Marathi Bible Reading | 16th week in ordinary Time | Thursday 23th July 2026 |

 सामान्यकाळातील १६ वा सप्ताह 

   गुरुवार  दि २३ जुलै  २०२६ 

“स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हांला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही."Because to you it is given to know the mysteries of the kingdom of heaven:


  स्वीडनची संत ब्रिजेट 
-विधवा (१३०३-१३७३)  

ब्रिजेट अथवा ब्रिजीटा ही स्वीडनच्या उप्लांड ह्या प्रांताचे राज्यपाल व न्यायाधीश ह्यांची एक श्रीमंत अशी कन्या होती. हा राज्यपाल व न्यायाधीश सच्चा ख्रिस्ती होता आणि न्यायभावनेने वागण्याच्या हेतूने त्याने गुलामांच्या मुक्तीकार्यातील सर्व अडथळे व्यवस्थितपणे दूर केलेले होते. त्याची मुलगी ब्रिजेट हिला वयाच्या ७ व्या वर्षापासून वेगळेच दृष्टांत दिसू लागले.
वयाच्या १३ व्या वर्षीच तिच्या श्रीमंत राजघराण्याशी बरोबरी करील अशा उल्फ गुडमार्सन ह्या धार्मिक वृत्तीच्या राजपुत्राशी तिचे लग्न झाले. त्यांच्या वैवाहिक जीवनवेलीवर आठ कलिका उमलल्या. त्यापैकी ख्रिस्तसभेने संतपद देऊन सन्मानित केलेली स्वीडनची संत कॅथरीन ही एक होय. ब्रिजेटच्या विवाहाच्या २८ व्या वर्षी तिचे पती निवर्तले. परंतु या २८ वर्षात तिच्या प्रार्थनामय व चिंतनशील जीवनाकडे पाहून उल्फ गुडमार्सन ह्यांनी देखील देवाशी निकटचा संबंध प्रस्थापित केलेला होता. दरम्यानच्या काळात ब्रिजेटला असंख्य दृष्टांत झाले होते.
तिच्या पतीनिधनानंतर देवाने एका दृष्टांतात दर्शन देऊन तिला म्हटले,जुलै महिन्यातील संत सोहळे
"मी निर्दयपणे कुणाचा न्याय करीत नाही. अगदी पापाच्या खाईत रुतलेल्या पातकी व्यक्तीला देखील मी दयेने वागवितो. मी मानवी रूप धारण करून या पृथ्वीतलावर अवतरलेलो असल्यामुळे प्रत्येक माणूस हा माझा बंधू आहे असे मी मानतो आणि बंधुत्वाच्या नात्याने मी त्याचा न्याय करतो."
पोपमहाशय, देशोदेशीचे राजेमहाराजे आणि राजकुमार तिच्याकडे सल्लामसलतीसाठी आपले प्रतिनिधी पाठवीत. तिच्या काळात आपल्या आजूबाजूच्या विश्वातील नीतिमत्ता उंचावण्यासाठी तिने पुष्कळ मेहनत घेतली. हे करताना ती सर्वांशी, विशेषतः गोरगरिबांशी नम्रतेने, प्रेमाने व सौम्यतेने वागत असे.
इ. स. १३८६ साली येशूने तिला दिलेल्या दृष्टांतानुसार तिने 'दी ऑर्डर ऑफ होली रिडिमर' नामक धार्मिक व्रतस्थांची संस्था सुरू केली. जसे येशूने ७२ शिष्य आणि १२ प्रेषितांना कामगिरीवर पाठविले तसेच ब्रिजेट हिने आपल्या संस्थेत १३ धर्मगुरू (१२ प्रेषित संत पौल) ४ उपधर्मगुरू आणि ८ प्रापंचिक व्रतस्थ बंधू आणि जवळच्याच कॉन्व्हेंटमध्ये ६० धर्मभगिनी ह्यांची जडणघडण केली आणि जगभरच्या धर्मगुरुंच्या प्रवचनाला फळ यावे म्हणून त्यांना प्रार्थना करण्यास उद्युक्त केले.
आपल्या या व्रतस्थांच्या चिंतनशील जीवनाला पूरक असे क्रियाशील जीवनदेखील तिने आखून दिलेले होते. त्यावेळी इतरत्र ह्या कृतीशीलतेच्या जागी अभ्यास हा पर्याय वापरात होता. एकदा साक्षात्कार होत असताना तिने आपल्या दोन धर्मभगिनींना बोलावले व प्रभूकडून तिला होत असलेल्या मार्गदर्शनानुसार तिने आपल्या संस्थेची आचारसंहिता तयार केली. ही संस्था पुढे एवढी नावरूपाला आली की, स्वीडनचा राजा मॅग्नस आणि राणी ह्यांनी ह्या संस्थेला भरभरून देणगीरूपाने मदत केली.
इ. स. १३५० ह्या पवित्र वर्षी संत ब्रिजेट आपल्या लाडक्या कन्येसह (संत कॅथरीन : सण २४ मार्च) रोम येथे गेली. तिथे तिने तब्बल २३ वर्षे केवळ मनत-चिंतनात घालविली. प्रभूच्या दुःखसहन, मरण व पुनरुत्थान ह्यांचा साक्षात्कार पाहात असतानाच तिने या जगाचा निरोप घेतला

