सामान्यकाळातील २६ वा सप्ताह
मंगळवार दि. ३०सप्टेंबर २०२५
तेव्हा त्याने येरुशलेमला जाण्याच्या दृढनिश्चयाने तिकडे आपले तोंड वळवले.
he set his face to go to Jerusalem.
संत जेरोम -
वर्तनसाक्षी,धर्मपंडित (३४१-४२०)
सोफ्रोनियस युजेबियस हैरोनिमस असे लांबलचक नाव असलेला जेरोम दल्मातिया (युगोस्लाव्हिया) प्रांतात जन्माला आला. त्याने रोम शहरात अभ्यास केल्यानंतर वृत्तीने ज्ञानपिपासू असलेला हा अभ्यासू बुद्धीमान माणूस ज्ञानाच्या शोधार्थ बरीच वर्षे दूरदूरचा प्रवास करीत राहिला. फा, जेरोम ह्यांची अभ्यासूवृत्ती, विविध भाषांवरील प्रभुत्व बायबलचे ज्ञान आणि चिकाटी ह्यामुळे तब्बल १८ वर्षांनी इ.स. ४०४ साली हे बायबल भाषांतराचे कार्य त्यांनी तडीस नेले. त्या आवृत्तीला 'व्हल्गेट' (म्हणजे दैनंदिन वापरासाठी बायबलची आवृत्ती) असे नाव देण्यात आले. पुढे ११०० वर्षांनी ट्रेंट इथे भरलेल्या विश्वपरिषदेमध्ये 'जेरोमकृत भाषांतरीत बायबल हे ख्रिस्तसभेचे अधिकृत भाषांतर आहे' अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यात आला.
नितांत श्रद्धा आणि तीक्ष्ण बुद्धिमत्ता ह्यांचा सुंदर मिलाफ त्यांच्याठायी घडून आलेला होता. मोठ्या खंबीरपणे बायबलवर सडेतोडपणे बोलणारे संत जेरोम रात्रीच्या रात्री प्रार्थनेमध्ये एकांतवासात घालवीत. पुष्कळ उपासतापास करीत. शेवटपर्यंत त्यांनी आपल्या शरीराला अनंत आत्मक्लेश दिले.३० सप्टेंबर ४२० रोजी आपल्या परिश्रमाचे प्रतिफळ मिळविण्यासाठी स्वर्गीय निजधामी गेलेला हा महापुरुष ग्रंथपालांचा आश्रयदाता संत मानला जातो.
त्यांच्या मते 'पवित्र शास्त्र वाचल्यानंतर आपल्याला प्रार्थना कराविशी वाटली पाहिजे आणि प्रार्थना करीत असताना पवित्र शास्त्रातील वचनांचा आधार आपल्याला घ्यावासा वाटला पाहिजे. 'पवित्र शास्त्राविषयीचे अज्ञान हे ख्रिस्ताविषयीचे अज्ञान होय.'
चिंतन : सतत काहीतरी करीत रहा, मग परमेश्वर येवो वा सैतान येवो, तुमचे हात पुष्कळशा चांगल्या गोष्टींनी भरलेले आहेत असे त्याला दिसले पाहिजे.-संत जेरोम ■■
बायबल वाचन, मनन-चिंतन, प्रार्थना व उपासनाविधीतील आपला सहभाग ह्याद्वारे आपण प्रभूची सामर्थ्यशाली कृपा अनुभवून देवाचे राज्य सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत होऊ या.
✝️
पहिले वाचन :: जखऱ्या ८ :२०-२३
वाचक :जखऱ्या या पुस्तकातून घेतलेले वाचन
“पुष्कळ लोक येरुशलेमाला परमेश्वराच्या चरणी येतील."
सेनाधीश परमेश्वर म्हणतो: “राष्ट्र आणि अनेक नगरांचे रहिवासी येतील अशी वेळ येईल, एका नगराचे रहिवासी दुसऱ्या नगरात जाऊन म्हणतील, आपण त्वरेने जाऊन परमेश्वराजवळ अनुग्रह मागू आणि सेनाधीश परमेश्वराच्या चरणी लागू, मीही जातो. पुष्कळ लोक आणि बलाढ्य राष्ट्रे येरुशलेमात सेनाधीश परमेश्वराच्या चरणी लागण्यास आणि परमेश्वराजवळ अनुग्रह मागण्यास येतील. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, त्या दिवसांत सर्व भाषा बोलणाऱ्या राष्ट्रांपैकी दहा जण यहुदी माणसाचा पदर धरून म्हणतील, आम्ही तुम्हांबरोबर येतो, कारण देव तुम्हांबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे."
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Zechariah 8:20-23
"Thus says the Lord of hosts: Peoples shall yet come, even the inhabitants of many cities. The inhabitants of one city shall go to another, saying, 'Let us go at once to entreat the favour of the Lord, and to seek the Lord of hosts; myself am going. Many peoples and strong nations shall come to seek the Lord of hosts in Jerusalem and to entreat the favour of the Lord. Thus says the Lord of hosts: In those days ten men from the nations of every tongue shall take hold of the robe of a Jew, saying, 'Let us go with you, for we have heard that God is with you.""
