सामान्यकाळातील ४ था सप्ताह
गुरुवार दि ५ फेब्रुवारी २०२६
✝️
त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार दिला
and gave them authority over the unclean spirits.
'प्रेषित' म्हणजे निवड करुन देवराज्य घोषविण्यास पाठविलेला निरोप्या किंवा दूत. प्रभू येशू ख्रिस्ताने देव राज्याचा विस्तार करण्यासाठी व सुवार्ता घोषविण्यासाठी प्रेषितांची निवड केली व त्यांना जोडीजोडीने पाठविले, निवडलेल्या प्रेषितांसाठी प्रभूने आचार संहिता घालून दिली. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेषितांना देवराज्याविषयी वेळोवेळी प्रशिक्षण , सुवार्ता घोषविण्याच्या सेवा कार्याबरोबरच आजारी, व्यंग आणि भूतग्रस्तांस आरोग्यदान व मुक्ती मिळवून देण्याची कृपादाने दिली. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या निवडलेल्या अनुयायांवर असंख्य कृपादानाचा वर्षाव करीत असतो.
पहिले वाचन १ राजे २:१-४, १०-१२
वाचक :राजाच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी जगाच्या रहाटीप्रमाणे ह्या जगातून जाणार. तर
शलमोन, हिंमत धर, मर्दुमकी दाखव."
दावीदचा अंतकाळ जवळ आला तेव्हा त्याने आपला पुत्र शलमोन यास ताकीद देऊन म्हटले, “मी जगाच्या रहाटीप्रमाणे ह्या जगातून जाणार. तर तू हिंमत धर, मर्दुमकी दाखव. तुझा देव परमेश्वर याने तुला जे अनुशासन लावून दिले आहे ते पाळ; त्याच्या मार्गांनी चाल आणि मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याचे नियम, आज्ञा, निर्णय, आणि निर्बंध पाळ; म्हणजे जे काही तू करशील त्यात आणि जिकडे तू जाशील तिकडे तुला यशप्राप्ती होईल आणि जर तुझी संतती आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवील आणि माझ्यासमोर सत्याने आणि जिवेभावे चालेल तर इस्राएलच्या गादीवरील तुझ्या राजघराण्याचा कधीही अंत होणार नाही. हे माझ्यासंबंधाने दिलेले वचन परमेश्वर कायम राखील."
नंतर दावीद मरण पावला आणि त्यां दावीदपुरात मूठमाती दिली. दावीदने इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले; सात वर्षे हेब्रोनात आणि तेहतीस वर्षे येरुशलेमात राज्य केले. मग शलमोन आपला बाप दावीद याच्या गादीवर बसला; त्याने आपल्या राज्यास चांगली बळकटी आणली.
प्रभूचा शब्द
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : Kings 2:1-4, 10-12
When David's time to die drew near, he commanded Solomon his son, saying, "I am about to go the way of all the earth. Be strong, and show yourself a man, and keep the charge of the Lord your God, walking in his ways and keeping his statutes, his commandments, his rules, and his testimonies, as it is written in the Law of Moses, that you may prosper in all that you do and wherever you turn, that the Lord may establish his word that he spoke concerning me, saying, "If your sons pay close attention to their way, to walk before me in faithfulness with all their heart and with all their soul, you shall not lack a man on the throne of Israel." Then David slept with his fathers and was buried in the city of David. And the time that David reigned over Israel was forty years. He reigned for seven years in Hebron and for thirty three years in Jerusalem. So Solomon sat on the throne of David his father, and his kingdom was firmly established.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १ इतिहास २९:१०,-१२
प्रतिसाद : प्रभो, तू सर्वांवर प्रभूत्व करतोस.
१) हे परमेश्वरा, आमचा पिता इस्त्राएल याच्या देवा,
तू सदासर्वकाळ धन्य आहेस.
२) हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम,
शोभा, विजय आणि वैभव ही तुझीच.
आकाशात आणि पृथ्वीवर जे काही आहे
ते सर्व तुझेच.
३) हे परमेश्वरा, राज्यही तुझेच,
तू सर्वांहून श्रेष्ठ आणि उन्नत आहेस.
धन आणि मान तुझ्यापासून प्राप्त होतात.
