सामान्यकाळातील ३१ वा सप्ताह
गुरुवार दि. ६ नोव्हेंबर २०२५
त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हांला सांगतो.
So I say to you, there shall be joy before the angels of God upon one sinner doing penance.
लुमिझीनचे संत लिओनार्ड
- वर्तनसाक्षी, मठाधिकारी (५५९)
मध्ययुगामध्ये संत लिओनार्ड हा जर्मनी, ऑस्ट्रिया आणि बोहेमिया इथे खूप नावारूपाला आला होता आणि त्यात त्यांची भक्ती वाढत गेली. त्याच्या मध्यस्थीने अनेक चमत्कारिक घटना घडत होत्या. त्याला आजारी, मंदबुद्धी, प्रसृतीवेदना सहन करणाऱ्या स्त्रिया आणि तुरुंगातील कैद्यांचा आश्रयदाता संत मानले जाते.
प्रभू येशूने पापांबद्दल पश्चात्ताप करून देवाबरोबर समेट करणाऱ्यांसाठी दोन उदाहरणे दिलेली आहेत. आपण जीवनात भरकटलो, बहकलो आणि पापाच्या खोल डोहात जरी पडलो तरी पण पश्चात्तापाच्या अनेक संधी परमेश्वर आपल्याला देत असतो.प्रभूने पहिले उदाहरण हरवलेल्या मेंढराचे दिले आहे. हरवलेल्या मेंढराचा माणूस शोध घेतो व ते सांपडल्यावर त्याला खांद्यावर घेऊन आनंद साजरा करतो. दुसऱ्या उदाहरणात हरवलेल्या नाण्याचा दाखला आहे. ती बाई दीवा पेटवून, घर झाडून ते नाणे सापडेपर्यंत मनापासून त्याचा शोध घेते. ते सापडल्यावर ती शेजारणीबरोबर आनंद साजरा करते
आपल्या जीवनात अनेकदा संसाराच्या चिंता, कामाचा व्याप, जगातील प्रलोभने व संकटांच्या भोवऱ्यात आपण देवापासून बहकतो व देवाच्या कृपेला पारखे होतो. प्रभू येशू आपला शोध करीत असतो मात्र आपणाला त्याची वाणी ऐकू येत नाही. आपण आज आपल्या जीवनावर चिंतन करीत असतांना प्रभूची वाणी ऐकू या.
पश्चात्तापाची जी संधी मिळेल त्याचा योग्य तो फायदा घेऊ या. देवाकडे वळू या. देवाकडे पश्चात्तापी अंतःकरणाने क्षमा याचना करु या. देवाला आपल्या पश्चात्तापाबद्दल आनंद होत असतो. कारण स्वर्गात आनंद आहे.
✝️
पहिले वाचन : रोम १४:७-१२
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहो."
आपल्यातील कोणी स्वतःकरिता जगत नाही आणि कोणी स्वतः करिता मरत नाही. जर आपण जगतो तर प्रभूकरिता जगतो आणि जर आपण मरतो तर प्रभूकरिता मरतो, म्हणून आपण जगलो, किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहो. ख्रिस्त मेलेल्यांचा आणि जिवंतांचाही प्रभू असावे म्हणून अशासाठी मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला.
तर मग तू आपल्या भावाला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहो. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, "प्रभू म्हणतो, ज्याअर्थी मी जिवंत आहे, त्याअर्थी माझ्यापुढे प्रत्येक जण गुडघा टेकील. आणि प्रत्येक जिव्हा देवाचे स्तवन करील."
तर मग आपणांतील प्रत्येक जण आपआपल्यासंबंधी देवाला हिशेब देईल.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Romans 14: 7-12
For none of us liveth to himself; and no man dieth to himself. For whether we live, we live unto the Lord; or whether we die, we die unto the Lord. Therefore, whether we live, or whether we die, we are the Lord’s. For to this end Christ died and rose again; that he might be Lord both of the dead and of the living. But thou, why judgest thou thy brother? or thou, why dost thou despise thy brother? For we shall all stand before the judgment seat of Christ. For it is written: As I live, saith the Lord, every knee shall bow to me, and every tongue shall confess to God. Therefore every one of us shall render account to God for himself.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १२७:१,४,१३-१४
प्रतिसाद : ह्या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील.
१) परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे,
मी कोणाची भीती बाळगू?
परमेश्वर माझा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू ?
२) परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले
त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन,
ते हे “आयुष्यभर परमेश्वराच्या घरात
माझी वस्ती व्हावी,' म्हणजे मी परमेश्वराचे
मनोहर रूप पाहत राहीन आणि
त्याच्या मंदिरात ध्यान करीन.
३) ह्या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे
कल्याण करील परमेश्वराचीच प्रतीक्षा कर,
खंबीर हो, हिंमत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर.
Psalms 27: 1bcde, 4, 13-14
R. (13) I believe that I shall see the good things of the Lord in the land of the living.
1 The Lord is my light and my salvation, whom shall I fear?
The Lord is the protector of my life: of whom shall I be afraid?
R. I believe that I shall see the good things of the Lord in the land of the living.
4 One thing I have asked of the Lord, this will I seek after;
that I may dwell in the house of the Lord all the days of my life.
That I may see the delight of the Lord, and may visit his temple.
R. I believe that I shall see the good things of the Lord in the land of the living.
13 I believe to see the good things of the
Lord in the land of the living.
14 Expect the Lord, do manfully,
and let thy heart take courage, and wait thou for the Lord.
R. I believe that I shall see the good things of the Lord in the land of the living.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
आपला तारणारा ख्रिस्त येशू ह्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन मिळवून दिले.
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
Come to me, all you who labor and are burdened, and I will give you rest, says the Lord.
R. Alleluia, alleluia.