रविवार, २५ जानेवारी २०२६
सामान्य काळातील तिसरा रविवार
अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात आणि छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे.' The people that sat in darkness, hath seen great light:
प्रतिसाद : परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे.
१) परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे,
मी कोणाची भीती बाळगू ?
परमेश्वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे,
मी कोणाचे भय धरू ?
२) परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले,
त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन; ते हे की,
आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी,
म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन
आणि त्याच्या मंदिरात ध्यान करीन.
३ ह्या जीवनातच परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील.
परमेश्वराची प्रतीक्षा कर,खंबीर हो, हिम्मत धर.
परमेश्वराचीच प्रतीक्षा कर.
४) महामंडळात मी नीतिमत्त्वाचे सुवृत्त सांगितले.
हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद ठेवले नाही हे तू जाणतोस.

0 टिप्पण्या