पुनरुत्थान तिसरा सप्तह
शुक्रवार दि. २४ एप्रिल २०२६
जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. Whoever feeds on my flesh and drinks my blood abides in me, and I in him.

संत फिदेलिस
रक्तसाक्षी (१५७८-१६२२)
आत्यंतिक गरिबीमध्ये असताना फा. फिदेलिस ह्यांनी आल्प्स पर्वताच्या प्रदेशातून प्रवास केला. आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी ते केवळ देवाच्या चांगुलपणावर व उदारतेवर अवलंबून राहात. आपले संरक्षण करण्यासाठी त्यांच्या हाती कुठलेही शस्त्र नव्हते. क्रूस, रोझरी, बायबल, धर्मगुरूंचे प्रार्थना पुस्तक आणि कॅप्युचिन आचारसंहितेचे पुस्तक इतकीच त्यांची मालमत्ता होती. बऱ्याच वेळा ते ख्रिस्तमंदिरात किंवा उघड्या मैदानावर प्रवचने व उपदेश करीत असत. तत्कालीन प्रॉटेस्टंट पंथियांच्या धमक्यांना कुठलीही भीक न घालता अगदी निर्भीडपणे ते व्याख्याने देत असत.
पुष्कळ वेळा अशा उपदेशाव्यतिरिक्त ते नगरातील मोठमोठ्या हुद्यावर असणाऱ्या नागरी अधिकाऱ्यांवर आपलं लक्ष केंद्रित करीत, त्यांना ख्रिस्ती धर्मतत्वे समजावून सांगत. हे करीत असताना कधी कधी त्यांना रात्रीचे १२-१ देखील वाजत. परंतु कुठल्याही तहान-भूकेची तमा न बाळगता केवळ देवराज्याच्या प्रसारासाठी ते जागरण- प्रार्थना करीत. एकदा का एकाद्या मोठ्या अधिकाऱ्यांचे मनपरिवर्तन झाले की, त्याच्या मदतीने मोठ्या प्रमाणात इतर नागरिकांना ते देवाजवळ आणीत असत.
त्यांचे हे यश प्रॉटेस्टंट पंथातील अधिकारी वर्गाच्या डोळ्यांत न सलते तर नवलच! त्यांनी फा. फिदेलिस ह्यांच्या धार्मिक कार्यात अडथळे आणण्यासाठी राजकीय व्यवस्थेला शिकविण्यास सुरूवात केली. त्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी -२४ एप्रिल १६२२ रोजी फा. फिदेलीस ह्यांना प्रवचनपीठावरून ओढून खाली काढले. आपल्या कॅथलिक श्रद्धेपासून ते तसूभरही ढळण्यास तयार नव्हते. म्हणून त्यांच्यावर भाले आणि तरवारीचे वार करण्यात आले. त्यातच त्यांचा अंत झाला.
पोप बेनडिक्ट चौदावे ह्यांनी १७४६ साली त्यांना संतपद प्रदान केले. कॅप्युचिन संघातील आणि धर्मप्रसार आयोगातील ते पहिले रक्तसाक्षी मानले जातात.
चिंतन : “कॅथलिक धर्म हा युगायुगाचा धर्म” आहे. - संत फिदेलीस
पहिले वाचनप्रेषितांचे कृत्ये ९:१-२०
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"परराष्ट्रीयांसमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता शौल माझे निवडलेले पात्र आहे."
शौल प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे आणि त्यांचा घात करणे ह्याविषयीचे फुत्कार टाकीत होता. त्याने मुख्य याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिष्कातल्या सभास्थानांसाठी अशी पत्रे मागितली की, तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून येरुशलेममध्ये आणावे. मग जाता जाता असे झाले की, तो दिमिष्काजवळ येऊन पोहचला त्यावेळी अकस्मात प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने एक वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की, "शौल, शौल, माझा छळ का करतोस ?" तेव्हा तो म्हणाला, "प्रभो, तू कोण आहेस?" त्याने म्हटले, तू "ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. तर ऊठ आणि नगरात जा, म्हणजे तू तेथे काय करावयाचे हे तुला सांगण्यात येईल." त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडले नाही. मग शौलला जमिनीवरून उठवले तेव्हा त्याने डोळे उघडले, पण त्याला काही दिसेना. तेव्हा त्यांनी त्याला हाती धरून दिमिष्कात नेले. तेथे तो तीन दिवस आंधळ्यासारखा झाला आणि त्याने काही अन्नपाणी घेतले नाही.
