सामान्य काळातील बाविसावा सप्ताह
बुधवार २ सप्टेंबर २०२६
त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यास बरे केले.
he laid his hands on every one of them and healed them.

पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेना
शिमोनाची सासू होती म्हणजेच तो विवाहित होता. त्याच्या आजारी सासूला येशू बरे करतो. मग ती सासू त्यांची सेवा करू लागते. देव प्रत्येकाच्या जीवनात कार्य करीत असतो. ह्याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी आणि देवाची सेवा म्हणून इतरांची सेवा करावी. आणि जर आपण दुसऱ्यांची सेवा करतो तर देव देखील महान कार्य करीत राहतो. जणू हेच हा प्रसंग दाखवून देत आहे. आजारी, पीडलेल्या लोकांना येशूकडे आणतात. येशू त्यांच्या डोक्यावर हात ठेवत बरे करतो. मी येशूची सेवा कोणत्याप्रकारे करू शकेन ? येशूने मला कोणकोणत्या पीडेतून मुक्त केलेले आहे ?
✝️
पहिले वाचन : : १करिथ ३:१-९
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"आम्ही देवाचे सहकारी आहो, तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहा."
बंधुजनहो, जसे आध्यात्मिक वृत्तीच्या माणसांबरोबर बोलावे तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दैहिकांबरोबर, जसे ख्रिस्तातील बाळकांबरोबर तसे मला बोलावे लागले. मी तुम्हांला दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्या वेळेस तुम्हांला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही, कारण तुम्ही अजूनही दैहिक आहा. ज्याअर्थी तुमच्यामध्ये हेवा आणि कलह आहेत, त्याअर्थी तुम्ही दैहिक आहा की नाही ? आणि मानवी रीतीने चालता की नाही ? कारण जेव्हा एखादा म्हणतो, “मी पौलचा आहे," दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोचा आहे,” तेव्हा तुम्ही मानवच आहा की नाही ?
अपुल्लोस कोण ? आणि पौल कोण ? ज्यांच्या द्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत, ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत. मी लावले, अपुल्लोसने पाणी घातले, पण देव वाढवतं गेला. म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढवणारा देव हाच काय तो आहे. लावणारा आणि पाणी घालणारा हे एकच आहे. तरी प्रत्येकाला आपआपल्या श्रमाप्रमाणे आपआपली मजुरी मिळेल. कारण आम्ही देवाचे सहकारी आहो, तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहा.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : Corinthians 3:1-9
1, brothers, could not address you as spiritual people, but as people of the flesh, as infants in Christ. I fed you with milk, not solid food, for you were not ready for it. And even now you are not yet ready, for you are still of the flesh. For while there is jealousy and strife among you, are you not of the flesh and behaving only in a human way? For when one says, "I follow Paul", and another, "I follow Apollos", are you not being merely human? What then is Apollos? What is Paul? Servants through whom you believed, as the Lord assigned to each. I planted, Apollos watered, but God gave the growth. So neither he who plants nor he who waters is anything, but only God who gives the growth. He who plants and he who waters are one, and each will receive his wages according to his labour. For we are God's fellow workers. You are God's field, God's building.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ३३:१२-१५, २०-२१
प्रतिसाद : ज्या लोकांना देवाने प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य !
१) ज्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे,
ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरिता
प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य !
परमेश्वर आकाशातून पाहतो,
सर्व मानवजातीला तो निरखतो.
२ )तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर
राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो,
त्या सर्वांची हृदये घडवणारा आणि
त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे.
३) आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करत आहे.
आमचे सहाय्य आणि ढाल तोच आहे.
त्याच्या ठायी आमच्या हृदयांना आनंद आहे.
त्याच्या पवित्र नामावर आमची श्रद्धा आहे.
Psalm 33:12-13, 14-15, 20-21
Blessed the people the Lord has chosen for his heritage.
Blessed the nation whose God is the Lord,
the people he has chosen as his heritage.
From the heavens the Lord looks forth;
he sees all the children of men. R
From the place where he dwells he gazes
on all the dwellers on the earth,
he who shapes the hearts of them all,
and considers all their deeds. R
Our soul is waiting for the Lord.
He is our help and our shield.
In him do our hearts find joy.
We trust in his holy name. R.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने.
आलेलुया!
Acclamation:
Alleluia:
R. Alleluia, alleluia.
The Lord has anointed me to . proclaim good news to the poor, to proclaimliberty to the captives
R. Alleluia, alleluia.