Marathi Bible Reading | 28th week in ordinary Time | Saturday 18th October 2025

सामान्यकाळातील २८ वा सप्ताह 

शनिवार  दि. १८ ऑक्टोबर २०२५

“पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत, म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.

"The harvest is plentiful, but the labourers are few. Therefore pray earnestly to the Lord of the harvest to send out labourers into his harvest.

 

 प्रिय चिकित्सक' (किंवा प्रिय वैद्य लूक) 
संत लूक   
शुभवर्तमानकार (८५)
सूरिया प्रांताची राजधानी असलेल्या अंत्युखिया येथे लुकस नावाचा एक तरुण राहात होता. तो पेशाने वैद्य होता. आपल्या दुसऱ्या प्रेषितीय दौऱ्यावर असताना पौलने या वैद्याची औषधोपचरानिमित्ते भेट घेतली. संत पौलचे जीवन आणि देवावरील त्याची अढळ श्रद्धा ह्याचा लूकवर खूप प्रभाव पडला. त्याने तात्काळ ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आणि संत पौलचे शिष्यत्व पत्करले. परराष्ट्रीयांना देवाची सुवार्ता सांगण्यासाठी तो आता संत पौल ह्याच्याबरोबर हिंडू फिरू लागला. अथेन्स, थेस्सलनिका आणि करिथ येथे पौल देवाच्या राज्याची शिकवण लोकांना देत होता आणि इफिस ह्या ठिकाणी तो ३ वर्षे राहिला. या सर्व काळात लूक ह्याने फिलिप्पै येथे प्रेषितकार्याचा भार सांभाळला.
पुढे लूक संत पौलबरोबर येरुशलेम येथे परतला आणि कैसेरिया येथे पौल बंदिवान म्हणून जीवन जगत असताना त्याने वारंवार त्याची भेट घेतली. कदाचित ह्याच वेळेत त्याने प्रदीर्घ असे येशूचे संत लूककृत शुभवर्तमान लिहिले असावे. पुढे ह्या शुभवर्तमानाला बायबलपंडित संत जेरोम व संत जॉन क्रिझोस्टोम ह्यांनी संत पौलकृत शुभवर्तमान असे यथार्थपणे संबोधिलेले आढळते. संत लूक ह्यांना पौलकडूनच आपले लिखित साहित्य निर्माण करण्याची प्रेरणा झालेली मानले जाते. पौलची प्रवचने आणि सुवार्ता प्रसार ह्यांना लूक आपल्या गोष्टी- वेल्हाळ शैलीत शब्दबद्ध केले.
संत मत्तयकृत अरेमाईक भाषेतील शुभवर्तमान ह्या अगोदरच लोकांमध्ये पसरलेले होते. शिवाय संत लूकला संत मार्कच्या शुभवर्तमानाचा आधार होताच.ख्रिस्ती नैतिकता, दारिद्र्य आणि प्रसन्नता अशा ख्रिस्ती मूल्यांचा पुरस्कार या शुभवर्तमानात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर देवदूताचा मरियेला निरोप, मरिया अलीशिबा भेट, येशूचा जन्म आणि त्याचे बालपण ह्याचं सुंदर व जिवंत चित्रण लूकने आपल्या शुभवर्तमानात केले आहे. ह्या सर्व गोष्टी संत लूक मोठ्या कष्टाने त्या काळात उपलब्ध असलेल्या साक्षीदारांकडून गोळा केल्या. त्यापैकी एक साक्षीदार पवित्र मरिया असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संत लूकचे शुभवर्तमान पवित्र मरियेवर भर देते. त्याला पवित्र मरियेचे शुभवर्तमान असेही संबोधले जाते.