आज प्रभू येशू म्हणत आहे, 'ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल'. म्हणजेच ज्यांना वचन ऐकण्याची व आत्मसात करण्याची ईच्छा आहे  त्यांना विपुल प्रमाणात कृपादान मिळेल. देवाचे वचन ऐकण्याची संधी | आपल्याला अनेकवेळा लाभते मात्र बऱ्याचवेळा आपण कान असून बहिरे आणि डोळे. असून आंधळे बनलेले असतो. देवाचे वचन आपण लक्षपूर्वक ग्रहण करण्यास तयार असले पाहिजे. प्रभू येशू आपल्या सर्वांना सार्वकालिक  जीवनाचे वरदान देऊ इच्छित आहे, परंतु आपली उपासना व भक्ती कर्मकांडापुरातीच मर्यादित न राहता आपण देवाच्या शब्दाची साक्ष आपल्या जीवनाद्वारे इतरांना देण्याचा प्रयत्न करायला हवा. देवाचे वचन वाचून लक्षपूर्वक व जाणीवपूर्वक त्याच्यावर मनन-चिंतन करु या.

  
हिले वाचन :यिर्मया २:१-३,७-८, १२-१३
वाचक : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
 “माझ्या लोकांनी मला सोडले आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले. "

परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले आहे की, “जा, हे पुकारून येरुशलेमच्या कानी घाल. तुझे तारुण्यातले प्रेम, वाड्. निश्चयाच्या वेळचा तुझा अनुराग आणि रानात पडीत स्थळी तुझे माझ्यामागून येणे यांचे मला स्मरण आहे. इस्राएल परमेश्वराला पवित्र, त्याच्या उपजाचे प्रथमफळ असे होता. त्याला गिळून टाकणारे सर्व दोषी ठरले. त्यांच्यावर अरिष्ट आले, असे परमेश्वर म्हणतो.”
“मी तुम्हाला सुपीक भूमीवर तिचा उपज खाण्यासाठी आणि तिची संपत्ती उपभोगण्यासाठी आणले. पण तुम्ही येऊन माझा देश विटाळला, माझे वतन तुम्ही अमंगळ केले आहे. 'परमेश्वर कोठे आहे' असे याजक म्हणाले नाहीत आणि धर्मशास्त्राचा कारभार चालवणाऱ्यांनी मला जाणले नाही; अधिपतीही माझ्यावरच उलटले; संदेष्टे बआलदैवताच्या नावाने भाषणे करू लागले आणि निरर्थक गोष्टींच्या मागे लागले.
हे आकाशा, हे पाहून भयचकित हो, थरथर काप, शुष्क होऊन जा, असे परमेश्वर म्हणतो; कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले: मी जो जिवंत पाण्याचा झरा, त्या मला त्यांनी सोडले आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


First Reading : Jeremiah 2: 1-3, 7-8, 12-13
And the word of the Lord came to me, saying: Go, and cry in the ears of Jerusalem, saying: Thus saith the Lord: I have remembered thee, pitying thy soul, pitying thy youth, and the love of thy espousals, when thou followedst me in the desert, in a land that is not sown. Israel is holy to the Lord, the first fruits of his increase: all they that devour him offend: evils shall come upon them, saith the Lord. And I brought you into the land of Carmel, to eat the fruit thereof, and the best things thereof: and when ye entered in, you defiled my land, and made my inheritance an abomination. The priests did not say: Where is the Lord? and they that held the law knew me not, and the pastors transgressed against me: and the prophets prophesied in Baal, and followed idols. Be astonished, O ye heavens, at this, and ye gates thereof, be very desolate, saith the Lord. For my people have done two evils. They have forsaken me, the fountain of living water, and have digged to themselves cisterns, broken cisterns, that can hold no water.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र :३६ : ६-११
प्रतिसाद :  प्रभो, जीवनाचा झरा तुझ्याठायी आहे.

१) हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य
 आकाशापर्यंत पोहोचले आहे; 
तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे. 
तुझे नीतिमत्व महान पर्वतासारखे आहे, 
तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहेत.

२) हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे! 
मानवजात तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय घेते!
 तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल 
आणि तू आपल्या सुखाच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील.

३) कारण जीवनाचा झरा तुझ्याठायी आहे, 
तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. 
तुला ओळखणाऱ्यांना तुझे वात्सल्य, 
सरळ मनाच्या लोकांना तुझे नीतिमत्व लाभू दे.


