सामान्यकाळातील २९वा सप्ताह
मंगळवार २४ ऑक्टोबर २०२३
तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लावलेले असू द्या.
"Stay dressed for action and keep your lamps burning,
✝️
बार्सेलोना येथे त्यांनी धार्मिक विषयांवरील पुस्तकांचे ग्रंथालय उभारले. ते इतके जगद्विख्यात झाले की ख्रिस्ती धर्मातील प्राचीन आणि आधुनिक काळातील महत्त्वाची पुस्तके आणि ग्रंथ अगदी सवलतीच्या दरात जगभर जाऊ लागले. जिथे कुठे संत अँथनी जात तिथे ते आपणाबरोबर ख्रिस्ती साहित्य, पुस्तके नेत आणि लोकांना मोफत वाटत असत.
संत अँथनी हे स्वतः एक सिद्धहस्त लेखक होते. त्यांनी १३० पुस्तके लिहिली. दि. २४ ऑक्टो. १८७० साली ते मरण पावले. त्यांचे अवशेष १८९७ साली गोळा गेले जात असताना त्यांचं हृदय अविनाशी अवस्थेत सापडले. इ. स. १९५० साली त्यांना संतपद देण्यात आले.
चिंतन : आपण सगळीकडे मिशनरी पाठवू शकत नसल्याकारणाने निदान चांगली पुस्तके तरी सर्वत्र पाठवावीत. कारण चांगली पुस्तके ही मिशनऱ्यांप्रमाणे चांगले प्रेषितकार्य करू शकतात. - संत अँथनी मेरी क्लॅरेट
पहिले वाचन : रोम. ५:१२,१५,१७-२१
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“जर ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर जे कृपेच्या दानाची विपुलता स्वीकारतात, ते येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील."
एका माणसाच्या द्वारे जगात पाप शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरिता विशेषकरून अधिक झाली. जर त्या एकाच इसमाच्याद्वारे, त्या एकाच इसमाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे आणि नीतिमत्त्वाचे दान ह्याची विपुलता स्वीकारतात, ते विशेषकरून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील.
तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्त्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त होते. जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील. जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा अधिक प्रमाणात झाली, जसे पापाने मरणाच्यायोगे राज्य केले तसे कृपेने नीतिमत्त्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे राज्य करावे.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Romans 5:12, 15b, 17-19, 20b-21
Brethren: Just as sin came into the world through one man, and death through sin, and so death spread to all men because all sinned - If many died through one man's trespass, much more have the grace of God and the free gift by the grace of that one man Jesus Christ abounded for many. For if, because of one man's trespass, death reigned through that one man, much more will those who receive the abundance of grace and the free gift of righteousness reign in life through the one man Jesus Christ. Therefore, as one trespass led to condemnation for all men, so one act of righteousness leads to justification and life for all men. For as by the one man's disobedience the many were made sinners, so by the one man's obedience the many will be made righteous. Where sin increased, grace abounded all the more, so that, as sin reigned in death, grace also might reign through righteousness leading to eternal life through Jesus Christ our Lord.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ४०: ७-१०, १७
प्रतिसाद : प्रभो, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मी आलो आहे.
१) यज्ञपशू आणि अन्नार्पण ह्यात तुला संतोष नाही,
पण ऐकायला तू माझे कान उघडले आहेस.
होम आणि पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस.
ह्यावरून मी म्हणालो, पाहा, मी आलो आहे.
२) ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की,
हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे,
तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.
३) महामंडळात मी नीतिमत्त्वाचे सुवृत्त सांगितले.
हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद ठेवले नाही
हे तू जाणतोस.
४ )तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठायी
आनंद आणि उल्हास पावोत.
तू सिद्ध केलेले तारण प्रिय मानणारे
परमेश्वराचा महिमा वाढो, असे सतत म्हणोत.
Psalm 40:7-8a, 8b-9, 10, 17
See, I have come, Lord, to do your will.
You delight not in sacrifice and offerings,
but in an open ear.
You do not ask for holocaust and victim.
Then said, "See, I have come." R
In the scroll of the book it stands
written of me: 1 delight to do your will, O my God;
your instruction lies deep within me." R
Your justice I have proclaimed
in the great assembly.
My lips I have not sealed;
you know it, O Lord. R
O let there be rejoicing and gladness
for all who seek you.
Let them ever say, "The Lord is great,"
who long for your salvation.R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभो, तुझी वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत. सार्वकालिक जीवनाची वचने आपणांजवळ आहेत.
आलेलुया!
Acclamation:
Stay awake at all times, praying that you may have strength to stand before the Son of Man.n.
शुभवर्तमान लूक १२:३५-३
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य."
येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लावलेले असू द्या. धनी लग्नाहून येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्याच्यासाठी तात्काळ उघडावे म्हणून, तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसांसारखे तुम्ही असा. धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य. मी तुम्हांला सत्य सांगतो की, तो आपली कंबर बांधून त्यांना जेवायला बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील. तो रात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रहरी येईल तेव्हा जे त्याला असे आढळतील ते धन्य आहेत.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Luke 12:35-38
At this time: Jesus said to his disciples, "Stay dressed for action and keep your lamps burning, and be like men who are waiting for their master to come home from the wedding feast, so that they may open the door to him at once when he comes and knocks. Blessed are those servants whom the master finds awake when he comes. Truly, I say to you, he will dress himself for service and have them recline at table, and he will come and serve them. If he comes in the second watch, or in the third, and finds them awake, blessed are those servants!
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
आजचे शुभवर्तमान आपणांस सावधगिरीचा इशारा देत आहे. तुम्ही येशूकडे काय मागता? तुम्ही येशूला काय म्हणून संबोधिता याविषयी सावध असा. वतनाचा वाटा मागणे हे लोभी अंतकरणाचे लक्षण आहे. परमेश्वर म्हणता, कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. कारण जगात आपल्या वाट्याला कितीही संपत्ती असली तरी तिच्यापासून आपल्याला सार्वकाळचे जीवन मिळणार नाही किंवा त्यापासून आपल्याला तिळमात्र शांती किंवा आनंद लाभणार नाही उलटपक्षी संपत्तीची वाढ म्हणजेच आध्यात्मिक दैन्याची वाढ. त्यामुळे आपण देवाऐवजी संपत्तीवर विसंबून राहातो तेथे आपला नाश होतो. जसे आपण या जगात येतो तसेच परत जातो. येथे मिळवलेल्या संपत्तीमधून एक फुटकी कवडीसुद्धा बरोबर घेऊन जात नाही. प्रभू म्हणतो, मुर्खा आज रात्री तुझा प्राण मागितला जाईल मग हे सारे कोणाचे? सिंकदर म्हणाला, “माझ्या मरणानंतर माझे दोन्ही हात पेटीच्या बाहेर असू दे. जेणेकरून लोकांना कळेल की, मी रिकाम्या हाती आलो व रिकाम्या हाती परत जात आहे.” पृथ्वीवर धनसंचय करू नका तर देवाविषयक बाबतीत धनवान व्हा.
प्रार्थना : हे प्रभू येशू, जीवनात सतर्क व जागृत राहून तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या