पुढे पौल रोम येथील तुरुंगात असताना संत लूक त्याच्याबरोबर होता. (कलस्सै ४: १४) त्याचवेळी त्याने ख्रिस्तसभेचा सांप्रत इतिहास लिहिला असावा. हा इतिहास प्रेषितांची कृत्ये या नावाने नव्या करारात समाविष्ट करण्यात आलेला आहे. संत पौलचा शिरच्छेद झाल्यानंतर संत लूक दल्मातिया (युगोस्लाव्हिया) येथे गेला आणि ग्रीसमध्ये त्याला रक्तसाक्षीत्वाचे मरण आले. संत लूक हा वैद्य, कलाकार, मटण विकणारे, काचेचा व्यवसाय करणारे आणि लिपीक ह्यांचा आश्रयदाता संत मानला जातो.

ख्रिस्तसभा आज सुवार्तिक संत लूक ह्याचा सण साजरा करीत आहे. संत लुकने त्याच्या सर्व कलागुणांचा वापर करून ख्रिस्ताची देवराज्याची सुवार्ता घोषविली. आपण तीच प्रेरणा आज संत लूककडून घेऊ या. आपणही आपल्यातील सर्व कलागुणांचा योग्य तो वापर करून देवराज्य पसरविण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून प्रार्थना करू या.

पहिले वाचन : २ तिमथी ४:१०-१७
वाचक : पौलचे तिमथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन 
"लूक मात्र माझ्याजवळ आहे."
देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेस्सलनीका येथे गेला. क्रेस्केस गलतीया येथे आणि तीत दालमतिया येथे गेला. लूक मात्र माझ्याजवळ आहे. मार्कला आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे. तुखिकाला मी इफिस येथे पाठवले आहे. माझा झगा त्रोवसात कार्पाजवळ राहिला आहे तो येताना घेऊन ये आणि पुस्तके, विशेषकरून चर्मपत्रेही आण. आलेक्सांद्र तांबटाने माझे पुष्कळ वाईट केले, त्याची फेड त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रभू करील. त्याच्याविषयी तूही जपून राहा कारण तो आमच्या बोलण्यास फार आडवा आला होता. माझ्या पहिल्या जबानीच्या वेळेस माझ्या बाजूचा कोणी नव्हता, सर्वांनी मला सोडले होते. ह्याबद्दल त्यांचा हिशेब घेण्यात न येवो. तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला, माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला सिंहाच्या जबड्यातून मुक्त केले.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :2 Timothy 4:10-17b
Beloved: Demas, in love with this present world, has deserted me and gone to Thessalonica. Crescens has gone to Galatia, Titus to Dalmatia. Luke alone is with me. Get Mark and bring him with you, for he is very useful to me for ministry. Tychicus have sent to Ephesus. When you come, bring the cloak that I left with Carpus at Troas, also the books, and above all the parchments. Alexander the coppersmith did me great harm; the Lord will repay him according to his deeds. Beware of him yourself, for he strongly opposed our message. At my first defence no one came to stand by me; but all deserted me. May it not be charged against them! But the Lord stood by me and strengthened me, so that through me the message might be fully proclaimed and all the Gentiles might hear it.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  १४५: १०-१३, १७-१८
प्रतिसाद :  हे प्रभो, तुझे भक्त तुझ्या राज्याचे  वैभवयुक्त ऐश्वर्य जाहीर करतात.
१) हे परमेश्वरा, तुझे सर्व प्राणीमात्र स्तुती गातात, 
तुझे भक्त तुला धन्यवाद देतात.
ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात 
आणि तुझा पराक्रम कथन करतात.

२) ते तुझे पराक्रम आणि तुझ्या राज्याचे 
वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस 
जाहीर करतात. तुझे राज्य युगानुयुगे राहणारे राज्य आहे, 
तुझा राज्याधिकार पिढ्यान्पिढ्या टिकणारा आहे.

३) परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे, 
तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. 
जे कोणी त्याचा धावा करतात,
जे मनापासून त्याचा धावा करतात, त्या सर्वांना तो समीप आहे.

Psalm 145:10-11, 12-13ab, 17-18
Your saints, O Lord, make known the glory of your reign.
All your works shall thank you, O Lord, a
nd all your faithful ones bless you. 
They shall speak of the glory of your reign, 
and declare your mighty deeds. R

To make known your might to the children of men, 
and the glorious splendour of your reign.
Your kingdom is an everlasting kingdom;
 your rule endures for all generations. R.

