Marathi Bible Reading | 28th week in ordinary Time | Friday 17th October 2025

सामान्यकाळातील २८ वा सप्ताह 

शुक्रवार  दि. १७ ऑक्टोबर २०२५

भिऊ नका, तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहात
Fear not; you are of more value than many sparrows.
 ✝️  
 

अंत्युखियाचे संत इग्नेशिअस 
- धर्मपाल, महागुरू, रक्तसाक्षी (४५-१०७)

आपल्या श्रद्धेसाठी आपल्याला रक्तसाक्षित्वाचे मरण येत आहे हे पाहून संत इग्नेशियसला अत्यानंद झाला. अशा मृत्यूला वेंग मारण्याची उत्सुकता व अधीरता आता अस्वस्थ करू लागली. रोमच्या वेशीवर पोहोचताच तो म्हणाला, "मी प्रभूचा गहूदाणा आहे आणि येशू ख्रिस्ताची शुद्ध आणि सामर्थ्यशाली भाकर होण्यासाठी हा गहूदाणा हिंस्र पशूंच्या दाताखाली भरडला जाणे आवश्यक आहे." हे शब्द त्याच्या सणाच्या मिस्सावेळी पवित्र ख्रिस्तशरीर संस्कारप्रार्थनेच्या वेळी उच्चारले जातात.
शेवटी तो क्षण आला. सर्कशीत असलेल्या रिंगणामध्ये दोन हिंस्र सिंह वयोवृद्ध होत असलेल्या महागुरूंच्या अंगावर सोडण्यात आले. महागुरू इग्नेशियस त्यावेळी येशूचे नाव घेण्यात गुंग होते. त्या दोन्ही सिंहाशी इग्नेशियसची झालेली झुंज आणि इग्नेशियसचे रक्तसाक्षी मरण ज्या त्याच्या दोन शिष्यांनी पाहिले ते धन्य ! त्यांनी आपल्या पुस्तकात हे वर्णन शब्दबद्ध केलेले आहे. ह्याच दोन शिष्यांनी रक्तसाक्षी हुतात्म्याच्या उर्वरीत शरीराचे पवित्र अवशेष अंत्युखिया येथे आणले.
 घशांच्या विकारासाठी संत इग्नेशियसचा धावा केला जातो.

चिंतन: हिंस्र पशू हाच परमेश्वराकडे जाण्याचा माझा मार्ग असेल तर मला त्यांचे भक्ष्य बनणे खूप आवडेल. मी देवाचा गहूदाणा आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र भाकरीसाठी हिंस्र पशूंच्या दातांखाली भरडले जाण्यास आनंदाने तयार आहे.-संत इग्नेशिअस

पहिले वाचन :  रोमकरांस  ४:१-८
वाचक : पौलचे रोमकरांस यातून घेतलेले वाचन 
“आब्राहामने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले."
तर मग आपला पूर्वज आब्राहाम ह्याला देहदृष्ट्या काय मिळाले, कारण आब्राहाम कर्मांनी नीतिमत्त्व ठरला असला, तरत्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे, पण देवासमोर नाही. कारण शास्त्र काय सांगते ? आब्राहामने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले. आता काम करणाराला मजुरी मिळते ती त्यांची कमाई म्हणून, मेहरबानी म्हणून नव्हे! पण जो काम करत नाही, तर अधार्मिकाला नीतिमान ठरविणाऱ्यावर विश्वास ठेवतो त्याचा विश्वास नीतिमत्त्व असा गणण्यात येतो. ह्याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्मावाचून नीतिमत्त्व गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदही करतो, ते असेः
"ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे आणि ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे ते धन्य!
ज्या माणसाच्या हिशेबी प्रभू पाप लावत नाही तो धन्य!"
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Romans 4:1-8
Brethren: What then shall we say was gained by Abraham, our forefather according to the flesh? For if Abraham was justified by works, he has something to boast about, but not before God. For what does the Scripture say? "Abraham believed God, and it was counted to him as righteousness." Now to the one who works, his wages are not counted as a gift but as his due. And to the one who does not work but believes in him who justifies the ungodly, his faith is counted as righteousness, just as David also speaks of the blessing of the one to whom God counts righteousness apart from works: "Blessed are those whose lawless deeds are forgiven, and whose sins are covered; blessed is the man against whom the Lord will not count his sin."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ३२: १-२,५,११
प्रतिसाद :  हे परमेश्वरा, तू माझे आश्रयस्थान आहेस

१) ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे,
ज्यांच्या पापावर पांघरूण घातले आहे तो धन्य! 
ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनीतीचा दोष लावत नाही 
आणि ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य!

२) मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, 
मी आपली अनीती लपवून ठेवली नाही. 
“मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन" असे मी म्हणालो.
तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केलीस.

३ )अहो नीतिमानांनो परमेश्वराच्या ठायी 
आनंदोत्सव करा. अहो सरळ मनाचे जनहो,
 तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा.

PsalmPsalm 32:1-2, 5, 11
You are a hiding place for me. You surround me with cries of deliverance. 

Blessed is he whose transgression is forgiven,
whose sin is remitted.
Blessed the man to whom the Lord imputes no guilt,
in whose spirit is no guile. R

To you I have acknowledged my sin; 
my guilt I did not hide.
I said, "I will confess my transgression to the Lord." 
And you have forgiven the guilt of my sin.

Rejoice in the Lord; exult, you just!
Ring out your joy, all you upright of heart! R


जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.
 आलेलुया!

Acclamation: 
 R. Alleluia, alleluia.
May your merciful love be upon us as we hope in you, O Lord.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान लूक   १२:१-७
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुमच्या डोक्याचे केस मोजलेले आहेत."
हजारो लोकांनी इतकी गर्दी केली की ते एकमेकांना तुडवू लागले. तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, तुम्ही आपणांला परुश्यांच्या खमिराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी संभाळा. जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही आणि जे कळणार नाही असे काहीही गुप्त नाही. जे काही तुम्ही अंधारात बोलता ते उजेडात ऐकण्यात येईल आणि जे तुम्ही खाजगी खोलीत कानात सांगता ते धाब्यावर गाजवले जाईल.
माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराचा वध करतात पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही त्यांची भीती बाळगू नका. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हांला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकावयाचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा. हो, मी तुम्हांला सांगतो, त्याचीच भीती बाळगा. पाच चिमण्या दोन दमड्यांना विकतात की नाही ? तरी त्यांपैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. फार तर काय, • तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिऊ नका, तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहात. 
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 12:1-7
At that time: When so many thousands of the people had gathered together that they were trampling one another, Jesus began to say to his disciples first, "Beware of the leaven of the Pharisees, which is hypocrisy. Nothing is covered up that will not be revealed, or hidden that will not be known. Therefore whatever you have said in the dark shall be heard in the light, and what you have whispered in private rooms shall be proclaimed on the housetops. "I tell you, my friends, do not fear those who kill the body, and after that have nothing more that they can do. But will warn you whom to fear, fear him who, after he has killed, has authority to cast into hell. Yes, I tell you, fear him! Are not five sparrows sold for two pennies? And not one of them is forgotten before God. Why, even the hairs of your head are all numbered. Fear not; you are of more value than many sparrows.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
ज्यांना मनापासून नैतिकता पाळायची नसते ते बाह्य देखाव्यावर जास्त भर देतात. रोमचे यहुदी लोक सुंतेवर अतिरिक्त किंवा अवाजवी भर देत होते. संत पॉल त्यांना समजून सांगतो की, अब्राहामाने विश्वास ठेवला तेव्हा सुंता ही कराराची खूण ठरलेली नव्हती. त्यामुळे त्याचा विश्वास हेच त्याचे नीतिमत्व असे गणण्यात आले होते. परराष्ट्रीयांची सुंता झालेली नाही. त्यांच्या विश्वासानेच त्याचे तारण होईल. जशी देवाने आपल्याला आपल्या पापांची क्षमा केलेली आहे तशी देव परराष्ट्रीयांनाही त्यांच्या पापांची क्षमा करीत असतो. त्यामुळे आपण यहुदी व परराष्ट्रीय असा भेदभाव करू नये असे पॉल शिकवितो. परूशीदेखील इतरांना त्यांच्या धार्मिकतेवरून मंकी लेखत होते. येशू आपल्या शिष्यांना त्यांच्या खमिरविषयी (दुष्प्रवृत्तीविषयी) सावध करतो. परमेश्वर एक दिवस त्यांचा पर्दाफाश करील अशी हमी देतो. अशा लोकांकाडून तुम्हाला त्रास होणार आहे परंतु त्यांना भिऊ नका कारण ते फक्त शरीराचा नाश करू शकतात आत्म्याचे काही नुकसान करू शकत नाहीत.अंत्युखियाचे संत इग्नेशियस ह्यांनी म्हटलेल्या वाक्यावर चिंतन करू याः शुद्ध भाकर होण्यासाठी पशुंच्या दातांखाली भरडला जाणारा मी ख्रिस्ताचा गहूदाणा आहे.
प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, तुझे अस्तित्व अनुभवण्यास व धैयन तुझी साक्ष  जगाला देण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन..




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या