सामान्यकाळातील १६ वा सप्ताह
बुधवार दि २२ जुलै २०२६
“त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून.”"They have taken away my Lord, and do not know where they have laid him."
“त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून.”"They have taken away my Lord, and do not know where they have laid him."
गालील समुद्राच्या किनारी तिबिर्याच्या जवळ माग्दाला नावाचे गाव वसलेले होते. त्या गावाच्या नावावरून मरिया हिला माग्दालेन हे आडनाव मिळाले असावे. प्राचीन ख्रिस्त सभेतील एका रूढ परंपरेनुसार पापी स्त्री-मरिया ही बेथानी येथल्या लाझरस व मार्थाची बहीण मरिया किंवा मरिया माग्दालिया असावी असे मानले जाते. ह्याच मरियेमधून आपल्या प्रभू येशूने सात भूते (सात भयानक पापप्रवृती किंवा सर्व प्रकारच्या विकृती) काढलेली होती. ह्या पापी स्त्रीने येशूला तैलाभ्यंग केला होता.नव्या करारातील शुभवर्तमानात मरिया माग्दालिया म्हणजे नक्की कोणती स्त्री ह्याविषयी अपुरी माहिती असल्यामुळे पौर्वात्य ख्रिस्तसभेत तीन वेगवेगळ्या मरिया नामक स्त्रियांचा सन्मान केला जातो. मरिया माग्दालिया, बेथानीची मरिया आणि पापी स्त्री- मरिया. संत योहान लिखित शुभवर्तमानानुसार येशूच्या चरणांना तैलाभिषेक करणारी पापी स्त्री ही मार्थाची बहीण, बेथानी येथली मरिया असावी. एकदा येशू तिच्या घरी आलेला असताना मार्था बऱ्याच गोष्टींविषयी दगदग व काळजी करीत होती. परंतु मरिया मात्र प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे म्हणणे ऐकत होती.मरिया माग्दालिया ही प्रभू येशूच्या क्रुसाजवळ उभी राहिली होती. तिने येशूचे दु:खसहन, मरण, थडग्यात पुरणे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले होते. येशूच्या पुनरुत्थानाची ती प्रथम साक्षीदार होती. कॅथलिक ख्रिस्तसभेने तिला चिंतनशील स्त्रियांचा आदर्श म्हणून गौरविलेले आहे. संत मेरी माग्दालेन एफसस येथे मरण पावली असावी. मात्र एका प्राचीन दंतकथेनुसार मार्था, मरिया व लाझरस ह्या तिघांनी फ्रान्सच्या दक्षिणेकडील भागात सुवार्ताप्रसार केला असे मानले जाते. पहिले वाचन :शलमोनाच्या गीतरत्न ३:१-४वाचक : शलमोनाच्या गीतरत्नातून घेतलेले वाचन "माझा प्राणप्रिय मला भेटला. "वधू म्हणते : रात्री शय्येवर पडले असता माझ्या प्राणप्रियाच्या दर्शनाची उत्कंठा मला लागली. मी त्याला चोहोकडे पाहिले, पण तो मला आढळला नाही. माझ्या मनात आले की आता उठून शहरभर फिरावे, आपल्या प्राणप्रियाचा शोध पेठांतून आणि गल्ल्यांतून करावा. मी त्याचा शोध केला पण तो मला आढळला नाही. नगरात फिरणारे गस्तवाले मला भेटले, मी त्यांना विचारले, "माझा प्राणप्रिय तुम्हांला कोठे आढळला काय ?" त्यांना सोडून मी अंमळ पुढे जाते तो माझा प्राणप्रिय मला भेटला.हा प्रभूचा शब्द आहे सर्व : देवाला धन्यवाद.
पर्यायी पहिले वाचन
वाचन : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन ५ : १४-१७"जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्टया ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही.'
