Marathi Bible Reading | 2nd Week of Easter | Thursday 16th April 2026

पुनरुत्थान दुसरा सप्ताह 

गुरुवार दि. १६ एप्रिल २०२६

जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; 
Whoever believes in the Son has eternal life;



संत मेरी बर्नाडे सौबेरियस
( लुर्डस )


   गुरुवार दि. ११ फेब्रु. १८५८ रोजी शेकोटीसाठी आणि सरपणासाठी लाकडाच्या सुक्या फांद्या गोळा करण्यासाठी ती गेली होती. सोबत तिची बहीण मरिया आणि जीन नावाची मैत्रिण होती. नदीकिनारी असलेल्या गुहेत मासाबेलाच्या ग्रोटोमध्ये तिला एक दृश्य दिसले. एक अतिसौंदर्यवान स्त्री तिच्या नजरेस पडली. आपल्याबरोबर असलेल्या मरिया व जीन ह्यांच्याकडे तिने ह्या स्त्रीचे वर्णन केले. शुभ्र वस्त्रे पांघरलेली स्वर्गीय तेजसंपन्न अशी सोळा सतरा वर्षांची ती स्त्री होती.तिच्या कमरेभोवती आकाशी रंगाचा निळा पट्टा होता. डोक्यावरून, पाठीवरून रुळणारी पांढरी ओढणी होती..... तिचे पाय अनवाणी होते आणि दोन्ही पायांवर प्रत्येकी एक गुलाब होते. तिच्या उजव्या हातावर सफेद मण्यांची रोझरी जपमाळ होती.... त्या रोझरीची साखळी सोनेरी रंगाची होती. ते मणी, ती साखळी आणि गुलाब एका आगळ्याच तेजाने झळकत होती.

बर्नाडेट हिने वर्णन केलेली ती स्त्री तिला एकूण सतरा वेळा दिसली. काही प्रसंगी तिने तिच्याशी संभाषणही केले. दि. १८ फेब्रुवारी रोजी दिलेल्या दर्शनात तिने म्हटले, “मी तुला खूप आनंदी व सुखी करू इच्छिते. कदाचित या जगात तू आनंदी व सुखी होणार नाही. पुढील जीवनात तू नक्कीच सुखी समाधानी होशील.” त्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी ती म्हणाली. पश्चात्ताप करा ! २७ फेब्रुवारी रोजी तिने त्या दर्शनाच्या ठिकाणी एक छोटेसे प्रार्थनामंदिर बांधले जावे अशी सूचना केली. तर २५ मार्च रोजी आपण निष्कलंक गर्भसंभव असलेली माता मरिया असल्याचे तिने बर्नाडेट हिला प्रगट केले.

३ जून रोजी बर्नाडेट हिने आपला प्रथम पवित्र ख्रिस्तशरीर संस्कार स्वीकारला. तिला झालेल्या दृष्टांतावरून बराच वादंग माजला. तिची थट्टा मस्करी सुरू झाली. लुर्डस येथील ग्रोटोजवळ तिला सहज जाता येऊ नये म्हणून लुर्डसच्या  महापौरांनी त्या ग्रोटोभोवती तारेचे काटेरी कुंपण घातले. तरीही बर्नाडेटने त्याच अंतरावरून पवित्र मरियेचे दर्शन घेतले 

“आपण दु:खाचा स्वीकार प्रेमाने करायला शिकले पाहिजे. आपला प्रभू ज्यांच्यावर विशेष प्रेम करतो त्यांना काट्यांचा मुकूट प्रदान करतो. माझ्या क्रुसावरील बिछान्यात मी एखाद्या मखमली गादीवर बसलेल्या राणीपेक्षाही आनंदी आहे.” -  संत मेरी बर्नाडे सौबेरियस

पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये  ५:२७-३३
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 
  “ह्या गोष्टींविषयी आम्ही साक्षी आहोत आणि पवित्र आत्मापण साक्षी आहे."
जेव्हा सरदाराने आणि वडीलमंडळाने प्रेषितांना आणून न्यायसभेपुढे उभे केले, तेव्हा प्रमुख याजकाने त्यांना विचारले, “ह्या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हांस निक्षून सांगितले होते की नाही? तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने येरुशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आम्हांवर आणू पाहत आहा." परंतु पेत्रने आणि इतर प्रेषितांनी उत्तर केले, “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहीजे. ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले. त्याने इस्राएलला पश्चात्ताप आणि पापांची क्षमा ही देणगी देण्याकरिता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले. ह्या गोष्टींविषयी आम्ही साक्षी आहो आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे."
हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांस जिवे मारण्याचा विचार करू लागले.
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Acts  5:27-33
in those days: When the officers had brought the apostles, they set them ere the Council. And the high priest questioned them, saying "We strictly charged you not to teach in this name , yet here you have filled Jerusalem with your teaching and you intend to bring this man's blood upon us." But Peter and the postles answered, "We must obey God rather than men. The God of our fathers raised Jesus, whom you killed by hanging him on a tree. God exalted him at his right hand as Leader and Saviour, to give repentance to Israel and forgiveness of sins. And we are witnesses to these things, and so is the Holy Spirit, whom God has given to those who abey him." When they heard this, they were enraged and wanted to kill them.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसादस्तोत्र ३४:२, ९,१७-२०
प्रतिसाद :   मी पामराने धावा केला आणि प्रभूने तो ऐकला.

