Marathi Bible Reading | 29th Sunday in Ordinary Time | 19th October 2025

सामान्यकाळातील २९ वा रविवार  

दि. १९ ऑक्टोबर २०२५

 देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय?
And will not God revenge his elect who cry to him day and night: ...... ?  that he will quickly revenge them.

 ही विधवा मला नेहमी त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, 

  लढाई करणाऱ्या अमालेक व त्यांच्या लोकांचा पाडाव कसा झाला ह्याचा वृतांत आजच्या पहिल्या वाचनात दिला आहे. केवळ वीर पुरुषांनी लढाई केली नाही तर मोशेने रात्रंदिवस परमेश्वराचा धावा केला... विशेषतः मोशेने हात उंचावून प्रार्थना केली. 
प्रार्थने शिवाय कोणतेच कार्य सिद्धीस जात नसते. प्रभूवरील विश्वासाबरोबरच प्रभूची वचने, त्याची शिकवण आणि नीतिमुल्यांचे परायण व चिंतन-मनन आणि प्रार्थना करणे महत्वाचे आहे, असे संत पौल मार्गदर्शन करीत आहे.

आजच्या शुभवर्तमानात प्रार्थनेचे महत्व पटवून देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने  अत्याग्रही विधवेचा दाखला दिला आहे. 
आपण आपली प्रार्थना, आपली मागणी व विनंती कशा प्रकारची असते ह्यावर आज चिंतन करु या.  आपला  विश्वास बळकट करण्यासाठी आपण प्रभू वचन ग्रहण करून त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी प्रभू कडे प्रेरणा मागू या. तसेच निष्ठेने व प्रामाणिकपणे प्रभूला शरण जाऊ या. 
✝️   
पहिले वाचन ::निर्गम  १७:८-१३
वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्राएलाची सरशी होई."
अमालेक येऊन रफीदीम येथे इस्राएल लोकांशी लढू लागला. तेव्हा मोशेने यहोशवाला सांगितले, आपल्यातले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर. उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन. मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले आणि तो अमालेकाशी लढू लागला. मोशे, अहरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले. मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्राएलची सरशी होई आणि तो आपले हात खाली करी, तेव्हा अमालेकाची सरशी होई. मोशेचे हात भरून आले तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन खाली ठेवला, त्यावर मोशे बसला आणि अहरोन आणि हूर ह्यांनी दोन्ही बाजूंने त्याचे हात वर उचलून धरले, त्यामुळे सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. मग यहोशवाने आपल्या तरवारीच्या धारेने अमालेकाचा आणि त्याच्या लोकांचा पाडाव केला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.



First Reading :
: Exodus 17: 8-13
And Amalec came, and fought against Israel in Raphidim. And Moses said to Josue: Choose out men: and go out and fight against Amalec: tomorrow I will stand on the top of the hill having the rod of God in my hand. Josue did as Moses had spoken, and he fought against Amalec; but Moses, and Aaron, and Hur went up upon the top of the hill. And when Moses lifted up his hands, Israel overcame: but if he let them down a little, Amalec overcame. And Moses’ hands were heavy: so they took a stone, and put under him, and he sat on it: and Aaron and Hur stayed up his hands on both sides. And it came to pass that his hands were not weary until sunset. And Josue put Amalec and his people to flight, by the edge of the sword.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र : : १२१:१-८
प्रतिसाद :  परमेश्वराचे नाव हाच आमचा आसरा आहे.

१) मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो,
मला सहाय्य कोठून येईल ?
आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता परमेश्वर
त्याच्या सामर्थ्यात आमचे सहाय्य आहे.

२) तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही
 तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही पाहा, 
इस्राएलच्या रक्षकाला झोप लागत नाही 
आणि डुलकीही घेत नाही.

३)परमेश्वर तुझा रक्षक आहे, 
परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. 
दिवसा सूर्याची आणि रात्री चंद्राची 
तुला बाधा होणार नाही.

४ )परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील, 
तुझ्या जिवाचे रक्षण करील, 
परमेश्वरा तुझे येणेजाणे येथून पुढे 
सर्वकाळ सुरक्षित करील.


Psalm   : Psalms 121: 1-2, 3-4, 5-6, 7-8
R. (2) Our help is from the Lord, who made heaven and earth.

1 I have lifted up my eyes to the mountains, from whence help shall come to me.
2 My help is from the Lord, who made heaven and earth.
R. Our help is from the Lord, who made heaven and earth.

3 May he not suffer thy foot to be moved: neither let him slumber that keepeth thee.
4 Behold he shall neither slumber nor sleep, that keepeth Israel.
R. Our help is from the Lord, who made heaven and earth.

5 The Lord is thy keeper, the Lord is thy protection upon thy right hand.
6 The sun shall not burn thee by day: nor the moon by night.
R. Our help is from the Lord, who made heaven and earth.

7 The Lord keepeth thee from all evil: may the Lord keep thy soul.
8 May the Lord keep thy going in and thy going out; from henceforth now and for ever.
R. Our help is from the Lord, who made heaven and earth.

