Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ८९:२-५,२७,२९
प्रतिसाद : त्याचे राजघराणे सर्वकाळ राहील.
१. प्रभूच्या अढळ प्रेमाचे मी सतत गुणगान गाईन.
मी माझ्या तोंडाने साऱ्या पिढ्यांना
तुझ्या विश्वसनीयतेविषयी सांगेन.
तुझी विश्वसनीयता स्वर्गात स्थापलेली आहे.
तुझे प्रेम अनंतकाळ टिकेल.
२. “मी स्वतः निवडलेल्या व्यक्तीशी करार केला आहे.
तुझे सिंहासन पिढ्यान्पिढ्या राखीन.
माझा दास दावीद याला अभिवचन दिले आहे,
तुझा वंश मी अबाधित ठेवीन.
३. तो मला म्हणेल, “तूच माझा पिता, माझा देव,
माझा रक्षणकर्ता दुर्ग, मुक्तिदाता आहेस.”
त्याच्यावरील माझे प्रेम अढळ राहील.
त्याच्याबरोबरचा माझा करार सदैव अबाधित राहील.
Psalm Psalm 89:2-3, 4-5, 27 and 29 (37)
His descendants shall continue for ever.
I will sing for ever of your mercies, O Lord,
through all ages my mouth will proclaim your fidelity.
I have declared your mercy is established for ever,
your fidelity stands firm as the heavens.
"With my chosen one I have made a covenant;
I have sworn to David my servant:
I will establish your descendants for ever,
and set up your throne through all ages."
"He will call out to me, "
You are my father, my God,
the rock of my salvation.
I will keep my faithful love for him always;
with him my covenant shall last. R
दुसरे वाचन पौलचे रोमकरांस पत्र ४ : १३. १६-१८.२२
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“आब्राहामने श्रध्दा ठेवली, आशेचा किरणही नसताना आशा बाळगली."
आब्राहामाचे आचरण धर्मशास्त्रानुसार होते म्हणून नव्हे, पण त्याच्या श्रध्देमुळे तो नीतिमान ठरला म्हणून, सारे जग त्याचेच होईल असे अभिवचन त्याला व त्याच्या वंशजांना देण्यात आले होते.
तेव्हा आब्राहामाच्या साऱ्या वंशजांना म्हणजे केवळ धर्मशास्त्राप्रमाणे वागवणाऱ्यांनाच नव्हे पण आब्राहामाप्रमाणे ज्यांची श्रध्दा आहे, त्यांनाही - हे वचन मेहेरबानीदाखल खात्रीने मिळावे म्हणून ते श्रध्देवर आधारलेले आहे, कारण आब्राहाम आपणा सर्वांचा पिता आहे. धर्मशास्त्रात लिहिले आहे, “मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता त्याच्याविषयी केले आहे." जो मृतांना जिवंत करतो व अस्तित्वात नसेल ते आपल्या आज्ञेसरशी अस्तित्वात आणतो, अशा देवावर त्याची श्रध्दा होती. आब्राहामाने श्रध्दा ठेवली, आशेचा किरण नसताना आशा बाळगली, म्हणूनच तो अनेक राष्ट्रांचा पिता झाला ! त्याच्याविषयी सांगण्यात आले होते, “इतके तुझे वंशज होतील !” म्हणून ते “त्याला नीतिमत्व असे गणण्यात आहे."
Romans 4:13, 16-18, 22
Brethren: The promise to Abraham and his offspring that he would be heir of the world did not come through the law but through the righteousness of faith. That is why it depends on faith, in order that the promise may rest on grace and be guaranteed to all his offspring-not only to the adherent of the law but also to the one who shares the faith of Abraham, who is the father of us all, as it is written, "I have made you the father of many nations"-in the presence of the God in whom he believed, who gives life to the dead and calls into existence the things that do not exist. In hope he believed against hope. that he should become the father of many nations, as he had been told, "So shall your offspring be." That is why his faith was "counted to him as righteousness."
This is the Word of God
Thanks be to God
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभो, तुझ्या मंदिरात राहणारे किती धन्य आहेत !
ते निरंतर तुझी स्तुती गातात.
आलेलुया!
Acclamation:
Blessed are they who dwell in your house, O Lord for ever singing your praise.
शुभवर्तमान मत्तय १:१६,१८-२१,२४
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"प्रभूच्या दूताच्या आदेशाप्रमाणे त्याने मरियेशी लग्न केले."
याकोबला योसेफ झाला. हा योसेफ मरियेचा पती असून तिच्याच पोटी ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला.
येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला त्याची आई मरिया हिचा योसेफाशी वाड्. निश्चय झालेला होता. पण त्याचे लग्न होण्यापूर्वीच पवित्र आत्म्याच्या योगे ती गर्भवती असल्याचे दिसून आले. तिचा भावी पती योसेफ सज्जन होता. मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडायची त्याची इच्छा नव्हती. म्हणून त्याने आपला वाड्. निश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या एका दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला, “दावीदच्या पुत्रा, योसेफ, आपली पत्नी म्हणून मरियेचा स्वीकार करायला भिऊ नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. तिला मुलगा होईल. तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे.” मग योसेफ जागा झाला. प्रभूच्या दूताच्या आज्ञेप्रमाणे त्याने मरियेचा स्वीकार केला.
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
0 टिप्पण्या