Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading |Thursday 3rd April 2025 | 4th week of the Lent |

उपवासकाळातील चौथा सप्ताह 

गुरुवार दि. ३ एप्रिल  २०२५

✝️  

 मी आपल्या पित्याच्या नावाने आलो आहे पण तुम्ही माझा स्वीकार करीत नाही;
I have come in my Father's name, and you do not receive me. 


संत रिचर्ड
महागुरू, वर्तनसाक्षी (११९७-१२५३)
रिचर्ड व्हीच हा इंग्लंड मधील विंचेस्टरशायर येथला रहिवासी होता. ख्रिस्तसभेच्या धर्मकायदा (कॅनन लॉ) विभागात तो तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होता. त्याची बुद्धीमत्ता पाहून त्याला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत कुलगरूपदावर नियुक्त करण्यात आलेले होते. बुद्धीमत्तेबरोबरच त्याला पावित्र्याची विशेष देणगी लाभलेली होती. त्यामुळे त्याला कॅन्टरबरी ह्या सरधर्मप्रांताचे चॅन्सेलर म्हणूनही नेमण्यात आले होते. तिथे असतानाच तो संत एडमंड ह्यांचा जीवश्च कंठश्च मित्र बनला. पुढे आर्चबिशपांना हद्दपार करण्यात आले, तेव्हा तो त्यांच्या समवेत फ्रान्स येथे गेला. राजा हेन्री तिसरा ह्याच्या काळात राज्यव्यवस्थेने महागुरूंच्या नेमणुकामध्ये केलेल्या हस्तक्षेपाच्या निषेधार्थ आर्चबिशपांनी हद्दपारीचा निर्णय स्विकारलेला होता. त्याला संत रिचर्ड ह्याच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

धर्मगुरूपदानंतर लगेच इ. स. १२४४ साली राजाने नेमलेल्या व्यक्तीला पर्याय म्हणून विंचेस्टर धर्मप्रांताचे महागुरू म्हणून फा. रिचर्ड ह्यांना महागुरूदीक्षा देण्यात आली. पोप इनोसेंट चौथे ह्यांनी त्यांच्या मस्तकावर महागुरूपदाचे शिरस्त्राण चढविले.
संत रिचर्ड ह्यांची राहणी अतिशय साधी होती. आपल्या हाती येणारा पैसा ते गोरगरिबांना वाटून टाकीत. दोन वर्षाकरिता राज्यव्यवस्थेने त्यांचे मानधन राखून ठेवलेले असले तरी आपल्या मिळकतीची रक्कम ते पददलितांकरिताच खर्च करीत.
आपल्या धर्मगुरूंच्या जीवनाचा दर्जा (आध्यात्मिक व धार्मिक दृष्ट्या) उंचवावा म्हणून त्यांच्या जीवन व कार्यावर आधारित एक नियमावली त्यांनी तयार केली होती. प्रत्येक परिषदेच्या वेळी धर्मगुरूंनी ती सोबत आणावी असा संत रिचर्ड ह्यांचा आग्रह असे. ३ एप्रिल १२५३ साली आपल्या स्वर्गीय निजधामी गेलेल्या बिशप रिचर्ड ह्यांना पोप अर्बन चौथे ह्यानी १२६२ साली संतांच्या मालिकेत गणले.

चिंतन : “देव विश्वासू आहे. आपण जर त्याच्याशी प्रामाणिक राहिलो तर तो आपल्या गरजा पुरवितो.” संत रिचर्ड
 
✝️ 
देवपित्याने सोपविलेली मानवाच्या उद्धाराची जबाबदारी प्रभू येशू  ख्रिस्ताने पूर्णत्वास नेली. पवित्र आत्मा स्वतः येशूविषयी साक्ष देत आहे की,  प्रभू येशू देवपित्याचा परमपुत्र आहे व त्याचे आपण ऐकावे. आपल्या सर्वांना  आतापर्यंत ख्रिस्तसभेतील संतांनी प्रभू येशू जिवंत देवाचा पुत्र असल्याची साक्ष दिली आहे. आजसुद्धा प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना प्रभूच्या प्रेमाचा,  करुणेचा व आरोग्यदानाचा अनुभव मिळत असतो. म्हणूनच निःशकपणे प्रभूला आपला तारणदाता म्हणून आपण स्वीकार करु या.


