Marathi Bible Reading | 26th week in ordinary Time | Wednesday 1st October 2025

सामान्यकाळातील २६ वा सप्ताह 

बुधवार  दिनांक १ ऑक्टोबर  २०२५

“जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्याला उपयोगी नाही."
 "No one who puts his hand to the plough and looks back is fit for the kingdom of God."


बाळ येशूची संत तेरेझा

- कुमारिका (१८७३-१८९७)

खरे मोठेपण मोठमोठ्या गोष्टी करण्यात नसून छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या मनाने करण्यात आहे हे तिने आपल्या जीवनाद्वारे दाखवून दिले व साध्याभोळ्या लोकांसमोर एक आगळावेगळा आदर्श उभा केला. "एका आत्म्याची कहाणी" या आत्मचरित्रात्मक लिखाणात तिने ही सत्ये नमूद केलेली आहेत. कोणत्याही गोष्टीविषयी चिंता करू नये, कुरकूर करू नये, आपण सहन करीत असलेले दुःख मुकाट्याने सोसावे, जे आपल्याशी तुसडेपणाने वागतात त्यांना विशेष प्रेम दाखवावे, हसत खेळत सर्वांशी मिळून मिसळून वागावे हे तिच्या जीवनातील काही महत्त्वाचे मूलमंत्र होते.

ख्रिस्तसभा आज विनम्र, बालसदृश्य मनोवृत्ती व प्रीतिने ओतप्रोतभरलेली बाळ येशूची संत तेरेजा हिचा सन्मान करीत आहे. देवावरील निखळ  प्रेम व बाळ येशूविषयी महान भक्ती ह्यामुळे संत तेरेजाचे जीवन प्रार्थनामय  बनले. मिशन विभागात कार्यकरणाऱ्या सर्व धर्मगुरुंना आणि मिशनऱ्यांना  त्यांचे सेवाकार्य करण्यास प्रेरणा व बळ मिळावे म्हणून संत तेरेजाने आपले संपूर्ण जीवन प्रार्थना व त्याग करण्यात घालविले. संत तेरेजाचा आदर्श समोर  ठेवून, नम्र, प्रेमळ आणि प्रार्थनामय जीवन जगण्यासाठी आपण मध्यस्थी करु  या.

पहिले वाचन :नहेम्या २:१-८
वाचक :नहेम्या या पुस्तकातून घेतलेले वाचन
"महाराजांची मर्जी असली तर माझ्या पूर्वजांच्या कबरा असलेल्या नगराला मला पाठवा म्हणजे मी ते बांधीन."

अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षी निसान महिन्यात राजापुढे द्राक्षरस ठेवलेला होता तो मी उचलून राजाला दिला. यापूर्वी मी कधीही त्याच्यासमोर खिन्न दिसलो नव्हतो. राजा मला म्हणाला, “तू आजारी नसून तुझे तोंड का उतरले आहे ? तुझ्या मनाला काहीतरी खेद होत असला पाहिजे." तेव्हा मी फार भ्यालो. मी राजाला म्हणालो, “महाराज चिरायू होवोत !” माझ्या वाडवडिलांच्या कबरी जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहे, त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत, तर माझे तोंड का उतरावयाचे नाही ? राजाने मला विचारले, तुझी विनंती काय आहे? तेव्हा मी स्वर्गीच्या देवाची प्रार्थना करून राजाला म्हटले, “महाराजांची मर्जी असली आणि आपण आपल्या दासावर प्रसन्न असला तर यहुदा देशी, माझ्या पूर्वजांच्या कबरी असलेल्या नगरालामला पाठवा, म्हणजे मी ते बांधीन.” (राजाजवळ राणी बसली असता) राजा मला म्हणाला, “तुझ्या प्रवासाला किती दिवस लागतील आणि तू केव्हा परत येशील ?” नंतर तू मला पाठवण्याचे राजाच्या मर्जीस आले आणि मी मुदत ठरवून त्याला कळवली. मग मी राजाला म्हणालो, “महाराजाच्या मर्जीस आल्यास मी यहुदा देशी पोहोचेपर्यंत महानदीच्या पश्चिमेकडील प्रदेशातून जाऊ देण्याविषयी तेथला अधिपती आसाफ यास असे पत्र द्यावे, मंदिराच्या गढीच्या दरवाजासाठी, शहराच्या कोटासाठी आणि मी जाऊन राहीन त्या घरासाठी तुळ्या काढण्यासाठी त्याने मला लाकडे दयावी.” माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर होता म्हणून राजाने माझी मागणी मान्य केली.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Nehemiah 2:1-8:

 In the month of Nisan, in the twentieth year of King Artaxerxes, when wine was before him, I, Nehemiah, took up the wine and gave it to the king. Now I had not been sad in his presence. And the king said to me, "Why is your face sad, seeing you are not sick? This is nothing but sadness of the heart." Then I was very much afraid. I said to the king, "Let the king live for ever! Why should not my face be sad, when the city, the place of my fathers' graves, lies in ruins, and its gates have been destroyed by fire?" Then the king said to me, "What are you requesting?" So prayed to the God of heaven. And said to the king, "If it pleases the king, and if your servant has found favour in your sight, that you send me to Judah, to the city of my fathers' graves, that I may rebuild it." And the king said to me (the queen sitting beside him), "How long will you be gone, and when will you return?" So it pleased the king to send me when I had given him a time. And I said to the king, "If it pleases the king, let letters be given to me for the governors of the province Beyond the River, that they may let me pass through until I come to Judah, and a letter to Asaph, the keeper of the king's forest, that he may give me timber to make beams for the gates of the fortress of the temple, and for the wall of the city, and for the house that shall occupy." And the king granted me what I asked, for the good hand of my God was upon me.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र १३:१- २,३,४-५,६
प्रतिसाद :  जर मी तुझी आठवण ठेवली नाही, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.

