उपवासकाळातील चौथा सप्ताह
शनिवार दि. ५ एप्रिल २०२५
✝️
"हा खरोखर तो संदेष्टा आहे." कित्येक म्हणाले, "हा ख्रिस्त आहे."
"This really is the Prophet." Others said, "This is the Christ."
वर्तनसाक्षी (१३५०-१४१९)
✝️
चिंतन : अनेक व्रतस्थ लोकांना गरिबीचे व्रत आवडते; परंतु त्या व्रताशी संबंधित असलेले दुःख आणि अपमानास्पद वागणूक ते टाळण्याचा प्रयत्न करतात. त्यांना पद व नावलौकिक हवा असतो; परंतु वस्तुस्थितीपासून ते दूर राहतात.- संत विन्सेंट फेरेर
यिर्मया संदेष्ट्याने प्रामाणिकपणे परमेश्वराचा सत्याचा संदेश दिला. परंतु लोकांनी त्याच्या विरुद्ध उठून त्याला मारण्याचा कट रचला. तरीसुद्धा यिर्मयाने परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे यिर्मयाने देवाचा संदेश लोकांना दिला,
येशू ख्रिस्ताला तारणारा व देवाचा पुत्र स्वीकारणे अनेकांना विवादास्पद वाटू लागले असताना काहीजणांना येशू मोठा संदेष्टा वाटत होता तर काहीजणांना मशीहा आणि काहीजण अलिप्त होते. रोमन अधिकारी तर येशूला अटक करु पाहत होते परंतु ते परत गेले. याजक आणि शास्त्रीपरुश्यांना तर येशू धर्मद्रोही वाटत होता. अशा प्रसंगी केवळ निकदेमसने येशूची बाजू घेण्याचा प्रयत्न केला तर त्यालासुद्धा गप्प बसविण्यात आले. येशूची शिकवण प्रेम, दया, क्षमा, आत्मत्याग, परोपकार व सेवा ह्या मुल्यांवर उभारलेली असल्यामुळे जनमानसात येशूची प्रतिमा उंचावली होती. देव माणसांवर नितांत प्रेम करावे हाच ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा गाभा आहे.
आपण ख्रिस्ती जीवन जगत असताना जेव्हा विरोध, छळ किंवा नींदा केली जाते तेव्हा आपण प्रभूच्या शिकवणुकीला सकारत्मकतेने प्रतिसाद द्यावा. त्यावर विश्वास ठेवून ख्रिस्त तारणारा आहे अशी साक्ष जगाला देता यावी म्हणून प्रयत्न करू या.
✝️
पहिले वाचन : यिर्मया ११:१८-२०
वाचक : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
माझे शत्रू माझ्याविरुद्ध कट रचत आहेत याची प्रभूने मला सूचना दिली. मी तर कत्तलखान्याकडे निमूटपणे नेल्या जाणाऱ्या कोकरासारखा वागत होतो. माझ्याविरुद्ध कटकारस्थाने माझ्या शत्रूनी रचली आहेत याची मला कल्पना नव्हती. ते म्हणत असावेत, " झाड हिरवेगार आहे तोच त्याला तोडले पाहिजे, यिर्मयाचा काटा एकदा काढून टाकला की, मग कोणी त्याची आठवण काढणार नाही! '
तेव्हा मी विनवणी केली, "हे सेनाधीश प्रभो, तूच खरा न्याय देतोस; कारण तुला मनातील भावना व विचार कळतात. माझी फिर्याद मी तुझ्यापुढे मांडतो, तू माझ्या शत्रूंचा सूड उगव आणि तो उगवताना मला तो पाहू दे.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Jeremiah 11:18-20
The LORD made it known to me and I knew, then you showed me their deeds. But I was like a gentle lamb led to the slaughter I did not know it was against me they devised schemes, saying, "Let us destroy the tree with its fruit, let us cut him off from the land of the living, that his name be remembered no more But, O LORD of hosts, who judges righteously, who tests the heart and the mind, let me see your vengeance upon them, for to you have I committed my cause.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ७ : २-३,९-१२
प्रतिसाद : प्रभो, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे.
१) हे प्रभो, माझ्या देवा, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे.
माझा पाठलाग करणाऱ्या सर्वांपासून माझी सुटका कर,
नाहीतर ते मला सिंहासारखे फाडून टाकतील
आणि कुणी मला सोडवू शकणार नाही
अशा ठिकाणी नेऊन माझ्या चिंधड्या उडवतील.
२) हे प्रभो, मानवजातीचा न्यायनिवाडा करणाऱ्या देवा,
माझ्या बाजूने न्याय दे; कारण मी सात्त्विक व सरळ आहे.
दुष्टांची दुष्टाई नष्ट होवो ! सात्त्विकाला स्थैर्य दे;
विचार व भावना पारखणारा तू न्यायपरायण देव आहेस!
३) देव माझा संरक्षक ढाल आहे,
सरळ मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो.
देव नि:स्पृह न्यायाधीश आहे,
तो मंदक्रोध आहे; दुष्टांचे तो नेहमीच पारिपत्य करतो.
