सामान्यकाळातील चौथा सप्ताह
बुधवार दि.४ फेब्रुवारी २०२६
"गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला तर पुष्कळ पीक देतो."
ruly, truly, I say to you, unless a grain of wheat falls into the earth and dies, it remains alone; but if it dies, it bears much fruit.

संत जॉन दिब्रिटो
रक्तसाक्षी (१६४७-१६९३)
भारतात आल्यावर लवकरच फा. जॉन दिब्रिटो मदुरा मिशनचे सुपिरिअर झाले आणि तो सगळा विशाल प्रांत त्यांनी पायाखाली घातला. पायी-पायी चालत त्यांनी तिथे ख्रिस्ताची सुवार्ता पसरविली. ज्यांनी त्यांच्याबरोबर कार्य केले ते त्यांचे सहकारी आपल्या पत्रात त्यांच्या धैर्याविषयी आणि भक्तीभावनेविषयी भरभरून स्तुती करताना आढळतात. त्याच्या विरक्तवृत्तीने आणि वैराग्यामुळेच त्याच्या श्रमाला पुढे परिवर्तनाचे अमाप पीक आले.
चौदा वर्षे त्यांनी प्रवचने करण्यात लोकांचे परिवर्तन करण्यात, त्यांना स्नामसंस्कार देण्यात घालविली. हे सर्व करीत असताना त्याला अनंत यातना सहन कराव्या लागल्या. असंख्य वेळा मानहानी व अपयश ह्यांना तोंड द्यावे लागले. त्यात त्याचा छळही खूप होत असे. सरतेशेवटी त्याला पकडण्यात आले आणि भारताबाहेर हाकलून देण्यात आले.
परंतु पोर्तुगालमध्ये तो जबरदस्तीने वा सक्तीने आलेला असल्यामुळे त्याला भारतीय लोकांची आठवण होई. भारतीय भूमीवर त्याचे विलक्षण प्रेम होते. सर्व प्रकारच्या अडचणींवर व अडथळ्यांवर मात करून फा. जॉन पुन्हा एकदा भारतात परतले. परंतु आता त्याच्या नशिंबी प्रेषितकार्य नव्हते तर त्याच्या ताटात वाढलेला होता छळ, हाल, अपमान...
जॉन दिब्रिटो ह्यांना संत योहान बाप्तिस्तसारखेच मरण आले. एका राजाने आपल्या राजदरबारात एक रखेली ठेवली होती. जॉनने त्या स्त्रीला तिच्या पापी जीवनाची जाणीव करून दिली आणि नवजीवनाची कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करण्यास सांगितले. ह्या सल्ल्यामुळे ती स्त्री भयंकर संतापली. तिने राजाचे कान फुंकले. तात्काळ जॉनला गजाआड करण्यात आले. तिथे त्याचा अमानुष छळ करण्यात आला आणि शेवटी त्याचा शिरच्छेद करण्यात आला.
तुरुंगातील छळ सोसत असताना त्याने आपल्या धर्माधिकाऱ्यांना लिहिले होते, "मी मृत्यूची वाट पाहात आहे. अगदी सहनशीलतेने मरणाची वाट पाहात आहे. सध्या मृत्यू हाच माझ्या प्रार्थनेचा विषय आहे. माझ्या सर्व श्रमांचा आणि दुःखसहनाचा कळस ज्या मृत्यूने गाठला जाणार आहे त्याला वेंग मारण्यास मी आसुसलेलो आहे.”
४ फेब्रुवारी १६९३ रोजी जेव्हा त्याच्या शिरच्छेदाची बातमी लिस्बन येथे पोहोचली तेव्हा राजा पेद्रो ह्याने आभारस्तवनाचा प्रार्थनाविधी आयोजित केला. त्या प्रार्थनाविधीमध्ये रक्तसाक्षी संत जॉन दिब्रिटो ह्याची आई देखील उपस्थित होती. तिने शोक व्यक्त करणारी नव्हे तर उत्सव व सोहळ्याची वस्त्रे धारण केली होती. जॉन दिब्रिटो ह्याला १९४७ साली संतांच्या मालिकेत सन्मानीत करण्यात आले.
