Marathi Bible Reading | Monday 2nd February 2026 | 4th Week in ordinary Time

सामान्यकाळातील चौथा सप्ताह 

सोमवार  दि.२ फेब्रुवारी  २०२६

"हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ दे."Lord, now you are letting your servant depart in peace, according to your word; 

(प्रभूचे देवालयात समर्पण सोहळा) 
PRESENTATION OF THE LORD

'मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे यहुदी कुटुंबात जन्मलेल्या प्रथम बाळाचे समर्पण देवालयात करायचे असते. त्याच बरोबर  परतफेड म्हणून आपल्या ऐपतीप्रमाणे पशु किंवा पक्षाचे समर्पण घ्यायचे असते. ख्रिस्तसभा प्रभूयेशूच्या देवालयात समर्पण केल्याचा सण साजरा करीत आहे.  इस्त्राएलच्या सांत्वनाची वाट पाहणारा संदेष्टा शिमोन हा येशू बाळाच्या समर्पणाच्या वेळी हजर होता. येशूबाळाला पाहताच, तो धन्य झाला आणि देवाची स्तुति करू लागला. परराष्ट्रीयांसाठी प्रकाश आणि इस्त्राएलसाठी वैभव असे तारणाऱ्या विषयीचे प्रकटीकरण शिमोनाने केले. येशू बाळाला आशीर्वाद देऊन शिमोनाने पवित्र मरियेला तारणाची योजना प्रकट केली. हन्ना संदेष्ट्रीने येशूबाळाला पाहून देवाची स्तुति करून आभार मानले. खरे पाहता प्रभू येशू स्वतः तारणारा होता, प्रभू येशूच्या समर्पणावर चिंतन करीत असताना आपले समर्पित जीवन कसे  आहे ह्यावर विचार करू या. आपले काम, व्यवसाय, व्यवहार, पति, पत्नी, मुले, आई-वडिल अशा सर्वांना आपण देव चरणी समर्पित करूया.

✝️  


पहिले वाचन मलाखी  ३:१-४
वाचक :मलाखीच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल."

प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, माझ्यापुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला संदेष्टा पाठवतो. ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पाहा, करार घेऊन येणाऱ्या संदेष्ट्याची तुम्ही अपेक्षा करत आहा तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल ?
“कारण तो धातू गाळणाऱ्याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे. रुपे गाळून शुध्द करणाऱ्यासारखा तो बसेल आणि लेवीच्या वंशजांस शुध्द करील. त्यांस सोन्यारुप्याप्रमाणे शुध्द करील, मग ते धर्माने परमेश्वराला बली अर्पण करतील. पूर्वीच्या दिवसांप्रमाणे, प्राचीन वर्षाप्रमाणे, यहूदा आणि येरुशलेम यांचे यज्ञार्पण परमेश्वराला आवडेल."
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading Malachi 3:1-4

Thus says the Lord God: "Behold, I send my messenger, and he will prepare the way before me. And the Lord whom you seek will suddenly come to his temple; and the messenger of the covenant in whom you delight, behold, he is coming, says the Lord of hosts. But who can endure the day of his coming, and who can stand when he appears? "For he is like a refiner's fire and like fullers' soap. He will sit as a refiner and purifier of silver, and he will purify the sons of Levi and refine them like gold and silver, and they will bring offerings in righteousness to the Lord. Then the offering of Judah and Jerusalem will be pleasing to the Lord as in the days of old and as in former years."

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र २४:७-१०
प्रतिसाद :  हा प्रतापशाली राजा कोण? हा प्रभू आहे. 

१.) अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा, 
पुरातन दारांनो, उंच व्हा. 
प्रतापशाली राजाला आत येऊ द्या 

२) हा प्रतापशाली राजा कोण ? 
बलवान आणि पराक्रमी परमेश्वर, 
युध्दात पराक्रमी परमेश्वर तोच

३.) अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा,
 पुरातन दारांनो, उंच व्हा. 
प्रतापशाली राजाला आत येऊ द्या 

४.) हा प्रतापशाली राजा कोण ? 
हा सेनाधीश परमेश्वर, 
हाच प्रतापशील राजा होय.


Psalm 24:7, 8, 9, 10
The Lord of hosts, he is the King of Glory!

O gates, lift high your heads: 
grow higher, ancient doors. 
Let him enter, the king of glory! R

Who is this king of glory? 
The Lord, the mighty, the valiant; 
the Lord, the valiant in war. R 

O gates, lift high your heads; 
grow higher, ancient doors. 
Let him enter, the king of glory! R

Who is this king of glory? 
He, the Lord of hosts, he is the king of glory. R

दुसरे वाचन   इब्री २:१४-१८
वाचन :इब्री लोकांस पाठवलेल्या पत्रातून घेतलेले 
"त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूंसारखे होणेअगत्याचे होते. "

ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्याअर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा की, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. कारण, खरे पाहता, तो देवदूतांच्या सहाय्यास नव्हे तर आब्राहामाच्या संतानाच्या साहाय्यास येतो. म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूंसारखे होणे अगत्याचे होते. ह्यासाठी की, लोकांच्या पापांबद्दल प्रायश्चित्त करण्याकरिता त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टीविषयी दयाळू आणि विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे. कारण ज्याअर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगले त्याअर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करण्यास तो समर्थ आहे.
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second reading 
Hebrews 2:14-18