१) प्रभूचे धन्यवाद मी सदासर्वदा गाईन, 
त्याचे स्तवन सतत माझ्या मुखी असेल. 
प्रभू किती चांगला आहे हे अनुभव घेऊन पाहा. 
त्याच्यावर भाव ठेवणारा माणूस धन्य!

२ )प्रभूची दृष्टी सात्त्विकांकडे लागलेली असते, 
त्यांची हाक ऐकायला त्याचे कान उघडे असतात. 
सात्त्विक धावा करतात, प्रभू ऐकतो. 
तो सर्व संकटातून त्यांना सोडवतो.

३) ज्यांची कंबर खचली आहे अशांच्या जवळ प्रभू असतो. 
ज्यांचे अवसान गाळले आहे अशांचा तो उद्धार करतो. 
सात्त्विकांवर अनेक आपत्ती ओढवतात, 
पण प्रभू त्या सर्वांतून त्याला सोडवतो.


Palm 34:2 and 9, 17-18, 19-20
The lowly one called, and the Lord heard him.

I will bless the Lord at all times;
praise of him is always in my mouth. 
Taste and see that the Lord is good. 
Blessed the man who seeks refuge in him.

 The Lord turns his face against 
the wicked destroy their remembrance from the earth. 
When the just cry out, the Lord hears,
 and rescues them in all their distress. R 

The Lord is close to the broken-hearted; 
those whose spirit is crushed he will save. 
Many are the trials of the just man, 
but from them all the Lord will him. R

जयघोष  

आलेलुया, आलेलुया! 
प्रभूने म्हटले, “थोमा, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे.
पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य."
आलेलुया !
Acclamation: 
Have you believed, Thomas, because you have seen me? Says the Lord; blessed are those who have not seen and yet have believed.

शुभवर्तमान  योहान ३:३१-३६
वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे."
येशू निकदेमला म्हणाला, “जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीचा आहे व ऐहिक गोष्टी बोलतो, जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे. जे त्याने पाहिले आहे आणि ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो आणि त्याची साक्ष कोणी मानीत नाही. ज्याने त्याची साक्ष मान्य केली त्याने देव सत्य आहे ह्या गोष्टींवर शिक्कामोर्तब केले आहे. कारण ज्याला देवाने पाठवले तो देवाची वचने बोलतो, तो आत्मा मोजून मापून देत नाहीन. पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे. जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो."
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 3:31-36
"He who comes from above is above all. He who is of the earth belongs to the earth and speaks in an earthly way. He who comes from heaven is above all. He bears witness to what he has seen and heard, yet no one receives his testimony. Whoever receives his testimony sets his seal to this, that God is true. For he whom God has sent utters the words of God, for he gives the Spirit without measure. The Father loves the Son and has given all things into his hand. Whoever believes in the Son has eternal life; whoever does not obey the Son shall not see life, but the wrath of God remains on him.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
 
चिंतनयेशू आपल्या जगण्याचे कारणः प्रेषितांची कृत्ये यात आपण प्रेषितांना उभे असलेले पाहतो न्यायसभेसमोर, जोखीम असूनही ते धैर्याने सुवार्तेची घोषणा करत होते. ते ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्यास तयार होते. योहानाच्या शुभवर्तमानात, येशू घोषित करतो की जो स्वर्गातून येतो तो त्याने जे पाहिले आणि ऐकले त्याची साक्ष देतो. आपण अनुभवलेल्या सत्याची साक्ष देण्यासाठी आपल्याला बोलावले आहे. आपली साक्ष इतरांसोबत शेअर करण्याचे धाडस आपल्यात आहे का? आपण प्रेषितांच्या धैर्याने आणि दृढनिश्चयाने भरलेले असू या. ते छळ सहन करू शकले कारण त्यांना माहीत होते की ते कशासाठी उभे आहेत. जगण्याच्या कारणामुळे आपले अस्तित्व बदलते. ख्रिश्चन म्हणून, आपले कारण येशू ख्रिस्त आहे. तो आपल्याला उद्देश, अर्थ आणि आशा देतो. त्याच्यासोबत, आपण जीवनातील आव्हानांना तोंड देऊ शकतो, अडथळ्यांवर मात करू शकतो आणि आनंदाने, उत्कटतेने आणि दिशेने जगू शकतो. येशू हे आपले जगण्याचे कारण आहे.

प्रार्थना :हे सर्व समर्थ प्रभू परमेश्वरा, तुला सर्वस्वी शरण येण्यास व तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या