सामान्यकाळातील २९वा सप्ताह
सोमवार २३ ऑक्टोबर २०२३
परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा प्राण मागितलाजाईल,
God said to him, 'Fool! This night your soul is required of you,
✝️
प्रभू येशू म्हणत आहे, 'सांभाळा सर्व प्रकारच्या लोभापासून दूर असा. 'लोभ हा संपत्ती, धन, मानसन्मान अधिकार व सत्ता अशा कोणत्याही गोष्टींचा असू शकतो. काहिजण ते मिळविण्यासाठी अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराचा अवलंब करीत असतात. परंतु ते विसरतात की हे मानवी जीवन क्षणभंगूर आहे.
देवाने त्याला म्हटले, 'अरे मुर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल'. ह्या जगातील वैभव नाशवंत आहे मात्र सार्वकालिक जीवन आणि स्वर्गीय संपत्ती अविनाशी आहेत. आपण स्वर्गीय संपत्तीचा ध्यास घ्यायला हवा. आपण अनमोल द्रव्याचा म्हणजेच प्रभूचा शोध घ्यायला हवा. ज्याला प्रभू सापडला आहे त्याला महान संपत्ती व वैभव मिळालेच आहे.
पहिले वाचन : रोमकरांस ४:२०-२५
वाचक :पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"जो देवावर विश्वास ठेवतो त्यास नीतिमत्त्व असे गणण्यात येते. असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे.” देवाच्या अभिवचनाकडे पाहून आब्राहाम अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचा गौरव केला आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. म्हणूनच ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले. ते त्याच्याकडे गणण्यात आले. हे विधान केवळ त्याच्यासाठी नव्हे तर आपल्या प्रभू येशूला ज्याने मेलेल्यांमधून उठवले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठीही ते लिहिलेले आहे. त्या आपणालाही ते गणले जाणार आहे. तो प्रभू येशू तुमच्याआमच्या अपराधांमुळे मरण्यासाठी धरून देण्यात आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Romans 4:20-25
Brethren: No unbelief made Abraham waver concerning the promise of God, but he grew strong in his faith as he gave glory to God, fully convinced that God was able to do what he had promised. That is why his faith was "counted to him as righteousness. But the words "it was counted to him" were not written for his sake alone, but for ours also. It will be counted to us who believe in him who raised from the dead Jesus our Lord, who was delivered up for our trespasses and ramed for our justification
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र लूक१:६९-७०, ७१-७२.७३-७५
प्रतिसाद : इस्त्राएलचा देव प्रभू धन्यवादित असो.
१. आपल्यासाठी त्याने आपला दास दावीद ह्याच्या
घराण्यात बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे.
हे त्याने युगाच्या प्रारंभापासून आपल्या पवित्र
संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे सांगितले आहे.
२ आपल्या शत्रूंच्या आणि आपला द्वेष
करणाऱ्या सर्वांच्या हातून सुटका करावी.
अशासाठी की, आपल्या पूर्वजांवर त्याने दया करावी.
आणि त्याने आपला पवित्र करार आठवावा.
३ म्हणजे जी शपथ आपला पूर्वज आब्राहाम
ह्याच्याशी त्याने वाहिली ती आठवावी ती अशी,
तुम्ही आपल्या शत्रूच्या हातून सुटून माझ्यासमोर
पवित्रतेने आणि नीतीने आयुष्यभर माझी सेवा
निर्भयपणे कराल, असे मी करीन.
Luke 1:69-70, 71-72, 73-75
Blessed be the Lord God of Israel, for he has visited his people,
He has raised up a horn of salvation for us
in the house of his servant David,
as he spoke by the mouth of his holy
prophets from of old. R
That we should be saved from our enemies
and from the hand of all who hate us;
to show the mercy promised to our fathers
and to remember his holy covenant. R
The oath that he swore
to our father Abraham,
to grant us that we,
being delivered from the hand of our enemies,
might serve him without fear,
in holiness and righteousness
before him all our days. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
जे वचन ऐकून सालस आणि चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात, ते धन्य होत.
आलेलुया!
Acclamation:
Blessed are the poor in spint, for theirs is the kingdom of heaven.
शुभवर्तमान लूक १२:१३-२१
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल ?" लोकसमुदायातील कोणाएकाने येशूला म्हटले, "गुरुजी, मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा." पण तो त्याला म्हणाला, “गृहस्था मला तुम्हावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमले ?" आणखी त्याने त्यांना म्हटले, संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही." मग त्याने त्यांना एक दाखला सांगितला कोणाएका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की, आता मी काय करावे? कारण माझे उत्पन्न साठवायला मला जागा नाही. मग त्याने विचार ठरवला, मी असे करीनः मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तेथे मी आपले सर्व धान्य आणि माल साठवीन. मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे. आता विसावा घे, खा, पी, आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा प्राण मागितलाजाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहे, हे कोणाचे होईल ? जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो आणि देवविषयक बाबतीत धनवान नाही तो ह्या धनवानासारखा आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Luke 12:13-21
At that time: Someone in the crowd said to Jesus, "Teacher, tell my brother to divide the inheritance with me." But he said to him, "Man, who made me a judge or arbitrator over you?" And he said to them. "Take care, and be on your guard against all covetousness, for one's life does not consist in the abundance of one's possessions." And he told them a parable, saying "The land of a rich man produced plentifully, and he thought to himself, What shall I do, for I have nowhere to store my crops?" And he said, 'I will do this: I will tear down my barns and build larger ones, and there I will store all my grain and my goods. And I will say to my soul, "Soul, you have ample goods laid up for many years; relax, eat, drink, be merry." But God said to him, 'Fool! This night your soul is required of you, and the things you have prepared, whose will they be? So is the one who lays up treasure for himself and is not rich towards God."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
आजचे शुभवर्तमान आपणांस सावधगिरीचा इशारा देत आहे. तुम्ही येशूकडे काय मागता? तुम्ही येशूला काय म्हणून संबोधिता याविषयी सावध असा. वतनाचा वाटा मागणे हे लोभी अंतकरणाचे लक्षण आहे. परमेश्वर म्हणता, कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. कारण जगात आपल्या वाट्याला कितीही संपत्ती असली तरी तिच्यापासून आपल्याला सार्वकाळचे जीवन मिळणार नाही किंवा त्यापासून आपल्याला तिळमात्र शांती किंवा आनंद लाभणार नाही उलटपक्षी संपत्तीची वाढ म्हणजेच आध्यात्मिक दैन्याची वाढ. त्यामुळे आपण देवाऐवजी संपत्तीवर विसंबून राहातो तेथे आपला नाश होतो. जसे आपण या जगात येतो तसेच परत जातो. येथे मिळवलेल्या संपत्तीमधून एक फुटकी कवडीसुद्धा बरोबर घेऊन जात नाही. प्रभू म्हणतो, मुर्खा आज रात्री तुझा प्राण मागितला जाईल मग हे सारे कोणाचे? सिंकदर म्हणाला, “माझ्या मरणानंतर माझे दोन्ही हात पेटीच्या बाहेर असू दे. जेणेकरून लोकांना कळेल की, मी रिकाम्या हाती आलो व रिकाम्या हाती परत जात आहे.” पृथ्वीवर धनसंचय करू नका तर देवाविषयक बाबतीत धनवान व्हा.
प्रार्थना : हे स्वर्गीय पित्या, तुझ्या सहवासाची ओढ आम्हाला लागावी म्हणून | प्रयत्नशील बनण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या