Marathi Bible Reading | Wednesday 3rd December 2025 | 1st Week of Advent

आगमनकाळातील पहिला सप्ताह 

बुधवार दि.  ३ डिसेंबर ०२५

ज्या कोणत्या घरात जाल तेथे, 'ह्या घरास शांती असो,' असे प्रथम म्हणा.

Whatever house you enter, first say, Peace be to this house!



सुवार्तिक संत फ्रान्सिस झेवियर, 
धर्मगुरू (भारतासाठी) सोहळा

ख्रिस्तसभा आज सुवार्ता प्रसारक संत फ्रान्सिस झेवियरचा सण साजरा करीत आहे. अत्यंत श्रीमंतीत वाढलेला फ्रान्सिस बुद्धिमान आणि महत्वाकांक्षी होता. उच्चशिक्षण घेऊन नाव लौकिक मिळवायचा आणि यश संपादन करायचे म्हणून पॅरीसच्या जगत्विख्यात विश्वविद्यालयात असताना त्याची गाठ संत इग्नेशियस लोयोला ह्यांच्याशी पडली. 'मानवाने सारे जग जिंकले परंतू स्वतः चा आत्मा गमावला तर त्याला काय लाभ?' (मत्तय १६:२६), ह्या अमृत वचनाचा स्पर्श फ्रान्सिसला झाला. फ्रन्सिसच्या अंतरमनाचा ठाव ख्रिस्ताच्या वचनांनी घेतला आणि तो संत इग्नेशियसने स्थापन केलेल्या येशू संघामध्ये दाखल झाला व धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी फ्रन्सिसने आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. पोर्तुगालपासून सुरु झालेला फ्रान्सिसचा मिशनरी प्रवास योगायोगाने त्याला भारतात घेऊन आला. गोव्यातील आणि दक्षिण भारतातील मिशनरी कार्य करीत असतानाच पूढे जपान, चीन आणि ऑस्ट्रेलीयापर्यंत फ्रान्सिसने ख्रिस्ताची सुवार्ता पसरविली.

प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपल्या प्रत्येकाला पाचारण करून सांगत आहे, ‘पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत.' जागतिक महत्वाकांक्षा बाळगून जागतिक वैभव मिळविण्यापेक्षा स्वर्गीय वैभव मिळविण्यासाठी आपण संत फ्रान्सिस झेवियरच्या मध्यस्थीने प्रार्थना करु या.

✝️   

पहिले वाचन : यिर्मया   :१: ४-८
वाचक :यिर्मयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे."
परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे : “मी तुला गर्भाशयात घडवले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून जन्मण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे.”
तेव्हा मी म्हणालो, “अहो, प्रभू परमेश्वरा, पाहा, मला बोलायचे ठाऊक नाही, मी केवळ बाळ आहे.” मग परमेश्वर मला म्हणाला, “ 'मी केवळ बाळ आहे' असे म्हणू नकोस, ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याच्याकडे तू जा आणि तुला आज्ञापीन ते बोल. त्यांना तू भिऊ नकोस. तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.”
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading ::Jeremiah 1:4-9
The word of the Lord came to me, saying, "Before I formed you in the womb I knew you, and before you were born 1 consecrated you; I appointed you a prophet to the nations." Then I said, "Ah, Lord God! Behold, I do not know how to speak, for I am only a youth." But the Lord said to me, "Do not say, 'I am only a youth', for to all to whom I send you, you shall go, and whatever I command you, you shall speak. Do not be afraid of them, for I am with you to deliver you, declares the Lord." Then the lord put out his hand and touched my mouth. And the lord said to me, "Behold, I have put my words in your mouth."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  ७१:१-६,१५,१७
प्रतिसाद :   मी तुझ्या न्यायनिष्ठेचे वर्णन करीन.

१) हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे, 
मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस. 
तू आपल्या न्यायनीतीने माझा उध्दार कर, 
माझ्याकडे आपला कान लाव आणि माझे तारण कर.

२) मला नेहमी थारा मिळावा म्हणून माझ्यासाठी
निवासाचा खडक हो, 
माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहेस 
कारण तू तर माझा गड आणि माझा दुर्ग आहेस.
 हे माझ्या देवा, दुर्जनांच्या हातातून मला मुक्त कर. 

३)  कारण हे प्रभो, परमेश्वरा,
तूच माझे आशास्थान आहेस, 
माझ्या तरुणपणापासून माझे श्रध्दास्थान आहेस. 
जन्मापासून तूच माझा आधार आहेस, 
मातेच्या उदरातून निघाल्यापासून तूच माझा कल्याणकर्ता आहेस.

४) माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि 
तू सिध्द केलेल्या तारणाच्या कृत्यांचे दिवसभर वर्णन करील.
हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस 
आणि मी आजपर्यंत तुझी अदभुत कृत्ये वर्णिली आहेत.

Psalms 71:1-2, 5-6, 8-9, 14-15ab
My mouth will tell of your justice. 

In you, O Lord, I take refuge; 
let me never be put to shame. 
In your justice, rescue me, free me; 
incline your ear to me and save me. R 

It is you, O Lord, who are my hope, 
my trust, O Lord, from my youth. 
On you I have leaned from my birth; 
from my mother's womb, you have been my help. 
At all times I give you praise. R 

My mouth is filled with your praise, 
with your glory, all the day long. 
Do not reject me now that I am old; 
when my strength fails do not forsake me. R 

But as for me, I will always hope, 
and praise you more and more. 
My mouth will tell of your justice, 
and all the day long of your salvation. R

दुसरे वाचन 
दुसरे वाचन : २ करिंथ ४:७-१५

मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे. देवाची जी कृपा तुमच्यासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेल म्हणजे प्रकटीकरणाच्याद्वारे मला रहस्य कळवले गेले, त्याप्रमाणे मी जे थोडक्यात वर लिहिले आहे, ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हाला समजेल. ते रहस्य जसे आता आत्म्याच्याद्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेष्ट्यांना प्रकट करून दाखवलेले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्यसंतानांस कळवण्यात आले नव्हते. ते रहस्य हे की, परराष्ट्रीय लोक ख्रिस्त येशूच्या ठायी सुवार्तेच्या योगाने आमच्याबरोबरवतनबंधू, आमच्याबरोबर एकशरीर आणि आमच्याबरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहेत.
देवाच्या सामर्थ्याच्या करणीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्याद्वारे मी सुवार्तेचा सेवक झालो आहे. मी जो सर्व पवित्र जनातील लहानाहून लहान त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी आणि ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठायी युगादिकालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय, हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे, ह्यासाठी की, जो युगादिकालाचा संकल्प त्याने आपल्या प्रभू ख्रिस्त येशूमध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती आणि अधिकारी ह्यांना मंडळीच्याद्वारे आता कळावे. त्या प्रभूच्या ठायी आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व हमीपूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत. म्हणून मी विनंती करतो की, तुम्हाप्रीत्यर्थ मला होणाऱ्या क्लेशामुळे तुम्ही खचू नये, ते तुम्हास भूषणावह आहेत.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


Second reading : 2 Corinthians 4:7-15
Brethren: We have this treasure in jars of clay, to show that the surpassing power belongs to God and not to us. We are afflicted in every way, but not crushed; perplexed, but not driven to despair; persecuted, but not forsaken; struck down, but not destroyed; always carrying in the body the death of Jesus, so that the life of Jesus may also be manifested in our bodies. For we who live are always being given over to death for Jesus' sake, so that the life of Jesus also may be manifested in our mortal flesh. So death is at work in us, but life in you. Since we have the same spirit of faith according to what has been written, "I believed, and so I spoke", we also believe, and so we also speak, knowing that he who raised the Lord Jesus will raise us also with Jesus and bring us with you into his presence. For it is all for your sake, so that as grace extends to more and more people it may increase thanksgiving, to the glory of God.
This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता.
 आलेलुया!

Acclamation: 
You shine as lights in the world, holding fast to the word of life.

शुभवर्तमान लूक १०: १-१६
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत."