पहिले वाचन :  निर्गम ३२:७-१५
वाचक :निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन
"आपल्या लोकांवर अरिष्टे आणण्याच्या हेतूपासून परावृत्त हो, "

परमेश्वर मोशेला म्हणाला, "चल, खाली उत्तर, कारण ज्या तुझ्या लोकांना तू इजिप्त देशातून आणले ते बिघडले आहेत. ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते तो माग लवकरच सोडून ते बहकून गेले आहेत. त्यांनी एक ओतीव वासरू करून त्याची पूजाअर्चा केली व त्यास बली अर्पण केले आणि हे इस्राएला, ज्यांनी तुला इजिप्त देशातून सोडवून आणले आहे तेच हे तुझे देव! असे ते म्हणू लागले आहेत. "मग परमेश्वराने मोशेला म्हटले, "मी या लोकांना पाहून चुकलो आहे. हे केवळ ताठ मानेचे लोक आहेत. तर आता मला आड गेक नको, मी आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यांना भस्म करतो आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करतो."
तेव्हा मोशे आपला देव परमेश्वर याची विनवणी करून म्हणाला, "हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महासामध्याचे व भुजबलाने इजिप्त देशातून सोडवून बाहेर आणले त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा? त्यांना पहाडांमध्ये मारून टाकावे आणि पृथ्वीवरून त्यांना नष्ट करावे म्हणून त्यांना इजिप्त देशातून त्याने दुष्ट हेतूने बाहेर काढले असे इजिप्तवासी लोकांनी का बोलावे ? आपल्या तीव्र कोपापासून निवृत्त हो आणि आपल्या लोकांवर अरिष्टे आणण्याचे तू योजले आहे त्यापासून परावृत्त हो. तुझे दास आब्राहाम, इसहाक व इस्राएल गांची आठवण कर तू त्यांना स्वतःची शपथ वाहून सांगितले होते की, मी तुमची संतती आकाशातील तान्यांसारखी बहुगुणित करीन आणि ज्या ह्या देशाविषयी मी तुम्हांला सांगितले तो सगळा तुमच्या संततीला देईन आणि ती त्याची निरंतरची वतनदार होईल," तेन्हा मी आपल्या लोकांचे अनिष्ट करीन असे जे परमेश्वर म्हणाला होता त्यापासून तो परावृत्त झाला,
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Exodus 32:7-14 
In those days: The LORD said to Moses, "Go down, for your people, whom you brought up out of the land of Egypt, have perrupted themselves. They have turned aside quickly out of the way that I commanded them. They have made for themselves a golden calf and have worshiped it and sacrificed to it and said, These are your gods, O Israel, who brought you up out of the land of Egypt! And the LORD said to Moses, "I have seen this people, and behold, it is a stiff-necked people. Now therefore let me alone, that my wrath may burn hot against them and I may consume them, in order that I may make a great nation of you." But Moses implored the LORD his God and said, "O LORD, why does your wrath burn hot against your people, whom you have brought out of the land of Egypt with great power and with a mighty hand? Why should the Egyptians say, 'With evil intent did he bring them out, to kill them in the mountains and to consume them from the face of the earth'? Turn from your burning anger and relent from this disaster against your people. Remember Abraham, Isaac, and Israel, your servants, to whom you swore by your own self, and said to them, 'I will multiply your offspring as the stars of heaven, and all this land that I have promised I will give to your offspring, and they shall inherit it forever." And the LORD relented from the disaster that he had spoken of bringing on his people.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद   स्तोत्र १०६:१९-२३
प्रतिसाद :प्रभो, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस
१) होरेब येथे त्यांनी वासराची एक मूर्ती बनवली,
त्या ओतीव मूर्तीला दंडवत घातले; त्यांनी आपल्या वैभवशाली देवाच्या मोबदल्यात गवत खाणार्या बैलाची प्रतिमा स्वीकारली. 

२)ज्याने इजिप्त देशात महान कार्य केले होते, 
म्हणजे हामाच्या देशात अलौकिक कृत्ये केली होती 
आणि तांबड्या समुद्रावर भीतीदायक गोष्टी केल्या होत्या. 
त्या आपल्या उद्धारक देवाला ते विसरले.

३) तेव्हा त्यांचा नाश करायचा देवाने विचार केला, 
पण त्याचा राग शांत करून त्यांचा नाश टाळण्यासाठी 
त्याचा निवडलेला भक्त मोशे मध्ये पडला.


Psalm 106:19-20, 21-22, 23
O Lord, remember us with the favour you show to your people.

They fashioned a calf at Horeb,
 and worshipped an image of metal, 
they exchanged their glory 
for the image of a bull that eats grass. R

 They forgot the God who was their saviour, 
who had done such great things in Egypt, 
such wonders in the land of Ham, 
such marvels at the Red Sea.  

For this he said he would destroy them, 
but Moses, the man he had chosen, 
stood in the breach before him, 
to turn back his anger from destruction.

जयघोष  
प्रभू म्हणतो, पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.

Acclamation: 
  God so loved the world that he gave his only-begotten Son; that whoever believes in him should not perish but have eternal life.

