सामान्यकाळातील तिसरा  सप्ताह

शुक्रवार  दि २६ जानेवारी  २०२४

  ✝️ 

  तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधकमुक्त करील. 
"If you obey my teaching, you are really my disciples; 
✝️


✝️
(भारताचा प्रजासत्ताक दिन)

  प्रभू येशू ख्रिस्त त्या सत्य स्वरुप परमेश्वराचा पुत्र आहे, हे अबाधित सत्य आहे. ख्रिस्तावर श्रद्धा ठेवणारा आणि त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारणाऱ्याला तो सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त करीत असतो. सैतानाच्या दास्यात, पापाच्या अंधकारात आणि असत्याच्या बंधनात असलेल्या सर्वांना मुक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आपले बलिदान दिले. ख्रिस्ताचे दुःखसहन, कुसावरील मरण, वैभवी पुनरूत्थान आणि स्वर्गरोहण हे सुद्धा सत्य आहे. ह्या सत्यावर श्रद्धा ठेवणारा व ख्रिस्ताला स्वीकारणारा कोणत्याच  बंधनात अडकून पडत नाही. आज प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वचनाप्रमाणे  आचरण करणाऱ्यांस सांगत आहे की, 'तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हास बंधमुक्त करील.' सर्व प्रकारच्या बंधनातून आपली मुक्तता व्हावी आणि आपण देवाच्या स्वर्गीय आनंदाचे सहभागीदार बनावेत. म्हणून एकमेकांसाठी प्रार्थना करु या. आज भारताचा प्रजासत्ताक दिन असून आपल्या देशातील सर्व प्रकारच्या असत्याचा अंधार नाहीसा होऊन सर्वांना सत्याचा प्रकाश लाभावा  हीच परमेश्वराकडे प्रार्थना.

✝️   

पहिले वाचन १ तीमथ्य २:१-८
वाचक :१ तीमथ्य  पुस्तकातून घेतलेले वाचन

सर्वांत प्रथम हा बोध मी करतो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना रद्वदल्या व उपकारस्तुति करावी; राजांकरितां व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावी, हयासाठी की पूर्ण, सुभक्तीनें व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे. हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावयास योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे. कारण एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांमध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्य आहे. त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले ह्याची साक्ष यथाकाळी द्यावयाची आहे; ह्या साक्षीसाठी मला घोषणा करणारा व प्रेषित, (मी सत्य बोलतो, खोटे बोलत नाही,) विश्वास व सत्य ह्यांसंबधी परराष्ट्रीयांचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले.
प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :

Second Timothy 1: 1-8 or Titus 1: 1-5

1 Paul, an apostle of Jesus Christ, by the will of God, according to the promise of life, which is in Christ Jesus.2 To Timothy my dearly beloved son, grace, mercy, and peace, from God the Father, and from Christ Jesus our Lord.3 I give thanks to God, whom I serve from my forefathers with a pure conscience, that without ceasing, I have a remembrance of thee in my prayers, night and day.4 Desiring to see thee, being mindful of thy tears, that I may be filled with joy,5 Calling to mind that faith which is in thee unfeigned, which also dwelt first in thy grandmother Lois, and in thy mother Eunice, and I am certain that in thee also.6 For which cause I admonish thee, that thou stir up the grace of God which is in thee, by the imposition of my hands.7 For God hath not given us the spirit of fear: but of power, and of love, and of sobriety.8 Be not thou therefore ashamed of the testimony of our Lord, nor of me his prisoner: but labour with the gospel, according to the power of God,

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र ९१:१-६,१०-११
प्रतिसाद :  परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असें म्हणतों; तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितों.

१) जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो, 
तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.
२ परमेश्वराला मी माझा आश्रय,
 माझा दुर्ग असें म्हणतों; तोच माझा देव, 
त्याच्यावर मी भाव ठेवितों.

कारण तो पारध्याच्या पाशापासून घातक 
मरीपासून तुझा बचाव करील.
४ तो तुझ्यावर पाखर घालील, 
त्याच्या पंखांखालीं तुला आश्रय मिळेल; 
त्याचें सत्य तुला ढाल व कवच आहे.

५ रात्रींच्या समयींचें भय, दिवसा सुटणारा बाण,
काळोखात फिरणारी मरी भरदुपारी नाश करणारी पटकी 
ह्यांची तुला भीती वाटणार नाही  

१० म्हणून कोणतेंहि अरिष्ट तुझ्यावर येणार
नाहीं, कोणतीहि व्याधि तुझ्या तंबूजवळ येणार नाहीं.
कारण तुझ्या सर्व मार्गात तुझें रक्षण करण्याची 
तुझ्याविषयीं तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल.

PsalmsPsalms 91: 1-5,10-11

God Our Protector


 Whoever goes to the LORD for safety, whoever remains under the protection of the Almighty,can say to him, "You are my defender and protector. You are my God; in you I trust.