४) तू सर्वावर प्रभुत्व करतोस,
सामर्थ्य आणि पराक्रम तुझ्याच हाती आहेत;
लोकांना थोर करणे आणि सर्वांना सामर्थ्य
देणे हे तुझ्याच हाती आहे.
Psalm
1 Chronicles 29:10b, 11ab, 11d-12a, 12
O Lord, you rale over all.
"Blessed are you, O Lord, the God of Israel our father,
for ever and ever. R
Yours, O Lord, is the greatness and the power,
and the glory and the victory
and the majesty for all that is in the heavens
and in the earth is yours. R
You are exalted as head above all.
Both riches and honour come from you,
You rule over all.
In your hand are power and might,
and in your hand it is to make great
and to give strength to all.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुझ्या आदेशाचे मार्ग मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अलौकिक त्यांचे मनन करीन.
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia. My sheep hear my voice, says the Lord; I know them, and they follow me.
Alleluia, alleluia
शुभवर्तमान मार्क ६:७-१३
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशू बारा जणांस बाहेर पाठवू लागला.'
येशूने बारा जणांस आपल्या जवळ बोलावले व तो त्यांना जोडीजोडीने बाहेर पाठवू लागला. त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार दिला आणि त्यांना आज्ञा केली की, “वाटेसाठी काठीवाचून दुसरे काही घेऊ नका, भाकरी, झोळणा किंवा कमरकशात पैसे घेऊ नका, वहाणा घालून चाला, दोन अंगरखे घालू नका. तुम्ही कोठेही एखाद्याच्या घरी उतराल तेव्हा ते ठिकाण सोडीपर्यंत तेथेच राहा आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही आणि जेथील लोक तुमचे ऐकणार नाहीत, तेथून निघताना, त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळपायांची धूळ तेथेच झाडून टाका." ते तेथून निघाले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा अशी त्यांनी घोषणा केली, पुष्कळ भुते काढली आणि अनेक रोग्यांना तेल लावून बरे केले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Mark 6:7-13
At that time: Jesus called the twelve, and began to send them out two by two, and gave them authority over the unclean spirits. He charged them to take nothing for their journey except a staff - no bread, no bag, no money in their belts - but to wear sandals and not put on two tunics. And he said to them, "Whenever you enter a house, stay there until you depart from there. And if any place will not receive you and they will not listen to you, when you leave, shake off the dust that is on your feet as a testimony against them." So they went out and proclaimed that people should repent. And they cast out many demons and anointed with oil many who were sick and healed them.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: प्रभू येशू आज त्याच्या बारा शिष्यांना प्रेषित होण्याचे प्रशिक्षण देतो. जोडीने पाठवताना तो त्यांना सांगतो की काहीही बरोबर घेऊ नका; ना भाकर, ना पिशवी, ना पैसे, कारण त्यांच्या प्रवासाचा आधारस्तंभ केवळ परमेश्वर आहे. देवाची सेवा ही स्वतःवर नव्हे, तर त्याच्या कृपेवर अवलंबून असते. हे शिष्य प्रेषित म्हणून जेथे जातात, तेथे ते देवाच्या राज्याची घोषणा करतात आणि लोकांना बरे करतात. प्रेषित म्हणजे पाठवलेला. आपणही बाप्तिस्म्याने याच ध्येयासाठी पाठवले गेलो आहोत - देवाचे राज्य लोकांपर्यंत घोषविण्यासाठी. जेव्हा आपण नम्रतेने आणि विश्वासाने पुढे जातो, तेव्हा देवच आपली व्यवस्था करतो. प्रत्येक मिस्साच्या अंती आपल्यावर हे मिशन सोपविलेले आहे. ते मी कृतीत उतरविण्यासाठी काय काय करतो? प्रार्थनाः प्रभू, तुझ्या राज्याची सुवार्ता जगण्यासाठी आणि इतरांना त्याची साक्ष देण्यासाठी मला धैर्य, नम्रता आणि तुझ्यावरचा अखंड विश्वास दे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, आमची श्रद्धा बळकर कर व तुझी सुवार्ता पसरविण्यास व सेवाकार्य करण्यास आम्हाला प्रेरणा, सामर्थ्य व बळ दे, आमेन.
✝️

0 टिप्पण्या