पुनरुत्थान तिसरा सप्तह
गुरुवार दि. २३ एप्रिल २०२६
ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही."No one can come to me unless the Father who sent me draws him. And I will raise him up on the last day.

संत जॉर्ज
रक्तसाक्षी (४ थे शतक)
ह्या सुप्रसिद्ध संताविषयी आपल्याला केवळ इतकेच ठाऊक आहे की, डायोक्लेशियन ह्यांच्या छळवादी कारकीर्दीमध्ये पॅलेस्टाईनमधल्या डायस्पोलिस ( लिडीया) येथे त्यांना रक्तसाक्षीत्वाचे मरण आले. गालील समुद्राच्या पूर्वेकडे असलेल्या त्राकोनिरीस जिल्ह्यात त्याची भक्ती पूर्वापार चालत आलेली आहे. इ. स. ३६७ सालचा एक शिलालेख त्यांच्या रक्तसाक्षीत्वाचा मुख्य पुरावा मानला जातो. त्यात लिडियाचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे.
सहाव्या शतकाच्या प्रारंभीस बरेच यात्रेकरू तीर्थयात्रेसाठी जात असत. त्याच ठिकाणी इ. स. १८६८ साली त्यांची खाच पुन्हा एकदा नव्याने उकरून काढण्यात आली. ग्रीक लोकांनी त्यांना सैनिकांचा आश्रयदाता म्हणून गौरविले आहे. त्या ठिकाणी तो एक महान रक्तसाक्षी म्हणून प्रसिद्ध आहे.
श्चात्य ख्रिस्तसभेत संत जॉर्ज हे सेनापती हुतात्मा म्हणून सर्वपरिचित आहेत. सेनापतींचा आदर्श आणि स्त्रियांचा कैवारी म्हणून त्यांना सन्मानीत करण्यात आलेले आहे. इ. स. ४९५ साली पोप जेलाशियस हे संत जॉर्जची महत्कृत्ये ह्यांचा उल्लेख करताना आढळतात. परंतु ही त्यांची महत्कृत्ये केवळ देवालाच ठाऊक असे त्यांचे म्हणणे होते. अजगराला ठार मारणाऱ्या संत जॉर्जचे चित्र अगदी अलिकडचे आहे. एक गोष्ट मात्र खरी आहे की अगदी प्रारंभापासून ख्रिस्तसभेत मानाचे स्थान मिळविलेल्या रक्तसाक्षी संतांमध्ये संत स्तेफानच्या पाठोपाठ संत जॉर्ज ह्यांचे नाव घेतले जाते.
ख्रिस्तसभेने गौरविलेल्या १४ पवित्र मदतनीसांच्या यादीमध्ये संत जॉर्जचा समावेश केला जातो. तो इंग्लंड, जर्मनी, पोर्तुगाल ह्या देशांचा आणि व्हेनिस व जिन्हेवा ह्या शहरांचा आश्रयदाता संत मानला जातो. पोप बेनेडिक्ट १४ वे ह्यांनीच त्याला इंग्लंडचा आश्रयदाता हा किताब बहाल केलेला होता. स्काऊट्सची मुले, शेतकरी ह्यांचाही तो आश्रयदाता होय. तापाने फणफणणाऱ्या लोकांसाठी संत जॉर्जचा धावा केला जातो.
परमेश्वराला आपल्या जीवनात अग्रक्रम व प्राधान्य दिल्याने सर्व काही त्याच्या इच्छेप्रमाणे घडत असते. आपल्या श्रद्धेचा प्रवास जरी अंधकारमय वाटला तरी पैलतीरी जीवनाचा प्रकाश आहे, हे श्रद्धावान माणूस जाणतो.आपले जीवन हे देवाचे दान आहे. मी व माझे असे काहींच नाही तर माझ्या जीवनाचा धनी तोच विधाता आहे. माझा श्वाससुद्धा त्याचाच आहे, अशी भावना ज्या माणसात निर्माण होते तेथे श्रद्धेचा अंकूर वाढत असतो.