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ८७:१-७
प्रतिसाद : परमेश्वर आम्हाबरोबर आहे.
१) परमेश्वराचे अधिष्ठान पवित्र पर्वतावर आहे
याकोबच्या सर्व वसतिस्थानांहून सियोनची द्वारे
त्याला अधिक प्रिय आहेत.
हे देवाच्या नगरी, तुझ्या वैभवाच्या कथा सांगितल्या जातात.
२) राहाब आणि बाबेल मला ओळखतात
असे मी जाहीर करीन.
पाहा, पलेशेथ, सोर आणि कुश म्हणतात,
ह्याचा जन्म तेथलाच. सियोनविषयी म्हणतील की,
हा आणि तो तिच्यातच जन्मले होते.
३) परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील.
लोकांची नावनिशी करताना ह्यांचा जन्म तेथलाच,
असे परमेश्वर लिहील,
गायन आणि नृत्य करणारे म्हणतीलः
माझे सर्व उगम तुझ्याच ठायी आहेत.
Psalm 87:1-3, 4-5, 6-7
R. God is with us.
Founded by him on the holy mountain,
the Lord loves the gates of Sion,
more than all the dwellings of Jacob.
Of you are told glorious things,
you, O city of God! R
"Rahab and Babylon I will count
among those who know me;
of Tyre, Philistia, Ethiopia, it is told,
'There was this one born.
But of Sion it shall be said,
"Each one was born in her."
He, the Most High, established it.R
I In his register of peoples the Lord writes,
"Here was this one born."
The singers cry out in chorus,
"In you, all find their home. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, तुझी वचने हृदयाला
आनंदीत करतात, ती नेत्रांना प्रकाश देतात.
आलेलुया!
Acclamation:
The Son of Man came not to be served but to serve, and to give his life as a ransom for many.
.
शुभवर्तमान लूक ९:५१-५६
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशूचा रोख येरुशलेमकडे जाण्याचा होता. "
येशूला वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा त्याने येरुशलेमला जाण्याच्या दृढनिश्चयाने तिकडे आपले तोंड वळवले. त्याने आपल्यापुढे निरोप्ये पाठवले, तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यासाठी शोमरोन्यांच्या एका गावात गेले, पण त्यांनी स्वीकार केला नाही, कारण त्याचा रोख येरुशलेमकडे जाण्याचा होता. हे पाहून त्याचे शिष्य याकोब आणि योहान म्हणाले, “प्रभो, आकाशातून अग्नी पडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी आपली इच्छा आहे काय ?” त्याने वळून त्यांना धमकावले. मग ते दुसऱ्या गावात गेले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Luke 9:51-56
When the days drew near for Jesus to be taken up, he set his face to go to Jerusalem. And he sent messengers ahead of him, who went and entered a village of the Samaritans, to make preparations for him. But other people did not receive him, because his face was set towards Jerusalem. And when his disciples James and John saw it, they said, "Lord, do you want us to tell fire to come down from heaven and consume them?" But he turned and rebuked them. And they went on to another village.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
"बायबलविषयीचे अज्ञान हे ख्रिस्ताविषयीचे अज्ञान आहे" असे उद्गार काढणाऱ्या संत जेरोम ह्यांची स्मृती ख्रिस्तसभा आज साजरी करीत आहे. संत जेरोम ह्याने पोपमहोदयांच्या आज्ञेवरूनबेथलेहेम येथे राहून हिब्रू व ग्रीक भाषांतून बायबलचे लॅटिन भाषेत भाषांतर केले. ते एवढे लोकप्रिय झाले की त्याला व्हल्गेट (लोकप्रिय) असे नाव पडले. परमेश्वराचे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन पोहोचावे अशी तळमळ त्या भाषांतरामागे होती. आजच्या पहिल्या वाचनात जखऱ्या संदेष्टा भाकीत करतो की सर्व राष्ट्र आणि सर्व भाषा बोलणारे परमेश्वराच्या मंदिरात एकत्र येतील आणि त्याची प्रार्थना करतील. दुर्दैवाने खुद्द येशूला देखील त्याच्याच बांधवांनी स्वीकारले नाही. शोमरोनच्या एका गावात त्याचे कोणीही स्वागत केले नाही. मात्र अशा लोकांप्रती येशूच्या मनात राग नव्हता. उलट त्यांना शिक्षा करण्याचा विचार बोलून दाखविणाऱ्या शिष्याना येशूने धमकाविले.
आपला स्वीकार न करणाऱ्या लोकांशी आपण कसे वागतो ?
प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझी वचने आत्मसात करण्यास व तुझी परस्पर प्रीतिची आज्ञा पाळण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या