सामान्यकाळातील १६ वा सप्ताह
मंगळवार दि २१ जुलै २०२६
जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण आणि आई."
whoever does the will of my Father in heaven is my brother and sister and mother
जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण आणि आई."
whoever does the will of my Father in heaven is my brother and sister and mother
ब्रिन्डीसीचे संत लॉरेन्स - वर्तनसाक्षी आणि धर्मपंडित (१५५९-१६१९)
इ. स. १६०२ साली त्यांना कंप्युचिन संघाने जनरलपदी निवडून दिले. तीन वर्षे त्यांनी जनरल पदाची धुरा अत्यंत कौशल्याने सांभाळली. परंतु तीन वर्षांनी त्यांची फेरनिवड झाली तेव्हा त्यांनी त्या निवडीस नम्रपणे नकार दिला.इ. स. १५७१ साली लिपान्टो येथे झालेल्या युद्धात तुर्कीच्या सागरी फौजेचा युरोपने पूर्णपणे पाडाव केला होता. मात्र पुढे १५९५ साली सुलतान मोहमद तिसरा ह्याने हंगेरीच्या बहुतांश भागावर वर्चस्व प्रस्थापित केलेले होते. त्यामुळे हळूहळू तुर्कस्थानच्या साम्राज्याचा विस्तार होत होता.सैनिकांचे नेतृत्व स्वत: संत लॉरेन्स ह्यांनी केले. आपल्या हातात क्रूस घेऊन सर्वांसमोर मोठ्या आत्मविश्वासाने चालणात्या लॉरेन्सकडे पाहून त्याच्या सैनिकांना स्फूर्ती मिळाली. त्यांचा आवेश पाहून तुर्की सैन्य युद्धभूमीवरून सुसाट वेगाने पळत सुटले.काही वर्षांनी इ. स. १६०५ साली पोप महाशयांनी लॉरेन्स ह्यांना जर्मनीत पाठविले तेव्हा त्याने आपल्या स्वतःच्या समर्पित वृत्तीने आणि असंख्य चमत्कारांनी अनेक लोकांना ख्रिस्ताकडे आणले. लॉरेन्स २२ जुलै १६१९ साली मरण पावले आणि १८८१ साली त्यांना संतपद आणि धर्मपंडित ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.प्रभू येशूने केलेल्या अनेक चमत्कारांचा जवळून अनुभव घेतलेला असतांना सुद्धा शास्त्री - परुश्यांनी प्रभू येशू जवळ चिन्हाची मागणी केली. शास्त्री परुशी जसे प्रभू येशूच्या बाबतीत वागले तसेच आपण सुद्धा वागू शकतो. कारण बऱ्याचवेळी आपण| खऱ्याअर्थाने आपण प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नाहीत. आपण आज चिंतन करीत असताना स्वत:ला प्रश्न विचारु या, मी खरोखरच प्रभू येशूला ओळखतो का? आपल्या घरात किंवा चर्चमध्ये आपण केवळ ख्रिस्ताचा क्रुस पाहतो. आतापर्यंत प्रभू येशूने आपल्या जीवनात कितीतरी चमत्कार केले आहेत, आज आपण ख्रिस्ताला पाहण्यासाठी व त्याचे प्रेम अनुभवण्यासाठी श्रद्धेचे डोळे उघडू या आणि अंत:करण मोकळे करु या. प्रभूला अनुभवण्यासाठी अंतर्मूख बनू या.
पहिले वाचन :मीखा ७:१४-१५.१८-२०वाचक : मीखा या पुस्तकातून घेतलेले वाचन
तू आकडी घेऊन आपल्या लोकांना चार, तुझ्या वतनातील मेंढरे कार्मेल डोगराच्या झाडीत एकांती राहतात त्यांना चार; प्राचीनकाळच्या दिवसाप्रमाणे बाशानात आणि गिलादात यांना चरू दे. तू इजिप्त देशातून बाहेर निघालास त्या दिवसांप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्ये दाखवीन. तुजसमान देव कोण आहे ? तू अधर्माची क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकतोस. तो आपला राग सर्वकाळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. तो वळून पुन्हा आम्हावर दया करील, आमचे अपराध पायाखाली तुडवील. तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील. प्राचीन काळापासून तू आमच्या वडिलांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे याकोबबरोबर सत्यतेने आणि आब्राहामबरोबर वात्सल्याने वागशीलहा प्रभूचा शब्द आहे सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Micah 7:14-15, 18-20Shepherd your people with with your staff, the flock of your inheritance, who dwell alone in a forest in the midst of a garden land; let them graze in Bashan and Gilead as in the days of old. As in the days when you came out of the land of Egypt, I will show them marvellous things. Who is a God like you, pardoning iniquity and passing over transgression for the remnant of his inheritance? He does not retain his anger for ever, because he delights in steadfast love. He will again have compassion on us; he will tread our iniquities underfoot. You will cast all our sins into the depths of the sea. You will show faithfulness to Jacob and steadfast love to Abraham, as you have sworn to our fathers from the days of old.This is the word of God Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र :८५ : २-८
ब्रिन्डीसीचे संत लॉरेन्स
- वर्तनसाक्षी आणि धर्मपंडित (१५५९-१६१९)
इ. स. १६०२ साली त्यांना कंप्युचिन संघाने जनरलपदी निवडून दिले. तीन वर्षे त्यांनी जनरल पदाची धुरा अत्यंत कौशल्याने सांभाळली. परंतु तीन वर्षांनी त्यांची फेरनिवड झाली तेव्हा त्यांनी त्या निवडीस नम्रपणे नकार दिला.
