Marathi Bible Reading | 4th Week of Easter | Saturday 2nd May 2026

 पुनरुत्थान चौथा आठवडा  

शनिवार  दि. २ मे २०२६

ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे, तर आम्हांला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस ?Whoever has seen me has seen the Father. How can you say, 'Show us the Father'? 


संत अथनेशियस
- महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपाल, धर्मपंडित (२९५-३७३)

अथनेशियस हे इजिप्तमधल्या आलेक्झांड्रिया शहराचे रहिवासी होते. आलेक्झांड्रिया हे शहर त्या काळात एक मोठे व्यापारी केंद्र होते. तसेच तत्वज्ञान ईशज्ञानाचे शिक्षणकेंद्र होते. अशा वातावरणात अथनेशियस ह्यांचे बालपण एका उच्चभ्रू ख्रिस्ती कुटुंबात गेले. तरुण असतानाच तो ज्ञानपिपासू बनलेला होता. तसेच त्याला भक्ती-श्रद्धा-देव-धर्म ह्याची विलक्षण आवड होती.
अथनेशियस केवळ उपधर्मगुरू असताना आलेक्झांड्रियाच्या पेट्रिआर्कने त्याला आपला सचीव म्हणून निवडून घेतले. ते त्याच्याकडे धर्माच्याबाबतीत सल्लाही मागत असत. इ. स. ३२५ साली नायसिया येथे भरलेल्या परिषदेसाठी त्यांनी अथनेशियस ह्यांना आपणाबरोबर नेले. याच परिषदेत एरियस नावाच्या पाखंडमतवाद्याला धर्मबहिष्कृत केले आणि ख्रिस्ताचे ईश्वरी रुप जगापुढे ठामपणे जाहीर केले. 
संत अथनेशियस हे एक सिद्धहस्त लेखक होते. येशूच्या देहधारणेवर त्यांनी उपधर्मगुरू असतानाच लेखन केले होते. आपल्या तिसऱ्या हद्दपारीच्या वेळी इजिप्तच्या अरण्यातील मठवाश्यांसह राहत असताना त्यांनी “एरियनवादाचा इतिहास” हा ग्रंथ लिहिला. त्यांनी लिहिलेल्या "लाईफ ऑफ सेंट अँथनी" ह्या पुस्तकामुळे सर्वत्र व्रतस्थ व विरक्त जीवनाला उधाण आले होते.
चिंतन : "केवळ पाप टाळण्यात कसली आलीय नीतिमत्ता? उलट चांगले टाळणे हेही पापच नव्हे काय? एकच नियम असता उलट फिरविता येतो.” संत अथनेशियस

पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १३:४४-५२
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"पाहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो."
पुढल्या शब्बाथ दिवशी बहुतेक सर्व नगर देवाचे वचन ऐकावयाला जमले. पण लोकसमुदायाला पाहून यहुदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले. तेव्हा पौल आणि बर्णबा हे निर्भीडपणे म्हणाले; “देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगावयाचे अगत्य होते. तरी ज्याअर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता आणिआपणांला सार्वकालिक जीवनाकरता अयोग्य ठरवता त्याअर्थी पाहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो. कारण प्रभूने आम्हांला आज्ञा दिली आहे की, मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असे करून ठेवले आहे, ह्यासाठी की, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण व्हावेस.”
हे ऐकून परराष्ट्रीय आनंदित झाले आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णिला. तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास ठेवला आणि प्रभूचे वचन सर्व प्रांतात पसरत गेले. तेव्हा यहुदी लोकांनी भक्तिमान आणि कुलीन स्त्रियांना आणि नगरातील मुख्य पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालवून दिले. त्यामुळे ते आपल्या पायांची धूळ त्यांच्यावर झटकून इकुन्या येथे गेले. इकडे शिष्य आनंदाने आणि पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Acts 13:44-52
 The next Sabbath almost the whole city gathered to hear the word
of the Lord. But when the Jews saw the crowds, they were filled with jealousy, and began to contradict what was spoken by Paul, reviling him. And Paul and Barnabas spoke out boldly, saying, "It was necessary that the word of God be spoken first to you. Since you thrust it aside, and judge yourselves unworthy of eternal life, behold, we are turning to the Gentiles. For so the Lord has commanded us, saying, "I have made you a light for the Gentiles, that you may bring salvation to the ends of the earth." And when the Gentiles heard this, they began rejoicing and glorifying the word of the Lord, and as many as were appointed to eternal life believed. And the word of the Lord was spreading throughout the whole region. But the Jews incited the devout women of high standing and the leading men of the city, stirred up persecution against Paul and Barnabas, and drove them out of their district. But they shook off the dust from their feet against them and went to Iconium. And the disciples were filled with joy and with the Holy Spirit.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ९८:१-४
प्रतिसाद :   पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.
१. नवीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा, 
कारण त्याने अलौकिक कृत्ये केली आहेत.
 त्याने आपल्या हाताने आणि पवित्र बाहुबलाने 
विजय संपादन केला आहे.

