सामान्यकाळातील २९ वा रविवार
२२ ऑक्टोबर २०२३
तर मग कैसरचे ते कैसरला आणि देवाचे ते देवाला द्या.
Therefore render to Caesar the things that are Caesar's, and to God the things that are God's."
आपणा सर्वांना दोन प्रकारचे नागरिकत्व मिळालेले आहे. ह्या जगात जिवंत असे पर्यंत जगाचे नागरिकत्व आणि दुसरे म्हणजे देवाच्या राज्याचे नागरिकत्व. जगातील व्यवहार सुरळीत चालण्यासाठी राष्ट्रातील योग्य अशा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सर्वांच्या भल्यासाठी सरकारी कर भरणे गरजेचे आहे. " प्रभू येशूने प्रचलित नाण्यावरील कैसराची मुद्रा दाखवून त्यांना | म्हटले, ‘कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा.' ह्या जगात जीवन जगत असताना आपल्या देशाप्रती आणि देवाप्रती आपण प्रामाणिक राहिले पाहिजे. जगात धार्मिक सलोखा -शांती व परस्पर प्रेम वाढीस लागावे म्हणून ख्रिस्ती माणसाने पुढाकार घेतला पाहिजे.
ख्रिस्तसभा आज मिशन रविवार साजरा करीत आहे. सेवेचे व्रत घेऊन त्यागमय जीवनाद्वारे गरजवंतांची सेवा करणाऱ्या सर्व मिशनरी धर्मगुरु, धर्मबंधु, धर्मभगिनी व प्रापंचिकांसाठी आज प्रार्थना करु या.
✝️
पहिले वाचन : यशया ४५:१,४-६
वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी कोरेश ह्याचा उजवा हात धरला आहे. "
परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्त आहे, त्याच्यापुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे. राजांना आपल्या कमरा सोडायला मी लावतो. त्याच्यापुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाहीत, असे मी करतो. "माझा सेवक याकोब, माझा निवडलेला इस्राएल ह्याच्यामुळे मी तुझे नाव घेऊन हाक मारली, तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला उपनाव दिले. मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे, माझ्याशिवाय कोणी दुसरा देव नाही. तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला सज्ज केले. उगवतीपासून मावळतीपर्यंत माझ्याशिवाय दुसरा देव नाही. मीच परमेश्वर आहे, अन्य कोणी नव्हे." हे सर्वांना कळले.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Isaiah 45:1, 4-6
Thus says the Lord to his anointed, to Cyrus, whose right hand have grasped, to subdue nations before him and to loose the belts of kings to open doors before him that gates may not be closed: For the sake of my servant Jacob, and Israel my chosen, I call you by your name, I name you, though you do not know me. I am the Lord, and there is no other, besides me there is no God; I equip you, though you do not know me, that people may know, from the rising of the sun and from the west, that there is none besides me; I am the Lord, and there is no other.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ९६:१.३,४-५,७-८, ९-१०अ.क
प्रतिसाद : परमेश्वराचा गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य वाखाणा.
१ परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा,
हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर,
राष्ट्रांमध्ये त्यांचा गौरव,
सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा.
२ परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे,
सर्व देवाहूंन त्याचेच भय धरणे योग्य आहे.
कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत.
परमेश्वर तर आकाशाचा निर्माणकर्ता आहे.
३ अहो मानवकुलांनो, परमेश्वराचा गौरव करा,
परमेश्वराचा गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य वाखाणा,
परमेश्वराच्या नावाची थोरवी गा. अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या.
४ पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा
हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो.
राष्ट्रांमधील लोकांना जाहीर करा की, परमेश्वर राज्य करतो.
तो सरळपणे लोकांचा न्याय करील.
Psalm 96:1 and 3, 4-5,7-8, 9-10a, and c
R Give the Lord glory and power.
O sing a new song to the Lord;
sing to the Lord, all the earth.
Tell among the nations his glory,
and his wonders among all the peoples. R
For the Lord is great and highly to be praised,
to be feared above all gods.
For the gods of the nations are naught.
It was the Lord who made the heavens. R
Give the Lord, you families of peoples,
give the Lord glory and power;
give the Lord the glory of his name.
Bring an offering and enter his courts. R
Worship the Lord in holy splendour.
O tremble before him, all the earth.
Say to the nations, "The Lord is king.".
he will judge the peoples in fairness. R
दुसरे वाचन थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र १:१-५
वाचक : पौलचे थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"तुम्ही विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम आणि आशेमुळे धरलेला धीर ह्यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो."
देवपित्याच्या ठायी आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी असलेली थेस्सलनीकाकरांची मंडळी हिला पौल, सिल्वान आणि तिमथी ह्यांच्याकडूनः तुम्हांला कृपा आणि शांती असो.
आम्ही आपल्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करत सर्वदा तुम्हा सर्वाविषयी देवाची उपकारस्तुती करतो. आपल्या देवपित्यासमोर तुम्ही विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरील आशेमुळे धरलेला धीर ह्यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो. देवाच्या प्रीतीतील बंधूनो, तुमची झालेली निवड आम्हांला ठाऊक आहेच. कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे; तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने आणि पूर्ण निर्धाराने तुम्हांला कळवण्यात आली.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद
Second Reading :1 Thessalonians 1:1-5b
Paul, Silvanus, and Timothy To the church of the Thessalonians in God the Father the Lord Jesus Christ: Grace to you and peace. We give thanks to God always fo of you, constantly mentioning you in our prayers, remembering before our God Father your work of faith and labour of love and steadfastness of hope in our 1 Jesus Christ. For we know, brothers loved by God, that he has chosen you, beca our gospel came to you not only in word, but also in power and in the Holy S and with full conviction.
This is the word of God
Thanks be to God
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
आलेलुया!