ख्रिस्ताची प्रीती आम्हांला आवरून धरते. आम्ही असे समजतो की, एक सर्वासाठी मेला तर सर्व मेले आणि तो सर्वासाठी ह्याकरिता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला आणि पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्टया ओळखत नाही आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्टया ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पाहा, ते नवे झाले आहे.हा प्रभूचा शब्द आहे सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Song of Solomon 3:1-4ab (Or: 2 Corinthians 5:14-17) The bride responds: On my bed by night I sought him whom my soul loves; I sought him, but found him not. I will rise now and go about the city, in the streets and in the squares; I will seek him whom my soul loves. I sought him, but found him not. The watchmen found me as they went about in the city. "Have you seen him whom my soul loves? Scarcely had I passed them when I found him whom my soul loves.This is the word of God Thanks be to God
गालील समुद्राच्या किनारी तिबिर्याच्या जवळ माग्दाला नावाचे गाव वसलेले होते. त्या गावाच्या नावावरून मरिया हिला माग्दालेन हे आडनाव मिळाले असावे. प्राचीन ख्रिस्त सभेतील एका रूढ परंपरेनुसार पापी स्त्री-मरिया ही बेथानी येथल्या लाझरस व मार्थाची बहीण मरिया किंवा मरिया माग्दालिया असावी असे मानले जाते. ह्याच मरियेमधून आपल्या प्रभू येशूने सात भूते (सात भयानक पापप्रवृती किंवा सर्व प्रकारच्या विकृती) काढलेली होती. ह्या पापी स्त्रीने येशूला तैलाभ्यंग केला होता.
नव्या करारातील शुभवर्तमानात मरिया माग्दालिया म्हणजे नक्की कोणती स्त्री ह्याविषयी अपुरी माहिती असल्यामुळे पौर्वात्य ख्रिस्तसभेत तीन वेगवेगळ्या मरिया नामक स्त्रियांचा सन्मान केला जातो. मरिया माग्दालिया, बेथानीची मरिया आणि पापी स्त्री- मरिया. संत योहान लिखित शुभवर्तमानानुसार येशूच्या चरणांना तैलाभिषेक करणारी पापी स्त्री ही मार्थाची बहीण, बेथानी येथली मरिया असावी. एकदा येशू तिच्या घरी आलेला असताना मार्था बऱ्याच गोष्टींविषयी दगदग व काळजी करीत होती. परंतु मरिया मात्र प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे म्हणणे ऐकत होती.
मरिया माग्दालिया ही प्रभू येशूच्या क्रुसाजवळ उभी राहिली होती. तिने येशूचे दु:खसहन, मरण, थडग्यात पुरणे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले होते. येशूच्या पुनरुत्थानाची ती प्रथम साक्षीदार होती. कॅथलिक ख्रिस्तसभेने तिला चिंतनशील स्त्रियांचा आदर्श म्हणून गौरविलेले आहे. संत मेरी माग्दालेन एफसस येथे मरण पावली असावी. मात्र एका प्राचीन दंतकथेनुसार मार्था, मरिया व लाझरस ह्या तिघांनी फ्रान्सच्या दक्षिणेकडील भागात सुवार्ताप्रसार केला असे मानले जाते.
पहिले वाचन :शलमोनाच्या गीतरत्न ३:१-४
वाचक : शलमोनाच्या गीतरत्नातून घेतलेले वाचन "माझा प्राणप्रिय मला भेटला. "
वधू म्हणते : रात्री शय्येवर पडले असता माझ्या प्राणप्रियाच्या दर्शनाची उत्कंठा मला लागली. मी त्याला चोहोकडे पाहिले, पण तो मला आढळला नाही. माझ्या मनात आले की आता उठून शहरभर फिरावे, आपल्या प्राणप्रियाचा शोध पेठांतून आणि गल्ल्यांतून करावा. मी त्याचा शोध केला पण तो मला आढळला नाही. नगरात फिरणारे गस्तवाले मला भेटले, मी त्यांना विचारले, "माझा प्राणप्रिय तुम्हांला कोठे आढळला काय ?" त्यांना सोडून मी अंमळ पुढे जाते तो माझा प्राणप्रिय मला भेटला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
पर्यायी पहिले वाचन
वाचन : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले
वाचन ५ : १४-१७
"जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्टया ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही.'
ख्रिस्ताची प्रीती आम्हांला आवरून धरते. आम्ही असे समजतो की, एक सर्वासाठी मेला तर सर्व मेले आणि तो सर्वासाठी ह्याकरिता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला आणि पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्टया ओळखत नाही आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्टया ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पाहा, ते नवे झाले आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Song of Solomon 3:1-4ab (Or: 2 Corinthians 5:14-17)
The bride responds: On my bed by night I sought him whom my soul loves; I sought him, but found him not. I will rise now and go about the city, in the streets and in the squares; I will seek him whom my soul loves. I sought him, but found him not. The watchmen found me as they went about in the city. "Have you seen him whom my soul loves? Scarcely had I passed them when I found him whom my soul loves.
This is the word of God
Thanks be to God