२.  प्रभूने आपल्या विजयाची द्वाही फिरवली आहे. 
राष्ट्रांसमक्ष आपली न्यायपरायणता प्रकट केली आहे.
 इस्राएलच्या घराण्यावरील आपले अढळ प्रेम 
आणि निष्ठा यांची त्याने आठवण ठेवली आहे.

३ पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांनी 
आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.
पृथ्वीवरील सर्व लोकहो, प्रभूचा जयजयकार करा 
जयघोष करून आनंदाने गा. त्याचे गुणगान गा.


Psalm 98:1, 2-3ab, 3cd-4

All the ends of the earth have seen the salvation of our God.

O sing a new song to the Lord, 
for he has worked wonders. 
His right hand and his holy arm 
have brought salvation. R

The Lord has made known his salvation, 
has shown his deliverance to the nations.
He has remembered his merciful love 
and his truth for the house of Israel. R

All the ends of the earth have seen
 the salvation of our God. 
Shout to the Lord, all the earth; 
break forth into joyous song, 
and sing out your praise. R


जयघोष  

आलेलुया, आलेलुया! 
असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे.
आलेलुया !

Acclamation: 
If you abide in my word, you are truly my disciples, and you will know the truth, says the Lord.


शुभवर्तमान   योहान १४:७-१४
वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे."

येशूने त्याच्या शिष्यांना म्हटले, "मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर तुम्ही माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता आणि तुम्ही त्याला पाहिलेही आहे."
फिलीप त्याला म्हणाला, "प्रभो, आम्हांला पिता दाखवा म्हणजे आम्हांला पुरे आहे." येशूने त्याला म्हटले, “फिलीप मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय ? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे, तर आम्हांला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस ? मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय ? ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगतो त्या मी आपल्या स्वतःच्या सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्ये करतो. मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना, नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना."
मी तुम्हांला सत्य तेच सांगतो, मी जी कृत्ये करतो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावा म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन." 
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 14:7-14

At that time: Jesus said to his disciples, "If you had known me, you would have known my Father also. From now on you do know him and have seen him." Philip said to him, "Lord, show us the Father, and it is enough for us." Jesus said to him, "Have I been with you so long, and you still do not know me, Philip? Whoever has seen me has seen the Father. How can you say, 'Show us the Father'? Do you not believe that I am in the Father and the Father is in me? The words that I say to you I do not speak on my own authority, but the Father who dwells in me does his works. Believe me that I am in the Father and the Father is in me, or else believe on account of the works themselves. Truly, truly, I say to you, whoever believes in me will also do the works that I do; and greater works than these will he do, because I am going to the Father. Whatever you ask in my name, this I will do, that the Father may be glorified in the Son. If you ask me for anything in my name, I will do it."
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनविश्वासात पुढे चालत राहाः पौल व बर्नाबास यांना नाकारले गेले पौल आणि बर्नाबास यांना यहुद्यांकडून नकार आणि छळाचा सामना करावा लागला, पण त्यांनी धैर्याने घोषित केले की आता ते अन्यजातींकडे वळतील. शुभवर्तमानात, येशू आपल्या शिष्यांना देवाच्या प्रेमाचे अद्वितीय स्वरूप शिकवतो आणि हे स्पष्ट करतो की तोच पित्याकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे.पौल आणि बर्नाबासप्रमाणेच, आपल्यालाही जीवनात अनेक अडथळे
आणि आव्हानांचा सामना करावा लागेल, पण आपण कधीच हार मानू नये. जेव्हा अडथळे येतात, तेव्हा नदीसारखे व्हा दिशा बदला, जुळवून घ्या, आणि आपल्या उद्दिष्टाकडे पोहोचण्यासाठी नवे मार्ग शोधा. पुढे चालत राहा! आजही अनेक जण फिलिपप्रमाणे विचारतात, "आम्हाला पिता दाखव."पण आपण ख्रिस्ती म्हणून त्याला जगासमोर प्रकट करत आहोत का? आपली कृत्ये, आपले शब्द आणि आपली वृत्ती जगाला देवाच्या चांगुलपणाची झलक दाखवतात का ?

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझी वचने आत्मसात करून विश्वासाने, धैर्याने व प्रेमाने तुझी सेवा करण्यास आम्हांला पात्र बनव, आमेन..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या