इकडे दिमिष्कात हनन्या नावाचा कोणीएक शिष्य होता. त्याला प्रभू दृष्टान्तात म्हणाला, "हनन्या!" त्याने म्हटले, "काय प्रभू ?" प्रभू त्याला म्हणाला, "उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तासकर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर. कारण पाहा, तो प्रार्थना करीत आहे आणि हनन्या नावाचा एक मनुष्य, आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून आपणावर हात ठेवत आहे, असे त्याने पाहिले आहे." तेव्हा हनन्याने उत्तर दिले, "प्रभो, येरुशलेममधल्या तुझ्या पवित्र जनांचे हा माणसाने किती वाईट केले आहे हे मो पुष्कळांकडून ऐकले आहे आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बांधावे असा मुख्य याजकांपासून त्याला अधिकार मिळाला आहे. परंतु प्रभूने त्याला म्हटले, "जा, कारण परराष्ट्रीय राजे आणि इस्राएलची संतती ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे." आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागले हे मी त्याला दाखवीन. तेव्हा हनन्या निघून त्या घरी गेला आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, “शौलभाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले, त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी आणि तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे म्हणून मला पाठवले आहे." तत्क्षणी त्याच्या डोळ्यांवरून खपल्यासारखे काही पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली.
ह्यानंतर तो दिमिष्कातल्या शिष्यांबरोबर काही दिवस होता आणि त्याने लागलेच सभास्थानांमध्ये येशूविषयी घोषणा केली की, “तो देवाचा पुत्र आहे."
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Acts 9:1-20
Acts those days: Saul, still breathing threats and murder against the disciples of the Lord, went to the high priest and asked him for letters to the synagogues at Damascus, so that if he found any belonging to the Way, men or women, he might bring them bound to Jerusalem. Now as he went on his way, he approached Damascus, and suddenly a light from heaven shone around him. And falling to the ground, he heard a voice saying to him, "Saul, Saul, why are you persecuting me?" And he said, "Who are you, Lord?" And he said, "I am Jesus, whom you are persecuting. But rise and enter the city, and you will be told what you are to do." The men who were travelling with him stood speechless, hearing the voice but seeing no one. Saul rose from the ground, and although his eyes were opened, he saw nothing. So they led him by the hand and brought him into Damascus. And for three days he was without sight, and neither ate nor drank. Now there was a disciple at Damascus named Ananias. The Lord said to him in a vision, "Ananias." And he said, "Here I am, Lord." And the Lord said to him, "Rise and go to the street called Straight, and at the house of Judas look for a man of Tarsus named Saul, for behold, he is praying, and he has seen in a vision a man named Ananias come in and lay his hands on him so that he might regain his sight." But Ananias answered, "Lord, I have heard from many about this man, how much evil he has done to your saints at Jerusalem. And here he has authority from the chief priests to bind all who call on your name." But the Lord said to him, "Go, for he is a chosen instrument of mine to carry my name before the Gentiles and kings and the children of Israel. For I will show him how much he must suffer for the sake of my name." So Ananias departed and entered the house. And laying his hands on him he said, "Brother Saul, the Lord Jesus who appeared to you on the road by which you came has sent me so that you may regain your sight and be filled with the Holy Spirit." And immediately something like scales fell from his eyes, and he regained his sight. Then he rose and was baptized; and taking food, he was strengthened. For some days he was with the disciples at Damascus. And immediately he proclaimed Jesus in the synagogues, saying, "He is the Son of God."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ११७:१-२
प्रतिसाद : सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.
