सामान्यकाळातील २८ वा सप्ताह
गुरुवार दि. १६ ऑक्टोबर २०२५
पण तुम्ही स्वतः आत गेला नाही आणि जे आत जात होते त्यांना तुम्ही प्रतिबंध केला.You did not enter yourselves, and you hindered those who were entering."
✝️

संत मार्गारेट मेरी अलाकोक
कुमारिका (१६४७-१६९०)
✝️
सतराव्या शतकामध्ये प्रोटेस्टंट पंथ इंग्लंडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेला होता की, त्यामुळे ख्रिस्ती श्रद्धा धोक्यात आलेली होती. दुसरीकडे फ्रान्ससारख्या देशात राजा लुई चौदावा हा भौतिकवादी राजा राज्य करीत असल्याने श्रद्धेची ज्योत क्षीण होत होती. ही ज्योत प्रज्वलित करण्यासाठी देवाने फ्रान्समधील एका व्रतस्थ धर्मभगिनीची निवड केली. तिचं नाव होतं मार्गारेट मेरी अलाकोक.ख्रिस्ताने प्रत्यक्ष आज्ञापिल्याप्रमाणे आपले घरदार सोडून १६७१ साली तिने पर ले मोनिअल येथील विझिटेशन कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला. तो दिवस होता संत योहानच्या सणाचा! अगदी सुरुवातीलाच तिला येशूचा साक्षात्कार झाला आणि तिला येशूचा जीवलग शिष्य योहानप्रमाणे येशूच्या उराशी (अतिपवित्र हृदयाजवळ) टेकण्याची संमती खुद्द येशूने दिली.
ख्रिस्त तिला म्हणाला, मानवावरील प्रेमापोटी माझ्या हृदयात प्रेमाचा अग्नि इतका धगधगतो आहे की, त्यामध्ये आता आणखी प्रीतीच्या ज्वाला समाविष्ट करणे केवळ अशक्य आहे. हे प्रेम आता तू इतरांपर्यंत पोहोचविले पाहिजे. मी तुला प्रकट करीन त्या महान व अतिमौल्यवान गोष्टी तू लोकांना सांग आणि त्यांच्यात देवधर्माविषयी प्रेम उत्पन्न कर. ह्या अतिमौल्यवान गोष्टींमध्ये सैतानाच्या सामर्थ्यापासून लोकांचा बचाव करण्याचे आणि तारण प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य दडलेले आहे.
मी लोकांवर इतकं प्रेम केले परंतु त्या बदल्यात मला काय मिळाले? तिरस्कार, अपमान, अनादर, कटुता आणि कृतघ्नता. म्हणूनच मी तुला आज्ञा करतो की, कॉर्पुस ख्रिस्ती (ख्रिस्ताच्या शरीर व रक्ता) च्या सणानंतरच्या आठवड्यातील शुक्रवार माझ्या अतिपवित्र हृदयाच्या सन्मानार्थ राखून ठेवला जावा. ह्या दिवशी लोकांनी भाल्यांनी विंधिलेल्या माझ्या घायाळ व रक्तबंबाळ हृदयाकडे पाहून पश्चात्ताप करावा, प्रायश्चित्त करावे आणि परिवर्तनासाठी दृढ निश्चय करावा, व आपल्या छोट्या मोठ्या पापांची भरपाई करावी अशा प्रकारे माझ्या अतिपवित्र हृदयाचा सन्मान करणाऱ्यांना मी विशेष कृपादाने देईन, शिवाय तशी भक्ती करण्यास इतरांना प्रोत्साहन देणाऱ्यांना दैवी प्रेमाची अलौकिक देणगी मी देईन.
प्रभू येशू ख्रिस्ताने तिला असे ठामपणे सांगितले की, महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी श्रद्धावंतांनी ख्रिस्तशरीर संस्कार स्वीकारावा तसेच त्या दिवशी संध्याकाळी अतिपवित्र साक्रामेंत आराधनेसाठी वेदीवर खुले ठेवावे.
शेवटी येशू तिला म्हणाला, “अतिपवित्र हृदयाच्या प्रिय शिष्ये, तू हे सर्व करशील तेव्हा तुला बराच अपमान आणि टीकानिंदा सहन करावी लागेल आणि माझ्या नावासाठी तुला रक्तदेखील सांडावे लागेल" आणि खरेच तिच्या कॉन्व्हेंटमधील इतर भगिनींना वाटले हिला दुष्टात्म्याने पछाडलेले आहे की काय म्हणून त्या तिच्यावर पवित्र पाणी शिंपडत असत.