चिंतन : देवाने दिलेल्या पाचारणाला होकार न दिल्याने आपण स्वत:हून देवाच्या क्रोधाला वाट मोकळी करून देतो. संत जॉन दिब्रिटो
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू गव्हाच्या दाण्याची उपमा देऊन समर्पित जीवन जगणाऱ्यांसाठी मोलाचा संदेश देत आहे. आत्मत्याग आणि समर्पणाशिवाय ख्रिस्ती जीवन पूर्णत्वास जाऊ शकत नाही. वदस्तंभाशिवाय तर ते फलदायी बनत नाही. ख्रिस्तसभा आज संत जॉन दिब्रिटो ह्या मिशनरी संताचा| स्मृतिदिन साजरा करीत आहे. प्रभू येशू म्हणतो, 'गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला तरच पुष्कळ पीक देतो' त्याप्रमाणे संत जॉन दिब्रिटो ह्यांना सुर्वाता प्रसार करताना अनेक प्रकारचा विरोध सहन करावा लागला. अनेक संकटांना व छळाला सामोरे जात असताना निधर्मी लोकांकडून त्यांना ठार मारण्यात आले. प्रभू येशूचे शिष्यत्व आत्मत्याग व सेवा ह्यामध्ये पूर्णत्वास येते. गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेल्यावर त्याला नवीन अंकुर फुटतो, त्याप्रमाणे संत जॉनने सुरु केलेले सुवार्ता प्रसाराचे कार्य नव्या जोमाने अंखडितपणे चालू राहिले.
आपल्या प्रत्येकाला त्याग आणि सेवा ह्याद्वारे प्रभू येशूची सुवार्ता पसरविण्यासाठी ख्रिस्तसभा आवाहन करीत आहे. संत जॉन दिब्रिटो ह्यांच्या जीवनाद्वारे प्रेरणा घेऊन आणि संत पौलाचा आदर्श समोर ठेवून आपण ख्रिस्ताची सुवार्ता घोषविण्यास वचनबद्ध होऊ या.
पहिले वाचन १ कोरिंथ ९:१९-२३
वाचक : पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"मी सर्वांना सर्व काही झालो आहे."
मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळवण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे. यहूदी लोक मिळवण्यासाठी मी यहूदी लोकांना यहुद्यांसारखा झालो. नियमशास्त्राधीन लोक मिळवण्यासाठी मी नियमशास्त्राधीन नसता, त्यांना नियमशास्त्राधीनासारखा झालो. जे नियमशास्त्रविरहित आहेत त्यांना मिळवण्यासाठी, म्हणजे नियमशास्त्र नाही अशांना मी नियमशास्त्रविरहित असा झालो. तरी देवाच्या नियमाबाहेर होतो असे नाही, तर ख्रिस्ताच्या नियमांच्या अधीन होतो.दुर्बळांना मिळवण्यासाठी दुर्बळांना मी दुर्बळ झालो. मी सर्वांना सर्व काही झालो आहे, अशा हेतूने की, मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे. मी सर्व काही सुवार्तेकरिता करतो, अशासाठी की, मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :1 Corinthians 9:19-27
Brethren: Though I am free from all, I have made myself a servant to all, that I might win more of them. To the Jews I became as a lew, in order to win Jews. To those under the law I became as one under the law (though not being myself under the law) that I might win those under the law. To those outside the law I became as one outside the law inot being outside the law of God but under the law of Christ) that I might win those outside the law. To the weak I became weak, that I might win the weak. I have become all things to all people, that by all means I might save some. I do it all for the sake of the gospel, that I may share with them in its blessings. Do you not know that in a race all the runners run, but only one receives the prize? So run that you may obtain it. Every athlete exercises self-control in all things. They do it to receive a perishable wreath, but we an imperishable. So I do not run aimlessly, I do not box as one beating the air But I discipline my body and keep it under control, lest after preaching to others I myself should be disqualified.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ६८:२९-३०,३३-३६
प्रतिसाद : अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाचें गीत गा :
प्रभूची स्तोत्रे गा!
१) यरुशलेमांतील तुझ्या मंदिराकरिता
राजे तुला भेटी आणितील.
लव्हाळ्यामध्ये राहणारे वनपशु, बैलांचा कळप
आणि त्यांचे वत्स ह्याना धमकाव;
रुप्याचा लोभ धरणाऱ्या खाली तुडीव.
लोकांना पाया युद्धप्रिय लोकांची त्यानें दाणादाण केली आहे.
२)पुरातन आकाशांच्या आकाशावर आरूढ
होऊन जो स्वारी करितो,
त्याची स्तोत्रे गा; पाहा, तो आपला शब्द, सामर्थ्याचा
शब्द, उच्चारितो.
३) देवाच्या बलाचें वर्णन करा;
इस्राएलांवर त्याचें ऐश्वर्य आणि
गगन मंडळांत त्याचे बळ आहे.
तुझ्या पवित्रस्थानांतून कार्य करणारा देव
भयप्रद आहे, इस्राएलाचा देव आपल्या लोकांस
बल व सामर्थ्य देतो.
देव धन्यवादित असो.
Psalm 68:29-30, 33-35a, 35b-36d
Let the peoples praise you, O God. Let all the peoples praise you
Summon forth your might, O God, your might,
O God, which you have shown for us.