१) आलेलुया !
अहो सर्व राष्ट्रांनो, प्रभूचे स्तवन करा.
साऱ्या मानवांनो, त्याचे गुणगान गा.
२) त्याचे आमच्यावर अलोट प्रेम आहे,
प्रभूची सत्यता अनंतकाळ टिकते.
Psalm Psalm 117:1, 2
R. Go into all the world, and proclaim the Gospel.
O praise the Lord, all you nations;
acclaim him, all you peoples! R
For his merciful love has prevailed over us;
and the Lord's faithfulness endures forever. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही..
आलेलुया !
Acclamation:
Whoever feeds on my flesh and drinks my blood abides in me, and I in him, says the Lord.
शुभवर्तमान योहान ६:५२-५९
वाचक :योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"माझा देह खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे."
यहुदी आपसामध्ये वितंडवाद करू लागले आणि म्हणाले, "हा आपला देह आम्हांला खावयाला कसा देऊ शकतो ?" ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, "मी तुम्हांला सत्य ते सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही आणि त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हांमध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो आणि रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय. पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले. पण हे तसे नाही, ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल." कफर्णहूम येथे शिक्षण देत असताना त्याने सभास्थानात ह्या गोष्टी सांगितल्या.
"प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
John 6:52-59
At that time: The Jews disputed among themselves, saying, "How can this man give us his flesh to eat?" So Jesus said to them, "Truly, truly, I say to you, unless you eat the flesh of the Son of Man and drink his blood, you have no life in you. Whoever eats my flesh and drinks my blood has eternal life, and I will raise him up on the last day For my flesh is true food, and my blood is true drink. Whoever feeds on my flesh and drinks my blood abides in me, and I in him. As the living Father sent me, and I live because of the Father, so whoever feeds on me, he also will live because of me. This is the bread that came down from heaven, not like the bread the fathers ate, and died. Whoever feeds on this bread will live for ever." Jesus said these things in the synagogue, as he taught at Capernaum.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: प्रत्येक पाप्याचे भविष्य असते, प्रत्येक संताचा भूतकाळ असतोः आजच्या पहिल्या वाचनात्, आपण शौल, एक क्रर छळ करणारा, याचे नाट्यमय धर्मांतर पाहतो.
पौलात, ख्रिस्ताचा एक उत्साही सैनिक बनला. दमास्कसच्या रस्त्यावर येशूशी झालेल्या त्याच्या भेटीने सर्व काही बदलले. शुभवर्तमानात, येशू घोषित करतो, जोपर्यंत तुम्ही मनुष्याच्या पुत्राचे मांस खात नाही आणि त्याचे रक्त पीत नाही तोपर्यंत तुमच्यात जीवन नाही. पौलाचे धर्मांतर आपल्याला शिकवते की आपण स्वतः किंवा इतरांवर हार मानू नये, कारण प्रत्येक पापी व्यक्तीमध्ये एक संत असतो. पौलाप्रमाणे, आपण अडखळू शकतो आणि पडू शकतो, परंतु त्या क्षणी आपल्याला पुन्हा उठण्याची, अधिक मजबूत आणि शहाणे होण्याची संधी दिली जाते. आपण आपल्या चुका आपल्याला पराभूत करू देऊ नये; त्याऐवजी, त्यांना आपल्याला विजयी करू द्या. आपण आपल्या दोषांपेक्षा जास्त आहोत. देवाकडे आपल्याला रूपांतरित करण्याची, बरे करण्याची आणि आपण ज्या संतांमध्ये असायला हवे होते त्यामध्ये बनण्याची शक्ती आहे.
प्रार्थना :- हे प्रभू येशू, तुला अनुभवण्यास व तुझ्या वचनाप्रमाणे आचरण । करण्यास मला प्रेरणा व कृपा दे, आमेन
0 टिप्पण्या