इ. स. १५७१ साली लिपान्टो येथे झालेल्या युद्धात तुर्कीच्या सागरी फौजेचा युरोपने पूर्णपणे पाडाव केला होता. मात्र पुढे १५९५ साली सुलतान मोहमद तिसरा ह्याने हंगेरीच्या बहुतांश भागावर वर्चस्व प्रस्थापित केलेले होते. त्यामुळे हळूहळू तुर्कस्थानच्या साम्राज्याचा विस्तार होत होता.
सैनिकांचे नेतृत्व स्वत: संत लॉरेन्स ह्यांनी केले. आपल्या हातात क्रूस घेऊन सर्वांसमोर मोठ्या आत्मविश्वासाने चालणात्या लॉरेन्सकडे पाहून त्याच्या सैनिकांना स्फूर्ती मिळाली. त्यांचा आवेश पाहून तुर्की सैन्य युद्धभूमीवरून सुसाट वेगाने पळत सुटले.
काही वर्षांनी इ. स. १६०५ साली पोप महाशयांनी लॉरेन्स ह्यांना जर्मनीत पाठविले तेव्हा त्याने आपल्या स्वतःच्या समर्पित वृत्तीने आणि असंख्य चमत्कारांनी अनेक लोकांना ख्रिस्ताकडे आणले. लॉरेन्स २२ जुलै १६१९ साली मरण पावले आणि १८८१ साली त्यांना संतपद आणि धर्मपंडित ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रभू येशूने केलेल्या अनेक चमत्कारांचा जवळून अनुभव घेतलेला
असतांना सुद्धा शास्त्री - परुश्यांनी प्रभू येशू जवळ चिन्हाची मागणी केली. शास्त्री परुशी जसे प्रभू येशूच्या बाबतीत वागले तसेच आपण सुद्धा वागू शकतो. कारण बऱ्याचवेळी आपण| खऱ्याअर्थाने आपण प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नाहीत.
आपण आज चिंतन करीत असताना स्वत:ला प्रश्न विचारु या, मी खरोखरच प्रभू येशूला ओळखतो का? आपल्या घरात किंवा चर्चमध्ये आपण केवळ ख्रिस्ताचा क्रुस पाहतो. आतापर्यंत प्रभू येशूने आपल्या जीवनात कितीतरी चमत्कार केले आहेत, आज आपण ख्रिस्ताला पाहण्यासाठी व त्याचे प्रेम अनुभवण्यासाठी श्रद्धेचे डोळे उघडू या आणि अंत:करण मोकळे करु या. प्रभूला अनुभवण्यासाठी अंतर्मूख बनू या.
पहिले वाचन :मीखा ७:१४-१५.१८-२०
वाचक : मीखा या पुस्तकातून घेतलेले वाचन
तू आकडी घेऊन आपल्या लोकांना चार, तुझ्या वतनातील मेंढरे कार्मेल डोगराच्या झाडीत एकांती राहतात त्यांना चार; प्राचीनकाळच्या दिवसाप्रमाणे बाशानात आणि गिलादात यांना चरू दे. तू इजिप्त देशातून बाहेर निघालास त्या दिवसांप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्ये दाखवीन. तुजसमान देव कोण आहे ? तू अधर्माची क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकतोस. तो आपला राग सर्वकाळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. तो वळून पुन्हा आम्हावर दया करील, आमचे अपराध पायाखाली तुडवील. तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील. प्राचीन काळापासून तू आमच्या वडिलांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे याकोबबरोबर सत्यतेने आणि आब्राहामबरोबर वात्सल्याने वागशील
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Micah 7:14-15, 18-20
Shepherd your people with with your staff, the flock of your inheritance, who dwell alone in a forest in the midst of a garden land; let them graze in Bashan and Gilead as in the days of old. As in the days when you came out of the land of Egypt, I will show them marvellous things. Who is a God like you, pardoning iniquity and passing over transgression for the remnant of his inheritance? He does not retain his anger for ever, because he delights in steadfast love. He will again have compassion on us; he will tread our iniquities underfoot. You will cast all our sins into the depths of the sea. You will show faithfulness to Jacob and steadfast love to Abraham, as you have sworn to our fathers from the days of old.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र :८५ : २-८