हळूहळू संत मागरिट मेरी हिचे आध्यात्मिक गुरू धन्यवादित क्लॉड डे ल कोलुम्बीएरे ह्या येशूसंघीय धर्मगुरूंनी तिच्या साक्षात्कारांना अधिकृत मान्यता मिळविण्याचा प्रयत्न केला व अशा प्रकारे येशूच्या अतिपवित्र हृदयाची भक्ती व आराधना पसरली व ख्रिस्तसभेच्या महान परंपरेचा ती एक भाग बनली.
संत मागरिट मेरी हिचा मृत्यू १७ ऑक्टोबर १६९० साली झाला आणि पोप बेनेडिक्ट पंधरावे ह्यांनी तिला १९२० साली संतपदाचा बहुमान दिला.
आपल्या सर्वांना श्रद्धेत टिकून राहण्यासाठी व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पवित्र आत्म्याची प्रेरणा व सामर्थ्य लाभावे, व पवित्र आत्म्यानुसार आपले जीवन आपण जगावे म्हणून प्रभूची व पवित्र आत्म्याची आराधना करु या.
पहिले वाचन : रोमकरांस ३:२१-३०
वाचक : पौलचे रोमकरांस यातून घेतलेले वाचन
"मनुष्य नियमशास्त्रातील कर्माने नव्हे तर विश्वासाने नीतिमान ठरतो."
नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमान ते प्रकट झाले आहे, त्याला नियमशास्त्राची आणि संदेष्ट्यांची साक्ष आहे. हे देवाचे नीतिमत्त्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे, त्यात भेदभाव नाही. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते देणगीदाखल नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, ह्यासाठी की, पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्त्व व्यक्त करावे, म्हणजे आपले नीतिमत्त्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे की, आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरविणारे असावे.
तर मग फुशारकी मारणे कोठे? ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्माच्या काय? नाही, तर विश्वासाच्या नियमाने. कारण नियमशास्त्रातील कर्माने नव्हे तर मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो असे आपण मानतो. देव केवळ यहूद्यांचा आहे का? तो परराष्ट्रीयांचा नव्हे का? हो, तो परराष्ट्रीयांचा देखील आहे, कारण देव एकच आहे.
प्रभूचा शब्द.
First Reading :Romans 3:21-30
Brethren: The righteousness of God has been manifested apart from the OUT law, although the Law and the Prophets bear witness to it-the righteousness of God through faith in Jesus Christ for all who believe. For there is no distinction: for all have sinned and fall short of the glory of God, and are justified by his grace as a gift, through the redemption that is in Christ Jesus, whom God put forward as a propitiation by his blood, to be received by faith. This was to show God's righteousness, because in his divine forbearance he had passed over former sins. It was to show his righteousness at the present time, so that he might be just and the justifier of the one who has faith in Jesus. Then what becomes of our boasting? It is excluded. By what kind of law? By a law of works? No, but by the law of faith. For we hold that one is justified by faith apart from works of the law. Or is God the God of Jews only? Is he not the God of Gentiles also? Yes, of Gentiles also, since God is one-who will justify the circumcised by faith and the uncircumcised through faith.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १३०: १-२,४-६
प्रतिसाद : परमेश्वराच्या ठायी दया आहे.
१) हे परमेश्वरा, मी शोकसागरातून तुझा धावा करत आहे.
हे प्रभो, माझी वाणी ऐक,
माझ्या विनवणीच्या शब्दांकडे तुझे कान लागोत.
२) हे परमेश्वरा, तू अधर्म लक्षात आणशील,
तर हे प्रभो, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?
तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठायी क्षमा आहे.
३) मी परमेश्वराची अपेक्षा करतो,
मी त्यांच्या वचनाची आशा धरतो.
पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यांपेक्षा
मी प्रभूची अधिक वाट पाहतो.
Psalm 130:1-2, 3-4, 5-6ab
For with the Lord there is mercy, in him is plentiful redemption.
Out of the depths cry to you, O Lord;
Lord, hear my voice!
O let your ears be attentive
to the sound of my pleadings. R
If you, O Lord, should mark iniquities,
Lord, who could stand?
But with you is found forgiveness,
that you may be revered. R.
I long for you, O Lord,
my soul longs for his word.
My soul hopes in the Lord
more than watchmen for daybreak. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे येरुशलेम, प्रभूचे गुणगान गा! तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
I am the way, and the truth, and the life, says the Lord; no one comes to the Father except through me.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान लूक ११:४७-५४
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"हाबेलच्या रक्तापासून तर जखऱ्याच्या रक्तापर्यंतच्या प्रत्येक संदेष्ट्यांच्या रक्ताबद्दल ह्या पिढीला हिशेब द्यावा लागेल."