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये ८:२६-४०
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"जर तू तुझ्या संपूर्ण अंत:करणाने विश्वास ठेवलास तर तुला बाप्तिस्मा मिळेल. "
प्रभूच्या दूताने फिलीपला म्हटले, "ऊठ, जी वाट येरुशलेमपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा. ती ओसाड आहे." मग तो उठला व निघाला, तेव्हा पाहा, एक कुशी षंढ, कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता आणि त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते, तो येरुशलेममध्ये उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचीत होता. तेव्हा आत्म्याने फिलीपला सांगितले, "तू जाऊन त्याचा रथ गाठ." फिलीप धावत गेला आणि त्याने यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, "आपण जे वाचत आहा ते आपल्याला समजते काय ?" त्याने म्हटले, "कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार?" मग त्याने फिलीपला आपल्याजवळ येऊन बसावयास वर बोलावले. तो जो शास्त्रलेख वाचीत होता तो असा :
त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले आणि जसे कोकरू कातरणाऱ्याच्या पुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडत नाही. त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला. तेव्हा षंढाने फिलीपला म्हटले, "मी तुम्हाला विनंतीपूर्वक विचारतो, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वत:विषयी की दुसऱ्या कोणाविषयी ?" तेव्हा फिलीपने बोलायला आरंभ केला आणि ह्या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली. मग वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले, तेव्हा पंढ म्हणाला, “पाहा, हे पाणी! मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?" तेव्हा त्याने रथ उभा करायला सांगितले आणि फिलीप आणि षंढ असे ते दोघे पाण्यात उतरले आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. मग ते पाण्यावरुन वर आले तोच प्रभूचा आत्मा फिलीपला घेऊन गेला म्हणून तो पुन्हा षंढाच्या दृष्टीस पडला नाही. नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करीत चालला. इकडे फिलीप अजोत नगरात आढळला आणि कैसरिया येथे येईपर्यंत त्याला वाटेत जी जी गावे लागली त्यातून जाताना त्याने सुवार्ता सांगितली.
First Reading :
Acts 8:26-40
In those days: An angel of the Lord said to Philip, "Rise and go towards the south to the road that goes down from Jerusalem to Gaza." This is a desert place. And he rose and went. And there was an Ethiopian, a eunuch, a court official of Candace, queen of the Ethiopians, who was in charge of all her treasure. He had come to Jerusalem to worship and was returning, seated in his chariot, and he was reading the prophet Isaiah. And the Spirit said to Philip, "Go over and join this chariot." So Philip ran to him and heard him reading Isaiah the prophet and asked, "Do you understand what you are reading?" And he said, "How can I, unless someone guides me?" And he invited Philip to come up and sit with him. Now the passage of the Scripture that he was reading was this: "Like a sheep he was led to the slaughter and like a lamb before its shearer is silent, so he opens not his mouth. In his humiliation justice was denied him. Who can describe his generation? For his life is taken away from the earth." And the eunuch said to Philip, "About whom, I ask you, does the prophet say this, about himself or about someone else?" Then Philip opened his mouth, and beginning with this Scripture told him the good news about Jesus. And as they were going along the road they came to some water, and the eunuch said, "See, here is water! What prevents me from being baptised?" And he commanded the chariot to stop, and they both went down into the water, Philip and the eunuch, and he baptised him. And when they came up out of the water, the Spirit of the Lord carried Philip away, and the eunuch saw him no more, and went on his way rejoicing. But Philip found himself at Azotus, and as he passed through he preached the gospel to all the towns until he came to Caesarea.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ६६:८-९,१६-१७,२०
प्रतिसाद : पृथ्वीवरील समस्त जनहो, देवाचा जयजयकार करा.
१) लोकहो, आमच्या देवाचे धन्यवाद गा.
त्याच्या स्तवनाचा गजर ऐकू द्या.
त्याने आमचे प्राण वाचवले आहेत.
आमचे पाय ढळू दिले नाहीत.
२) देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, या व ऐका.
त्याने माझ्यासाठी काय काय केले ते मी तुम्हांला सांगतो.
मी माझ्या मुखाने त्याचा धावा केला,
माझ्या जिभेवर त्याचे स्तवन होते.
३) धन्य तो देव !
माझी प्रार्थना त्याने झिडकारली नाही,
आपले प्रेम कमी केले नाही.
Psalm 66:8-9, 16-17, 20
R Cry out with joy to God, all the earth.
O peoples, bless our God; I
et the voice of his praise resound,
of the God who gave life to our souls
and kept our feet from stumbling. R
Come and hear, all who fear God;
I will tell what he did for my soul.
To him I cried aloud,
with exaltation ready on my tongue. R
Blest be God, who did not reject my prayer,
nor withhold from me his merciful love. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
येशूने थोमाला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून श्रद्धा ठेवली आहे. पाहिल्यावाचून श्रद्धा ठेवणारे ते धन्य.
आलेलुया !
Acclamation:
I am the living bread that came down from heaven, says the Lord; if anyone eats of this bread, he will live for ever.
शुभवर्तमान योहान ६:४४-५१
वाचक :योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"स्वर्गातून उतरणारी जिवंत भाकर मीच आहे."
येशूने लोकसमुदायाला म्हटले, “ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेष्ट्यांच्या ग्रंथात लिहिले आहे की, 'ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील.' जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही, जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हांला सत्य सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मात्रा खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की, ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे, ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल, जी भाकर मी देईन ती माझा देह असून जगाच्या जीवनासाठी आहे."
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
John 6:44-51
At that time: Jesus said to the crowds, "No one can come to me unless the Father who sent me draws him. And I will raise him up on the last day. It is written in the Prophets, 'And they will all be taught by God.' Everyone who has heard and learned from the Father comes to me not that anyone has seen the Father except he who is from God; he has seen the Father. Truly, truly, I say to you, whoever believes has eternal life. I am the bread of life. Your fathers ate the manna in the wilderness, and they died. This is the bread that comes down from heaven, so that one may eat of it and not die. I am the living bread that came down from heaven. If anyone eats of this bread, he will live for ever. And the bread that I will give for the life of the world is my flesh.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: ख्रिस्ताबरोबर आनंदी व्हा, त्याचा प्रकाश वाटाः आज आपण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली फिलिपला इथियोपियन षंढाला भेटताना आणि सुवार्ता सांगताना पाहतो. त्याच्यासोबत. त्या षंढाचे हृदय उघडले जाते आणि तो येशूचा अनुयायी बनतो. शुभवर्तमानात, येशू घोषित करतो, ज्याने मला पाठवले तो पिता त्याला आकर्षित करत नाही तोपर्यंत कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. फिलिप्प आत्म्याने भरला होता आणि तो त्या षंढाला येशू देऊ शकला. त्याचप्रमाणे, आपण फक्त आपल्याकडे जे आहे तेच देऊ शकतो. जर आपल्याला ख्रिस्ताचा आनंद, शांती आणि प्रेम सामायिक करायचे असेल तर आपण प्रथम ते स्वतःमध्ये अनुभवले पाहिजे. मधमाशा नैसर्गिकरीत्या अमृताकडे आकर्षित होतात, त्याचप्रमाणे प्रामाणिकपणा, दयाळूपणा, आणि सकारात्मकता. इतरांकडून मान्यता मिळवण्याची मग गरज नाही; फक्त तुमचे आंतरिक सौंदर्य आणि चांगुलपणा जोपासण्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही ख्रिस्ताची ऊब, करुणा आणि आनंद पसरवता तेव्हा मधमाशा अमृताकडे आकर्षित होतात तसे इतर लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.
प्रार्थना :- हे परमेश्वरा, पूर्णपणे मी तुजसमोर शरण आलो आहे. समर्पित जीवन जगण्यास मला प्रेरणा व धैर्य दे, आमेन.
0 टिप्पण्या