१ बाबेलच्या नद्यांजवळ आम्ही बसलो, 
तेथे आम्हांला सियोनची आठवण झाली,
तेव्हा आम्ही रडलो. तेथील वाळुजांच्या फांद्यांवर 
आम्ही आपल्या वीणा टांगून ठेवल्या.

२ कारण तेथे आमचा पाडाव करणाऱ्यांनी 
आम्हांला गाणी गावयाला सांगितले, 
आमचा छळ करणाऱ्यांनी आम्हांला 
त्याची करमणूक करावयाला सांगितले, 
ते म्हणाले, आम्हांला सियोनचे एखादे
गाणे गाऊन दाखवा.

३. आम्ही परक्या स्थळी परमेश्वराचे गाणे कसे गावे ?
 हे येरुशलेम, जर मी तुला विसरलो तर 
माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो.

४ जर मी तुझी आठवण ठेवली नही, 
जर मी येरुशलेमला माझ्या आनंदाच्या मुख्य 
विषयाहून अधिक मानले नाही, 
तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.



Psalm 137:1-2, 3, 4-5, 6 
O let my tongue cleave to my palate if I remember you not.

By the rivers of Babylon 
there we sat and wept, 
remembering Sion; 
on the poplars that grew there
we hung up our harps. R 


For it was there that they asked us, 
our captors, for songs, 
our oppressors, for joy.
 "Sing to us," they said, 
"one of Sion's songs." R.

O how could we sing 
The song of the Lord 
on foreign soil?
If I forget you, Jerusalem,
 let my right hand wither! R

O let my tongue
cleave to my palate
if I remember you not
if I prize not Jerusalem
as the first of my joys! R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
माझ्या देवा, तुझ्या वाटा मला प्रकट कर, 
तू आपल्या सत्पथाने मला चालव.
 आलेलुया!

Acclamation: 
 Alleluia:
R. Alleluia, alleluia.
I count everything as loss, because of the surpassing worth of knowing Christ Jesus my Lord and be found in him.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   लूक ९:५७-६२ 
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "प्रभो, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन."

येशू आणि त्याचे शिष्य वाटेने चालत असता कोणाएकाने त्याला म्हटले, "आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन.” येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना बिळे आणि आकाशातल्या पाखरांना घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही.” त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, “माझ्यामागे ये.” परंतु तो म्हणाला, "प्रभो, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरायला जाऊ दया.” तो त्याला म्हणाला, “मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांना पुरू दे, तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर." मग आणखी एकाने म्हटले, “प्रभो, मी आपल्यामागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ दया.” येशूने त्याला म्हटले, “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्याला उपयोगी नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 9:57-62: 

At that time: As Jesus and his disciples were going along the road, someone said to him, "I will follow you wherever you go." And Jesus said to him, "Foxes have holes, and birds of the air have nests, but the Son of Man has nowhere to lay his head." To another he said, "Follow me." But he said, "Lord, let me first go and bury my father." And Jesus said to him, "Leave the dead to bury their own dead. But as for you, go and proclaim the kingdom of God." Yet another said, "I will follow you, Lord, but let me first say farewell to those at my home." Jesus said to him, "No one who puts his hand to the plough and looks back is fit for the kingdom of God."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
महाराष्ट्रामधील संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली असे म्हटले जाते. अवघ्या २४ व्या वर्षी क्षयरोगाच्या कारणावरून हे जग सोडून गेलेली बाळ येशूची संत तेरेजा हिने आपल्या सुपीरियरच्या आज्ञेवरून गूढवादी अध्यात्मावर आधारित केवळ एकच पुस्तक लिहिले: "The Story of a Soul" (एका आत्म्याची कहाणी). आज त्या पुस्तकावर डॉक्टरेट मिळविणारे अध्यात्मवादी ईशज्ञानी आहेत. ख्रिस्तसभा अशा महान संतिणीचा सण आज साजरा करीत आहे. तिलादेखील 'डॉक्टर ऑफ द चर्च' (धर्मपंडिता) हा किताब देऊन गौरविण्यात आलेले आहे. ती कधीही मिशनमध्ये गेलेली नव्हती; परंतु मिशनमध्ये काम करणाऱ्या मिशनऱ्यांविषयीतिच्या मनात प्रचंड आस्था व आपुलकी होती. त्यामुळे तिला 'धर्मप्रसाराची सहाय्यिनी' असे म्हटले जाते. दुर्दैवाने आजच्या शुभवर्तमानात दर्शविल्याप्रमाणे प्रभूचे मिशनकार्य हाती घेण्याऐवजी लोक विविध सबबी शोधून काढीत आहेत. कोणाला आपल्या कुटुंबाची काळजी वाटते तर कोणाला आपली कर्तव्ये प्रिय वाटतात. काहींची तशी तयारी असते परंतु त्यासाठी कोणती किंमत मोजावी लागते त्याची गंधवार्ताही काहींना नसते. मला खरोखर प्रभूचे कार्य करावेसे वाटते का? त्यामध्ये कोणते अडथळे आहेत ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या शांतीचा दूत बनवू तुझी साक्ष जगाला देण्यास। 'आम्हाला प्रेरणा व धैर्य दे, आमेन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या