Marathi Bible Reading | 31st week in ordinary Time | Wednesday 5th November 2025

सामान्यकाळातील ३१ वा सप्ताह 

बुधवार   दि. ५ नोव्हेंबर २०२५

तुम्हांपैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही
 any one of you who does not renounce all that he has cannot be my disciple.


संत बर्टिला
- कुमारिका ( ६९२)

✝️


आपले आप्तेष्ट, आपली भौतिक धनसंपत्ती व जे काही शिष्य बनण्यास अडथळा निर्माण करेल अशा सर्वांचा त्याग करण्यास प्रभू आवाहन करीत आहे. सर्वस्वाचा त्याग करुन ख्रिस्ताला अनुसरणे सोपे नाही, मात्र अशक्यही नाही. सर्व प्रेषितगण आणि संतगणांनी त्यागमय व खऱ्या ख्रिस्ती जीवनाचा आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे.

जागतिक जीवनात अनेक प्रलोभने व मोह आहेत. आपण त्याची निवडलेली प्रजा आहोत म्हणूनच प्रभू पासून आपल्याला विभक्त होता येत नाही. प्रभू येशूचे खरे शिष्य बनण्यास सामर्थ्य, धैर्य, प्रेरणा व कृपा लाभावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करु या.
पहिले वाचन :रोम  १३:८-१०
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
 "प्रीती हे नियमशास्त्रांचे पूर्णपणे पालन होय."
एकमेकांवर प्रीती करणे ह्यांच्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका, कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. “व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको," ह्या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश "जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर," ह्या वचनात आहे. प्रीती शेजाऱ्यांचे काही वाईट करत नाही, म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय. 
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Romans 13:8-10

Brethren Owe no one anything except to love each other, for the one who loves another has fulfilled the law for the commandments, "You shall not commit adultery. You shall not murder. You shall not steal. You shall not covet, and any other commandment, are summed up in this word: "You shall love your neighbour as self Love does no wrong to a neighbour, therefore love is the fulfilling of the law
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ११२:१-२,४-५,९  
प्रतिसाद : जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो : त्याचे कल्याण होते.

१) परमेश्वराचे स्तवन करा, 
जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो 
आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य! 
त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. 
सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल.

२) सरळ जनांना अंध:कारात प्रकाश प्राप्त होतो, 
त्याच्या ठायी कृपा, दया आणि न्याय ही आहेत 
जो मनुष्य दया करतो आणि उसनेदेतो त्याचे कल्याण होते,
तो न्यायाने आपला व्यवसाय करील
त्याने सढळ हाताने गरिबांना दानधर्म केला आहे 
त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहील. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल.

Palm 112:16-2, 4-3,9
It goes well for the man who deals generously and lends 

Blessed the man who fears the Lord 
who takes great delight in his commandments 
His descends all be powerful on earth 
the generation of the upright will be blest. R

 A light es in the darkness for the upright
 he is generous, merctful, and just 
It goes well for the man who deals
 generously and lends, 
who conducts his affairs with justice. R

Open-handed, he gives to the poor;
 his justice stands firm forever. 
 His might shall be exalted in glory. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी देवाने आपणाला सुवार्तेच्या द्वारे पाचारण केले आहे.
 आलेलुया!

Acclamation: 
 R. Alleluia, alleluia.
if you are insulted As the name of Christ, you are blessed, because the Spirit of glory and of God rests upon you
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान लूक  १४:२५-३३
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही."

येशूबरोबर मोठा लोकसमुदाय चालला होता, तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, “जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ आणि बहिणी ह्यांचा आणि आपल्या जिवाचाही त्याग करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वतःचा क्रूस घेऊन माझ्यामागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला बुरूज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून आणि खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हेपाहत नाही? नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, 'हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही,' अथवा असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करायला निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की, जो वीस हजार घेऊन माझ्यावर येतो त्याच्यावर मला दहा हजारांनिशी जाता येईल काय? जर जाता येत नसेल तर तो दूर आहे तोच तो वकिलाला पाठवून सलोख्याने बोलणे सुरू करील. म्हणून त्याचप्रमाणे तुम्हांपैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 14:25-33

At that time: Great crowds accompanied Jesus, and he tumed and said to them, "ti anyone comes to me and does not hate his own father and mother and wife and children and brothers and sisters, ves, and even his own life, he cannot be my disciple. Whoever does not bear his own cross and come after me cannot be my disciple. For which of you desiring to build a tower does not first sit down and count the cost, whether he has enough to complete it? Otherwise, when he has laid a foundation and is not able to finish, all who see it begin to mock him, saying. This man began to build and was not able to finish. Or what king going out to encounter another king in war, will not sit down first and deliberate whether he is able with ten thousand to meet him who comes against him with twenty thousand? And if not, while the other is yet a great way off, he sends a delegation and asks for terms of peace. So therefore, any one of you who does not renounce all that he has cannot be my disciple.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन:  
जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, कारण प्रीतीच सर्वश्रेष्ठ आहे. प्रभू ख्रिस्ताचे अनुयायी होण्यास किंमत मोजावी लागेल. त्यासाठी काय शर्ती आहेत ? 
१. सर्व आप्तजनांचा त्याग. 
२. क्रूस घेऊन प्रभूला अनुसरावे. 
३. जीवनाचे नियोजन करणे, घर बांधताना त्याचा प्लॅन करतात तसे. ख्रिस्ताचे अनुयायी होण्यास ख्रिस्ताला आपल्या जीवनात प्रथम स्थान द्यायला पाहिजे. जीवनात कितीही दुःखे आली तरी प्रभू ख्रिस्ताला सोडून जाऊ नये. प्रभू ख्रिस्ताच्या जीवन पुनरुत्थानाचे स्मरण करताना, प्रार्थना करू या की त्याच्यावरील आपला विश्वास ढासळू नये व आपण खऱ्या अर्थाने आपला क्रूस उचलून प्रभूच्या मागे जाऊ व त्याची सेवा करू. आपल्याला मिळालेल्या कृपादानाप्रमाणे आपण आपल्या स्थानिक ख्रिस्तमंडळात सेवा द्यायला पाहिजे व एकदिलाचा समाज व एक मनाचे चर्च घडवायला पाहिजे.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या सुवार्तेचे साक्षीदार बनण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा  दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या