Psalm 7:2-3, 9bc-10, 11-12 (2a)
O Lord, my God, I take refuge in you.
O Lord, my God, I take refuge in you.
Save and rescue me from all my pursuers,
lest they tear me apart like a lion,
and drag me off with no one to rescue me.
Give judgement for me, O Lord,
for I am just and blameless of heart.
Put an end to the evil of the wicked!
Make the just man stand firm,
it is you who test mind and heart,
O God of justice!
God is a shield before me.
who saves the upright of heart.
God is a judge, just and powerful and patient,
not exercising anger every day. R
जयघोष
मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, "बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे."
Acclamation:
Blessed are those who, hearing the word, hold it fast in an honest and good heart, and bear fruit with patience.
शुभवर्तमान योहान ७:४०-५२
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
लोकसमुदायातील कित्येक जण येशूचे शब्द ऐकून म्हणत होते, "हा खरोखर तो संदेष्टा आहे." कित्येक म्हणाले, "हा ख्रिस्त आहे." पण दुसरे कित्येक म्हणाले, "ख्रिस्त गालिलातून येतो का? दावीदच्या वंशाचा व ज्या बेथलेहेमात दावीद होता त्या गावातून ख्रिस्त येणार असे शास्त्रात सांगितले नाही का? " ह्यावरून त्याच्यामुळे लोकसमुदायात फूट पडली. त्यांच्यातील कित्येकजण त्याला धरावयास पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही. मग मुख्य याजक व परुशी ह्याच्याकडे कामदार आले. त्यांना ते म्हणाले, “तुम्ही याला का आणले नाही?" कामदारांनी उत्तर दिले, "कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही!" त्यावरून परुशी त्यांना म्हणाले, “तुम्हीही फसला आहा का? अधिकाऱ्यांपैकी किंवा परुश्यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे का? पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे." त्याच्याकडे पूर्वी आलेला निकदेम हा त्यांच्यापैकी एक होता तो त्यांना म्हणाला, "एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्यावाचून व तो काय करतो ह्याची माहिती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते का?" त्यांनी त्याला उत्तर दिले, "तुम्हीही गालिलातले आहा का ? शोध करून पाहा, की गालिलातून कोणी संदेष्टा उद्भवत नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
John 7:40-53
At that time: When they heard the words of Jesus, some of the people said, "This really is the Prophet." Others said, "This is the Christ." But some said, "Is the Christ to come from Galilee? Has not the Scripture said that the Christ comes from the offspring of David, and comes from Bethlehem, the village where David was?" So there was a division among the people people over him. Some of them wanted to arrest him, but no one laid hands on him. The officers then came to the chief priests and Pharisees, who said to them, "Why did you not bring him?" The officers answered, "No one ever spoke like this man!" The Pharisees answered them, "Have you also been deceived? Have any of the authorities or the Pharisees believed in him? But this crowd that does not know the law is accursed." Nicodemus, who had gone to him before, and who was one of them, said to them, "Does our law judge a man without first giving him a hearing and learning what he does?" They replied, "Are you from Galilee too? Search and see that no arises from Galilee." They went each to his own house.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: प्रभू येशूने सत्याविषयी खरी साक्ष दिली आणि परमेश्वराच्या नियमांविषयी लोकांची कान उघडणी केली, म्हणून यहुदी अधिकारी त्याचा जीव घेऊ पाहात होते. यिर्मया संदेष्ट्याच्या वाणींतून हे स्पष्ट करण्यात आले आहे : "ह्या झाडाचा आपण फळासकट नाश करू व त्याच्या नावाचे स्मरण पुनः होऊ नये म्हणून त्यास जिवंतांच्या भूमीवरून नाहीसे करू." चांगल्या कार्यासाठी कोणी कोणाचा जीव घेऊ पाहातो काय ? प्रभू येशूच्या चांगल्या कार्यासाठी नव्हे तर हेव्यामुळे यहुदी अधिकारी त्याला मारू इच्छित होते. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांस त्यांनी शापग्रस्त म्हणून घोषित केले. प्रभू येशूच्या बाजूने बोलणाऱ्या निकोदेमला त्यांनी शांत करताना सांगितले की गालीलांतून कोणी संदेष्टा उद्भवत नाही. शास्त्र जाणणारे यहुदी अधिकारी मसीहा कोण असेल हे ओळखण्यास पूर्णपणे अपात्र ठरले. प्रभू येशू मसीहा ह्या त्यांच्या अपेक्षेचा मसीहा नव्हता, म्हणून त्यांनी प्रभू येशूच्या प्रकटीकरणासमोर आपली अंतःकरणे कठीण केली आणि त्यांना खरा मसीहा कळला नाही. प्रभू येशूला ओळखण्यासाठी अंतःकरणत्याच्या प्रकाशाने प्रकाशित होणे गरजेचे आहे. प्रभू ख्रिस्ताचा प्रकाश आपणांस लाभावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
प्रार्थना: हे प्रभू येशू, ह्या उपवासकाळात अंत:करणापासून तुझ्या आज्ञा पाळण्यास व आचरण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.
✝️