Psalms 36: 6-7ab, 8-9, 10-11
R. (10a) With you is the fountain of life, O Lord.

6 O Lord, thy mercy is in heaven, 
and thy truth reacheth, even to the clouds.
7ab Thy justice is as the mountains of God, 
thy judgments are a great deep.
R. With you is the fountain of life, O Lord.

8 O how hast thou multiplied thy mercy, O God! 
But the children of men shall put their trust under the covert of thy wings.
9 They shall be inebriated with the plenty of thy house; 
and thou shalt make them drink of the torrent of thy pleasure.
R. With you is the fountain of life, O Lord.

10 For with thee is the fountain of life; 
and in thy light we shall see light.
11 Extend thy mercy to them that know thee,
 and thy justice to them that are right in heart.
R. With you is the fountain of life, O Lord.
जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !   
तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड 
आणि तुझे नियम मला शिकव.
आलेलुया!

Acclamation:
Alleluia: Matthew 11: 25
R. Alleluia, alleluia.
25 Blessed are you, Father, Lord of heaven and earth; you have revealed to little ones the mysteries of the Kingdom.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान  मत्तय १३:१०-१७
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हांला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही."
शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, "आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता?" त्याने त्यांना उत्तर दिले, "स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हांला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि त्याला भरपूर होईल; परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल तेदेखील काढून घेतले जाईल. ह्यास्तव मी त्यांच्याबरोबर दाखल्यानी बोलतो, कारण ते पाहात असता पाहात नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत आणि त्यांना समजतही नाही. यशयाचा संदेश त्याच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा -
'तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हाला समजणारच नाही आणि पहाल तर खरे, परंतु तुम्हाला दिसणारच नाही. कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत. ह्यासाठी त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानानी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये."
पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत आणि धन्य तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हास सत्य सांगतो की, तुम्ही जे पाहत आहा ते पाहायला पुष्कळ संदेष्टे आणि नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहायला मिळाले नाही आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकायला ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकायला मिळाले नाही."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

 Matthew 13: 10-17
And his disciples came and said to him: Why speakest thou to them in parables? Who answered and said to them: Because to you it is given to know the mysteries of the kingdom of heaven: but to them it is not given. For he that hath, to him shall be given, and he shall abound: but he that hath not, from him shall be taken away that also which he hath. Therefore do I speak to them in parables: because seeing they see not, and hearing they hear not, neither do they understand.
And the prophecy of Isaias is fulfilled in them, who saith: By hearing you shall hear, and shall not understand: and seeing you shall see, and shall not perceive.
 For the heart of this people is grown gross, and with their ears they have been dull of hearing, and their eyes they have shut: lest at any time they should see with their eyes, and hear with their ears, and understand with their heart, and be converted, and I should heal them. But blessed are your eyes, because they see, and your ears, because they hear. For, amen, I say to you, many prophets and just men have desired to see the things that you see, and have not seen them, and to hear the things that you hear and have not heard them.



 चिंतन
यिर्मया दाखवतो की देवाने आपल्यावर प्रेमाने निगराणी ठेवली, पण लोकांनी त्याच्यापासून दूर जाऊन इतर विहिरी शोधल्या. देव म्हणतो की त्यांनी “जिवंत पाण्याचा झरा" सोडून तुटक्या, पाणी न धरणाऱ्या विहिरी तयार केल्या-म्हणजेच खोटे आधार. हे विचारायला लावतेः माझे हृदय देवाच्या जवळ आहे की जगाच्या खोट्या सुरक्षिततेत भटकत आहे? देवआपल्याला पहिल्या प्रेमाची आठवण करून देतो-जेव्हा आपण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवत चालत होतो. मत्तय १३ मध्ये येशू सांगतो की देवाचे राज्य शोधणाऱ्यांनाच रहस्ये उघड होतात. ज्यांचे हृदय कठीण झाले आहे त्यांना ऐकनही ऐक येत नाही, पाहूनही दिसत नाही. म्हणून प्रश्न असाः माझे हृदय खुले आहे का? देवाचा आवाज माझ्या दैनंदिन जीवनात मी ओळखतो का? देवाचे वचन ऐकण्यासाठी नम्रता, शांतता आणि आतल्या तळमळीची आवश्यकता आहे. देवाजवळ असलेले हृदय त्याच्या इच्छेत आनंद मानते आणि सत्यासाठीची भूक ठेवते. आजचा संदेशः हृदय देवाजवळ ठेवा, त्याचा आवाज ऐका, आणि देवाचे राज्य प्रथम शोधा-तेव्हाच जीवनाला खरा अर्थ मिळेल.
प्रार्थना हे प्रभू येश, तुझ्या दिव्य वाचनांनुसार जीवन आचरण करण्यास व तुझे रहस्यमय वैभव अनुभवण्यास मला कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या