येशू शास्त्र्यांना म्हणाला, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी जिवे मारले! तुम्ही साक्षीदार आहा आणि आपल्या पूर्वजांच्या कृत्यांना अनुमती देता, कारण त्यांनी तर त्यांना जिवे मारले आणि तुम्ही त्यांची थडगी बांधता. ह्या कारणास्तव देवाच्या ज्ञानानेही म्हटले, मी त्यांच्याकडे संदेष्टे आणि प्रेषित पाठवीन आणि त्यांच्यातील काहीना ते जिवे मारतील आणि काहींना छळतील, ह्यासाठी की, जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेष्ट्यांचे रक्त म्हणजे हाबेलच्या रक्तापासून वेदी आणि पवित्रस्थान ह्यांच्यामध्ये ज्या जखऱ्याचा घात झाला त्याच्या रक्तापर्यंत जे रक्त पाडले गेले त्याचा हिशेब ह्या पिढीकडून घेतला जावा. होय, मी तुम्हांला सांगतो, त्याचा हिशेब ह्या पिढीपासून घेतला जाईलच. तुम्हां शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला, पण तुम्ही स्वतः आत गेला नाही आणि जे आत जात होते त्यांना तुम्ही प्रतिबंध केला.
तो तेथून बाहेर आल्यावर शास्त्री आणि परुशी त्याच्या अंगावर त्वेषाने येऊन त्याने पुष्कळशा गोष्टींविषयी बोलावे म्हणून त्यावर प्रश्नांचा भडीमार करू लागले आणि त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला बोलण्यात धरावे म्हणून ते टपून राहिले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Luke 11:47-54
At that time: Jesus said, "Woe to you! For you build the tombs of the prophets whom your fathers killed. So you are witnesses and you consent to the deeds of your fathers, for they killed them, and you build their tombs. Therefore also the Wisdom of God said, 1 will send them prophets and apostles, some of whom they will kill and persecute', so that the blood of all the prophets, shed from the foundation of the world, may be charged against this generation, from the blood of Abel to the blood of Zechariah, who perished between the altar and the sanctuary. Yes, I tell you, it will be required of this generation. Woe to you lawyers! For you have taken away the key of knowledge. You did not enter yourselves, and you hindered those who were entering." As he went away from there, the scribes and the Pharisees began to press him hard and to provoke him to speak about many things, lying in wait for him, to catch him in something he might say.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
सर्वानी पाप केलेले आहे आणि ते देवाच्या गौरवास उणे पडलेले आहेत म्हणून यहुदी किंवा परराष्ट्रीय ह्यांपैकी कोणीही फुशारकी मारू नये तर देवावरील विश्वासाने नीतिमान म्हणून जीवन जगत राहावे. ही नैतिक सुसंगती पौलाला खूप महत्त्वाची वाटत होती. केवळ सुंता झाल्यानेच आपले तारण आपोआप झालेले आहे अशी घमेंडखोर भावना नैतिकतेविरुद्ध आहे असे त्याचे स्पष्ट मत होते. तीच गोष्ट येशू शुभवर्तमानात शास्त्री आणि परूशी ह्यांना लागू करतो. खरे पाहता हे लोक नैतिकतेचे सुंदर आदर्श असायला हवे होते. परंतु त्यांच्या जीवनात नैतिक सुसंगती नव्हती तर विसंगती होती. एकीकडे ते लोकांना नैतिकतेचे धडे देत होते, त्यांचे काही चुकल्यास त्यांना कठोर शिक्षा करीत होते आणि दुसरीकडे ते स्वतःच अनैतिक (अन्याय, खून, स्वार्थ, अहंकार ह्यांनी माखलेले) असे जीवन जगत होते. येशूचे बोलणेत्यांच्या जिव्हारी लागले. त्यामुळे स्वतः आत्मपरीक्षण करून आपल्यात बदल घऊन आणण्याऐवजी त्यांनी येशूला शब्दांत पकडण्याचा घाट घातला.
नैतिक सुसंगतीचा सखोल अर्थ मला समजला आहे का? परमेश्वर नीतिमान आहे म्हणून मी नैतिक जीवन जगावे हे मला समजलेले आहे का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, विश्वासात वाढत जाऊन खरे नीतिमान, भक्तीमान व आध्यात्माने भरलेले परोपकारी ख्रिस्ती जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या