Since the children share in flesh and Blood Jesus himself likewise partook of the same things that through death he might destroy the one who has the power of death, that is, the devil, and deliver all those who through fear of death were subject to lifelong slavery. For surely it is not angels that he helps, but he helps the offspring of Abraham. Therefore he had to be made like his brothers in every respect, so that he might become a merciful and faithful high priest in the service of God, to make propitiation for the sins of the people. For because he himself has suffered when tempted, he is able to help those who are being tempted.
This is the word of God 
Thanks be to God

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
ते परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड आणि तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे हे आहे. 
  आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
A light for revelation to the Gentiles and for glory to your people Israel.
Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   लूक २:२२-४०
वाचक :  लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे.
(पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे बाळ येशू व मरिया ह्यांचे शुध्दीकरणाचे दिवस भरल्यावर ते त्याला वर येरुशलेमला घेऊन आले. ते अशासाठी की, येशूबाळाचे प्रभूला समर्पण करावे) (म्हणजे "प्रत्येक प्रथम जन्मलेला मुलगा प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा" असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे") आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोडा किंवा पारव्यांची दोन पिले यांचा यज्ञ करावा. तेव्हा पाहा, शिमोन नावाचा कोणीएक मनुष्य येरुशलेममध्ये होता, तो नीतिमान आणि भक्तिमान मनुष्य असून इस्राएलच्या तारणाची वाट पाहत होता. त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले, तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाला धन्यवाद देत म्हटले :
"हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ दे.
कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे.
ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिध्द केले आहे.
ते परराष्टीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड आणि तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे आहे.”
त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप आणि त्याची आई ह्यांना आश्चर्य वाटले. शिमोनने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्याची आई मरिया हिला म्हटले, "पाहा, पुष्कळ लोकांच्या अंत:करणातील विचार उघडकीस यावे, ह्यासाठी इस्राएलमध्ये अनेकांचे पतन आणि पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्याविरुध्द लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला नेमले आहे. (आणि पाहा, तुझ्या स्वतःच्या हृदयातून तरवार भोसकून पार जाईल)"हन्ना नावाची एक प्रवक्ती होती, ती आशेराच्या वंशातील फनूएलाची मुलगी होती. ती फार वयोवृध्द झाली होती आणि कौमार्यकाल संपल्यापासून ती पतीजवळ सात वर्षे राहिली होती. आता ती चौऱ्याऐशी वर्षांची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपवास आणि प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे. तिने याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे येरुशलेमच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली.
नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकाही पुरे केल्यावर ते गालीलात आपले गाव नाझरेथ येथे परत गेले. ते बाळ वाढत वाढत बलवान होत गेले व ज्ञानाने पूर्ण होत गेले आणि त्याच्यावर देवाची कृपा होती.
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Luke 2:22-32 (Longer form Luke 2:22-40)

When the time came for their purification according to the Law of Moses, the parents of Jesus brought him up to Jerusalem to present him to the Lord, (as it is written in the Law of the Lord, "Every male who first opens the womb shall be called holy to the Lord") and to offer a sacrifice according to what is said in the Law of the Lord, "a pair of turtle-doves, or two young pigeons". Now there was a man in Jerusalem, whose name was Simeon and this man was righteous and devout, waiting for the consolation of Israel, and the Holy Spirit was upon him. And it had been revealed to him by the Holy Spirit that he would not see death before he had seen the Lord's Christ. And he came in the Spirit into the temple, and when the parents brought in the child Jesus, to do for him according to the custom of the Law, he took him up in his arms and blessed God and said, "Lord, now you are letting your servant depart in peace, according to your word; for my eyes have seen your salvation that you have prepared in the presence of all peoples, a light for revelation to the Gentiles, and for glory to your people Israel."
  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनआजचा सण आपल्याला स्मरण करून देतो की प्रभू येशू स्वतःला आज्ञाधारकतेने, नम्रतेने आणि प्रेमाने पित्याठायी अर्पण करतो. प. मरिया आणि संत योसेफ मंदिरात बाळ येशूला घेऊन येतात, कारण देवाची इच्छा पूर्ण करणे हेच त्यांच्या जीवनाचे एकमेव ध्येय आहे. सिमोन आणि अन्ना हे दोघे वृद्ध भक्त त्याच क्षणी साक्षात देवाची भेट घेतात, आणि सिमोन आनंदाने म्हणतो, “हा बालक सर्व लोकांसाठी प्रकाश आहे.” प्रत्येक ख्रिस्ती मनुष्य जेव्हा देवाच्या इच्छेनुसार जगतो, तेव्हा तोही त्या प्रकाशाचा वाहक बनतो. अर्पण म्हणजे काहीतरी वस्तू देणं नव्हे, तर स्वतःला देवासाठी समर्पित करणं. आज या सणाचे औचित्य साधून ख्रिस्तसभा सर्व व्रतस्थांचा दिवसही साजरा करते. ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहण्यास सर्व व्रतस्थांना प. आत्म्याचे सामर्थ्य लाभावे म्हणून त्यांच्यासाठी विशेष कृपा मागू या. प्रार्थनाः हे प्रभू प. मरियेप्रमाणे, मला तुझ्या इच्छेत स्वतःला समर्पित करण्याची कृपा दे

प्रार्थना : हे प्रभू येशू, समर्पित जीवन जगण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला तुझी कृपा व सामर्थ्य दे, आमेन

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या