 5, 6 ( 4ab)

Though I should walk in the valley of the shadow of death, no evil would I fear, for you are with me.

The Lord is my shepherd; 
there is nothing I shall want. 
Fresh and green are the pastures 
where he gives me repose. 
Near restful waters he leads me; 
he revives my soul. R

He guides me along the right path, 
for the sake of his name. 
Though I should walk in the valley of the shadow of death, 
no evil would I fear, for you are with me. 
Your crook and your staff will give me comfort. R 

You have prepared a table before me
 in the sight of my foes.
My head you have anointed with oil; 
my cup is overflowing. R

Surely goodness and mercy shall follow me 
all the days of my life.
In the Lord's own house shall I dwell
 for length of days unending. R

जयघोष  
प्रभो, तुझे शब्द आत्मा व जीवन आहेत. तुझ्यापाशी शाश्वत जीवनाचे शब्द आहेत.

Acclamation: 
 I have no pleasure in the death of the wicked, 
says the Lord, but that the wicked turn from his way and live.


शुभवर्तमान योहान ८:१-११
वाचक :योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 
येशू जैतुनाच्या डोंगरावर गेला. नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. त्यावेळी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुशी ह्यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले "गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावा. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता?" त्याला दोष लावावयाला आपणांस काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओणवून बोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्याला एकसारखे विचारीत असता ते उठून त्यांना म्हणाला, "तुम्हांमध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा." मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून ते थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले; नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला; "बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत ? तुला कोणी दंड ठरवला नाही का ?" ती म्हणाली "प्रभो, कोणी नाही." तेव्हा येशू तिला म्हणाला, "मीही तुला दंड ठरवत नाही; जा, ह्यापुढे पाप करूं नको."
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 8:1-11

At that time: Jesus went to the Mount of Olives. Early in the morning he came again to the temple. All the people came to him, and he sat down and taught them. The scribes and the Pharisees brought a woman who had been caught in adultery, and placing her in the midst they said to him, "Teacher, this woman has been caught in the act of adultery. Now in the Law, Moses commanded us to stone such women. So what do you say?" This they said to test him that they might have some charge to bring against him. Jesus bent down and wrote with his finger on the ground. And as they continued to ask him, he stood up and said to them, "Let him who is without sin among you be the first to throw a stone at her." And once more he bent down and wrote on the ground. But when they heard it, they went away one by one, beginning with the older ones, and Jesus was left alone with the woman standing before him. Jesus stood up and said to her, "Woman, where are they? Has no one condemned you?" She said, "No one, Lord." And Jesus said, "Neither do I condemn you; go, and from now on sin no more."
  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: परमेश्वर आपला रक्षणकर्ता आहे हे आजच्या वाचनांतून आपल्यासमोर स्पष्ट करण्यात आले आहे. आपण जेव्हा सत्याने आणि न्यायाने वागतो तेव्हा परमेश्वर आपले रक्षण करतो आणि जेव्हा आपण आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप करतो तेव्हा देखील परमेश्वर आपणांस राखतो. आज आपल्यासमोर दोन स्त्रियांची उदाहरणे ठेवण्यात आली आहेत. पहिल्या वाचनातील स्त्री सुसन्ना परमेश्वराच्या वचनाला जागून राहिली आणि परमेश्वरानेदानीएल संदेष्ट्याद्वारे तिचे रक्षण केले. शुभवर्तमानातील व्यभिचारामध्ये पकडण्यात आलेल्या स्त्रीचे प्रभू येशू स्वतः रक्षण करतो. शास्त्री आणि परूशी प्रभू येशूला दोष लावावयाला काहीतरी सापडावे म्हणून व्यभिचारी स्त्रीला प्रभू येशूकडे घेऊन येतात आणि सांगतात, "मोशेने आम्हाला नियमशास्त्रांत अशी आज्ञा दिली आहे की व्यभिचारी स्त्रियांनी दगडमार करावा, तर आपण हिच्याविषयी काय म्हणता?" तो त्याला एकसारखे विचारत असता प्रभू येशू त्यांना म्हणाला, "तुम्हांमध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा.” हे शब्द ऐकून वृद्धांपासून सुरुवात करून शेवटल्या माणसांपर्यंत सर्वजण निघून गेले. प्रभू येशूने नियमशास्त्राचे रक्षण तर केलेच, पण त्या व्यभिचारी स्त्रीला देखील संरक्षण पुरवले. इतकेच नव्हे प्रभू येशू ह्या स्त्रीला क्षमा देखील करतो, कारण ती पश्चात्तापी अंतःकरणाने प्रभू येशूसमोर उभी होती. आज प्रभू येशू आपणांस सांगत आहे की प्रथम स्वतःच्या अंतःकरणामध्ये डोकावून पाहा आणि ते प्रथम साफ करा.

प्रार्थना: प्रभो, माझ्या पापची मला जाणीव होऊन मी माझे चांगले व पवित्र जीवन जगण्यास मला मदत कर, इतरांचा न्याय न करता मी माझे पाप रडावे म्हणून मला पवित्र आत्म्याचे दान दे, आमेन.
✝️