Acclamation:
You shine as lights in the world, holding fast to the word of life.
शुभवर्तमान मत्तय २२:१५-२१
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला द्या.' "
येशूला बोलण्यात कसे पकडावे ह्यासंबंधाने परुश्यांनी मसलत केली. त्यांनी आपल्या शिष्यांना हेरोदियासह त्याच्याकडे पाठवून म्हटले, "गुरुजी आम्हांला ठाऊक आहे की, आपण खरे आहात, परमेश्वराचा मार्ग खरेपणाने शिकवता आणि कोणाची भीड धरत नाही. आपण तोंड पाहून बोलत नाही.आता आपल्याला काय वाटते हे आम्हांला सांगा. कैसराला कर देणे योग्य आहे की नाही ?" पण येशू त्यांचा कावा ओळखून म्हणाला, “अहो, ढोंग्यांनो, माझी परीक्षा कशाला पाहता ? कराचे नाणे मला दाखवा.” तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ एक नाणे दिले. येशूने त्यांना म्हटले, हा मुखवटा आणि हा लेख कोणाचा? ते म्हणाले, “कैसरचा.” तेव्हा त्याने त्यांना म्हटले, तर मग कैसरचे ते कैसरला आणि देवाचे ते देवाला द्या.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Matthew 22:15-21
At that time: The Pharisees went and plotted how to entangle Jesus in his words.. they sent their disciples to him, along with the Herodians, saying, "Teacher, we kr that you are true and teach the way of God truthfully, and you do not care about anyo opinion, for you are not swayed by appearances. Tell us, then, what you think. Is it lav to pay taxes to Caesar, or not?" But Jesus, aware of their malice, said, "Why put me to test, you hypocrites? Show me the coin for the tax." And they brought him a denari And Jesus said to them, "Whose likeness and inscription is this?" They said, "Caesar Then he said to them, "Therefore render to Caesar the things that are Caesar's, and to God the things that are God's."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: जीवनामध्ये ज्या गोष्टींना आपण महत्त्व देतो त्या गोष्टींचा परिणाम आपल्या एकंदर जीवनशैलीवर दिसून येत असतो. आजची वाचने आपल्याला जीवनात परमेश्वराला प्रथम स्थान देण्याविषयी मार्गदर्शन करतात.
१. परमेश्वर हाच मुक्तिदाता : माणूस कोणत्या ना कोणत्या तरी बंधनात असतो. त्यातून मुक्त होण्याचा तो कसोशीने प्रयत्न करतो. इस्राएली जनता बाबिलोनच्या हद्दपारीत जीवन कंठीत होती. त्यांना पदोपदी जरूसलेमची, मंदिराची, यज्ञबळीची, याजकांची, आपल्या धार्मिक व सामाजिक जीवनाची आठवण यायची. कधी एकदा येथून मुक्त होतो आणि आपल्या प्रिय मायदेशात परत जातो असे त्यांना झाले होते. अशी पार्श्वभूमीवर पर्शियाचा राजा सायरस (कोरेश)ह्याने बाबिलोनचा पराभव केला आणि यहूदी जनतेने आपल्या मायदेशात परतावे असे फर्मान काढले. त्यामुळे सायरस हाच आपला मुक्तिदाता आहे अशी लोकांची समजूत झाली. मात्र सायरस आपल्याच हातातील साधन आहे, आपणच इस्राएलचा खराखुरा मुक्तिदाता आहोत हे परमेश्वर आजच्या पहिल्या वाचनात स्पष्ट करतो.
२. परमेश्वर आपले सर्वस्व : ह्या जगात कायम टिकणारे असे काहीच नाही. केवळ परमेश्वर तेवढा शाश्वत स्वरूपाचा आहे. थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र हे संत पॉलचे व ख्रिस्ती साहित्यातील पहिले लेखन मानले जाते. येशूच्या पुनरुत्थान व स्वर्गारोहणानंतर अवघ्या २० वर्षांनी (इसवी सन ५१ साली) त्याचे लेखन झालेले व आहे. बाल्यावस्थेतील ख्रिस्तसभेच्या कोवळ्या लुसलुशीत श्रद्धेचे दर्शन ह्या पत्रात घडते. आजच्या वाचनात पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्या त्रैक्यस्वरूप परमेश्वराचा उल्लेख करून तोच आपले सर्वकाही आहे हे पौल ठासून सांगतो.
३. परमेश्वर अग्रस्थानी : परूशी व हेरोदीय हे एकमेकांचे शत्रू होते. परंतु येशूला कचाट्यात पकडण्यासाठी ते एकत्र आले होते. दोन्ही गटांचा हेतू निराळा होता. परुश्यांना धार्मिक दृष्ट्या तर हेरोदियांना राजकीय दृष्ट्या येशूला शब्दांत धरायचे होते. ते हेरोदाचे हस्तक असून येशू कैसराला कर देण्याविषयी काय सांगतो ते त्यांना पाहायचे होते.तर कराच्या नाण्यावर कैसराचा मुखवटाअसल्यामुळे ते जवळ बाळगतो. ही सुद्धा व्यक्तिपूजा आहे असे परूशी मानत. येशूने त्यांना राजकीय कर्तव्य बजावताना आपले धार्मिक कर्तव्य विसरू नये ह्याची जाणीव करून दिली. माणूस हा साक्षात् देवाचा मुखवटा आहे म्हणून देवाचे ते देवाला द्या अशी शिकवण येशूने दिली . आत्मपरीक्षण : माझ्या जीवनात प्रथम प्राधान्य / कोणाला आहे ? परमेश्वर हाच माझा मुक्तिदाता व माझे सर्वस्व बनला आहे का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, नम्रतेने तुजसमोर शरण येण्यास व सर्व गुणांनीशी तुझी सेवा करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️