पुनरुत्थानकाळ पांचवा सप्ताह
बुधवार दि. ६ मे २०२६
"मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे.
I am the true vine; and my Father is the gardener.
संत डॉमणिक सावियो
वर्तनसाक्षी (१८४२-१८५७)
चार्ल्स आणि ब्रिजेट ह्यांच्या पोटी २ एप्रिल १८४२ साली डॉमनिक सावियो नामक पुत्ररत्न जन्माला आले. उत्तर इटलीतील मुरियाल्डो येथे डॉमणिकचे कुटुंब राहात होते. डॉन बॉस्को या महान युगप्रवर्तकाचा हा लाडका शिष्य बालपणापासूनच अत्यंत प्रार्थनामय जीवन जगत होता.
डॉमणिक सावियोच्या धार्मिकतेला त्याच्या घरी आणि घराजवळच असलेल्या देवळात भरपूर खतपाणी मिळत गेले. त्याचे आईवडील आणि घरातील श्रद्धाळू वातावरण ह्यामुळे देवाकडून मोठमोठी कृपादाने स्वीकारण्यासाठी डॉमणिक सावियोचे अंत:करण विशाल बनले. त्यांच्या घराशेजारी असलेल्या देवळात फा. जॉन बॉस्को नावाचे एक उमदे व्यक्तीमत्व हसतखेळत मुलांवर धार्मिक संस्कार करीत होते. त्यांच्यात गाणी, गोष्टी, जादू अशा माध्यमातून देवाविषयी आदर व पवित्र मरियेविषयी भक्तीभाव जागृत करीत होते. त्यांनी किशोरवयातील डॉमणिक ह्याला देवावर संपूर्ण हृदयाने प्रेम करायला शिकविले.
डॉमणिक दररोज सकाळी ५.०० वा. मिस्साअर्पणाला न चुकता हजेरी लावीत असे. तिथे वेदीसेवा करणे, मिस्सानंतर वैयक्तिक प्रार्थना करणे ह्यात तो वेळ घालवित असे. ऊन असो, वारा असो, पाऊस असो किंवा कडाक्याची थंडी असो, हा मुलगा अत्यंत विश्वासाने व प्रेमाने आपली धार्मिक कर्तव्ये बजावीत असे.
देवावर प्रेम करणे आणि इतरांना देवावर प्रेम करण्यास प्रवृत्त करणे ह्यात असणाच्या पारमार्थिक आनंदाचा अनुभव या बालकाने फा. जॉन बॉस्को ह्यांच्याकडून घेतलेला होता. पोप पायस दहावे ह्यांनी तर या बालकाविषयी पुढील गौरवोद्गार काढलेले होते. जीवनातील अखेरचा श्वास घेईपर्यंत ज्या बालकाने आपल्या स्नानसंस्काराच्या वेळी मिळालेल्या ख्रिस्ती प्रतिष्ठेला कधीही कलंक लावू दिला नाही. तो किशोरवयीन बालक निश्चितच संत मानला गेला पाहिजे.
वयाच्या पंधराव्या वर्षी तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असे जीवन जगत होता. आध्यात्मिक क्षेत्रात तो अत्यंत पारंगत झालेला होता.९ मार्च १८५७ रोजी मृत्यूशय्येवर खिळलेला असताना डॉमणिकला एक स्वर्गीय दृष्टांत झाला आणि तो हर्षातिशयाने ओरडला, “अरे वा! काय सुंदर दृश्य आहे हे ! "
शंभर वर्षे त्याच्या जीवनाविषयी सखोल अभ्यास करण्यात आला. शेवटी त्याला संतपद देण्याचे ठरले. १२ जून १९५४ साली आयोजित करण्यात आलेल्या त्याच्या भव्य संतीकरण सोहळ्यात पोप पायस बारावे ह्यांनी पुढीलप्रमाणे डॉमणिक सावियो ह्याच्या जीवनाचा आढावा घेतला. “आजच्या युगात युवकांच्या हृदयातून सत्प्रवृत्ती समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असताना केवळ १५ वर्षीय डॉमणिक सावियो ह्याला आल्ताराचा बहुमान देण्यास आम्हाला विशेष आनंद होत आहे. सर्व युवकांनी डॉमणिक सावियोचे अनुकरण करावे असे आदर्श जीवन तो जगला. ”
मी मोठमोठ्या गोष्टी करू शकत नाही, परंतु जे काही मी करीन ते अगदी लहानातली लहान गोष्टसुद्धा देवाच्या महान गौरवासाठी करीन. - संत डॉमणिक सावियो
✝️
पहिले वाचनप्रेषितांचे कृत्ये १५:१-६
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“ह्या वादासंबंधाने येरुशलेमातले प्रेषित आणि वडीलजन ह्यांच्याकडे पौल आणि बर्णबा ह्यांनी आणि त्यांच्यापैकी इतर काहींनी जावे असे ठरवण्यात आले. "
काही प्रेषितांनी यहुदियाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली : “मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची : सुंता झाल्यावाचून तुमचे तारण होणे शक्य नाही. तेव्हा पौल आणि बर्णबा ह्याचा त्यांच्याशी बराच मतभेद आणि वादविवाद झाल्यावर असे ठरवण्यात आले की, पौल व बर्णबा ह्यांनी आणि त्यांच्यापैकी इतर काहीनी ह्या वादासंबंधाने येरुशलेमातले प्रेषित आणि वडीलवर्ग ह्यांच्याकडे जावे. मग मंडळीने त्यांची रवानगी केल्यावर ते फेनिके आणि शोमरोन ह्यांमधून गेले आणि परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले. नंतर ते येरुशलेमला पोहचल्यावर तेथील मंडळी, प्रेषित आणि वडीलवर्ग ह्यांनी त्यांचे आगतस्वागत केले. तेव्हा आपण देवाच्या सहवासात असताना त्याने जे जे घडवले ते त्यांनी सांगितले. तरीपण परुशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे पुढे येऊन म्हणाले, “त्यांची सुंता झालीच पाहिजे आणि मोशेचे नियमशास्त्र पाळावयाची त्यांना आज्ञा केलीच पाहिजे." मग प्रेषित आणि वडीलवर्ग ह्या प्रकरणाचा विचार करण्यासाठी जमले.