He will keep you safe from all hidden dangers and from all deadly diseases. He will cover you with his wings;

 you will be safe in his care; his faithfulness will protect and defend you.


 You need not fear any dangers at night or sudden attacks during the day or the plagues that strike in the dark or the evils that kill in daylight.


 and so no disaster will strike you, no violence will come near your home.God will put his angels in charge of you to protect you wherever you go.


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
 प्रभू म्हणतो,
मी तुम्हांला निवडले व तुम्हांला नेमले आहे, ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे.
  आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.

 I chose you from the world, to go and bear fruit that will last, says the Lord.

Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  योहान ८:३१-४२

वाचक :  योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेविला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनांतराहिला तर खरोखर माझे शिष्य आहा; तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधकमुक्त करील. ते त्याला म्हणाले, आम्ही अब्राहामाचे वंशज आहो व कधीही कोणाच्या दास्यांत नव्हतो; तर तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता ?येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हांला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करितो तो पापाचा दास आहे. दास घरात सदासर्वदा राहत नाही, पुत्र सदासर्वदा राहतो. म्हणून जर पुत्र तुम्हांला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधकमुक्त व्हाल. तुम्ही अब्राहामाचे वंशज आहा हे मला ठाऊक आहे, तरी तुम्ही तुम्हांमध्ये माझ्या वचनाला जागा नाही; म्हणून तुम्ही मला जिवे मारावयास पाहता. मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसेच तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले ते करिता.त्यांनी त्याला उत्तर दिले, आमचा पिता अब्राहम आहे. येशू त्यांना म्हणाला, तुम्हीअब्राहामाची मुले आहा तर अब्राहामाची कृत्ये करा; परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हाला सांगितले त्या मनुष्याला म्हणजे मला तुम्ही आता जिवे मारावयास पाहता; अब्राहामने असे केले नाही. तुम्ही आपल्या पित्याची कृत्ये करिता. ते त्याला म्हणाले, आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही. आम्हांस एकच पिता म्हणजे देव आहे. येशूने त्यांना म्हटले, देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीति केली असती; कारण मी देवापासून निघालो व आलो आहे; मी आपण होऊन आलो नाही, तर त्यानेच मला पाठविले.

प्रभूचे हे शुभवर्तमान 

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:John 8:31-42

So Jesus said to those who believed in hirn, "If you obey my teaching, you are really my disciples; 32 you will know the truth, and the truth will set you free."33 "We are the descendants of Abra- ham," they answered, "and we have never been anybody's slaves. What do you mean, then, by saying, 'You will be free'?"

34 Jesus said to them, "I am telling you the truth: everyone who sins is a slave of sin. 35 A slave does not belong to a family permanently, but a son belongs there for ever. 36 If the Son sets you free, then you will be really free. 37 I know you are Abraham's descendants. Yet you are trying to kill me, because you will not accept my teaching. 38 I talk about what my Father has shown me, but you do what your father has told you."39 They answered him, "Our father is Abraham."

"If you really were Abraham's chil- dren," Jesus replied, "you would dot the same things that he did. 40 All I have ever done is to tell you the truth I heard from God, yet you are trying to kill me. Abraham did nothing like this! 41 You are doing what your father did.""God himself is the only Father we have," they answered, "and we are his true sons."42 Jesus said to them, "If God really were your Father, you would love me, because I came from God and now I am here. I did not come on my own authority, but he sent me.

  This is the Gospel of the Lord 

Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनआज आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. आपण स्वतंत्र झालो आणि आपल्या देशाला सार्वभौमत्व प्राप्त झाले आणि देशात लोकशाही तंत्र अस्तित्वात आले. आपली प्रगतीपथाकडे वाटचाल झाली आणि आपल्या देशाने खूप प्रगती केली. आज आपण ह्या बाह्य- स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत. पण आपले अंतःकरण स्वतंत्र झाले आहे का? की आजदेखील मी पापांच्या गुलामगिरीत खितपत पडलेलो आहे. प्रभू येशू सांगतो, “जो कोणी पाप करितो तो पापाचा गुलाम आहे." माझ्या पापांमुळे मी अजून गुलाम आहे, पूर्णपणे बंधमुक्त झालेलो नाही. मला ह्या गुलामगिरीतून बंधमुक्त करणारा फक्त प्रभू येशू ख्रिस्तच आहे: “जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल." ह्या स्वातंत्र्यासाठी मुक्तिदात्या प्रभू येशूवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे, कारण ह्या विश्वासामुळेच आपणास सत्य समजेल व सत्य आपणास बंधमुक्त करील.” प्रभू येशूच "मार्ग, सत्य आणि जीवन" आहे. आपले खरे स्वातंत्र्य आणि जीवनाचा आनंद प्रभू येशू ख्रिस्तामध्येच आहे.

प्रार्थना :हे प्रभू येश, आम्ही सर्वस्वी तुझ्या सत्यात आम्हाला समर्पित करतो,  आम्हाला बंधमुक्त कर, आमेन.

✝️