प्रभूने आणखी बहात्तर जणांना नेमून ज्या ज्या नगरात आणि ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठवले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, "पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत, म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. जा, लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हांला पाठवत आहे, पाहा. पैशाची थैली, झोळी किंवा वहाणा घेऊ नका, वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे, 'ह्या घरास शांती असो,' असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील, नसला तर तुम्हाकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरे बदलू नका. कोणत्याही नगरात तुम्ही गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हांला वाढतील ते खा. त्यात जे आजारी असतील त्यांना बरे करा आणि त्यांना सांगा मी, 'देवाचे राज्य तुमच्याजवळ आले. आले.' तुम्ही कोणत्याही गावात गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही तर तेथील रस्त्यांवर बाहेर जाऊन असे म्हणा : ‘आमच्या पायांना लागलेली तुमच्या गावची धूळदेखील झाडून तुमची तुम्हांला परत करतो, तथापि हे लक्षात ठेवा की, देवाचे राज्य जवळ आले आहे.' मी तुम्हांला सांगतो, त्या गावापेक्षा सदोमला त्या दिवशी सोपे जाईल.”" हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार ! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार ! कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर आणि सीदोन ह्यात घडली असती तर त्यांनी तेव्हाच गोणपाट आणि राख अंगांवर घेऊन बसून पश्चाताप केला असता. ह्यामुळे न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर आणि सीदोन ह्यांना सोपे जाईल. हे कफर्णहूमा, तू आकाशापर्यंत उच्चपदाला पोहचशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील.“जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो, जो तुमचा अव्हेर करतो तो माझा अव्हेर करतो आणि जो माझा अव्हेर करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा अव्हेर करतो.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 10:1-16 
At that time: The Lord appointed seventy-two others and sent them on ahead of him, two by two, into every town and place where he himself was about to go. And he said to them, the harvest is plentiful, but the labourers are few. Therefore pray Barnestly to the Lord of the harvest to send out labourers into his harvest. Go your way; behold, I am sending you out as lambs in the midst of wolves. Carry no money bag, no knapsack, no sandals, and greet no one on the road. Whatever house you enter, first say, Peace be to this house! And if a son of peace is there, your peace will rest upon him. But if not, it will return to you. And remain in the same house, eating and drinking what they provide, for the labourer deserves his wages. Do not go from house to house. Whenever you enter a town and they receive you, eat what is set before you. Heal the sick in it and say to them, "The kingdom of God has come near to you.' But whenever you enter a town and they do not receive you, go into its streets and say, 'Even the dust of your town that clings to our feet we wipe off against you. Nevertheless know this, that the kingdom of God has come near. I tell you, it will be more bearable on that day for Sodom than for that town." Woe to you, Chorazin! Woe to you, Bethsaida! For if the mighty works done in you had been done in Tyre and Sidon, they would have repented long ago, sitting in sackcloth and ashes. But it will be more bearable in the judgment for Tyre and Sidon than for you. And you, Capernaum, will you be exalted to heaven? You shall be brought down to Hades. The one who hears you hears me, and the one who rejects you rejects me, and the one who rejects me rejects him who sent me."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:
 ३ डिसेंबर फ्रान्सीस झेवियरसंत फ्रान्सीस झेवियर हा पॅरिस विद्यापीठाचा विद्यार्थी होता, पृथ्वीवरील मानसन्मान व गौरवासाठी महत्त्वाकांक्षी होता, त्याला पवित्रता किंवा ख्रिस्ताच्या सेवेत जास्त रस नव्हता. पण त्याच्या आयुष्यात एक दूत आला, लोयोला येथील संत इग्नेशियस, जो त्याच्यापेक्षा वयाने मोठा होता, जो त्याच्या जीवनात वाढत्या वयानुसार परिपक्वतेचे वैशिष्ट्य असलेल्या पावित्र्याच्या मार्गावर होता. इग्नेशियसने फ्रान्सिसला योग्य बनवण्यासाठी पारख करण्यासाठी सुमारे तीन वर्षे मदत केली. जीवनाच्या खोलवर डोकावल्यानंतर आपल्या सहकाऱ्याला मदतीने अगदी पडद्याआडही एक महान हृदय ओळखण्यास मार्गदर्शन केले. झेवियरची स्वप्ने ही त्याची स्वतःची स्वप्ने होती यश, कीर्ती, पृथ्वीवरील मोठ्या नावाचे श्रेय. संत इग्नेशियसने केलेल्या मार्गदर्शनाने फ्रान्सिसची स्वतःच्या योजना एकामागून एक भंग झाल्या. इग्नेशियसने फ्रान्सिसच किमती वेळ घालवला, एक प्रकारचा अभिमान पाहिला आणि मग त्याचा प्रश्न सोडवलाः फ्रान्सिस, एखाद्या माणसाने संपूर्ण जग मिळवले आणि त्याच्या आत्म्याचे नुकसान केले तर त्याचा त्याला काय फायदा? एके दिवशी फ्रान्सिस झेवियरने आपली महत्त्वाकांक्षा उलट फिरविली, महत्त्वाकांक्षा आता स्वतःसाठी नाही तर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवासाठी आणि त्या दिवशी स्वर्गातील सर्व घंटा निनादू लागल्या.

प्रार्थनाप्रभू परमेश्वरा, तुझी सुवार्ता घोषविण्यासाठी आम्हाला प्रेरणा व धैर्याचा आत्मा दे, आमेन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या