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
: Acts 15: 1-6
And some coming down from Judea, taught the brethren: That except you be circumcised after the manner of Moses, you cannot be saved. And when Paul and Barnabas had no small contest with them, they determined that Paul and Barnabas, and certain others of the other side, should go up to the apostles and priests to Jerusalem about this question. They therefore being brought on their way by the church, passed through Phenice, and Samaria, relating the conversion of the Gentiles; and they caused great joy to all the brethren. And when they were come to Jerusalem, they were received by the church, and by the apostles and ancients, declaring how great things God had done with them. But there arose some of the sect of the Pharisees that believed, saying: They must be circumcised, and be commanded to observe the law of Moses. And the apostles and ancients assembled to consider of this matter.
This is the word of God
प्रतिसाद स्तोत्र १२२: १-५
प्रतिसाद : आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ.
१) "आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ"
असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.
हे येरुशलेम, तुझ्या दारात आमचे पाय उभे आहेत.
२) हे येरुशलेम, मजबूत रचलेल्या
नगरीसारखी तू बांधलेली आहेस.
तुझ्याकडे वंश परमेश्वराचे वंश चढून जातात.
३) कारण परमेश्वराच्या नामाचे उपकारस्मरण
करणे होच इस्त्राएलची साक्ष होय.
तेथे न्यायासने, दावीदाच्या घराण्याची
सिंहासने मांडली आहेत.
Psalm 122: 1-2, 3-4ab, 4cd-5
R. (1) Let us go rejoicing to the house of the Lord.
1 I rejoiced at the things that were said to me: We shall go into the house of the Lord.
2 Our feet were standing in thy courts, O Jerusalem.
R. Let us go rejoicing to the house of the Lord.
3 Jerusalem, which is built as a city, which is compact together.
4ab For thither did the tribes go up, the tribes of the Lord.
R. Let us go rejoicing to the house of the Lord.
4cd the testimony of Israel, to praise the name of the Lord.
5 Because their seats have sat in judgment, seats upon the house of David.
R. Let us go rejoicing to the house of the Lord.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
आलेलुया !
Acclamation:
Alleluia, alleluia.
Remain in me as I remain in you, says the Lord. Whoever remains in me will bear much fruit
शुभवर्तमान योहान १५:१-८
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहा. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुझ्यामध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिल्यावाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहा. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणितसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला आणि माझी वचने तुम्हांमध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हांला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल."
"प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
John 15: 1-8
I am the true vine; and my Father is the gardener. Every branch in me, that beareth not fruit, he will take away: and every one that beareth fruit, he will purge it, that it may bring forth more fruit.
Now you are clean by reason of the word, which I have spoken to you. Abide in me, and I in you. As the branch cannot bear fruit of itself, unless it abide in the vine, so neither can you, unless you abide in me. I am the vine: you the branches: he that abideth in me, and I in him, the same beareth much fruit: for without me you can do nothing. If any one abide not in me, he shall be cast forth as a branch, and shall wither, and they shall gather him up, and cast him into the fire, and he burneth. If you abide in me, and my words abide in you, you shall ask whatever you will, and it shall be done unto you.In this is my Father glorified; that you bring forth very much fruit, and become my disciples.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: ख्रिस्तामध्ये एकताः प्रारंभीच्या ख्रिस्ती समुदायासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा - राहिला अन्यजातींना आणि नियमांना कसे हाताळायचे? प्रेषित आणि ज्येष्ठ मंडळी एकत्र आली, त्यांनी चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला आणि चर्चची एकता टिकवली. शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांना द्राक्षवेल आणि फांद्या या उदाहरणाद्वारे शिकवतो. तो सांगतो की जो - माझ्यात राहतो, तो भरपूर फळे - देईल. एकतेचे सौंदर्य अनुभवण्यासाठी, आपल्याला स्वतःच्या स्वार्थाचा आणि इच्छा-आकांक्षांचा त्याग करावा - लागतो. 'मी' मरण पावले पाहिजे, आणि -'आपण' जन्माला आले पाहिजे. जेव्हा - आपण इतरांच्या आणि समुदायाच्या - गरजांना आपल्या स्वतःच्या गरजांपेक्षा अधिक महत्त्व देतो, तेव्हा आपण अशी - नाती निर्माण करतो जी भेदभावां पलीकडे जातात. चला, आपण आपला अहंकार, अभिमान आणि स्वार्थी हेतू बाजूला ठेवूया. असे केल्याने आपल्याला ख्रिस्ताच्या देहामध्ये म्हणजेच चर्चमध्ये एक खोल एकात्मता, उद्देश आणि आपलेपणाची जाणीव मिळेल. एकत्र येऊन आपण अधिक बलवान, तेजस्वी आणि एकदिलाने बांधलेला समुदाय होऊ. ख्रिस्तामध्ये एक म्हणून उभे राहू!
प्रार्थना :- हे प्रभू येशू, तुझ्यामध्ये राहिल्या वाचून जीवन नाही, हे जाणण्यास व तुझ्या वचनाप्रमाणे जीवन आचरण करण्यास कृपा दे, आमेन.

0 टिप्पण्या