From your temple high in Jerusalem,
kings will come to you bringing their tribute. R
You kingdoms of the earth, sing to God,
praise the Lord who rides on the heavens, the ancient heavens.
Behold, he thunders his voice, his mighty voice.
Come, acknowledge the power of God.
His glory is on Israel; his might is in the skies.
Awesome is God in his holy place
He is God, the God of Israel.
He himself gives strength and power to his people.
Blest be God! R
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
आपला तारणारा ख्रिस्त येशू ह्याने मरण नाहीसे केले आणि सुवातेंच्याद्वारे जीवन मिळवून दिले.
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
Our Saviour Christ Jesus abolished death and brought life and immortality to light through the gospel
Alleluia, alleluia.
शुभवर्तमान योहान १२ :२०-३२
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला तर पुष्कळ पीक देतो."
सणात उपासना करण्यास आलेल्या लोकांपैकी काही हेल्लेणी होते, त्यांनी गालीलातील बेथसैदाकर फिलिप्प ह्याच्याजवळ येऊन विनंती केली की, महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे. फिलिप्पाने येऊन आंद्रेयाला सांगितले आणि आंद्रेया व फिलिप्प ह्यांनी येऊन येशूला सांगितले. येशूने त्यांना म्हटले, मनुष्याच्या पुत्राचा गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जिवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल आणि जो ह्या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल, जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील.
आता माझा जीव व्याकुळ झाला आहे, मी काय बोलू ? हे बापा, ह्या घटकेपासून माझे रक्षण कर, परंतु मीह्यासाठीच ह्या घटकेत आलो आहे. हे बापा, तू आपल्या नावाचा गौरव कर. तेव्हा अशी आकाशवाणी झाली की, मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन. तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, मेघगर्जना झाली, दुसरे म्हणाले, त्याच्याबरोबर देवदूत बोलला. येशूने उत्तर दिले, ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली. आता ह्या जगाचा न्याय होतो, आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:John 12:20-32
At that time: Among those who went up to worship at the feast were some Greeks. So these came to Philip, who was from Bethsaida in Galilee, and asked him, "Sir, we wish to see Jesus." Philip went and told Andrew, Andrew and Philip went and told Jesus. And Jesus answered them, "The hour has come for the Son of Man to be glorified. Truly, truly, I say to you, unless a grain of wheat falls into the earth and dies, it remains alone; but if it dies, it bears much fruit. Whoever loves his life loses it, and whoever hates his life in this world will keep it for eternal life. If anyone serves me, he mustfollow me: and where I am, there will my servant be also. If anyone serves me, the Father will honour him. "Now is my soul troubled. And what shall I say? "Father, save me fro this hour'? But for this purpose I have come to this hour. Father, glorify your name." Then a voice came from heaven: "I have glorified it, and I will glorify it again." The crowd tha stood there and heard it said that it had thundered. Others said, "An angel has spoken to him." Jesus answered, "This voice has come for your sake, not mine. Now is the judgment of this world; now will the ruler of this world be cast out. And I, when I am lifted up from the earth, will draw all people to myself."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: प्रभू येशू आज एक महान आध्यात्मिक नियम उलगडतोः 'गव्हाचा दाणा मेला तरच तो भरभरून फळ देतो.” जीवनाचे खरे सौंदर्य स्वतःसाठी जगण्यात नाही, तर स्वतःला देवासाठी अर्पण करण्यात आहे. संत जॉन दिब्रिटो यांनी हे शहाणपण रक्तलांछित होईपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत जगले. त्यांनी प्रभूच्या राज्यासाठी स्वतःचे स्वप्न, सुरक्षितता, ओळख-सर्व काहीअर्पण केले. तामिळ लोकांमध्ये राहून, त्यांची भाषा-संस्कृती स्वीकारून त्यांनी ख्रिस्ताची सेवा एक आपलेपणाच्या नात्याने केली. त्यांचा शारीरिक मृत्यू पराभव नव्हता; तो गव्हाचा दाणा जो मेला होता-त्याद्वारे पुढे असंख्य विश्वासूंची पेरणी/कापणी केली जात आहे. प्रभू येशू आज आपल्यालाही आमंत्रित करतोः "जिथे मी आहे, तिथे तुम्हीही असाल." ख्रिस्ताच्या मार्गावर चालताना प्रत्येक त्याग, प्रत्येक अन्यायाचा प्रहार, फळ देणारा गव्हाचा दाणा बनतो. प्रार्थनाः हे प्रभू येशू, संतांप्रमाणे माझे जीवनही दैवी फळ देणारे बनावे म्हणून मला कृपा दे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचविण्यास मला तुझे सामर्थ्य व कृपा, आमेन.