दुसरे वाचन  २ तिमथी  ३:१४-४:२
वाचक: पौलचे तिमथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन 
"देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा."
तू ज्या गोष्टी शिकलास आणि ज्यांविषयी तुझी खात्री झाली आहे त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास हे आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे है तुला ठाऊक आहे, ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करावयाला समर्थ आहे. प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे, ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. देवासमक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा आणि मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष त्याच्या प्रगट होण्याला आणि त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की, वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने आणि शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर आणि बोध कर..
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second Reading: Second Timothy 3: 14 – 4: 2
But continue thou in those things which thou hast learned, and which have been committed to thee: knowing of whom thou hast learned them; And because from thy infancy thou hast known the holy scriptures, which can instruct thee to salvation, by the faith which is in Christ Jesus. All scripture, inspired of God, is profitable to teach, to reprove, to correct, to instruct in justice, That the man of God may be perfect, furnished to every good work.1 I charge thee, before God and Jesus Christ, who shall judge the living and the dead, by his coming, and his kingdom: Preach the word: be instant in season, out of season: reprove, entreat, rebuke in all patience and doctrine.
This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष                                  
आलेलुया, आलेलुया !   
प्रभु म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे, 
जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
आलेलुया!

Acclamation: 

R. Alleluia, alleluia.
 The word of God is living and effective, discerning reflections and thoughts of the heart.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  लूक १८:१-८
वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“देवाचे निवडलेले लोक त्याचा जे धावा करतात त्यांचा तो न्याय करील."
आपल्या शिष्यांनी सर्वदा प्रार्थना करावी आणि खचू नये, ह्याविषयी येशूने त्यांना एक दाखला सांगितला. तो असा: एका नगरात कोणीएक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे आणि माणसाला जुमानत नसे. त्याच नगरात एक विधवा होती, ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की, माझी दाद घ्या आणि माझ्या प्रतिवाद्याविरूद्ध न्याय करा. पण काही काळपर्यंत तो ते करीना, परंतु नंतर त्याने मनात ठरवले, जरी मी देवाला भीत नाही आणि माणसाला जुमानत नाही, तरी ही विधवा मला नेहमी त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्याच्याविषयी तो विलंब लावील काय? मी तुम्हांस सांगतो, तो त्याचा न्याय लवकर करील. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर असा विश्वास आढळेल काय ?

लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

Gospel Reading :
Luke 18: 1-8
And he spoke also a parable to them, that we ought always to pray, and not to faint, Saying: There was a judge in a certain city, who feared not God, nor regarded man. And there was a certain widow in that city, and she came to him, saying: Avenge me of my adversary. And he would not for a long time. But afterwards he said within himself: Although I fear not God, nor regard man, Yet because this widow is troublesome to me, I will avenge her, lest continually coming she weary me. And the Lord said: Hear what the unjust judge saith. And will not God revenge his elect who cry to him day and night: and will he have patience in their regard? I say to you, that he will quickly revenge them. But yet the Son of man, when he cometh, shall he find, think you, faith on earth?
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
ख्रिस्ती श्रद्धेत मध्यस्थीच्या प्रार्थनेला खूप महत्त्वाचे स्थान असते. आजची तिन्ही वाचने आपल्याला मध्यस्थीच्या प्रार्थनेविषयी मागदर्शन करताना आढळतात. 
१) परमेश्वर हाच सर्व मध्यस्थीच्या प्रार्थनांचे अंतिम टोक असते. आजच्या पहिल्या वाचनात इस्राएलचे अमालेकांशी युद्ध सुरू असताना मोशेने आपले हात उंचावून आपल्या लोकांसाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली. त्याच हात उंचावणे हे शरणागतीचेप्रतीक होते. अहरोन आणि हूर ह्यांनी त्याला दिलेला आधार हे परमेश्वराच्या सामर्थ्याला मानवाने दिलेला प्रतिसाद दर्शवितो. मात्र शेवटी देवच कर्ता करविता असतो हे माणसाने विसरायचे नसते. 
२) मध्यस्थीची प्रार्थना ही बायबलच्या शिकवणुकीवर आधारित असली पाहिजेः आजच्या दुसऱ्या वाचनात संत पॉल तीमथ्याला आठवण करून देतो की, परमेश्वर हा सर्व ज्ञानाचा उगम आहे. संपूर्ण बायबल हे ईश्वरप्रेरित आहे. त्यामुळे मध्यस्थीच्या प्रार्थना ह्या केवळ जगाच्या किंवा आपल्या अवतीभवती पसरलेल्या लोकांच्या गरजांवर आधारित नसाव्यात तर त्या बायबलच्या वचनावर आधारित असावयात अन्यथा माणूस आपल्याच प्रार्थनेने सर्व काही होत आहे असा स्वतःचा समज करून घेण्याची शक्यता असते. परमेश्वराची योजना ही माणसाच्या गरजांपेक्षा व्यापक असते. त्या योजनेच्या संदर्भात माणसाने काळाची चिन्हे ओळखायची असतात. 
३) मध्यस्थीच्या प्रार्थनेत जिद्द आणि चिकाटी असेल तर तिला ईश्वरी कृपादानाची फळे येतात राहतातः शुभवर्तमानातील विधवा अत्याग्रही आहे. न्यायाधीश तिला काही दाद देत नाही. ती मात्र त्याचा पिच्छा सोडत नाही. तिची नजर केवळ तिच्या गरजांकडे नव्हे तर न्यायाधीशाच्या अधिकाऱ्याकडे लागलेली आहे. शेवटी तो तिचा न्याय करतो. परमेश्वर केवळ न्यायी नाही तर तो दयाळू आहे. मुंगीच्या पावलांचा आवाज तो ऐकू शकतो तर भक्ताच्या आर्त किंकाळीचा कानोसा तो घेणार नाही का? माझ्या जीवनात मध्यस्थीच्या प्रार्थनेला कोणते स्थान आहे? थोड्याश्या विलंबाने मी माझी प्रार्थना सोडून देतो/देते का?
प्रार्थना : तुझी सुवार्ता सर्वांपर्यंत पोहोचावी, सर्वांना तुझ्या प्रेमाचा स्पर्श व्हावा म्हणून हे प्रभो, मला तुझ्या सुवार्तेचे साधन बनव आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या