शुभवर्तमान योहान ५:३१-४५
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
  
येशू यहुद्यांस म्हणाला, मी स्वतःविषयी साक्ष दिली, तर माझी साक्ष खरी नाही; माझ्याविषयी साक्ष देणारा दुसरा आहे आणि जी साक्ष तो माझ्याविषयी देतो, ती खरी आहे हे मला ठाऊक आहे. तुम्ही योहानाकडे पाठवून विचारले व त्याने सत्याविषयी साक्ष दिली आहे. पण मी माणसांची साक्ष मान्य करीत नाही; तथापी तुम्हाला तारण प्राप्त व्हावे म्हणून मी हे सांगतो. तो जळता व प्रकाश देणारा दिवा होता आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष करावयास राजी झाला. परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानच्या साक्षीपेक्षा मोठी आहे; कारण जी कार्य सिद्धिस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठवले आहे.  आणखी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच माझ्याविषयी साक्ष दिली आहे. तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही व त्याचे स्वरूपसुद्धा पाहिले नाही आणि त्याचे वचन तुम्ही आपणांमध्ये दृढ राखले नाही, कारण ज्याला त्याने पाठवले त्याचे तुम्ही खरे मानत नाही. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्याच्याद्वारे तुम्हांला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हांला वाटते आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत; तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हांला इच्छा होत नाही. मी मनुष्यांकडून प्रशंसा करून घेत नाही. परंतु मी तुम्हांला ओळखले आहे की, तुमच्या ठायी देवाची प्रीती नाही. मी आपल्या पित्याच्या नावाने आलो आहे पण तुम्ही माझा स्वीकार करीत नाही; दुसरा कोणी स्वत:च्या नावाने आला तर त्याचा तुम्ही स्वीकार कराल. जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करीत नाही, त्या तुम्हांला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे ? मी पित्यासमोर तुम्हांला दोष लावीन असे समजू नका; ज्याच्यावर तुम्ही आशा ठेवली आहे तो मोशे तुम्हाला दोष लावणार आहे. तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर माझ्यावर विश्वास ठेवला असता; कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे. तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवत नाही तर माझ्या वचनांवर विश्वास कसा ठेवाल ?"

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 5:31-47

At that time: Jesus said to the Jews, "If I alone bear witness about myself, my testimony is not true. There is another who bears witness about me, and I know that the testimony that he bears about me is true. You sent to John, and he has borne witness to the truth.
Not that the testimony that I receive is from man, but I say these things so that you may be saved. He was a burning and shining lamp, and you were willing to rejoice for a while in his light. But the testimony that I have is greater than that of John. For the works that the Father has given me to accomplish, the very works that I am doing, bear witness about me that the Father has sent me. And the Father who sent me has himself borne witness about me. His voice you have never heard, his form you have never seen, and you do not have his word abiding in you, for you do not believe the one whom he has sent. You search the Scriptures because you think that in them you have eternal life; and it is they that bear witness about me, yet you refuse to come to me that you may have life. I do not receive glory from people. But I know that you do not have the love of God within you. I have come in my Father's name, and you do not receive me. If another comes in his own name, you will receive him. How can you believe, when you receive glory from one another and do not seek the glory that comes from the only God? Do not think that I will accuse you to the Father. There is one who accuses you: Moses, on whom you have set your hope. For if you believed Moses, you would believe me; for he wrote of me. But if you do not believe his writings, how will you believe my words?"
  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: परमेश्वराने आपल्या पराक्रमी बाहूने इस्त्राएली लोकांना गुलामगिरीतून मुक्त केले आणि त्यांना आपल्या सर्वसमर्थ नावाची ओळख करून दिली. त्या लोकांच्या डोळयांसमक्ष परमेश्वराने अद्भुत कृत्ये केली तरी देखील परमेश्वराला ओळखण्यास ते अपात्र ठरले आणि सर्वसमर्थ परमेश्वराचे स्थान त्यांनी कोरीव मूर्तीला दिले. परमेश्वराचा राग त्यांच्यावर भडकला तेव्हा मोशे त्यांच्यासाठी मध्यस्थी करतो. नेमलेल्या समयी परमेश्वर स्वतः मानव होऊन लोकांना स्वतःची ओळख करून देतो, परंतु प्रभू येशूला ओळखण्यास ते अपात्र ठरतात. मोशे प्रभू येशूविषयी साक्ष देतो, कारण त्याने शास्त्रात त्याच्याविषयी लिहिले आहे. संत योहान बॅप्टीस्टा, ज्याला प्रभू येशू जळता आणि प्रकाश देणारा दिवा म्हणून संबोधितो तो प्रभू येशूविषयी साक्ष देतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वतः पिता आपल्या पुत्राविषयी साक्ष देतो. प्रभू येशूने केलेली कार्ये स्वर्गातील पित्याने त्याला दिलेल्या मिशनची साक्ष देतात. "जी कार्ये सिद्धीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे, म्हणजे जी कार्ये मी करितो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की पित्याने मला पाठवले आहे." प्रभू येशूविषयी देण्यात आलेल्या साक्षीवरून आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष हे परमेश्वराचे प्रकटीकरण आहे आणि ही साक्ष आज आपल्यासमोर लिखित स्वरूपात आहे. परमेश्वराच्या दिव्य वचनांवर आपण विश्वास ठेवून प्रभू येशूची खरी ओळख आपणांस व्हावी म्हणून आपण परमेश्वराचे आशीर्वाद माँगू या.

प्रार्थना:हे प्रभू येशू, तूच एकमेव तारणारा व जीवनदाता आहेस ही श्रद्धा दृढबनविण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
✝️