Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | 12th week in ordinary Time| Friday 27th June 2025

सामान्यकाळातील १२ वा सप्ताह 

शुक्रवार दि.२७ जून  २०२५

'माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.'

Rejoice with me, because I have found my sheep that was lost.



प्रभूयेशूच्या अति पवित्र हृदयाचा सोहळा

ख्रिस्तसभा आज प्रभूयेशूच्या अति पवित्र हृदयाचा सोहळा साजरा करीत आहे. प्रभूयेशूचे हृदय सर्वांना त्याच्या वेंगेत घेण्यासाठी सदैव तयार आहे. प्रभू येशू दयेचा, प्रेमाचा, चांगुलपणाचा आणि कृपेचा महासागर आहे. त्याच्या  अतिपवित्र हृदयातून कृपेचा झरा अखंडपणे वाहत असतो. ख्रिस्त आपणास  म्हणतो, अहो कष्टी आणि भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्वजण मजकडे या, मी  तुम्हांला विसावा देईन" (मत्तय ११:२८). 

आज प्रभू येशूच्या अतिपवित्र हृदयाचा आपण सन्मान करीत आहोत. ख्रिस्त प्रभू त्याचे दोन्ही बाहू पसरुन  आपल्याला त्याच्या हृदयाशी कवटाळण्यासाठी तयार आहे. आपल्या सर्व वेदना, कष्ट, संकटे, दु:खे, चिंता व ईश्वरापासून जे जे आपणास दूर घेऊन जाते  अशा सर्व घटना विचार घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताला आपले सर्वस्व समर्पित करु  या. त्याच्या हृदयातू अखंडपणे वाहत असलेल्या कृपेच्या झऱ्यातून तो आपणास अंतर्यामी बलसंपन्न करावयास तयार आहे.

प्रभू येशूच्या अतिपवित्र हृदया आम्हा पाप्यांवर दया कर!

 

पहिले वाचन : यहेज्केल ३४ : ११-१६ 
वाचक :  यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन
 “मी स्वतः माझी मेंढरे चारीन आणि त्यांची निजण्याबसण्याची सोय करीन."
“कारण प्रभू परमेश्वर म्हणतो : पाहा, मी स्वतः आपल्या मेंढरांचा शोध करीन, त्यांना मी हुडकीन. जो मेंढपाळ आपल्या दाणादाण झालेल्या मेंढरांमध्ये राहून त्यांना हुडकतो, त्याच्याप्रमाणे मी आपल्या मेंढरांना हुडकीन आणि अभ्राच्छादित व अंधकाराच्या दिवशी त्यांची दाणादाण झाली त्या सर्व ठिकाणातून त्यांना वाचवून आणीन. मी त्यांना राष्ट्रांतून आणीन, निरनिराळ्या देशातून त्यांस जमा करीन, मी त्यांना स्वदेशी परत आणीन. मी इस्राएलच्या पर्वतांवर, नाल्यांजवळ आणि देशातल्या सर्व वसतिस्थानात त्यांस चारीन. मी त्यांना चांगल्या कुरणात चारीन, त्यांचे कुरण इस्राएलच्या उंच पहाडांवर होईल. ते तेथे चांगल्या कुरणात बसतील, इस्राएलच्या पर्वतावर त्यांना उत्तम चारा मिळेल. मी स्वतः माझी मेंढरे चारीन आणि त्यांची निजण्याबसण्याची सोय करीन असे प्रभू परमेश्वर म्हणतो. मी हरवलेल्यांना शोधीन, हाकून दिलेल्यांना परत आणीन, घायाळांना पट्टी बांधीन, रोग्यांना बळ देईन, पण लठ्ठ आणि बलिष्ठ यांचा मी नाश करीन, त्यांना मी यथान्याय चारीन."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


First Reading :: Ezekiel 34: 11-16
 For thus saith the Lord God: Behold I myself will seek my sheep, and will visit them. As the shepherd visiteth his flock in the day when he shall be in the midst of his sheep that were scattered, so will I visit my sheep, and will deliver them out of all the places where they have been scattered in the cloudy and dark day. And I will bring them out from the peoples, and will gather them out of the countries, and will bring them to their own land: and I will feed them in the mountains of Israel, by the rivers, and in all the habitations of the land. I will feed them in the most fruitful pastures, and their pastures shall be in the high mountains of Israel: there shall they rest on the green grass, and be fed in fat pastures upon the mountains of Israel. I will feed my sheep: and I will cause them to lie down, saith the Lord God. I will seek that which was lost: and that which was driven away, I will bring again: and I will bind up that which was broken, and I will strengthen that which was weak, and that which was fat and strong I will preserve: and I will feed them in judgment.
This is the word of God 
Thanks be to God 


प्रतिसाद स्तोत्र २३:१-६
प्रतिसाद :  परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही.

१) परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, 
मला काही उणे पडणार नाही. 
तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो. 
तो मला संथ पाण्यावर नेतो,
तो माझा जीव ताजातवाना करतो.

२) तो आपल्या नामासाठी मला नीतिमार्गाने चालवतो. 
मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो 
तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. 
कारण तू माझ्याबरोबर आहेस,

३)तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात.
 तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस.
तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस, 
माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे.

४). खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण 
आणि दया ही लाभतील. 
परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.