The Lord is just in all his ways, l
 and holy in all his deeds.
The Lord is close to all who call him, 
who call on him in truth. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
मी तुम्हांला निवडले आणि तुम्हांला नेमले आहे, ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे
 आलेलुया!

Acclamation: 
 R. Alleluia, alleluia.
I chose you from the world that you should go and bear fruit and that your fruit should abide, says the Lord.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान लूक   १०:१-९
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत."

प्रभूने आणखी बहात्तर जणांना नेमून ज्या ज्या नगरात आणि ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठवले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत, म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. जा, लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हांला मी पाठवत आहे, पाहा. पैशाची थैली, झोळी किंवा वहाणा बरोबर घेऊ नका, वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे, 'ह्या घरास शांती असो,' असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील, नसला तर तुम्हाकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरे बदलू नका. कोणत्याही नगरात तुम्ही गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हाला वाढतील ते खा. त्यात जे आजारी असतील त्यांना बरे कराआणि त्यांना सांगा की, 'देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.'
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 10:1-9

At that time: The Lord appointed seventy-two others, and sent them on ahead of him, two by two, into every town and place where he himself was about to go. And he said to them, "The harvest is plentiful, but the labourers are few. Therefore pray earnestly to the Lord of the harvest to send out labourers into his harvest. Go your way; behold, I am sending you out as lambs in the midst of wolves. Carry no money bag, no knapsack, no sandals; and greet no one on the road. Whatever house you enter, first say, 'Peace be to this house!' And if a son of peace is there, your peace will rest upon him. But if not, it will return to you. And remain in the same house; eating and drinking what they provide, for the labourer deserves his wages. Do not go from house to house. Whenever you enter a town and they receive you, eat what is set before you. Heal the sick in it and say to them, The kingdom of God has come near to you."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
ख्रिस्तसभा आज संत लूक ह्याचा सण साजरा करीत आहे. संत लूक हा वैद्य होता हे संत पौलच्या पत्रावरून समजते. तो इतिहासकार-देखील होता. संत लूकचे शुभवर्तमान आणि प्रेषितांची कृत्ये ही पुस्तके त्याने लिहिलेली आहेत. रोझरी प्रार्थनेतील आनंदाची पाच रहस्ये केवळ लूकच्या शुभवर्तमानामुळे आपल्याला माहीत झालेली आहेत. संत लूक हा संत पॉलचा सहकारी आणि शिष्य होता. पवित्र मरियेवर त्याचे विशेष प्रेम होते. म्हणून त्याच्या शुभवर्तमानात पवित्र मरियेवषयी आदराची भावना जोपासण्यात आलेली आहे. मरियेचे स्तोत्र आणि मरियेची सात दुःखे आपल्याला ह्याच शुभवर्तमानामुळे अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात. त्याचबरोबर स्त्रिया, पवित्र आत्मा, स्वर्गीय आनंद, गोरगरीब हे त्याच्या शुभवर्तमानाचे विषय बनलेले होते. येशूचे देवळात हरवणे, उधळ्या पुत्र, मार्था आणि मरिया, दहा कुष्ठरोगी, जक्कय जकातदार, येशूच्या उजव्या हाताकडील चोर, अम्माऊसची घटना असे अनेक उतारे केवळ त्याच्या शुभवर्तमानात वाचायला मिळतात. आजच्या शुभवर्तमानातील बहात्तर शिष्यानं कामगिरीवर पाठविणे हा अध्यायदेखील फक्त लूकने सादर केलेला आहे. प्रभू येशूच्या शिकवणुकीमुळे माझ्या स्वभावात, विचारसरणीत, कार्यपद्धतीत आणि जीवनशैलीत कोणकोणते बदल घडून आलेले आहेत / यायला हवेत?

प्रार्थना :हे प्रभू येशू, देवाचे राज्य या जगामध्ये यावे यासाठी माझा योग्य तो वापर कर आणि मला तुझी तारणदायी सुवार्ता पसरविण्याचे साधन बनव, आमेन.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या