Psalm  Psalms 23: 1-3a, 3b-4, 5, 6

R. (1) The Lord is my shepherd; there is nothing I shall want.

1 The Lord ruleth me: and I shall want nothing.
2 He hath set me in a place of pasture. He hath brought me up, on the water of refreshment:
3a He hath converted my soul.
R. The Lord is my shepherd; there is nothing I shall want.

3b He hath led me on the paths of justice, for his own name’s sake.
4 For though I should walk in the midst of the shadow of death, I will fear no evils, for thou art with me. Thy rod and thy staff, they have comforted me.
R. The Lord is my shepherd; there is nothing I shall want.

5 Thou hast prepared a table before me against them that afflict me. Thou hast anointed my head with oil; and my chalice which inebriateth me, how goodly is it!
R. The Lord is my shepherd; there is nothing I shall want.

6 And thy mercy will follow me all the days of my life. And that I may dwell in the house of the Lord unto length of days.
R. The Lord is my shepherd; there is nothing I shall want.

दुसरे वाचन   पौलचे रोम ५:५-११
वाचक :पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
"देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण देतो."
आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे.
आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेषकरून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहो. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेषेकरून तारले जाणार आहो. इतकेच केवळ नाही, तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपणाला आता मिळाली आहे त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आपण देवाच्याठायी अभिमान बाळगतो.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

 Romans 5: 5b-11
The charity of God is poured forth in our hearts, by the Holy Ghost, who is given to us. For why did Christ, when as yet we were weak, according to the time, die for the ungodly? For scarce for a just man will one die; yet perhaps for a good man some one would dare to die. But God commendeth his charity towards us; because when as yet we were sinners, according to the time, Christ died for us; much more therefore, being now justified by his blood, shall we be saved from wrath through him. For if, when we were enemies, we were reconciled to God by the death of his Son; much more, being reconciled, shall we be saved by his life. And not only so; but also we glory in God, through our Lord Jesus Christ, by whom we have now received reconciliation.
This is the word of God 
Thanks be to God 

                                               
जयघोष
आलेलुया, आलेलुया! 
प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे, जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात.
आलेलुया!


Acclamation: 
Alleluia, alleluia. I am the good shepherd, says the Lord, I know my sheep, and mine know me. R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान लूक  १५:३-७
वाचक :   लूकलिखित  लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा." "

येशूने शास्त्री आणि परुशी ह्यांना हा दाखला सांगितला : “तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की, त्याच्याजवळ शंभर मेंढरे असता त्यातून एक हरवले तर नव्याण्णव रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करत नाही? ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रांना आणि शेजाऱ्यांना एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, 'माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.' त्याप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो.' "
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : 
Luke 15: 3-7
And he spoke to them this parable, saying: What man of you that hath an hundred sheep: and if he shall lose one of them, doth he not leave the ninety-nine in the desert, and go after that which was lost, until he find it? And when he hath found it, lay it upon his shoulders, rejoicing: And coming home, call together his friends and neighbours, saying to them: Rejoice with me, because I have found my sheep that was lost. I say to you, that even so there shall be joy in heaven upon one sinner that doth penance, more than upon ninety-nine just who need not penance.
 This is the Gospel of the Lord  
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनयेशूचे आपल्यासाठी घायाळ झालेले अतिपवित्र हृदय मानवासाठी अमर्याद प्रेम, करुणा व त्याग ह्यांनी ओतप्रोत भरलेले आहे. मनुष्य पापी असूनही येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला ह्यातून त्याच्या आपल्यावरील प्रेमाची खोली दिसून येते असे रोमकरांस लिहिलेल्या पत्रातून घेतलेल्या आजच्या वाचनात संत पॉल आपल्याला सांगतात. ह्यानंतर अजूनही जे परमेश्वरापासून दूर आहेत, बहकलेले वा भरकटलेले आहेत त्यांचा तो प्रेमाने, काळजीने अविरत शोध घेतो, क्षमाशील हृदयाने पुन्हा त्याच्या कळपात सामावून घेण्याची संधी देतो हे हरवलेल्या मेंढराच्या दाखल्यातून आजच्या शुभवर्तमानातील उताऱ्यात आपल्या स्पष्ट करण्यात आले आहे. आज आपण देवापासूनज्या ज्या वेळी भरकटलो होतो, दूर गेलो होतो तेव्हा त्याने आपला शोध घेऊन, आपल्याला पित्याच्या प्रेमाने क्षमा करून, आपल्याला त्याच्या कळपात पुन्हा कसे समाविष्ट केले ह्याची आठवण करून नम्रपणे, पश्चात्तापी अंतःकरणाने त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करू या. तसेच, आपल्यापासून नाते-संबंधात हरवलेल्यांचा प्रामाणिकपणे शोध घेऊन, येशूच्या प्रेमळ हृदयाचे अनुकरण करीत उदार अंतःकरणाने त्यांना क्षमा करून पुन्हा त्यांना आपल्यात सामावून घेण्यासाठी आपण परमेश्वराची कृपा मागू या.

प्रार्थना : हे येशूच्या अतिपवित्र हृदया, आम्ही सर्वदा तुझ्या सहवासात असावे आणि तुझी वाणी ऐकून त्याप्रमाणे मार्गक्रमण करावे म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन.


✝️